
-
स्टार प्रवाहच्या येड लागलं प्रेमाचं मालिकेत अतिशा नाईक साकारणार खलनायिका

२७ मे पासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका येड लागलं प्रेमाचं. पंढरपुरच्या मातीत रंगलेली रांगडी प्रेम कहाणी अभुनवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. उत्कंठावर्धक कथानकासोबतच दिग्गज कलाकारांची फौज या मालिकेची आणखी एक जमेची बाजू. सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक या मालिकेतून खलनायिकेच्या रुपात भेटीला येतील. शशीकला असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून कोणाचही भलं झालेलं तिला आवडत नाही. प्रत्येकाबद्दलच तिच्या मनात एक असूया आहे. अभिनेत्री होण्याचं शशीकलाचं स्वप्न होतं. मात्र हे स्वप्न अधुरच राहिलं. त्यामुळे नटण्याची तिला प्रचंड आवड आहे.

स्वार्थी, अप्पलपोटी आणि पैशांचा माज दाखवणारी अशी ही शशीकला साकारताना अभिनेत्री म्हणून कस लागत आहे अशी भावना अतिशा नाईक यांनी व्यक्त केली. या भूमिकेबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, मी आजवर अनेक खलनायिका साकारल्या. मात्र शशीकलाची बातच न्यारी आहे. तिची घरात प्रचंड दहशत आहे. तिच्या पेहरावातून, चालण्यातून, बोलण्यातून याची कल्पना येते. मला खात्री आहे शशीकलाचा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच भावेल. शशीकलाच्या दागिन्यांची, तिच्या साड्यांची नक्कीच चर्चा रंगेल. शशीकलाचा मालिकेतली मुख्य नायिका म्हणजेच मंजिरीवर विशेष राग आहे. मंजिरी या घरात नसती तर एव्हाना शशीकलाने संपूर्ण घर आपल्या नावावर करुन घेतलं असतं. मंजिरीच्या सुरळीत होणाऱ्या गोष्टींमधे अडचणी आणून त्या कुटुंबाची कोंडी करायची हे काम शशीकला नेटानं करत असते. शशीकलाचे डाव यशस्वी होतात का हे पहायचं असेल तर नक्की पहा आमची नवी मालिका येड लागलं प्रेमाचं २७ मे पासून रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
-
Vaarun Bhagat steals the show by giving one of the most defining performance in Undekhi 3

As the highly anticipated series Undekhi 3 finally graces our screens, viewers are left in awe of actor Vaarun Bhagat’s exceptional portrayal of Lucky Paaji. Vaarun known for his dynamic range, has once again proved his mettle by showcasing a never-before-seen avatar in the series.
The actor, known for his ability to breathe life into diverse characters, brings a vibrant energy to the screen with each appearance. In Undekhi 3, Vaarun Bhagat undergoes a remarkable transformation, transitioning effortlessly from a dashing macho man to a charming romantic lover.
Undekhi Season 3 has finally hit the screens, and the buzz is electrifying! Fans are diving headfirst into the gripping narrative, and can’t contain their excitement. From Luck Paji’s enigmatic aura to his intricate layers of emotion, viewers are in for a rollercoaster ride.
What’s truly captivating is the depth of Luck Paji’s persona. Audiences are spellbound by his ruthless demeanor juxtaposed with glimpses of his tender, romantic side. Now, as we embark on this exhilarating journey through Season 3, brace yourselves for even more twists, turns, and jaw-dropping moments. Without giving too much away, let’s just say that Luck Paji’s evolution is far from over. As the story unravels, expect to delve deeper into his psyche, uncovering secrets and confronting new challenges.
With his captivating performance, Vaarun Bhagat has once again proven why he is one of the most promising talents in the industry. His ability to seamlessly transition between different roles continues to leave audiences in awe, and his portrayal of Lucky Paaji is yet another feather in his cap. As viewers continue to immerse themselves in the world of Undekhi 3, one thing is for certain — Vaarun Bhagat’s stellar performance is not to be missed.
On the work front, Vaarun Bhagat has been giving some amazing performances in Undekhi 1 and Undekhi 2 Vaarun has also worked in series like Inside Edge, Dulha Wanted, and Aar Ya Paar and was also seen in the T-series music video BIBA. Apart from his recent release Undekhi 3 he also has a few more projects in the pipeline which the official announcement will be made soon. -
अंजली पाटील, शारीब हाश्मी अभिनीत ‘मल्हार’ नात्याच्या विविध छटा उलगडणार

