Home

  • मायलेक’मध्ये उमेश कामत साकारणार महत्वपूर्ण भूमिका

    सोनाली खरे आणि सनाया आनंद यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मायलेक’ येत्या १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. आई मुलीच्या सुंदर, संवेदनशील नात्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत असतानाच आता या चित्रपटातील आणखी एक चेहरा समोर आला आहे. ‘मायलेक’मध्ये उमेश कामतचीही महत्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून पोस्टरमध्ये उमेश सनाया आणि सोनालीसोबत दिसत आहेत.
    पोस्टर पाहाता ‘मायलेक’मध्ये उमेशची नेमकी भूमिका काय असणार, हे मात्र उत्सुकता वाढवणारे आहे. दरम्यान, या चित्रपटात उमेश एका वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.

    ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटाचे  कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत. या चित्रपटात बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

    आपल्या भूमिकेबद्दल उमेश कामत म्हणतो, ” आई आणि मुलीच्या सुंदर नात्याची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे आणि अशा चित्रपटाचा मी भाग आहे. मी स्वतः या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. माझ्या व्यक्तिरेखेबद्दल जास्त काही सांगणार नाही. मात्र एक नमूद करेन माझ्या इतर भूमिकांपेक्षा ही भूमिका निश्चितच वेगळी आहे. सोनाली आणि सनायासोबत काम करायचा अनुभवही भन्नाट होता. सोनाली एक उत्तम अभिनेत्री आहे हे सर्वांना माहित आहेच परंतु सनाया मध्येही हे गुण आहेत. सनायालाही अभिनयाची उत्तम जाण आहे. ही ‘मायलेक’ची जोडी भन्नाट आहे. रिअलमध्ये ही जोडी कमाल असल्याने रिलमध्येही ही केमिस्ट्री उत्तम जुळून आली आहे.”

  • ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाच्या निमित्ताने ‘गीतरामायण’च्या आठवणींना उजाळा

    संगीतविश्वातील एक मोठे नाव म्हणजे सुधीर फडके. स्वरगंधर्व सुधीर फडके म्हणजेच ‘बाबूजी’ यांच्या ‘गीतरामायण’ या अद्भुत निर्मितीस ६९ वर्षे पूर्ण झाली असून या ऐतिहासिक दिवसाचं औचित्य साधत रिडिफाईन प्रॉडक्शन्सने पुण्यात ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात श्रीधर फडके, आनंद माडगुळकर ही सुधीर फडके, ग. दि. माडगुळकर यांची पुढील पिढी, आकाशवाणी पुणे केंद्राच्या काही सन्माननीय व्यक्ती, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सौरभ गाडगीळ, लेखक, दिग्दर्शक, निर्माते योगेश देशपांडे, कलाकार सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, धीरेश जोशी, परितोष प्रधान उपस्थित होते. यावेळी या मान्यवरांसोबत गप्पांची मैफलही रंगली. या कार्यक्रमादरम्यान ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या २० फूट उंच अशा भव्य पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. या पोस्टरवर चित्रपटातील सगळ्या नामांकित व्यक्तिरेखा झळकल्या आहेत. या कार्यक्रमाची खासियत म्हणजे यावेळी चित्रपटातील  ‘गीतरामायण’मधील प्रसिद्ध गाणी आणि ‘गीतरामायण’च्या प्रवासातील अविस्मरणीय क्षणही दाखवण्यात आले. 

    या कार्यक्रमात सुधीर फडके म्हणजेच ‘बाबूजीं’चे व्यक्तिमत्व, त्यांची गाण्याची आवड, गाणी तयार होताना घडलेले प्रसंग, शब्दांचे गीत होतानाच प्रवासही यावेळी  मांडण्यात आला. १ एप्रिल १९५५ रोजी सुरु झालेल्या गीतरामायण शृंखलेचे ७० व्या वर्षात पदार्पण होत असताना, या अजरामर कलाकृतीचा भावपूर्ण, गंधयुक्त आणि सुमधुर आठवणींचा खजिना उलगडण्याचा एक प्रयत्न यावेळी करण्यात आला. एकंदरच ‘गीतरामायणा’चा रंजक प्रवास या कार्यक्रमाच्या निमित्ताने उलगडला. तर कलाकारांनी चित्रपटात व्यक्तिरेखा साकारताना, चित्रीकरणादरम्यान अनुभवलेले प्रसंग यावेळी उपस्थितांसोबत शेअर केले.

