
-
शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रौत्सवाचे आयोजन

चैत्र महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. यंदा चैत्र नवरात्रीचा उत्सव ९एप्रिलला साजरा होणार असून या नवरात्रौत्सवाचा जागर करण्यासाठी शेलार मामा फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. अभिनेता सुशांत शेलार यांच्या पत्नी सौ.साक्षी सुशांत शेलार यांच्या विद्यमाने लोअर परेल मध्ये प्रथमच ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रौत्सव साजरा होणार आहे.
९ ते१८ एप्रिल दरम्यान रंगणाऱ्या या उत्सवात अभिषेक, शृंगार पूजा, मंडल पूजा, पाठ वाचन, नवचंडी होमहवन,भजन, ललिता सहस्त्रनाम, कुंकू मार्चन, देवीचा गोंधळ, जागरण, महिला पुरोहितांचे पठण, श्रीरामनवमी उत्सव, विसर्जन आदी चे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत १४ एप्रिलला प्राथमिक कर्करोग चिकित्सा शिबिराचे आयोजन सकाळी १०.०० ते २.०० यावेळेत करण्यात आले आहे. वेशभूषा, महिला क्रीडा स्पर्धा यांचे विशेष आयोजन ही या उत्सवा दरम्यान करण्यात आले आहे.
लोअर परेल उड्डाण पूलाखाली जे हसन बिल्डिंग मध्ये रंगणारा हा चैत्रोत्सव आमच्यासाठी आत्मिक समाधान आणि आनंद देणारा असेल, असा विश्वास व्यक्त करीत आयोजिका साक्षी सुशांत शेलार यांनी या चैत्रोत्सवाचा लाभ सर्वांनी आवर्जून घ्यावा असे आवाहन केले आहे. -
मोहन जोशी’ यांना यंदाचा झी नाट्य गौरव २०२४ ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर !

मराठी नाट्यसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी नाट्य गौरव २०२४ पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. या सोहोळ्याचे खास आकर्षण ठरलं ते कलाकारांसमवेत नांदीने झालेली सुरुवात आणि यंदाच्या ‘झी नाट्य गौरव २०२४’ जीवन गौरव पुरस्काराचे मानकर ठरले ते म्हणजे जेष्ठ अभिनेते ‘मोहन जोशी’. आज हिंदी आणि मराठी चित्रपट क्षेत्रात अनेक दिग्गज मराठी कलावंत आहेत. पण बालनाट्य, एकांकिका, प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक अशी साधना करून हिंदी-मराठीत स्थिरावलेले काही मोजके कलावंत आहेत. त्यातलंच एक हुकमी नाव म्हणजे मोहन जोशी.
१२ जुलै १९५३ ला बंगळुरुला जन्म झाल्यानंतर तुमचं बालपण पुण्यात गेलं. फाटक वाड्यातला खट्याळ मुलगा म्हणून तुम्ही लवकरच प्रसिद्ध झालात. गल्लीत भाजीवाला आणि दहीवाल्याचा आवाज यायचा तेव्हा पुणेकर मंडळी अपेक्षेने दाराखिडक्यात यायचे. तेव्हा या आवाजाची नक्कल काढणारा ‘खट्याळ मोहन’ फिदीफिदी हसायचा. एकदा मंडळाला होळीला जेव्हा गव-या मिळत नव्हत्या तेव्हा खत्रुड शेजा-यांच्या अंगणातून आईची साडी घालून बेमालुमपणे याच ‘खट्याळ मोहन’ने गव-या उडवल्या आणि मंडळाचा होळीचा प्रश्न मिटवला. अभ्यासात ठिकठाक आणि खोड्या उदंड. पालक सहसा नकला आणि खोड्यांनी त्रस्त होतात. पण मोहनच्या वडीलांनी त्याला ‘भरत नाट्यमंदिर’मध्ये रंगभूषाकार ‘बाबा साठे’ ह्यांच्या हवाली केलं. नेमकं तेव्हाच एका बालनाट्यातला प्रमुख कलाकार अभ्यासाचं कारण देऊन नाटक सोडून गेला होता. एकाने अभ्यास करायला रंगभूमी सोडली. आणि मोहनने अभ्यासापासून पळून जायला रंगभूमीवर पाऊल ठेवलं.