नात्यातील विविध छटा उलगडणाऱ्या ‘मल्हार’ चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून मैत्री, प्रेम, विश्वास या भावना यात दिसत आहेत. व्ही मोशन प्रस्तुत या चित्रपटाचे प्रफुल पासड निर्माते असून दिग्दर्शन आणि लेखन विशाल कुंभार यांनी केले आहे.
कलाकार कोण
या चित्रपटात अंजली पाटील, शारीब हाश्मी, ऋषी सक्सेना, श्रीनिवास पोकळे, विनायक पोतदार, मोहम्मद समद, अक्षता आचार्य, रवी झंकाळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या ७ जून २०२४ रोजी ‘मल्हार’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

गुजरातमधील कच्छच्या ग्रामीण भागात या तीन वेगवेगळ्या कथा घडताना ट्रेलरमध्ये दिसत आहे. यात दोन लहान मुलांची मैत्री, तरूण – तरूणीचे एकमेकांवर असणारे प्रेम आणि एका जोडप्याचे एकमेकांवर असणारा विश्वास अशा तीन कथांचा यात समावेश असून या कथा कोणत्या वळणावर जाणार हे औस्त्युक्याचे ठरणार आहे. हा चित्रपट भावनिक असला तरी लहान मुलांची धमालही यात दिसत आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल कुंभार म्हणाले, ” तीन वेगवेगळ्या वयोगटाची ही कथा आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यातील निरागसता, संभ्रम, घालमेल, विश्वास अशा अनेक भावना यात पाहायला मिळतील. ‘मल्हार’ हा एक कौटुंबिक चित्रपट असून नातेसंबंध कसे जुळतात आणि त्यांचा प्रवास कसा फुलत जातो, हे अतिशय रंजकतेने दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागातील साधेपणा, गावच्या मातीतील सहवास, नात्यांमधील मुळं यावर हा चित्रपट आधारित असल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.’’
-
२७ सप्टेंबरला ‘धर्मा- दि ए आय स्टोरी’ होणार प्रदर्शित

पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली होती. तेव्हापासूनच या वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत होती. अखेर या चित्रपटाची तारीख जाहीर झाली असून येत्या २७ सप्टेंबर २०२४ रोजी ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे प्रोमोमधून दिसत आहे. प्रोमोमधील जबरदस्त संगीत ऐकूनच अंगावर शहारे येतात. एका वडील आणि मुलीची गोष्ट या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा विषय मराठी सिनेसृष्टीला मिळणार आहे, असे म्हणायला हरकत नाही. या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत.
कलाकार कोण
पुष्कर सुरेखा जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यात प्रमुख भूमिकेत दिसतील.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, ” काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात झाली होती. एआयच्या जंजाळात अडकलेल्या आपल्या मुलीच्या शोधात असलेल्या बापाचा प्रवास हा विषय फार आधीपासून माझ्या डोक्यात होता. तेच ‘धर्मा- दि एआय स्टोरी’च्या माध्यमातून दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. ज्यांना या विषयाबद्दल फारसे माहित नसेल, त्यांना या चित्रपटाच्या माध्यमातून हा विषय नक्कीच समजेल. परदेशात फिल्मच्या शुटिंगदरम्यान मला थोडी दुखापतही झाली, परंतु तुम्हा सगळ्या प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे मी सुखरूप बाहेर आलो आणि आता येत्या २७ सप्टेंबरला हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम सोबत असूद्यात.” -
सातासमुद्रापार दिमाखात साकारणार मराठी चित्रपट महोत्सव, साकारतेय मराठी चित्रपटसृष्टी!