  • Ajay Devgn opens up on the first time he heard the true story of Syed Abdul Rahim

    The anticipation is running high for the story of a man who revolutionized football in India. With Ajay Devgn starring as Syed Abdul Rahim, fans cannot wait to unfold this inspiring life journey. Makers recently released Team India Hain Hum evoking  a sense of adrenaline and enthusiasm for the release of Maidaan. 

    Talking about the film and Syed Abdul Rahim, Ajay Devgn shared, “Apart from being a great story, I never knew that something like that had happened in our country and football had reached its peak and only because of, I can’t say one man but one man and these players who changed the course of football in the 50s and 60s. In fact I was shocked and surprised this would have happened and there is a person like him and that was the first thing that this story needs to be told.”

    Maidaan also features Priyamani, Gajraj Rao, and Bengali actor Rudrani Ghosh.

    _Produced by Zee Studios, Boney Kapoor, Arunava Joy Sengupta and Akash Chawla, screenplay and dialogues are written by Saiwyn Quadras and Ritesh Shah respectively, Music is by AR Rahman and Lyrics by Manoj Muntashir Shukla. The film is all set to release worldwide in theatres this Eid, 2024 on 10th April 2024 also in IMAX._

  • Mad Max: Fury Road, Avengers: Age of Ultron famed international action director Craig Macrae was roped in for ‘Bade Miyan Chote Miyan’ Action Sequences!

    Pooja Entertainment’s highly anticipated blockbuster, ‘Bade Miyan Chote Miyan,’ has been stirring up excitement since the moment it was announced. From its infectious foot-tapping tracks to an electrifying trailer, this movie screams blockbuster and is poised to set the screens on fire when it releases on April 10th, 2024.

    Prepare to be taken on a thrilling ride as ‘Bade Miyan Chote Miyan’ promises to elevate action to unprecedented heights in Indian cinema. With the expertise of internationally acclaimed stunt director Craig Macrae, renowned for his work in Mad Max: Fury Road, Avengers: Age of Ultron, the movie’s action sequences are poised to be nothing short of breathtaking.

    From heart-pounding stunts on aircraft to intricately choreographed fight sequences, audiences will be treated to a spectacle unlike any other. Witnessing the original action superstars deliver adrenaline-pumping stunts is guaranteed to leave audiences spellbound.

    Jackky Bhagnani, the producer of ‘Bade Miyan Chote Miyan,’ enthusiastically shared, “We were determined to offer audiences a once-in-a-lifetime cinematic experience with our action sequences. I believed in Ali’s vision, and what you see in the movie is the result of that collaboration.“

    As the anticipation mounts, we eagerly await the moment when ‘Bade Miyan Chote Miyan’ graces the silver screen, promising a visual extravaganza that will leave audiences on the edge of their seats.

    Vashu Bhagnani and Pooja Entertainment present BADE MIYAN CHOTE MIYAN in association with AAZ films. Written and directed by Ali Abbas Zafar, and Produced by Vashu Bhagnani, Deepshikha Deshmukh, Jackky Bhagnani, Himanshu Kishan Mehra, Ali Abbas Zafar. The film is slated to release on 10th April 2024 starring Akshay Kumar, Tiger Shroff, Prithviraj Sukumaran, Sonakshi Sinha, Alaya F and Manushi Chillar in pivotal roles.