पुढे १२ वर्ष बाल नाटकांचा सपाटा सुरू राहिला. जंगलातील वेताळ, गाणारा मुलुख, बुडत्याचा पाय खोलात, इकडम तिकडम विजयी विक्रम, राजकन्या नेत्रादेवी. मजलदरमजल करत कॉलेज गाठलं. बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स BMCC. कॉलेजमध्ये डिअर पिनाक, काका किशाचा, तीन चोक तेरा, पेटली आहे मशाल अशा अनेक नाटकांतून भुमिका गाजल्या. दौ-यावर असतांना तुम्ही कंपनीत पत्र पाठवीत. एका गावावरून – आजी आजारी आहे. सबब दोन दिवस रजेवर आहे. आणि पुढच्या गावावरून दौ-याला – आजी वारली. सबब तेरा दिवस रजेवर आहे’ मग असे असंख्य दौरे आणि अगणित आज्या वारल्यावर कंपनीने तुम्हाला नाटक आणि कंपनी ह्यात निवड करायला सांगितली.
आता घरच्या कॅलेंडरवर नाटकाच्या तारखा लिहल्या जायच्या. समंजस ज्योती तारखांच्या हिशोबाने खर्चाचा ताळमेळ बसवे. परिवार वाढत होता. त्यामुळे आर्थिक स्थैर्यासाठी तुम्ही ट्रान्सपोर्ट लाईन सुरु केली. गाडी नंबर २७३०. बेळगाव , हुबळी , धारवाड , सत्तुर, शिरसी, बॅंग्लोर म्हैसूर, कलकत्ता हैद्राबाद सिंकदराबाद देवास नागपूर. ८ वर्ष. या आठ वर्षांनी तुम्हाला असंख्य अनुभव, अनेक वाटा, अगणित खड्डे दाखवले.
वाहतूक व्यवसाय बंद करून मुंबईला येणं हा मोठा निर्णय होता. सुरवातीच्या काळात मुंबईतला पत्ता सांगतांना ‘प्रभादेवीला रविंद्रनावाचा बंगला आहे’ असं तुम्ही सांगायचा. पण हा बंगला म्हणजे ‘रविंद्र नाट्य मंदिर’ हे अनेकांना माहिती नव्हतं. कोप-यावरचा पब्लिक फोन हाच तुमचा खाजगी दिवाणखान्यातला फोन. मुंबईबद्दलच्या एक अनामिक भितीने हळुहळु मुंबईच्या प्रेमात रुपांतर होत गेलं.
शरद तळवळकर, बाबूराव गोखले, यशवंत दत्त, मधुकर (मामा) तोरडमल अशी एक एक दिग्गज मंडळीच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही रंगभूमी गाजवु लागलात. थॅंक्यु मिस्टर ग्लाड, तरुण तुर्क म्हातारे अर्क, गुड बाय डॉक्टर, नाती गोती, रायगडाला जेव्हा जाग येते, श्री तशी सौ, कुर्यात सदा टिंगलम, पुरुष, ती फुलराणी, मी रेवती देशपांडे , माझं छान चाललंय, कार्टी काळजात घुसली… अशी पन्नासपेक्षा अधिक नाटके गाजवलीत. गाढवाचं लग्नने तर अक्षरश: धुमाकूळ घातला. नाटकानंतर मालिका, मराठी – हिंदी चित्रपटसृष्टीत तुम्ही हक्काचे ‘मोजो’ झालात.
पण रंगभूमीशी तुमचं नातं नाट्य परिषदेच्या रुपाने म्हणा किंवा अगदी आत्ता आत्ता ‘नटसम्राट’ , ‘सुमी आणि आम्ही’ अशा नाटकांच्या माध्यमातून म्हणा तुम्ही घट्ट ठेवलं.तुमच्या रंगभूमीवरच्या योगदानासाठी तुम्हाला संगीत नाटक अकादमी पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, विष्णुदास भावे पुरस्कार अशी अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. मराठी रंगभूमीवरचे तुमचे स्थान अढळ आहे. ….तेव्हा नटसम्राट येणार, हाऊसफुल्लचा बोर्ड लागणार प्रयोग पाहायला यावंच लागणार, झी नाट्यगौरव पुरस्कार २०२४ रविवार ७ एप्रिल संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर पाहता येणार आहे.
