
-
चंद्रकांत पवार दिग्दर्शित “अप्सरा” १० मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात!!

अभिनेत्री मेघा घाडगे आणि अभिनेते विट्ठल काळे एकत्र!! नृत्य अभिनेत्री म्हणून आपली ओळख असलेल्या मेघा घाडगे यांनी अनेकदा सशक्त अभिनेत्री म्हणूनह स्वतःचा ठसा उमटवलाच आहे. आगामी ‘अप्सरा’ या चित्रपटात अभिनेत्री मेघा घाडगे आणि अभिनेता विट्ठल काळे झळकणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. चित्रपटाच्या मोशन पोस्टरवरून चित्रपट हा रोमँटिक असावा असा प्राथमिक अंदाज बांधता येतो.
सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. चंद्रकांत पवार यांनी दिग्दर्शक म्हणून यापूर्वी ‘विठ्ठला शप्पथ’ हा उत्कृष्ट चित्रपट दिला आहे. आता ‘अप्सरा’ या चित्रपटातून आणखी एक नवी गोष्ट घेऊन ते आपल्या भेटीस येत आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयी आता उत्सुकता आहे. चित्रपटातील अन्य कलाकारांची नावे अद्याप जाहीर केली नसली तरी लवकरच जाहीर होतील.
मेघा घाडगे यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत आपल्यातील अभिनेत्रीचं दर्शन प्रेक्षकांना घडवलं आहे. मात्र ‘अप्सरा’ हा चित्रपट त्यांच्यासाठी वेगळा ठरणार आहे. कारण या चित्रपटात त्या साकारत असलेली भूमिका ही अनोखी असून ती नक्की कोणती आहे? यासाठी आपल्याला थोडी वाट पहावी लागणार आहे. तसेच आपल्या बहुआयामी भूमिकेतुन रसिक प्रेक्षकांच्या मनावर नुसत्या आपल्या बोलक्या डोळ्यातून अभिनयाची मोहोर उमटवणारे अभिनेते विट्ठल काळे हे देखील चित्रपटाची जमेची बाजू असणार आहेत.
तसेच या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे, आपल्या रसभरीत गीतातून मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गीतकार मंगेश कांगणे यांनीच आपल्या शब्दांना स्वरबद्ध केले आहे. त्यामुळे मजबूत कथेला कसलेल्या अभिनयाची साथ आणि त्यावर उत्तम संगीताचा तडका अनुभवासाठी प्रेक्षक मायबाप नक्कीच उत्सुक होतील यात शंका नाही.
Thanks & Regards
Darshan S.Musale
(Media Planet) -
सुख कळले” कलर्स मराठीवर येत्या २२ एप्रिलपासून

महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात, नव्या जल्लोषात नवं वर्ष साजरं करायला सिद्ध झालीय.. सज्ज झालीय. या नव्या बदलाची सुरूवात नुकतीच ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे दणदणीत केल्यानंतर कलर्स मराठी “सुख कळले “ ही नवी मालिका रसिकांच्या भेटीला आणतेय.
आपल्या सुखी संसाराची स्वप्नं पूर्ण करायला वेगवेगळ्या कसोट्यांमधून तावून सुलाखून जाणाऱ्या जोडप्याची ही कथा. परिस्थितीच्या वेगवेगळ्या वादळातून जाताना एकमेकांचा विश्वास , प्रेम आणि परस्परांची साथ जपत मार्ग काढणाऱ्या माधव- मिथिलाची गोष्ट म्हणजे ‘ सुख कळले!’
सुख नेहमी हक्क, अधिकार मिळवण्यातच असतं, असं नाही तर ते त्यागातही असू शकतं… स्वतःला जिंकताना बघण्यात सुख असतंच पण कधीकधी दुसऱ्याला जिंकवण्यात नि जिंकलेलं पाहण्यातही सुख असू शकतं. माधव- मिथिलाचं सुख कशात आहे, हे सांगणारी , त्यांच्या निखळ , निःस्वार्थी प्रेमाची ही कथा म्हणजेच ‘सुख कळले!’ २२ एप्रिलला कलर्स मराठीवर दाखल होतेय. याचा पहिलाच गोड प्रोमो रसिकांच्या भेटीला आलाय. आणि माधव- मिथिलाच्या भूमिकेत रसिकांना भेटायला येणाऱ्या सागर देशमुख आणि स्पृहा जोशी यांच्या कमाल जोडीचं प्रेक्षक खूप कौतुक करतायत. या कसदार कलावंतांना पडद्यावर एकत्र पाहणं हेही सुखच असणार आहे, अशी प्रेक्षकांची प्रतिक्रिया मिळतेय.
या मालिकेची निर्मिती सोहम प्रॅाडक्शन्स यांनी केली असून सुचित्रा बांदेकर व सोहम बांदेकर या मालिकेचे निर्माते आहेत. -
BAD BOYS ARE BACK WITH 4 TIMES THE ACTION AND 4 TIMES THE COMEDY