परदेशातील वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट पोहोचणं ही गोष्ट दिग्दर्शकासाठी अत्यंत महत्त्वाची असते, पण आता आणखी एक मोठा अभिमानास्पद क्षण आपल्या सर्वांना अनुभवायला मिळणार हे तो म्हणजे, थेट मराठी चित्रपट महोत्सवच अमेरिकेत आयोजित केला जाणार आहे. नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनच्या वतीने कॅलिफोर्निया येथे चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आता केवळ मराठी चित्रपटच नाही तर मराठी चित्रपट महोत्सवही साता समुद्रापार पोहोचला आहे. नॉर्थ अमेरिकेतील मराठी निर्माते अभिजीत घोलप यांनी सुरू केलेल्या NAFA (North American Film Association) या असोसिएशन मार्फत पहिल्यांदाच या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनच्या वतीने कॅलिफोर्निया येथे मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन
या चित्रपट महोत्सवाला अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावणार असून, त्यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळे कार्यक्रमात आयोजित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेते व दिग्दर्शक सचिन पिळगांवकर ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, अभिनेत्री अश्विनी भावे अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर, गीतकार गुरू ठाकूर, अभिनेता सुबोध भावे, अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक, संगीतकार-दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आदी कलाकार मंडळी या चित्रपट महोत्सवास भेट देतील आणि आपले अमूलाग्र मार्गदर्शन करतील. या महोत्सवात NAFA निर्मित “निर्माल्य’’, ‘’अथांग’’ आणि ‘’पायरव’’ या शॉर्टफिल्म्स दाखवल्या जातील. या शॉर्टफिल्म अमेरिकेतच चित्रीत करण्यात आल्या असून तेथील कलाकारांनीच साकारलेल्या आहेत.
NAFA चे संस्थापक अभिजीत घोलप यांनी लोकप्रिय चित्रपट ‘देऊळ’ची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला सुवर्णकमळ मिळाले होते, तर अभिनेते गिरीश कुलकर्णी यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी अमेरिकेत उभारण्याचा त्यांचा मानस लवकरच पूर्ण होईल अशी आशा. त्याचबरोबर घोलप हे अमेरिकेतील उद्योजकही आहेत.NAFA निर्मित ३ शॉर्टफिल्म्सचे महोत्सवात प्रीमिअर
नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या या चित्रपट महोत्सवात ५ फिचर फिल्म्सचे प्रिमिअर, दिग्गजांकडून ६ मास्टरक्लास, ३ पॅनल डिस्कशन, ९ शॉर्ट फिल्म्सचे शो असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. २७ आणि २८ जुलैला कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथे हे चित्रपट महोत्सव संपन्न होईल. मराठी सिनेसृष्टी परदेशात प्रगतीपथावर नेण्यासाठी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल असेल.
-
रितेश देशमुख करणार ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनचे होस्टिंग

संपूर्ण महाराष्ट्र गेली दोन वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होता, तो क्षण आता जवळ आला असून कलर्स मराठी आणि JioCinema वर मराठीतला सुप्रसिध्द शो ‘बिग बॉस मराठी’ चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रसिकांचा आवडता, मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठ्ठा शो “बिग बॉस मराठी” या भव्यदिव्य कार्यक्रमाचे होस्टिंग नामवंत बॅालीवूडचा स्टार, प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता , अवघ्या महाराष्ट्राचाच नाहीतर जगभरातील मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत असलेला “लय भारी” स्टार रितेश देशमुख करणार आहे. कलर्स मराठी आणि JioCinema च्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवर “बिग बॉस मराठी” चा व्हिडिओ शेयर केला आला असून त्यामध्ये बिग बॉसचा डोळा त्याच सोबत बॅालीवूडचा स्टायलिश हिरो आणि रसिकांना ‘वेड’ लावणारा मराठमोळा मुलगा रितेश देशमुख देखील दिसत आहे. या नव्या सिझनचे हे नवे सरप्राईज असणार असून या सिझनमध्ये रितेश देशमुखबरोबरच एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
https://youtu.be/HwD1OYfvOBY
हिंदीमधल्या अफाट यशानंतर ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला. “बिग बॉस मराठी”चा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचला. प्रेक्षक या कार्यक्रमावर बेहद फिदा झाले. “बिग बॉस मराठी” च्या पहिल्या चार सिझननी मराठी प्रेक्षकांची तुफान मने जिंकली आणि मराठमोळ्या थिमसह बिग बॉसच्या चारही सिझनची जगभर जोरदार चर्चा झाली. आता त्याच सर्वाधिक प्रसिध्द असलेल्या “बिग बॅास मराठी” च्या नव्या सिझनची जोरात तयारी सुरू झालीय.
बिग बॅासचे घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची, कुतूहलाची बाब असते. बिग बॅास मराठीचे हे आलिशान घर आता आकार घेऊ लागले आहे. तसेच बिग बॅासच्या घरातील अतरंगी मोहरे यांचीही कसून निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सिझनमध्ये बिग बॅासच्या या आलिशान घरात आणखी काय काय नाविन्य असेल, काय एक्स्ट्रा गॅासिप्स अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन पहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.
-
कान्स मध्ये झळकला “हजारवेळा शोले पाहिलेला माणूस”

हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील “शोले” हा चित्रपट आजही प्रचंड लोकप्रिय आहे. आपल्या नावामुळेच चर्चेत असलेल्या “हजारवेळा शोले पाहिलेला माणूस” या चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच प्रतिष्ठित अशा कान्स फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये करण्यात आले. याप्रसंगी चित्रपट निर्माते शेहजाज सिप्पी,सगून वाघ यांचा सत्कार पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल आणि निर्मात्या श्रीदेवी शेट्टी वाघ आणि जीत वाघ यांचा सत्कार स्वाती म्हसे I.A.S.MD महाराष्ट्र चित्रपट मंच आणि सांस्कृतिक विकास कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या हस्ते करण्यात आला. रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या चित्रपटला मिळाला.
राजेश डेम्पो, भक्ती डेम्पो, सगूण वाघ, श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी “हजारवेळा शोले पाहिलेला माणूस” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शोले मीडिया अँड एंटरटेन्मेंट, कुबेरन्स टेक व्हेंचर्स चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर जीत वाघ असोसिएट प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं आहे. अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम बालकलाकार श्रीरंग महाजन अशी दमदार स्टारकास्ट असून अभिनेते आनंद इंगळे,समीर धर्माधिकारी हे पाहुण्या कलाकारच्या भूमिकेतुन आपल्या भेटीस येणार आहेत.
-
सर्वात जास्त कमाई करणाऱ्या 10 अभिनेत्यांच्या यादीत टायगर श्रॉफ, रणवीर सिंग आणि विकी कौशल यांचा समावेश

बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करून अनेक अभिनेते त्यांचा अभिनयाने कायम प्रेक्षकांना आपलंसं करत आले आहेत. अभिनयाची जादू दाखवून त्यांचा चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. ‘यूआरआय’, ‘वॉर’ आणि ‘पद्मावत’ यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली आहे.
टायगर श्रॉफ -वॉर
बॉलीवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ त्याच्या ॲक्शनर ‘वॉर’सह अव्वल स्थानावर आहे. जो 2019 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 53.35 कोटी रुपयांची ब्लॉकबस्टर ओपनिंग केली होती आणि कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर एकूण 318 कोटींचे कलेक्शन केलं.टायगर श्रॉफ ते रणवीर सिंग पर्यंत बॉलिवुड मध्ये सर्वात जास्त कमाई करणारे चित्रपट असलेले हे अभिनेते
रणवीर सिंग – ‘पद्मावत’
रणवीर सिंग स्टारर ‘पद्मावत’ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 302 कोटींच्या एकूण कलेक्शनसह हा चित्रपट 2018 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून उदयास आला.
विकी कौशल – ‘यूआरआय’
विकी कौशल स्टारर URI ला त्याच्या थीम आणि कथानकासाठी लोकांमध्ये प्रचंड ओळख मिळाली. या चित्रपटाने अंदाजे 245 कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे विकी कौशल हा हजारो वर्षांच्या अभिनेत्यांपैकी एक बनला आणि त्याच्या श्रेयावर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला.
कार्तिक आर्यन – ‘भूल भुलैया 2
‘भूल भुलैया 2’ मध्ये प्रेक्षकांनी कार्तिक आर्यनला यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात पाहिले. प्रेक्षकांच्या गमतीशीर हाडांना गुदगुल्या करणाऱ्या या चित्रपटाने तब्बल 186 कोटींची कमाई केली आहे.
वरूण धवन – ‘दिलवाले’
वरुण धवनने ‘दिलवाले’मध्ये रोमान्स, कॉमेडी आणि ॲक्शन यांचे सहज मिश्रण केले. या रोम-कॉमने श्रोत्यांच्या मनाला भिडले आणि सुमारे 148 कोटी रु. कमावले.
आता चाहते त्यांच्या आवडत्या अभिनेत्यांना त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्स मध्ये बघण्यासाठी उत्सुक आहेत.
https://www.instagram.com/p/C6_gTxCPzM_/?igsh=cGNtaXR3N2t4d2ox -
‘रमा राघव’चा 400 भागांचा टप्पा पार, प्रेक्षकांचे मिळाले भरभरून प्रेम

कलर्स मराठीवरील ‘रमा -राघव’ या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. ही मालिका घराघरात पोहोचली असून सगळे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रेक्षकवर्ग या सगळ्यांवर भरभरून प्रेम करत आहेत. याच प्रेमामुळेच आज ‘रमा -राघव ’ या मालिकेने 400 भागांचा टप्पा गाठला आहे. ‘रमा- राघव’च्या संपूर्ण टीमने सेटवर केक कापून उल्हासीतपणे हा दिवस साजरा केला .
या मालिकेतील रमा आणि राघव यांच्यावर प्रेक्षकांनी कायमच प्रेम केले. कधी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला, तर कधी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दोघांवर अनेक संकटेही आली, मात्र त्या प्रत्येक संकटावर त्यांनी एकमेकांना साथ देत मात केली. प्रत्येक वेळी रमा राघवच्या मागे खंबीरपणे उभी राहिली.
‘रमा राघव’ मालिका सध्या उत्कंठावर्धक टप्प्यावर असून मालिकेत येणारे एक नवे वळण प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. रमा राघवच्या पत्रिकेत असलेला विरह टळावा यासाठी पुरोहितांनी मनावर दगड ठेऊन रमा राघवला वनवासाला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा वनवास रमा राघवच्या आयुष्यात नवे वादळ आणणारा होता. त्यांच्या आयुष्यात अद्वैत दादरकर आणि वीणा जगताप या दोन नवीन पात्रांचा प्रवेश झाला आहे. रमा राघवचा सुरू झालेला हा वनवास आणि या पार्श्वभूमीवर या दोघांमुळे अजून कोणते आणि काय होईल ट्विस्ट निर्माण होईल हे पाहाणे खूप मनोरंजनात्मक ठरेल.
रमा आणि राघवच्या आयुष्यात आणखी काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहा ‘रमा-राघव’ , सोम – शुक्र, रात्री ९:३० वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ सिनेमावर पाहता येणार आहे.
-
ठाकूर अनुप सिंग साकारणार “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज”

महाराष्ट्राचा महासिनेमा “सरसेनापती हंबीरराव” या चित्रपटाच्या भव्य यशानंतर उर्विता प्रॉडक्शन्सने भव्य आणि बिग बजेट अशा “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” या चित्रपटाची घोषणा केली होती. सुरुवातीपासूनच अत्यंत गोपनीयता पाळल्याने छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका कोण साकारणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, त्यातच श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरने ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत पुणे येथे संस्थापक, अध्यक्ष नवनाथ पठारे पाटील यांच्या सूर्योदय प्रतिष्ठान आयोजित भव्यदिव्य अशा सोहळ्यात हजारो शिवशंभू भक्तांच्या उपस्थितीत “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. याप्रसंगी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ठाकूर अनुप सिंग याने छत्रपती संभाजी महाराजांच्या अवतारात सोहळ्यामध्ये प्रवेश केला आणि हजारोंच्या गर्दीतील प्रत्येकाला शंभूराजांचे दर्शन मिळाल्याचे समाधान व अप्रूप पाहायला मिळाले. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमुळे ठाकूर अनुप सिंग छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले.

मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज
पोस्टरमध्ये पार्श्वभूमीला भगवान शंकराची मूर्ती व त्यांचे साधक असून त्यांच्या पुढे एका हातात भगवा झेंडा व दुसऱ्या हातात त्रिशूल घेतलेले, अंगावर वार आणि डोळ्यात धार असलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे रौद्र रूप दर्शविण्यात आलेले आहे. अतिशय नेत्रदीपक अशा या पोस्टरमुळे चित्रपट भव्य आणि ऍक्शनपॅक्ड असणार आहे असे दिसून येत आहे. आता या चित्रपटात अजून कोणकोणते कलाकार कोणत्या भूमिका साकारणार? याची उत्कंठा चित्रपट रसिकांमध्ये वाढलेली आहे.

पुणे येथे छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यात अवतरले शंभूराजे पुण्यात जन्म झालेला अभिनेता ठाकूर अनुप सिंग हा आकर्षक व्यक्तिमत्व आणि पिळदार शरीरयष्टीसाठी ओळखला जातो, त्याने आपल्या उत्तम अभिनयाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रामुख्याने तेलुगु आणि काही तामिळ व कन्नड चित्रपट गाजवले आहेत. त्याने सूर्या बरोबर सिंघम ३, अल्लू अर्जुन बरोबर सूर्या द सोल्जर, रवी तेजा सोबत खिलाडी, साई धरम तेज बरोबर विनर तसेच विद्युत जामवाल बरोबर कमांडो २ हा हिंदी अशा अजूनही चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या सोबतच 2013 च्या महाभारत टीव्ही मालिकेत त्याने धृतराष्ट्राची भूमिका केली होती. ठाकूर अनुप सिंग मूलतः एक बॉडीबिल्डर असल्याने आपल्या शरीराची खूप काळजी घेतो, त्याने 2015 मध्ये बँकॉक, थायलंड येथे झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. छत्रपती संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व उत्तुंग आणि बलदंड होते त्यामुळे ठाकूर अनुप सिंग याने ही भूमिका साकारताना आपल्या व्यक्तिमत्वावर आणि शरीरावर विशेष मेहनत घेतली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत बिग बजेट चित्रपट फार कमी प्रमाणात बनतात त्यापैकीच एक “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” चित्रपट आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनकार्याचा पट खूप भव्य आणि साहसी आहे त्यामुळे मोठ्या पडद्यावरसुद्धा तो भव्यदिव्यच दिसला पाहिजे असे निर्मात्यांचे ठाम मत होते त्यामुळे या चित्रपटाची निर्मितीमूल्ये ही अतिशय उच्च दर्जाची ठेवताना बजेटची चिंता न करता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर भव्य चित्रपट पाहण्याचा समृद्ध अनुभव मिळेल असा चित्रपट बनविण्यात आला आहे.

उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित आणि संदीप रघुनाथराव मोहितेपाटील प्रस्तुत “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” चित्रपटाचे निर्माते शेखर रघुनाथराव मोहितेपाटील, सौजन्य सूर्यकांतजी निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा आणि केतनराजे निलेशराव भोसले आहेत तर तुषार विजयराव शेलार यांनी दिग्दर्शन केले आहे तसेच कथा आणि पटकथा संदीप रघुनाथराव मोहितेपाटील आणि डॉ. सुधीर निकम यांनी लिहिली आहे. “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” हा चित्रपट दोन भागात मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून यातील पहिला भाग २०२४ मध्ये लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