  • कलाकारांची मांदियाळी असलेला ‘जुनं फर्निचर’

    सत्य – सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा दिमाखात पार पडला. टीझरमधील महेश मांजरेकर यांच्या करारी व्यक्तिरेखेची झलक सर्वांनीच पाहिली. आता या चित्रपटातील इतर कलाकारही समोर आले आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून यात महेश मांजरेकर यांच्यासोबत मेधा मांजरेकर, उपेंद्र लिमये, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर आणि सचिन खेडेकर दिसत आहेत. पोस्टरमध्ये न्यायालय, न्यायधीश आणि काही कागदपत्रे दिसत आहेत, ज्यावर न्याय, हक्क, कायदा लिहिलेले आहे. त्यामुळे आता ही कोणती लढाई लढली जाणार आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे.

    दरम्यान या चित्रपटात  समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. याव्यतिरिक्त या चित्रपटात ओंकार भोजने, शिवाजी साटम यांचीही झलक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटात अनेक बड्या कलाकारांना एकत्र पाहाण्याची संधी मिळणार आहे. या मल्टीस्टारर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केले असून यतिन जाधव ‘जुनं फर्निचर’चे निर्माते आहेत.

    चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर म्हणतात, ”जुन्या फर्निचरमध्ये किती ताकद असते, हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाचा लढा यात दाखवण्यात आला आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जात असतील, परंतु ही प्रकरणे समोर येत नाहीत. मी म्हणेन प्रत्येक तरूणाने आपल्या पालकांसोबत हा चित्रपट पाहावा, जेणे करून त्यांचा दृष्टिकोन बदलेल.”

  • पैर टूटने के बाद भी अक्षय कुमार ने ‘बड़े मियां छोटे मियां’ की शूटिंग की पूरी, फिर साबित किया फिल्म के प्रति अपना अटूट समर्पण

    पूजा एंटरटेनमेंट की अपकमिंग ब्लॉकबस्टर बड़े मियां छोटे मियां 10 अप्रैल 2024 को सिनेमाघरों में रिलीज होगी. बड़े मियां छोटे मियां का बुखार पहले ही देश पर चढ़ चुका है और रिलीज की उल्टी गिनती शुरू हो चुकी है.

    फिल्म मेकर्स ने हाल ही में मुंबई में आयोजित एक भव्य कार्यक्रम में इस बहुप्रतीक्षित फिल्म का ट्रेलर लॉन्च किया था. ट्रेलर में फिल्म के कुछ शानदार एक्शन सीन्स की झलक दिखाई गयी है और ओजी एक्शन सुपरस्टार्स को कुछ अविश्वसनीय एक्शन स्टंट करते हुए देखना एक अद्भुत अनुभव है.

    एक्शन सुपरस्टार अक्षय कुमार का पैर टूट गया था, फिर भी उन्होंने पूरे समर्पण के साथ फिल्म की शूटिंग पूरी की. एक एक्शन सीक्वेंस के दौरान अभिनेता को चोट लग गई, लेकिन उन्होंने शूटिंग जारी रखी और फिल्म की शूटिंग पूरी की.

    हम पहले से ही एक्शन सुपरस्टार अक्षय कुमार की कला के प्रति उनकी अटूट प्रतिबद्धता और समर्पण को जानते हैं. पर्दे के पीछे की यह दिलचस्प कहानी इस बात का प्रमाण है कि कैसे एक्टर ने दर्शकों को एक शानदार सिनेमाई अनुभव देने के लिए अपना सर्वश्रेष्ठ दिया है, जिससे बड़े मियां छोटे मियां निस्संदेह साल की बहुप्रतीक्षित फिल्म बन गई है.

    एएजेड फिल्म के सहयोग से वाशु भगनानी और पूजा एंटरटेनमेंट ने इस फिल्म को प्रेजेंट किया है. यह अली अब्बास जफर द्वारा लिखित और निर्देशित है. वाशु भगनानी, दीपशिखा देशमुख, जैकी भगनानी, हिमांशु किशन मेहरा, अली अब्बास जफर ने इसे प्रोड्यूस किया है. यह फिल्म 10 अप्रैल 2024 को ईद पर रिलीज होने वाली है. इस फिल्म में अक्षय कुमार, टाइगर श्रॉफ, पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, अलाया एफ और मानुषी छिल्लर प्रमुख भूमिकाओं में हैं.