-
मनोज जरांगे पाटील यांच्या रांगड्या व्यक्तिमत्त्वासारखंच “मर्दमावळा”

महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्यासाठी २६ एप्रिलला येतोय “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध घेणाऱ्या “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” या चित्रपटाची अवघ्या महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा टीजर तसेच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या “उधळीन मी…” या सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या गाण्याला रसिक प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटातलं “मर्दमावळा…: हे धडाकेबाज गाणं लाँच करण्यात आलं आहे. दिव्य कुमार यांच्या दमदार आवाजात हे गीत स्वरबद्ध करण्यात आल आहे. येत्या २६ एप्रिल रोजी “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
मर्दमावळा या गाण्याला वीरश्री चेतवणारे शब्द, ताल धरायला लावणारं संगीत, भारदास्त आवाज लाभलाय. दिव्यकुमार यांनी हे गाणं गायलं असून, मंगेश कांगणे यांच्या शब्दांना चिनार महेश यांचं दमदार संगीत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर मराठा समाजानं केलेलं अफाट प्रेम, आरक्षणासाठी राज्यभर फिरताना त्यांना मिळालेला तुफान प्रतिसाद, त्यांच्या सभांना झालेली गर्दी या गाण्यात दाखविण्यात आली आहे. उत्तम गाण्याचं नेत्रदीपक चित्रीकरणही करण्यात आले आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या रांगड्या व्यक्तिमत्त्वासारखंच “मर्दमावळा” हे गाणंही रांगडेपण दर्शवणारं आहे.
शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाचे शिवधनुष्य पेलले असून त्यांनी याआधी धुमस, मुसंडी, मजनू आदी चित्रपटांसाठी म्हणून काम पाहिले आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.
“संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील”चित्रपटातून समाजासाठी लढणाऱ्या एका कार्यकर्त्याचा प्रेरणादायी प्रवास उलगडणार असल्याने आता हा चित्रपट पाहण्यासाठी २६ एप्रिलपर्यंत आपल्याला वाट पहावी लागणार आहे.
*Song Link*
https://youtu.be/jh50LjAw2BA?si=GUNg1QlZ9xh1WYtu
Thanks & Regards
Darshan S.Musale
(Media Planet) -
‘सन मराठी’च्या ‘कॉन्स्टेबल मंजू’मध्ये आता तात्यासाहेबांचा दरारा; मिलिंद शिंदे साकारणार खलनायकाची भूमिका

मालिकेमध्ये विरोधी स्वभावाची दोन मुख्य पात्रांची गोष्ट रंगत असताना जेव्हा त्यात तिस-या पात्राची एंट्री होते ज्याचा स्वभाव आधीच्या दोन स्वभावांपेक्षा अतिशय आगळा वेगळा असतो तेव्हा मालिकेत आणखी काहीतरी रंजक, कथेशी खिळवून ठेवणा-या घटना पाहायला मिळणार अशी प्रेक्षकांची आतुरता आणि अपेक्षा असते. प्रत्येक मालिकेच्या पहिल्या एपिसोडपासून प्रेक्षकांना कथेशी जोडून ठेवायचं, उद्याच्या भागात काय होणार याची प्रेक्षकांची कुतुहलता वाढवणं हे ‘सन मराठी’ वाहिनी अतिशय सुरेख जमतं. नुकतीच सुरु झालेल्या ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेने देखील पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांची मने जिंकायला सुरुवात केली आहे.
१८ मार्चपासून सुरु झालेल्या ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेत एका प्रसिध्द राजकारण्याचा कार्यकारी सत्या जो निडर, बिनधास्त आणि रावडी आहे, त्याच्या नशिबात येणार भित्री भागुबाई कॉन्स्टेबल मंजू. दोघांचेही स्वभाव एकमेंकाच्या अगदी उलट, पण नशिबाने त्यांची एकत्र गाठ बांधली जाणार आहे हे आपण प्रोमोमध्ये पाहिलंच आहे. पण आता मालिकेच्या कथेत एक नवीन ट्विस्ट येणार असून नवीन पात्राची एंट्री होणार आहे जो या दोघांपेक्षाही वेगळा आहे.