Will Smith and Martin Lawrence return as Bad Boys for the fourth time, promising an action packed ride in the trailer of Bad Boys: Ride or Die!
Continuing its legacy since 1995, the trailer of the fourth film in the popular action-comedy franchise, titled Bad Boys: Ride or Die, shares a glimpse into the roller coaster adventure that the epic duo Will Smith and Martin Lawrence are embarking on.
This summer, the world’s favorite Bad Boys are back with their iconic mix of edge-of-your seat action and outrageous comedy but this time with a twist: Miami’s finest are now on the run.
Directed by Adil & Bilall, the film also features Vanessa Hudgens, Alexander Ludwig, Paola Nuñez, Eric Dane, Ioan Gruffudd, Jacob Scipio, Melanie Liburd, Tasha Smith with Tiffany Haddish and Joe Pantoliano.
_Sony Pictures Entertainment India will exclusively release Bad Boys: Ride or Die in Indian cinemas on 7th June 2024, in English, Hindi, Tamil, and Telugu, both in 2D and IMAX formats.__Bad Boys: Ride or Die will hit the big screen on 7th June 2024._
*Trailer Link:* https://youtu.be/LHYR5HGPXxU -
Action-packed Trailer Launch: ‘Bade Miyan Chote Miyan’ Promises Thrills Galore

The much-awaited trailer for the upcoming Hindi-language action-thriller film, ‘Bade Miyan Chote Miyan,’ has been launched, sending waves of excitement through Bollywood enthusiasts. Helmed by acclaimed filmmaker Ali Abbas Zafar and produced by a stellar lineup including Zafar, Jackky Bhagnani, Vashu Bhagnani, Deepshikha Deshmukh, and Himanshu Kishan Mehra, the film boasts a star-studded cast and promises to be a rollercoaster of adrenaline-pumping action and gripping suspense.
Starring the dynamic trio of Akshay Kumar, Tiger Shroff, and Prithviraj Sukumaran in leading roles, alongside a talented ensemble featuring Sonakshi Sinha, Manushi Chhillar, Alaya F, and Ronit Bose Roy, ‘Bade Miyan Chote Miyan’ sets the stage for an epic showdown of power, betrayal, and redemption.
The trailer offers a tantalizing glimpse into the world of ‘Bade Miyan Chote Miyan,’ showcasing jaw-dropping action sequences, intense confrontations, and heart-stopping moments that promise to keep audiences on the edge of their seats. With its blend of high-octane thrills and compelling storytelling, the film is poised to captivate audiences and set new benchmarks for the action genre in Indian cinema.
As anticipation reaches a fever pitch, fans have taken to social media to express their excitement and anticipation for the film’s release. With ‘Bade Miyan Chote Miyan’ gearing up to hit the silver screen soon, cinephiles can expect an exhilarating cinematic experience unlike any other.
Stay tuned for further updates as ‘Bade Miyan Chote Miyan’ gears up to make a thunderous impact at the box office, promising audiences a pulse-pounding journey into the heart of action and adventure.
-
स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेत येणार नवं वळण