  • अजय गोगावले यांच्या आवाजात संघर्षयोद्धा’ मधील ‘उधळीन जीव’ हे हृदयस्पर्शी गाणं!!

    चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला!!

    मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध “संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील” या चित्रपटातून घेतला जाणार आहे. घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या टीजर ला ही अफाट प्रतिसाद मिळाला आहे. गायक अजय गोगावले ( Ajay Gogavale ) यांच्या आवाजात “उधळीन जीव…” हे हृदयस्पर्शी गाणं या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे. २६ एप्रिल रोजी “संघर्षयोद्धा” मनोज जरांगे पाटील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

    शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे,  माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

    “उधळीन जीव….” या गाण्याचं लेखन वैभव देशमुख यांनी केलं असून, संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तर गायक अजय गोगावले यांनी त्यांच्या भावोत्कट आवाजात हे गाणं गायलं आहे. मनोज जरांगे यांच्या व्यक्तिमत्त्वातला साधेपणा आणि समाजासाठी काही करण्याची धडपड या गाण्यात मांडण्यात आली आहे. वैभव देशमुख यांचे भावगर्भ शब्द, विजय गवंडे यांचं अंतर्मुख करणारं संगीत आणि झिंगाट, चिकनी चमेली.. सारखी अनेक ट्रेंडिंग गाणी देणारे संगीतकार अजय – अतुल ( Ajay Atul) या जोडीतील अजय गोगावले यांचा काळजाला हात घालणारा आवाज यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल यात शंकाच नाही. चित्रपटाविषयी आधीच उत्सुकता ताणली गेली असताना आता या गाण्यानं त्यात आणखी भर पडणार आहे.

  • माहेरची साडी’चे दिग्दर्शक विजय कोंडके यांचा नवा चित्रपट लेक असावी तर अशी

    ज्येष्ठ दिग्दर्शक विजय कोंडके हे नाव घेतलं की, ‘माहेरची साडी’ हा चित्रपट डोळ्यांसमोर येतो. या चित्रपटाने मराठी चित्रपट उत्पन्नाचे सर्व उच्चांक मोडले. निर्मिती, वितरण आणि दिग्दर्शन अशी तिहेरी मुशाफिरी करत विजय कोंडके यांच्या  मराठी चित्रपटाने यशाचे आणि लोकप्रियतेचे नवे मापदंड निर्माण केले.  १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या यशानंतर निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके यांनी ३४ वर्षानंतर पुन्हा एकदा नव्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. विजय कोंडके यांची निर्मिती, दिग्दर्शन असलेला ‘लेक असावी तर अशी’ हा मराठी चित्रपट २६ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. ‘ज्योती पिक्चर्स’ निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. 

    सोंगाड्या, पांडू हवालदार, बोट लावीन तिथं गुदगुल्या, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, आली अंगावर यांसारख्या दादा कोंडके यांच्या अनेक यशस्वी चित्रपटांच्या वितरणामध्ये विजय कोंडके यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. मराठी प्रेक्षकांची अभिरुची ओळखून त्यानुसार यशस्वी चित्रपट निर्मिती करण्याची गुरुकिल्ली माहीत असलेले विजय कोंडके ‘लेक असावी तर अशी’ हा कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या रंजनासाठी  घेऊन सज्ज झाले आहेत. 

    निर्माते-वितरक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केल्यानंतर आपणही कधीतरी दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसून आपल्या मनातील सिनेमा बनवण्याच्या इच्छेतून आणि दादा कोंडके यांनी दिलेल्या संधीमुळे मी ‘माहेरची साडी’ ( maherchi Sadi) या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य उचलले. यशापलीकडे या चित्रपटाने मला रसिकांचे अमाप प्रेमही मिळवून दिले. रसिकांच्या याच प्रेमापोटी ‘लेक असावी तर अशी’ हा नवा मराठी चित्रपट मी २६ एप्रिलला घेऊन येतोय.