सत्या आणि मंजूच्या रणधुमाळीत आमदार तात्यासाहेब मोहिते यांचं आगमन होणार आहे आणि तात्यासाहेबांची भूमिका अभिनेते मिलिंद शिंदे साकारत आहेत. नुकताच त्यांच्या भूमिकेचा एक नवीन प्रोमो प्रदर्शित करण्यात आला ज्यामध्ये प्रेक्षकांना आमदार तात्यासाहेबांचा रुबाब, दरारा आणि वेळप्रसंगी भयानक पाऊल उचलण्याचा स्वभाव पाहायला मिळेल. मिलिंद शिंदे यांनी यापूर्वी अनेक खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत, त्यांच्या एंट्रीनेच समोरच्याची दातखिळी बसेल असा खलनायकाचा अभिनय ते अगदी जबरदस्त करतात. आता त्यांच्या येण्याने सत्या आणि मंजूच्या आयुष्यात काय वादळ येणार ते पाहण्यासाठी पाहत राहा ‘कॉन्स्टेबल मंजू’ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त आपल्या ‘सन मराठी’वर.
-
महेश मांजरेकरांच्या हस्ते ‘चांदवा’ प्रकाशित

‘प्रेम’ या अडीच अक्षरी शब्दांत दडलेली भावना लाखमोलाची असते. प्रत्येकाच्या प्रेमाची एकवेगळीच कहाणी असते. निस्सिम प्रेमाचा आणि साथीचा असाच मनस्पर्शी ‘चांदवा’ अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. स्टारक्राफ्ट मनोरंजन प्रस्तुत ‘चांदवा’ या मराठी म्युझिक अल्बमचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत फिल्मसिटीच्या बॉलीवूड थीमपार्क मध्ये झाले.‘चांदवा’ या नव्या अल्बमला आघाडीचा तरुण गायक स्वप्नील बांदोडकर आणि प्रथमच व्यावसायिक गायिका म्हणून पदार्पण करणाऱ्या श्रेया भारतीय यांचा स्वरसाज लाभला आहे. संतोष मिजगर आणि प्रणाली मेने हे कलाकार या अल्बम मध्ये दिसणार आहेत.
विशेष म्हणजे ‘चांदवा’अल्बमचे निर्माते संतोष मिजगर यांनी चित्रनगरी मधील बॉलीवूड थीमपार्क सर्वसामान्यांसाठी खुलं केलं आहे. ‘पाहिलेल्या स्वप्नांचा ध्यास घेता यायला हवा, असं सांगताना दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अल्बमचे निर्माते संतोष मिजगर यांचं भरभरून कौतुक केलं’. प्रेमाच्या उर्मीची जाणीव करून देणारं हे गाणं गाताना खूपच समाधान लाभल्याची भावना गायक स्वप्नील बांदोडकरने व्यक्त केली. स्वप्नील सारख्या कसलेल्या दिग्ग्ज गायकासोबाबत पहिलं व्यावसायिक गीत गाण्याची संधी मिळाल्याचा आनंद गायिका श्रेया भारतीय यांनी व्यक्त केला. एकमेकांच्या सहवासातून फुलणारं प्रेम आणि मिळणारी साथ खूप महत्त्वाची असते हे सांगू पाहणारं हे गाणं प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल, असा विश्वास ‘चांदवा’ अल्बमचे निर्माते, अभिनेते संतोष राममीना मिजगर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी बॉलीवूड थीम पार्कचे टीम चें चिराग शाह ,रवी रुपरेलिया, संतोष वाईकर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
‘आज वाटे मला जन्म झाला नवा I तुला पाहता मनी चांदवा’ I असे बोल असणाऱ्या या गाण्यातून एका जोडप्याचा निस्सिम प्रेमाचा प्रवास दाखविण्यात आला आहे. या गाण्यातून संतोष आणि प्रणाली या जोडीने प्रेमामागाची उत्कटता व त्यातील भावनेची खोली याचा सुरेख मेळ साधला आहे. दया होलंबे यांनी शब्दबद्ध केलेल्या गीताला संगीत देण्याची जबाबदारी डी. एच हार्मनी, एस.आर.एम एलियन यांनी सांभाळली आहे. झी म्युझिकने हे गाणं वितरीत केलं आहे. -
परंपरा”च्या निमित्ताने अभिनेते मिलिंद शिंदे आणि वीणा जामकर एकत्र

आपल्या संस्कृतीमध्ये अनेक विविध परंपरा आहेत. या परंपरा पाळताना अनेकदा आर्थिक ओझंही येतं. अशाच एका परंपरेची गोष्ट “परंपरा” या आगामी चित्रपटात मांडली जाणार असून, उत्तम स्टारकास्ट असलेला ‘परंपरा’ हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबोलो यांच्या स्टार गेट मूव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत “परंपरा” या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून फैजल पोपरे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन प्रणय निशिकांत तेलंग यांचे आहे. चित्रपटात अभिनेते मिलिंद शिंदे अभिनेत्री वीणा जामकर, प्रकाश धोत्रे, अरूण कदम, किशोर रावराणे, जयराज नायर, रोहित चव्हाण, प्रशांत नेमाण, मास्टर मच्छिंद्र, दिवंगत अभिनेते जनार्दन परब यांच्या उत्तम भूमिका आहेत. त्यामुळे सकस कथानक, उत्तम स्टारकास्ट हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरणार आहे. चित्रपटाची पटकथा प्रणय निशिकांत तेलंग आणि संजय सावंत यांची असून छायाचित्रण निशा तेलंग यांनी केले आहे. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना आनंद मेनन यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. श्रीकांत तेलंग यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे तर पार्श्वसंगीत विजय गवंडे यांचे आहे.
संस्कृती, रूढी, परंपरा जपताना अल्पभूधारक माणसाची होणारी फरफट चित्रपटाच्या केंद्रस्थानी असून नक्की अशी कोणती “परंपरा” आहे ज्याचा त्या कुटुंबाला फटका बसतो यासाठी आपल्याला २६ एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Thanks & Regards
Darshan S.Musale
(Media Planet) -
Bollywood music director and singer, AmitTrivedi, is set to make his debut in Kannada with the much-anticipated film Uttarakaanda

Renowned Bollywood Music Director and singer Amit Trivedi is now set to compose music for Uttarakaanda.With this announcement, the highly anticipated and multi-starrer movie has created more buzz . A popular and an experienced Bollywood music director scoring music for “Uttarakaanda” has doubled the expectations of the film.
Amit Trivedi is known to be one of the best music composers in the present Bollywood music industry due to his unique style of composition and originality, gaining a huge fan base. His discography includes Dev D , Queen, Wake Up Sid, English Vinglish, Kai Po Che, Lootera, Udta Punjab, Dear Zindagi, Secret Superstar, Manmarziyan, Andhadun, Sye Raa Narasimha Reddy and the recent web series Jubilee and the movie Shaitaan. Amit has worked in numerous films alongside well known film makers like Anurag Kashyap, Amir Khan and many more. The makers confirmed Charan Raj was roped in to score music only for the promo of the film “Uttarakaanda”, and Amit will be composing music for the whole movie.
Producers and director Rohit Padaki say, “We are trying to create a very raw and rustic world through Uttarakaanda. This story has a very native Indian emotion and Amit Trivedi’s music will weave a story by itself and reach across India. Amit being the best in business is an icing on the cake” .
“I have totally understood the vibe and emotion this film carries and the tale Rohit Padaki and KRG is ready to tell. I am all enthusiastic to explore and experiment. Highly excited to be a part of such hardcore native tales” says Amit Trivedi.
‘Uttarakaanda’ is an upcoming Action Drama set in North Karnataka backdrop, directed by Rohit Padaki, produced by Karthik Gowda and Yogi G Raj under the banner of KRG Studios. The movie stars Hattrick hero Dr. Shivarajkumar, Natarakshasa Daali Dhananjay in the lead roles. The team is in process of finalizing the female lead. The film is going on floors on April 15th in Vijayapura and surroundings. -
हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!” कलर्स मराठीवर २० एप्रिलपासून शनि-रवि रात्री ९ वा

आपल्या सर्वांची लाडकी वाहिनी कलर्स मराठी नव्या वर्षात नवी उर्जा आणि नवी झळाळी घेऊन आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा धमाकेदार खजिना घेऊन येत आहे. ‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’ या मालिकांनंतर कलर्स मराठी आता विनोदाचा ॲटमबॅाम्ब फोडायला सज्ज झाली आहे. महाराष्ट्राचा अत्यंत लाडका विनोदाचा बादशाह अर्थात डॅा. निलेश साबळे याच्याबरोबर विनोदाची ही सुपरफास्ट मेल आता कलर्स मराठी घेऊन येतेय. डॉ. निलेश साबळेबरोबरच भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदसम्राट या कार्यक्रमात सहभागी असणार असून या कार्यक्रमाचे नाव आहे, “हसताय ना ?हसायलाच पाहिजे!!” या कार्यक्रमाची लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार असून यात भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदि कलाकार त्यांना साथ देणार आहेत.
तर या कार्यक्रमात महाराष्ट्राचे कॅामेडी किंग आणि अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दोन महान कलाकार दर भागामधे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी लाभणार आहेत. त्यामुळे विनोदाचा हा पॅावरबाज डोस घेण्यासाठी सज्ज रहा.
डॉ. निलेश साबळे यांनी आपल्या बहारदार विनोदाने अवघ्या महाराष्ट्राला हसवले. केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात त्यांनी त्यांचे चाहते निर्माण केले. मराठी मनोरंजन सृष्टीत त्यांचे अनेक दिवाने आहेतच पण बॅालीवूडमध्येही डॅा निलेश साबळे यांनी सगळ्या सुपरस्टार्सना आपल्या कॅामेडीचे जबरदस्त फॅन केले. भाऊ कदम यांनीही आपल्या मिश्किल चेहऱ्याने आणि निखळ विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले. तसेच ओंकार भोजनेही आपल्या खास शैलीमुळे प्रेक्षकांचा लाडका झाला. आता विनोदाचे हे तीन हुकमी एक्के एकत्र येऊन पुन्हा एकदा नव्या जोशात , नव्या जल्लोषात विनोदाची चौफेर आतषबाजी करायला सज्ज झाले आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवायला येत असलेला ”हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!’ हा शो कलर्स मराठीवर २० एप्रिलपासून शनिवार – रविवार रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता लोटपोट हसण्यासाठी सज्ज रहा आणि पहायला विसरू नका, “हसताय ना ? हसायलाच पाहिजे!” फक्त कलर्स मराठीवर!

-
बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षपदी निलम शिर्के-सामंत याची एकमताने निवड

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था ‘बालरंगभूमी परिषद’ मुंबईची सर्वसाधारण सभा पुणे येथे संपन्न झाली.
सभेने सन. २०२४-२९ साठी एकमताने कार्यकारी मंडळाची निवड करत अभिनेत्री निलम शिर्के-सामंत यांची अध्यक्षपदी, तर राजीव तुलालवार- कार्याध्यक्ष, सतीश लोटके-प्रमुख कार्यवाह, दीपा क्षीरसागर- उपाध्यक्ष, दीपक रेगे-कोषाध्यक्ष, आसेफ (अन्सारी) शेख व दिपाली शेळके सहकार्यवाह या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून ॲड.शैलेश गोजमगुंडे- लातूर, आनंद खरबस- सोलापूर, वैदेही चवरे- सोईतकर- नागपूर, अनंत जोशी- अहमदनगर , आनंद जाधव – नाशिक, योगेश शुक्ल – जळगाव, धनंजय जोशी- सांगली , त्र्यंबक वडसकर – परभणी, नंदकिशोर जुवेकर – रत्नागिरी यांची निवड करण्यात आली. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी निवडणूक अधिकारी म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी पार पाडली. सर्वसाधारण सभेची सुरुवात मागील सभेचे इतिवृत्त वाचून करण्यात आली. त्यानंतर विषयपत्रिकेनुसार सभेचे कामकाज सुरू झाले. त्यानंतर माजी अध्यक्ष प्रकाश पारखी यांनी संस्थेच्या मागील कार्याचा आढावा सभेपुढे मांडला. त्यासोबतच पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली आणि यात १७ कार्यकारी मंडळ सदस्यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्षा निलम शिर्के-सामंत यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यभार स्वीकारला.कार्याध्यक्षपदी राजू तुलालवार तर प्रमुख कार्यवाह सतीश लोटके
बालरंगभूमी चळवळी विषयक सभेत सभासदांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षा निलम शिर्के- सामंत यांनी सर्व कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन करत आपले मनोगत व्यक्त केले. ज्यामध्ये त्यांनी बालरंगभूमी परिषदेच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अनेक नवीन उपक्रमांची घोषणा केली. ज्यामध्ये स्पर्धा किंवा बालरंगभूमीवर तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी बाल कलावंतांना सक्षम करण्याच्या हेतूने अभिनयासोबतच बाल कलावंतांना रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, दिग्दर्शन याचेही प्रशिक्षण देण्यात यावे, यावर भर देण्यात आला. बालरंगभूमी परिषद केवळ नाट्यकलेपुरतीच मर्यादित न राहता इतर ललित कला प्रकारांचा समावेश त्यामध्ये व्हावा, या हेतूने भविष्यात बालरंगभूमी परिषदेचे कार्य राहील असेही त्या म्हणाल्या. प्रत्येक शाखा सक्षम व्हावी या हेतूने कार्यभार स्वीकारताच काही कालावधीतच संपूर्ण विभागाचा दौरा करण्याचा मानस त्यांनी दर्शविला. बालरंगभूमी परिषदतर्फे वर्षातून एकदा तरी एका बालनाट्याची निर्मिती व्हावी या हेतूने प्रत्येक शाखेने प्रयत्न करायला हवा, प्रत्येक शाखेचं कार्यालय असावे, विविध पारितोषिक विजेत्या तसेच उत्कृष्ट अशा बालनाट्य संहिता एकत्रित करून त्या निशुल्क सर्वांना उपलब्ध कशा करून देता येतील या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, बालरंगभूमीसाठी सातत्याने बालनाट्य चळवळ राबविणाऱ्या किंवा बालरंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या होतकरू कलावंतांचा, जेष्ठाचा सन्मान बालरंगभूमी परिषदेतर्फे करण्यात यावा, बालनाट्य संमेलनाची सुरुवात करण्यात यावी यासारख्या अनेक बाबींचा समावेश आपल्या मनोगतात करीत हे संपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी आपण स्वतः एक कलावंत व बालरंगभूमी परिषद सदैव कार्यरत राहील असे अध्यक्ष निलम शिर्के-सामंत यांनी सांगितले. संपूर्ण वर्षभरातील कार्यक्रमांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याबरोबरच सर्व उपक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निधी उभा करणे यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत. सर्व सभासदांच्या विचारांचे स्वागत करत त्यासंबंधी नक्कीच निर्णय घेतला जाईल असे अध्यक्ष निलम शिर्के-सामंत यांनी सांगितले. प्रार्थनेने सर्वसाधारण सभेची सांगता झाली सदर सर्वसाधारण सभेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून विविध शाखांमधील कार्यकारिणी सदस्य तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाट्यसंमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले , अजित भुरे व सर्व नियामक मंडळ सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन केले. -
Actress Jyoti Saxena Also Expresses Her Desire to Join Politics Ahead In Future

Jyoti Saxena is one such actress in Tinsel Town who never refrains from saying what she actually feels and now the actress has expressed her recent and biggest desire, and the desire is something that would even turn out to be a shock to many audiences the actress has expressed her keen interest in venturing into the realm of politics.
Saxena revealed that her interest in politics has been long-standing. “I have always been intrigued by politics and I feel it has the potential to bring about positive change in society which usually many lack. Being an actress, I have the privilege to connect with people from diverse backgrounds, and I believe this exposure will help me with a deep sense of responsibility towards the welfare of our society.”
The actress expressed her willingness to actively participate in political activities and even join a political party if the opportunity arises. “If any political party extends an offer to me, I would gladly accept it happily. I am committed to contributing my part towards the betterment of our nation. It’s truly inspiring to witness the advancements in various sectors. I would be grateful, If I ever got a chance and would love to work for the welfare of society, through education, women’s rights, and even for the animal’s rights.”
Jyoti Saxena’s aspiration to transition into politics reflects her deep-rooted commitment to serving society and contributing to the nation’s development. With her passion, determination, and dedication, she aims to make a meaningful impact in the political landscape, paving the way for a brighter future for India and its citizens.