स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. अक्षय आणि रमाची जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी ठरत आहे. अक्षय आणि रमाच्या या प्रेमाच्या मुरांब्यात रेवा मात्र अडसर ठरतेय. वेगवेगळी कारस्थानं करुन रमा आणि अक्षयला वेगळं करु पहाणाऱ्या रेवाच्या आयुष्यात मात्र आता नवं वादळ येणार आहे. मालिकेत रमाचा नवरा म्हणजेच अथर्वची एण्ट्री होणार आहे. अभिनेता आशय कुलकर्णी रेवाच्या नवऱ्याची म्हणजेच अथर्वची भूमिका साकारणार आहे. अथर्वच्या येण्याने मालिकेत नेमकं कोणतं नवं नाट्य घडणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. तेव्हा पाहायला विसरु नका मुरांबा दुपारी १.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
-
शरद पोंक्षे यांचे चिरंजीव स्नेह पोंक्षे करणार चित्रपट दिग्दर्शन

चित्रपटाच्या टीमने प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन चित्रपटाचा शुभारंभ केला. शरद पोंक्षे… मराठी कलाक्षेत्रातील एक दिग्गज नाव. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून आपण त्यांचा दर्जेदार अभिनय पाहिला आहे. मात्र आता शरद पोंक्षे एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लवकरच शरद पोंक्षे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा पुत्र म्हणजेच स्नेह पोंक्षे करणार आहे. सध्यातरी या चित्रपटाचे नाव ठरलेले नसले तरी या चित्रपटाच्या निमित्ताने वडिल-मुलाची जोडी मात्र एकत्र काम करणार आहे. या चित्रपटाच्या टीमने प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन चित्रपटाचा शुभारंभ केला.
वि. एस. प्रोडक्शन्स व मोरया प्रोडक्शन यांच्या सहयोगाने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची पूर्व तयारी सध्या ‘प्रॅाडक्शन नं १’ या नावाने होत असून रोहिणी विजयसिंह पटवर्धन या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत तर शरद पोंक्षे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन स्नेह पोंक्षे याने केले आहे. ही जोडी नक्की कोणत्या विषयावर चित्रपट घेऊन आपल्या समोर येणार आहेत, हे फार औत्सुक्याचे ठरणार आहे.
वडिल – मुलगा येणार एकत्र याबद्दल निर्माते शरद पोंक्षे म्हणतात, ‘’एका नवीन भूमिकेतून तुमच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे मुलाच्या सोबतीने ही वेगळी भूमिका साकारत आहे. यापूर्वी स्नेहने पाच वर्षं सह दिग्दर्शक म्हणून काम केले आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तो दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. मला खात्री आहे, तो ही जबाबदारी उत्तमरित्या पेलेल.’’
दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो, ” लवकरच हा चित्रपट आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहोत. आम्ही सुद्धा या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहोत. चित्रीकरणाला सुरूवात होणार असून विषय, शीर्षक, कलाकार हे लवकरच आम्ही जाहीर करू. पदार्पणातच वडिलांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे, त्याचा विशेष आनंद आहे.’’
#sharadpoknshe #newmarathimovie
-
प्लॅनेट मराठीने साजरा केला ‘रंगोत्सव’

विको प्रस्तुत, प्लॅनेट मराठी ‘रंगोत्सव’ रंगांची उधळण करत नुकताच जल्लोषात साजरा करण्यात आला. रंगपंचमीच्या निमित्ताने आजोजिलेल्या या आनंदोत्सवात अभिजीत पानसे, किशोरी शहाणे, अवधूत गुप्ते, श्रृती मराठे, गौरव घाटणेकर, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे, विजय पाटकर, जयंत वाडकर, पुष्कर श्रोत्री, दिग्दर्शक विशाल देवरूखकर, तन्वी मुंडले, विवेक सांगळे, अविनाश दारव्हेकर, सुशांत शेलार, आदिती सारंगधर, मनवा नाईक, सुरभी हांडे, सोनाली खरे, प्रियांका तन्वर, सनाया आनंद, गौरव मोरे यांच्यासह प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि अन्य मान्यवर सहभागी झाले होते.

याबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बरदापूरकर म्हणतात, ” विविध रंगांची उधळण करणारा हा सण खूप उत्साहाने भरलेला आहे आणि म्हणूनच हा सण आम्ही एकत्र साजरा करत आहोत. एरव्ही कामात व्यस्त असणारे हे कलाकार यानिमित्ताने एकत्र येऊन धमाल करतात. मजा, मस्ती आम्ही या रंगोत्सवात करतोय.’’



-
कै. मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लेखक, नाटककार, गीतकार, नाट्यनिर्माते अशी बहुआयामी ओळख असलेल्या कै. मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मनोरंजनसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन तसेच मधुसूदन कालेलकर यांचे सुपुत्र अनिल कालेलकर, अलका कुबल-आठल्ये, दिग्दर्शक विजय राणे, मनोहर सरवणकर या मान्यवरांच्या पुढाकाराने १९ मार्च ते २२ मार्च या कालावधीत मुंबईत श्री शिवाजी मंदिर येथे चार दिवस रंगलेल्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न झाला. कै. मधुसूदन कालेलकर यांच्या नाटकांचा आणि त्यांनी शब्दबद्ध केलेल्या गीतांच्या सांगीतिक मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ कलाकार प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, चेतन दळवी, सविता मालपेकर, अर्चना नेवरेकर आदी मान्यवरांनी या महोत्सवाला आवर्जून उपस्थिती लावली.

या जन्मशताब्दी महोत्सवात मधुसूदन कालेलकर लिखित ‘दिवा जळू दे सारी रात, ‘डार्लिंग डार्लिंग, ‘नाथ हा माझा’ या प्रसिद्ध नाटकांचे सादरीकरण झाले. हाऊसफुल्ल गर्दीत प्रेक्षकांनी कालेलकरांच्या कलाकृतींना आपली प्रेमळ पोचपावती दिली. या सोहळ्याच्या उद्घाटनाला ज्येष्ठ दिग्दर्शक-अभिनेते पद्मभूषण राजदत्त यांची विशेष उपस्थिती लाभली. याप्रसंगी कै. मधुसूदन कालेलकर यांच्या स्मृतींना उजाळा देताना, ”मला चांगलं काम करण्याची प्रेरणा देणारा तसेच माझ्या अभिनय कारकिर्दीला दिशा देण्याचे मोलाचे सहकार्य करणारा उत्तम माणूस” अशा शब्दात श्री. राजदत्त यांनी मधुसूदन कालेलकर यांना मानवंदना दिली.

मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मदिनी म्हणजे २२ मार्च रोजी ‘सूर तेचि छेडीता’ या सांगीतिक कार्यक्रमाने या महोत्सवाचा समारोप झाला. एक काळ गाजवलेली आणि आजही प्रत्येक वयोगटातील कानसेन आणि गानसेनांना भावणारी गाणी प्रेक्षकांच्या देखील ओठी रुळली हे पाहताना मधुसूदन कालेलकर यांचे सुपुत्र ज्येष्ठ लेखक अनिल कालेलकर यांचे डोळे पाणावले. ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी, ”अशा महोत्सवांमधून जुनं ते सोनं या उक्तीची अक्षरशः जाणीव होते शिवाय तो काळ… तेव्हाची गाणी, चित्रपट यांमुळे एक वेगळाच आनंद रसिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो असं सांगत”, महोत्सवासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.

”महाराष्ट्रातील दिग्गज कलावंतांच्या गुणगौरवासाठी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग हा एक संधी पाहत असतो. हिंदी-मराठी-गुजराथी अशा अनेक भाषांमधील साहित्यांत नाटककार, पटकथाकार, गीतकार अशा विविध विभागांत मुशाफिरी करणारे मधुसूदन कालेकलर यांना दैवी देणगीच लाभलेली आहे असं मी म्हणेन. कै. मधुसूदन कालेलकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्याची संधी निर्माण केल्याबाद्दल मी आयोजकांचे आभार मानतो.” अशा शब्दांत विकास खारगे यांनी मधुसूदन कालेलकर यांचा गौरव केला.
कलेची आवड जोपासत सिनेगीतांचा कार्यक्रम करणारे कृष्णकांत गावंड, ५ हजारहून अधिक चित्रपटांचा आस्वाद घेत ‘मधुघट’ हा सुमधूर गीतांचा कार्यक्रम सादर करणारे विवेक पुणतांबेकर, सिनेमाची आवड जपत मधुसूदन कालेलकर यांच्यावर लघुपट करणारे मांगलेश जोशी या मान्यवरांचा याप्रसंगी शाल, श्रीफळ आणि भुसावळ मधील लेखिका नसीमा देशमुख यांनी मधुसूदन कालेलकरांच्या नाटकावर पीएचडी करून त्यावर लिहिलेले पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. लेखक अनिल कालेलकर, दिग्दर्शक विजय राणे यांनी जन्मशताब्दी महोत्सवाला सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले. -
ह्या होळीच्या निमित्ताने शिवा आणि आशुवर चढेल का प्रेमाचा रंग?

‘शिवा’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. ह्या मालिकेचा होळी विशेष भाग नुकताच चित्रित झाला. शिवा, आशुची गुंडांच्या तावडीतून सुटका करते आणि तेव्हा तिला हाताला जखम होते तर आशुची शिवासाठी मलमपट्टी करण्याची धडपड पाहून शिवाला मनातून अतिशय आनंद होतोय. अप्पर आणि सायलेंसर हे सगळं बघतात आणि त्यांना वाटत की आशुच शिवाची छान काळजी घेऊ शकतो. शिवाच्या हाताला लागलेल असूनसुद्धा शिवा होळीतुन नारळ काढते. रंगपंचमीच्या दिवशी आशु ठरवतो की पहिला रंग माझ्या होणाऱ्या बायकोला लावेन, पण इकडे पाना गँग ठरवते की शिवाला पहिला रंग आशुच लावेल. आशु आणि मांजा वस्तीत येतात तेव्हा पाना गँग आशूला चॅलेंज करते की दम असेल तर शिवाला रंग लावून दाखव. तिकडे आशु रंग लावायला आलेला बघून शिवा पळत सुटते.

आशु शिवाला रंग लावू शकेल ? ही होळी शिवा आणि आशुच्या नात्यांमध्ये प्रेमाचा रंग भरेल ? यासाठी बघायला विसरू शिवा चा होळी विशेष भाग रात्री ९:०० वा. फक्त झी मराठीवर.
-
६ डिसेंबरला होणार ‘महापरिनिर्वाण’ प्रदर्शित

शोषित- वंचितांच्या हक्कासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाने अवघा देश हळहळला. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र हंबरठा फुटला. त्यांच्या अंत्ययात्रेला असंख्य समुदाय लोटला होता. त्यांच्या अनुयायांच्या हुंदक्यांच्या टाहोने मुंबापुरीचा आसमंत व्यापला होता आणि या सगळ्या प्रसंगांचे एकमेव साक्षीदार होते नामदेवराव व्हटकर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अखेरचा प्रवास आपल्या कॅमेरात टिपलेल्या या नामदेवराव व्हटकर यांच्या जीवनावर आधारित ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता अनेकांना लागली होती. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनची तारीख जाहीर झाली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घडलेल्या गुंतागुंतीच्या भावना व घटनांचा उलगडा करणाऱ्या नामदेवराव व्हटकर यांची भूमिका प्रसाद ओक यांनी साकारली असून अंजली पाटील, कमलेश सावंत, गौरव मोरे हे कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार, हे सध्यातरी गुपित आहे. कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, अभिता फिल्म निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेंद्र बागडे आणि अमर कांबळे डीओपी आहेत. तर लेखन चेतक घेगडमल आहेत.
चित्रपटाबद्दल निर्माते सुनील शेळके म्हणतात, ” आम्हाला आनंद आहे, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहोत. हा चित्रपट म्हणजे आमच्याकडून ही एक मानवंदना आहे. ‘एक कथा दोन इतिहास’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. असंख्य जनसागर त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी लोटला होता. यादरम्यान कोणत्या विशेष घटना घडल्या, कोण कोण उपस्थित होते, अशा अनेक गोष्टी ज्या अनेकांना माहित नाहीत, त्या विस्तृतपणे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. अवघी मुंबापुरी यावेळी थांबली होती. हा मन सुन्न करणारा प्रसंग आपण नामदेवराव व्हटकर यांच्या नजरेतून पाहाणार आहोत.”