  • Delbar Arya and Pratik Sehajpal Bring us the Heartbreak Anthem of the Year “KAABIL” with Stebin Ben’s Voice

    Music in today’s world plays an essential role in each life by leaving a lasting impact with the ability to captivate audiences and evoke emotions. In the latest offering from the world of music, actress Delbar Arya and Bigg Boss OTT fame Pratik Sehajpal bring up the breakup anthem of the year titled KAABIL.

    Delbar Arya, known for her mesmerizing performances, has also garnered immense praise for her collaboration with Guru Randhawa on the chart-topping track Downtown. Arya has carved a niche for herself in the music industry. Now, she is all set to enchant fans again, this time alongside the charismatic Pratik Sehajpal.

    Delbar took to her social media and shared the poster of the song with her loved ones, In the poster we could see Delbar and Pratik being madly lost in love with Stebin Ben in the poster as well. The song is helmed by Imran Sheikh, the Lyrics are given by Eemaan, the Music by Gurmeet Singh, and Produced by Virender Bhalla and Shivang Sharma.

    Sharing her experience Delbar says, “Kaabil is a super romantic yet heartbreaking breakup song. The song is about lovebirds and their complications and betrayal. But the melody to the song is given by Stebin Ben and I can assure you that the song will remind you of your betrayal.”

    https://www.instagram.com/p/C0yZUc_y8QE/

    “KAABIL” is not just another music video; it’s a visual masterpiece that promises to tug at audiences’ heartstrings worldwide. With Stebin Ben lending his soulful voice to the track, the song is set to resonate deeply with listeners, delivering a powerful message about love, loss, and resilience. Delbar Arya and Prateik Sehjpal’s chemistry is palpable, promising an on-screen dynamic that will leave viewers spellbound.

    Stay tuned for the unveiling of “KAABIL”, the heartbreak anthem of the year. On the work front, Delbar Arya also just broke the record and completed the shoot of her Punjabi Film Damdaa in just 23 days. Apart from that the actress also has a bunch of projects releasing, which the official announcement will be made soon.

  • भारतातील एकुण १३९  लघुपटातून “ऱ्हास” या एकमेव लघुपटाची महाराष्ट्रातून निवड

    रशीद निंबाळकर लिखीत, दिग्दर्शित “ऱ्हास” या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

    राष्ट्रीय मानवअधिकार आयोग (NHRC), दिल्ली,भारत सरकार यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या ९व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अग्निपंख प्रॉडक्शनच्या गिरीश यशवंत गवळी निर्मित, रशीद निंबाळकर लिखीत, दिग्दर्शित “ऱ्हास” या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतातील एकुण १३९  लघुपटातून “ऱ्हास” या एकमेव लघुपटाची महाराष्ट्रातून निवड झाली आहे.  

    आधुनिक भारतात आजही भटक्या समाजात काही प्रथा ह्या रुढी व परंपरेनुसार मजबुरीने पाळाव्या लागतात.आयुष्यभर फिरस्ती करून,पारंपारिक कला सादर करून पोट भरुन जीवन जगणाऱ्या काही भटक्या समाजावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ह्या जगात
    त्यांच्या शेकडो वर्षांच्या पारंपारीक कला या हळूहळू ऱ्हास पावत आहेत.याच विषयावर “ऱ्हास” हा लघुपट आपल्या मनाला भिडतो आणि विचार करायला भाग पाडतो.

    याआधी रशीद निंबाळकर यांना बाराव्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात  ‘इरगाल’ चित्रपटाला बेस्ट फिल्म ज्युरी अॅवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आले होते. महोत्सवातील ७१८ चित्रपटांतून “इरगाल” चित्रपटाला हा पुरस्कार होता. महाराष्ट्रातील मरीआईवाले या दुर्लक्षित जमातीवर हा चित्रपट भाष्य करणारा होता.

    परमेश्वर जाधव, उषा निंबाळकर व दीदी निंबाळकर यांनी या लघुपटात काम केले आहे. रशीद निंबाळकर यांनीच कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून   दामोदर पवार ,अभि शिंदे यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे.