
-
The Creative Process Of Shama Sikander’s Captivating Photoshoot (Behind The Scenes)

Shama Sikander has truly been one diva in the Indian entertainment scenario for whom earning love and attention of the audience has been a sheer natural process. Apart from being respected as a successful artiste, Producer, and mental health advocate, Shama is also someone who has throughout her entire life managed to establish a personal connection with her audience. Be it her career in entertainment as an actor and Producer or because of her ravishing persona and swag quotient as a super model, Shama Sikander has truly battled all odds against her and has proven the fact big time that an ‘ambitious’ woman is actually an ‘unstoppable’ woman.
Her social media handle is nothing less than a work of art and no wonder, the aesthetic visual pleasure that her audience derives out of is simply unparalleled. She’s got the hots and charm to give any modern-day youngster a serious run for her money and well, the snaps speak for themselves.
One thing that’s always been consistent in Shama’s case is that her photoshoots are always well planned and executed with the right amount of research and efforts that are needed. Everything, right from the props used to the outfit, the pose, the camera angles and the theme has to be on point and that’s when Shama is at her absolute best. In one of her recent photos as well, she’s making everyone drool big time. The thematic representation of the photo suggests a calm and soothing feeling and that’s why, the treatment and use of white is well justified. Shama is seen in her element with her eyes closed in a relaxed zone and we absolutely love the whites. The subtle use of red at the background alongside thin branches makes the photo all the way more vibrant as it perfectly brings forward the essence of ‘purity’ and ‘delicacy’ in her soul and personality. Not just that, we love the use of white flower bouquet as we all know that it establishes the idea of purity, innocence and sympathy, all in one and in the best way possible. Given the fact that Shama herself is known as a pure and empathetic soul, she’s truly the quintessential muse for this thematic shot that communicates the essence of these wonderful attributes. The picture itself tells a story and the message behind the shoot blended with Shama’s natural, captivating aura makes it a deadly combination and a true force to reckon with. The overall shot is artistic in the true sense of the term and the research and preparation behind getting the act right deserves an appreciation as well. In case you haven’t seen the picture before, here you go. Check it out and get ready for a delightful experience for your eyes

Regarding the incredible photoshoot, Shama Sikander was quoted saying,
“This photoshoot was done for my birthday. The idea behind this was a birthday suit. I feel like every time, I feel that I have a rebirth and I get wiser. I personally don’t like to use the word ‘older’. I prefer calling myself ‘wiser’ and more confident and integrated with myself. That was the thought behind this shoot specifically. The process was very simple. I have this beautiful decor done at home for my birthday and I just wanted to make myself feel like a queen. At the same time, I also wanted the feeling of a child just being born. So, this was all about child-like innocence blended with the power of becoming more of me. So yeah, that’s exactly the idea that was there behind this photoshoot and I am glad it turned out to be well.”
Well, Shama Sikander truly knows what she’s best at and that’s what makes her such an alluring and confident personality from whom there’s so much to learn. The shot is truly a 10/10 and we certainly look forward to more such thematic shots with Shama as the muse. On the work front, Shama Sikander also has interesting work projects going forward, the official announcements of which will happen soon as per the ideal timelines. Stay tuned for more updates. -
Rashami Desai visits Ram Mandir in Ayodhya

Rashami Desai is one of the most adored and respected actresses in the Indian entertainment industry. As an artiste, she has always pushed the envelope beyond usual limits to slay and well, her incredible body of work speaks volumes for itself. As an individual, in different stages of life, she’s proven her grit, dedication and mental strength on many occasions and well, without any element of doubt, one big reason behind that has been her consistent faith in spirituality. She’s always someone who gives a sense of calm and cool and it’s truly soothing indeed.
Quite often, we see Rashami visiting different temples as she believes in practicing her faith to good effect. Well, that’s exactly why she decided to take time away from her busy schedule to visit the special Ram Mandir at Ayodhya. It is to be noted that ever since the temple was opened for visitors, Rashami couldn’t visit due to her hectic schedule. But well, when she could visit, she certainly made the most out of it.
Not just the Ram Mandir, Rashami also visited the auspicious Siddhipeet Hanuman Mandir and what grabbed the most attention was how she actually stood in the queue like a normal citizen despite being offered special treatment. Regarding her visit to Ayodhya for the temple visits, Rashami said and we quote,
“Ayodhya has changed immensely for the better. Ever since the mandir was open, I wanted to come. It’s been long but the wait was worthwhile. There’s a different sense of positive aura in the surroundings and I truly cherished every bit of it. Also, I believe that nobody is a celebrity in front of God. For God, everyone is equal and hence, there was no way I would have done my darshan by taking any special treatment. I was very happy waiting in the queue for my turn as it’s a part of my honest faith in God. I truly loved the experience of both the temples and I look forward to seeking blessings in the future as well going forward. Jai Bajrangbali. Jai Shree Ram.”
Well, kudos to Rashami Desai for being a true citizen of the country and actually practicing her faith like anyone else without choosing or preferring any kind of special treatment. This honest and humble nature of Rashami is what appeals to people the most and we love it. On the work front, Rashami Desai has many interesting projects going forward apart from her work in JNU and we truly can’t wait. Here’s wishing her good luck and success for everything going forward. Stay tuned for more updates.
-
पुण्यातील रसिकप्रेक्षकांनी केलेल्या प्रेमाचा वर्षावात न्हाऊन निघालेला चॅम्पियन कार्तिक आर्यन कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाला, “कोटी कोटी धन्यवाद, पुणे!”

कार्तिकच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि समीक्षकांनीही भरभरून कौतुक केले आहे. या दरम्यान कार्तिक आर्यन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अलीकडेच पुण्यात आला होता.
अभिनेत्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत असल्यानुसार, चाहते त्यांच्या चॅम्पियन- कार्तिक आर्यनला मॉलमध्ये प्रत्यक्ष बघून हरखून गेले होते. या युवा सुपरस्टारने मंचावर प्रवेश करताच, चाहत्यांचा आनंद व उत्साह शिगेला पोहोचला, त्याच्या नावाचा जयजयकार केला जात होता, शिट्ट्या वाजवत चाहते कार्तिकच्या नावाचा पुकारा करत होते. चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार करीत, कार्तिकने आनंदाने चाहत्यांना त्याच्यासोबत फोटो काढू दिले. उत्साही चाहत्यांसोबत त्याने सेल्फी घेतले, त्याच्या सर्व चाहत्यांना कार्तिकने ऑटोग्राफ दिले, त्याच्या चाहत्या असलेल्या स्त्रीवर्गाकडून गुलाब स्वीकारले आणि त्यांच्याशी मराठीत संवाद साधून, त्यांना आश्चर्यचकित केले.
*स्वारस्यपूर्ण गोष्ट म्हणजे, कार्तिकने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओत एक कॅप्शन मराठीतही आहे, ज्यात त्याने मान्यता मिळवून देणारी ओळख प्रदान केल्याबद्दल आणि प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल त्याच्या चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे, ते असे-
*”तुमचा चंदू चॅम्पियन एवढं प्रेम बघून खूप खूप खूष झाला!
कोटी कोटी धन्यवाद, पुणे ❤️❤️
ChanduChampion”
‘चंदू चॅम्पियन’ मधील त्याच्या अभिनयाबद्दल कार्तिकचे मोठे कौतुक होत आहे. या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट म्हणून प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या मोठ्या पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे. कार्तिकची अभूतपूर्व कामगिरी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे, प्रेक्षकांच्या भावनांना हात घालत आहे.
साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांनी संयुक्तपणे निर्मिती केलेला, ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट १४ जून २०२४ रोजी प्रदर्शित झाला. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयावर अमिट छाप उमटणार आहे. या चित्रपटातील आपल्या उत्कृष्ट कामगिरीने कार्तिक आर्यनने रसिक प्रेक्षकांचे मन जिंकले असून, चित्रपटाच्या यशात मुरलीकांत पेटकर यांची लक्षवेधी कथा आणि अभिनेत्याने जीव तोडून केलेली कामगिरी यांचा मोठा वाटा आहे.
-
अभिनेत्री, लेखिका मधुरा वेलणकर साटम यांना यंदाचा “मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार” प्रदान

चार राज्य पुरस्कारांची आणि इतर अनेक पुरस्कारांची मानकरी ठरलेली एक चतुरस्र अभिनेत्री म्हणून आपल्याला परिचित असलेल्या आणि नाट्य-चित्रपट-अभिनय शिबिरं-कार्यशाळा अशा नानाविध माध्यमांतून गेल्या दोन दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात घोडदौड करणाऱ्या, ३०हुन अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम हिने अगदी सहजच लेखन क्षेत्रातही पाऊल टाकलं आणि तिचे पहिलवहिले लेखिका म्हणून असलेले ‘मधुरव’ पुस्तकही अल्पावधीतच लोकप्रिय ठरल.
“मधुरव” ह्या रसिक आंतरभारती प्रकाशित पुस्तकासाठी यंदाचा “मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार” सोलापूर येथे सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते नुकताच अभिनेत्री, लेखिका मधुरा वेलणकर साटमला प्रदान करण्यात आला.
राज्यस्तरीय पुरस्कार-मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, आणि रोख एकवीस हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
“मधुरव” पुस्तकाच्या निमित्ताने अभिनेत्री, लेखिका मधुरा वेलणकर साटम यांना पुरस्कार
उमेद पुरस्कार कला गौरव पुरस्कार, कर्तृत्त्व आभा पुरस्कार, राणी सईबाई पुरस्कार, रोटरी लाईन्स, क्लब यंग गेस्ट अचीवर अवॉर्ड, व्ही.शांताराम पुरस्कार अशा अभिनयासाठी मिळालेल्या अनेक विविध पुरस्कारांनांतर लेखनाकरिता मिळालेल्या ह्या पुरस्काराचे मोल हे नक्कीच विशेष आणि नवीन ऊर्जा देणारे असल्याचे अभिनेत्री,लेखिका मधुरा वेलणकर साटम हिने सांगितले. तसेच सध्या माया या नवीन कादंबरीचे लेखन सुरु असल्याचे ही तिने आवर्जून नमूद केले.
-
‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार श्रीमती रोहिणी हट्टंगडी व मा.श्री. अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार तहहयात विश्वस्त मा.श्री. शरद पवार यांच्या हस्ते प्रदान.

नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ १४ जून २०२४ रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मा.श्री. अशोक सराफ आणि मा.श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांना तहहयात विश्वस्त मा.श्री. शरद पवार व इतर मान्यवर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच या सोहळ्याचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण नाटय संकुलाच्या नूतनीकरणानंतर यशवंत नाट्य मंदिर रसिकार्पण सोहळा देखील संपन्न झाला. ह्या सोहळ्याला अ.भा.मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त मा.श्री. शरद पवार साहेब, नाटयसंमेलनाध्यक्ष मा.डॉ. जब्बार पटेल, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त मा.श्री. शशी प्रभू, उद्योगमंत्री तथा अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त मा.ना.श्री. उदय सामंत, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त मा.श्री.मोहन जोशी, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त मा.श्री.अशोक हांडे, पोलीस आयुक्त मा.श्री. विवेक फणसळकर, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच ह्या सोहळ्यात प्रायोगिक ८ पारितोषिके, व्यावसायिक १४ पारितोषिके आणि नाट्य परिषदेकडून देण्यात आलेली १३ पारितोषिके अशी एकूण ३५ पारितोषिके प्रदान करण्यात आली.

शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या नाट्य कलेचा जागर महोत्सवमध्ये अंतिम फेरीत बालनाट्य, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, एकपात्री, नाट्य अभिवाचन, एकांकिका ह्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे सादरीकरण झाले.
-
वैजू साकारताना माझ्या प्रेरणास्थानी होत्या दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील,” स्टार प्लस वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेतील वैजू ऊर्फ ऋतुजा बागवे सांगतेय तिच्या भूमिकेविषयी!

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेत ऋतुजा बागवे आणि अंकित गुप्ता मुख्य भूमिका निभावत आहेत. ऋतुजा बागवे ही वैजयंती (वैजू) ही भूमिका साकारत असून अंकित गुप्ता रणविजयच्या भूमिकेत दिसेल.
महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये घडणाऱ्या या कथानकात वैजूचा संघर्ष आणि तिच्या प्रवासाची कहाणी बघायला मिळते, जी शेतात राबून पैसे कमावते आणि कुटुंबाला हातभार लावते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच आहे. वैजू कुटुंबाभिमुख, मेहनती आणि दूरदर्शी आहे आणि आपले जीवनमान उंचावणे व गावाच्या सुधारणेसाठी काम करणे हे तिचे ध्येय आहे.
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या मालिकेत वैजूच्या भावनिक उलथापालथीचे चित्रण करण्यात आले आहे, जी तिच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी सर्वतोपरी संघर्ष करतेय. रणविजयशी भेट झाल्यानंतर तिच्या आयुष्यात घडणारे बदलही या मालिकेतून बघता येतील.
या मालिकेत नातेसंबंधातील गुंतागुंत आणि संस्कृतीतील विशिष्ट बारकावे यांचेही चित्रण केले जाणार आहे. उद्भवलेल्या अनपेक्षित परिस्थितीत होणारे वैजू आणि रणविजय यांचे लग्नही प्रेक्षकांना पाहता येईल. तिचे जीवनमान उंचावत आणि गावात सुधारणा घडवून आणण्याची तिची महत्त्वाकांक्षा कायम ठेवत ज्या लग्नात प्रेमाचा लवलेश नाही, त्या विवाहाच्या नात्यात वैजूला प्रेम कसे प्राप्त होते, हे पाहणे रंजक ठरेल.
ऋतुजा बागवेने वैजूची भूमिका साकारली आहे. वैजू ही एक खंबीर, स्वतंत्र स्त्री आहे, जी निर्भयतेचे मूर्त रूप आहे आणि प्रख्यात अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याप्रमाणेच, स्वप्ने पूर्ण करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या सर्व महिलांकरता एक प्रेरणादायी उदाहरण आहे. वैजू आणि स्मिता पाटील यांच्यात आणखी एक साम्यस्थळ आहे, ते म्हणजे या दोघीही मराठमोळ्या आहेत आणि शक्ती व अभिमान यांचे चित्रण करणाऱ्या आहेत. स्मिता पाटील यांनी बाजार, मिर्च मसाला, अर्थ आणि अशा कितीतरी उल्लेखनीय चित्रपटांतून स्त्री सक्षमीकरणाच्या भूमिका चितारल्या आहेत, तर ऋतुजा बागवे हिने ‘नांदा सौख्य भरे’ आणि ‘चंद्र आहे साक्षीला’ या भूमिकांकरता प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. आश्चर्य वाटेल इतका सारखेपणा स्मिता पाटील आणि वैजू यांच्यात आहे, हे लक्षात घेता, निःसंशयपणे प्रेक्षकांकरता वैजूला बघणे हे आनंददायी असेल, कारण ती आपल्याला भूतकाळात घेऊन जाते आणि स्मिता पाटील यांची आठवण करून देते.
‘स्टार प्लस’ मालिकेत ‘माटी से बंधी डोर’मध्ये वैजूची भूमिका करणारी ऋतुजा बागवे मनोगत व्यक्त करताना म्हणाली, “माटी से बंधी डोर या मालिकेत, मी वैजूची व्यक्तिरेखा साकारत आहे, जी खंबीर आहे, स्वतंत्र आहे आणि निडर आहे. वैजू ही व्यक्तिरेखा साकारताना माझ्यासमोर दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील यांचा आदर्श आहे. त्यांचा वेगळा लूक आणि ज्या साधेपणाने, अभिजाततेने त्या भूमिका साकारायच्या, त्यातून बरेच काही शिकत मी वैजूचे पात्र साकारत आहे. स्मिता पाटील या चित्तवेधक, निर्भय, सहजसुंदर आणि समतोल व्यक्तिमत्त्वाच्या जणू प्रतीक आहेत. त्या माझ्याकरता खरोखरीच प्रेरणास्थानी आहेत आणि माझ्या वैजू या व्यक्तिरेखेद्वारे, प्रेक्षकांना या वैजूत स्मिता पाटीलची झलक दिसावी आणि वैजू ही इतरांकरता प्रेरणा ठरावी असे मला वाटते.”
‘माटी से बंधी डोर’ ही मालिका ‘स्टार प्लस’ वाहिनीवर सोमवार ते रविवार संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होते. -
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’.. १७ जूनपासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका

१७ जूनपासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं. कुठलंही नातं टिकवायचं असेल तर फक्त आपल्याच बाजूने विचार करून चालत नाही. नातं परिपूर्ण होण्यासाठी थोडं तुझं आणि थोडं माझं असावं लागतं. स्टार प्रवाहच्या या नव्या मालिकेतूनही अश्याच नात्यांची गोष्ट उलगडेल. स्टार प्रवाहच्या देवयानी मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि गोठ मालिकेमधून लोकप्रियता मिळालेला सुप्रसिद्ध अभिनेता समीर परांजपे यांची जोडी या मालिकेतून भेटीला येईल. अभिनेत्री मानसी कुलकर्णी देखिल या मालिकेच्या निमित्ताने तब्बल १० वर्षांनंतर मालिका विश्वात पदार्पण करणार आहे.

या नव्या मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘कोणतीही गोष्ट एकट्याने होत नसते. जोडीदाराची थोडी मदत ही लागतेच. थोडं तुझं आणि थोडं माझं ही अशीच गोष्ट आहे. परस्पर नाते संबंध उलगडणाऱ्या गोष्टी सांगण्याचा स्टार प्रवाहचा कायम प्रयत्न असतो. या मालिकेतूनही अशीच एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे आपल्या अवती भवती जिव्हाळ्याची काळजी करणारी माणसं आहेत. आयुष्य हे जोडून घेतल्यावरच सुंदर असतं. एक प्रेम कथा उलगडताना कौटुंबिक आव्हानं पेलत नायक आणि नायिका हे त्यांचं नातं कसं फुलवत नेतील हे पहायला रसिकांना आवडेल ही खात्री आहे.’

तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकेत काम करण्यासाठी अभिनेत्री शिवानी सुर्वे फारच उत्सुक आहे. ‘स्टार प्रवाह कुटुंबासोबत पुन्हा एकदा जोडली जातेय याचा आनंद आहे. स्टार प्रवाहच्या मालिकांचे विषय, त्याची मांडणी मला खूपच भावते. त्यामुळेच थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेसाठी मी लगेच होकार दिला. मानसी हे पात्र मला अतिशय आवडलं. देवयानी मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. हेच प्रेम आणि यश माझ्या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे.’ अश्या शब्दात शिवानीने आपली भावना व्यक्त केली.

स्टार प्रवाहच्या या नव्या मालिकेत काम करण्यासाठी समीर प्रचंड उत्सुक आहे. तेजस या व्यक्तिरेखविषयी सांगताना समीर म्हणाला, ‘तेजस ही व्यक्तिरेखा खूपच वेगळी आहे. तो खोडकर आहे. त्याला कुणी डिवचलं तर तो आपलं म्हणणं खरं करण्यासाठी वाट्टेल ते करु शकतो. मालिकेचं नाव आणि गोष्ट खूपच भावली मला. कोणतंही नातं एकतर्फी असून चालत नाही. थोडं तुझं आणि थोडं माझं करतच नातं टिकवावं लागतं. त्यामुळे प्रत्येक वगोगटाला आपलीशी वाटेल अशी गोष्ट आणि पात्र या मालिकेची जमेची बाजू म्हणता येईल.

अभिनेत्री मानसी कुलकर्णी गायत्री प्रभू हे पात्र साकारणार आहे. १० वर्षांनंतर मालिका विश्वात पुनरागमन करताना प्रचंड उत्सुकता असल्याची भावना मानसीने व्यक्त केली. ‘गायत्री हे पात्र खूपच हटके आहे. तिची महत्त्वाकांक्षा तिच्या वागण्या-बोलण्यातून जाणवते. आपल्यापेक्षा वरचढ ठरणारं कुणी असू नये यासाठी तिची सतत धडपड सुरु असते.
स्टार प्रवाह प्रस्तुत थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेची निर्मिती अतुल केतकर आणि अपर्णा केतकर यांच्या राईट क्लिक मीडिया सोल्युशन्स या निर्मिती संस्थेने केली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कणसे या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं १७ जूनपासून रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर. -
अष्टपदी’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त क्लॅप खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी दिला

‘अष्टपदी’ या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी ‘अष्टपदी’ चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला होता. तेव्हापासून अनोख्या शीर्षकामुळे या चित्रपटाबाबत कुतूहल वाढलं आहे. चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार आणि यात कोणकोणते कलाकार झळकणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आजवर गुलदस्त्यात असलेल्या गोष्टी हळूहळू बाहेर येऊ लागल्या आहेत.
निर्माते उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील यांनी महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली ‘अष्टपदी’ चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. उत्कर्ष जैन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. श्रीगणेश गीताच्या रेकॅार्डिंगने ‘अष्टपदी’चा मुहूर्त झाल्यानंतर सध्या या चित्रपटाची संपूर्ण टिम कोल्हापूर मुक्कामी आहे. कोल्हापूरमध्ये चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी खासदार छत्रपती शाहू महाराज, ज्येष्ठ कलादिग्दर्शक संतोष फुटाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुहूर्त पार पडला. याप्रसंगी खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी मुहूर्त क्लॅप दिला तसेच चित्रपटाच्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर आणि आसपासच्या भागांमध्ये या चित्रपटाचा महत्त्वपूर्ण भाग चित्रीत केला जाणार आहे. कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या चित्रीकरणाबाबत दिग्दर्शक उत्कर्ष जैन म्हणाले की, करवीर निवासिनी अंबाबाईच्या वास्तव्याने पावन झालेल्या कोल्हापूर नगरीमध्ये ‘अष्टपदी’चं चित्रीकरण करत असल्याचा एक वेगळा आनंद आहे. चित्रपटाची संपूर्ण टिम नवीन उर्जेने आणि प्रचंड ताकदीनिशी तयारीला लागली असून आजवर कधीच रुपेरी पडद्यावर न आलेलं कथानक प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याची ग्वाही देखील उत्कर्ष यांनी दिली.‘अष्टपदी’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला कोल्हापूरमध्ये सुरूवात…

संतोष जुवेकर ‘अष्टपदी’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार असून मयुरी कापडणे, अभिनव पाटेकर, मिलिंद फाटक, मोना कामत, स्वप्नील राजशेखर, मिलिंद दास्ताने, विशाल अर्जुन, विनिता काळे, चंदा सारसेकर, कल्पना राणे, नयना बिडवे आदी कलाकार कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘अष्टपदी’चे क्रिएटिव्ह दिग्दर्शक असलेल्या महेंद्र पाटील यांनी अष्टपैलू कामगिरी करीत या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लिहिले आहेत. संगीतकार मिलिंद मोरे यांचं संगीत आणि पार्श्वसंगीत या चित्रपटाला लाभलं आहे. सिनेमॅटोग्राफी डिओपी धनराज वाघ करणार असून, कला दिग्दर्शन निलेश रसाळ यांचं आहे. राहुल पाटील आणि नंदू आचरेकर या चित्रपटाचे सहदिग्दर्शक असून अजय खाडे कार्यकारी निर्माते आहेत. रंगभूषा अतुल शिधये करीत असून वेशभूषा अंजली खोब्रेकर यांची आहे.
-
Bharatnatyam Artist ‘Rohini Banerjee’ awarded with The Nritya Bharti Award 2024 at Kala Academy, Panjim , Goa

Bharat Nrutya Mahotsav 2024 took place on 6th June 2024 at Kala Academy in Panjim, Goa. This event was organized by Akhil Natrajam Aantar Sanskrutik Sangh, Nagpur, a member of the International Dance Council CID, Paris, France. As part of the Bharat Nrutya Mahotsav-2024, the international dance contest and festival, the award honored various artists.
Rohini Banerjee, a Bharatnatyam artist and the principal of Krishankshi Bharatnatyam Dance Academy in Vasai, as well as a dance teacher at Podar International School, Vasai, and a disciple of Dr. Kishu Pal Madam was among the awardees. She was awarded as nrutya bharti award 2024 by the chief guest, Versatile Choreographer Ashish Patil. -
अजिंक्य आणि अश्विनी यांची जोडी पुन्हा जमली

आजवर रुपेरी पडद्यावर नायक नायिकेच्या अनेक लोकप्रिय जोड्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवणारी अशीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे अजिंक्य देव आणि अश्विनी भावे. लवकरच पुन्हा एकदा ही जोडी ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने रसिक दरबारी हजेरी लावणार आहे. प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या सुरेख टीझर नंतर हा चित्रपट रसिकांसाठी वेगळी ट्रीट असणार हे नक्की.
पॅनोरमा स्टुडिओज आणि नॅविअन्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘घरत गणपती’ हा भव्य चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.
शरद घरत आणि अहिल्या घरत या व्यक्तिरेखा ते साकारणार आहेत. या चित्रपटात अजिंक्य देव आपल्याला कुटुंबवत्सल पती, प्रेमळ वडिल अशा भूमिकेत दिसणार असून कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहणाऱ्या करारी आईची व्यक्तिरेखा अश्विनी भावे साकारणार आहेत. याआधी ‘शाब्बास सूनबाई’,‘मायेची सावली’,‘चल गंमत करू’, ‘सरकारनामा’ या चित्रपटांद्वारे आमच्यातली केमिस्ट्री पडद्यावर चांगलीच खुलली आता २५ वर्षांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करण्याचा आनंद व्यक्त करीत, आमची केमिस्ट्री रसिकांना आनंद देईल, असं हे दोघे सांगतात. चित्रपटाचा सुंदर विषय व आमचे काम प्रेक्षकांना नक्कीच भावेल, असा विश्वासही दोघांनी व्यक्त केला.
आधीच्या चित्रपटातील या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली असल्याने ही जोडी पुन्हा एकत्र असणं हा ‘घरत गणपती’ चित्रपटाचा सर्वात मोठा ‘प्लस पॉइंट’ आहे. श्री गणराया’च्या आगमनाच्या निमित्ताने घरत कुटुंबातल्या अनुबंधाची हलकी-फुलकी गोष्ट ‘घरत गणपती’ चित्रपटात पहायला मिळणार आहे.
