Home

  • THE NEWS BULLETINS Launched by Pranav Birje

    On the auspicious day of Gudi Padva that marks the beginning of the new year, the day on which God Brahma created time and the universe, Pranav Birje launches his most ambitious project – THE NEWS BULLETINS

    THE NEWS BULLETINS is an all inclusive and exhaustive effort of Pranav and his team to bring you the latest news, interviews and updates in the fields of Entertainment, Showbiz, Bollywood, Theatre, Lifestyle, Business, Politics, Education, Healthcare, Sports, Technology and other sectors virtually presenting a 360 degrees of the news, information, updates and reviews of the latest innovation and product launches.

    The first phase commences with the website and a portal, with *THE NEWS BULLETINS* gradually spreading its tentacles in the Digital World on the Facebook, Instagram, Twitter and YouTube.

    Pranav Birje seeks your blessings and best wishes in his latest endeavor.

  • आशा भोसले यांनी सांगितल्या बाबुजींच्या आठवणी

    ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाला दिल्या शुभेच्छा

    मराठी मनावर कोरलेले संगीतविश्वातील एक दिग्गज नाव म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके. म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबुजी. आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या बाबुजींची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट येत्या १ मे रोजी रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट म्हणजे आजवरचा सर्वात भव्य स्वरमयी बायोपिक ठरणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बाबुजी आणि त्यांच्यासोबत गायलेल्या अनेक नामवंताच्या असंख्य गाजलेल्या गाण्यांना चित्रपटगृहात नव्याने अनुभवण्याची पर्वणी या कलाकृतीच्या माध्यमातून मिळणार आहे. दरम्यान ‘स्वरांची गंगा’ समजल्या जाणाऱ्या आशा भोसले यांनी बाबुजींसोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.

    बाबुजी आणि आशाबाईंनी कायमच आपल्या प्रतिभेची चमक दाखवली आहे. त्यांच्या स्वर्गीय सुरांनी नटलेल्या प्रत्येक गाण्याला लाभलेली लोकप्रियता अवर्णनीय आहे. या दोघांनी गायलेली सगळीच गाणी ऐकताना त्या कलाकृतीच्या अलौकिकतेचा प्रत्यय येतो. ही गाणी सदाबहार असून ‘जगाच्या पाठीवर’, ‘या सुखांनो या’, ‘धाकटी बहीण’, ‘लाखाची गोष्ट’, ‘सुवासिनी’, ‘लक्ष्मीची पाऊले’ अशा अनेक चित्रपटांतील गाण्यांना या जोडीचा आवाज लाभला आहे. ही सगळीच गाणी अजरामर आहेत.

    आशा भोसले बाबुजींसोबतच्या आठवणींना उजाळा देताना म्हणतात, ” बाबुजी म्हणजे एक अष्टपैलू आणि कलासक्त कलाकार. ‘का रे दुरावा…’ चा एक गंमतीदार किस्सा म्हणजे. हे गाणे गाताना ‘का रे दुरावा… ही ओळ गाताना बाबुजींनी मला खूपच हावभाव व्यक्त करण्यास सांगितले. परंतु हे करताना मला खूप हसायला येत होते. मी असे हावभाव दिले तर लोकं वेडं म्हणतील मला. त्यावर त्यांचे उत्तर होते, नाही.. नाही… चांगलं म्हणतील. अशा पद्धतीने ते गाणं शिकवायचे. त्यामुळे आम्ही समृद्ध होत गेलो. मी बाबुजींना खूप मानते, ते माझे गुरूच आहेत. त्यांची आयुष्यगाथा सांगणारा चित्रपट येतोय. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद.”

    सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे.  ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • छत्रपती संभाजी महाराज यांच्या महतीचे गायन जय शंभूराया

    आनंदी वास्तू प्रोडक्शनच्या आनंद पिंपळकर यांचा पुढाकार

    छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणाचा, बलिदानाचा दिवस महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातली शिवप्रेमी,धर्मप्रेमी, शंभूप्रेमी जनता कधीच विसरू शकणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळा मध्ये दिडशे लढाया यशस्वीरित्या जिंकल्या. थोरल्या महाराजांच्या महानिर्वाणानंतर दिल्लीच्या औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास व छत्रपती संभाजी महाराजांचे स्वरूप म्हणजे ईश्वर स्वरूपच आहे. ‘यदा यदाही धर्मस्य’ पद्धतीने धर्मरक्षणाची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी पार पाडली नसती तर औरंगजेबाने महाराष्ट्रात नंगानाच केला असता. छत्रपती संभाजी महाराजांचे पुण्यस्मरण म्हणून आनंदी वास्तु प्रोडक्शन निर्मित छत्रपती संभाजी महाराजांची महती सांगणारी व आर्ततेने केली गेलेली आरती नुकतीच प्रदर्शित झाली असून आनंद पिंपळकर यांच्या ‘आनंदी वास्तू’ या यूट्यूब चॅनलवर आपल्याला ही आरती पहायला मिळेल. ‘जय शंभूराया’ या आरतीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या महतीचे गायन केले आहे.

    आरती ही देवतांची होते आणि छत्रपती संभाजी महाराज हे सर्व धर्मप्रेमींचे देवच आहेत.. त्यांच्या अखंड बुद्धिमत्तेने, शौर्याने, बलिदानाने त्यांचे देवत्व सिद्ध होते. देवतेची प्रत्येकाची संकल्पना ही वेगळी आहे पण छत्रपती संभाजी महाराज हे नावाप्रमाणेच शंभू महादेवच वाटतात आणि त्यांचे आर्ततेने स्मरण सुमनांजली म्हणजे हे आरती गीत आहे असे मत प्रसिद्ध वास्तूतज्ञ आनंद पिंपळकर यांनी व्यक्त केले. अत्यंत कमी वेळामध्ये हे शिवधनुष्य पेलण्याचे कार्य केवळ श्री शंभूराजांच्या आशीर्वादाने झाले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    ‘जय शंभूराया’ या आरती गीताच्या चित्रीकरणाची सर्व जबाबदारी अगदी कमी कालावधीत दिग्दर्शक सुरज वामन यांनी पार पाडली असून अजय घाडगे यांनी सुंदर छायाचित्रण केलं, अक्षय पितळे व निनाद शिंदे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे.  हे गीत सोनू म्युझिकचे मारुती चव्हाण यांनी लिहिले आहे. संगीत तेजस साळुंखे यांचे आहे तर संदीप रोकडे आणि दीक्षा वावळ यांच्या तडफदार आवाजामध्ये हे आरती गीत ऐकताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. हे आरती गीत शब्दबद्ध केलंय शुभम कुलकर्णी यांनी तर आनंद पिंपळकर,प्रणव पिंपळकर, धनश्री कदम, रोहित इंजनवारे यांच्या प्रमुख भूमिका असून निर्माती आहे अश्विनी पिंपळकर.

    प्रत्येक शंभूभक्ताने छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरण म्हणून दररोज हे आरती गीत ऐकायलाच हवे, असे आवाहन श्री आनंद पिंपळकर यांनी केले आहे. आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या youtube चॅनलवर ‘जय शंभूराया’  हे आरती गीत आपल्याला पहाता येईल.

  • नवोन्मेषाचा आनंद घेऊन रंगला  ‘चिरायू’

    ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ म्हणजेच ‘गुढीपाडवा’ उत्साहाने आणि उमेदीने साजरे करण्याची आपली परंपरा आहे. मराठी मनोरंजनसृष्टीही त्याला अपवाद नाही.  नवनवे संकल्प आणि कार्य-प्रकल्पांसोबत मनोरजंनाची गुढी उभारत मराठी नववर्षाचं स्वागत ‘चिरायू’तर्फे दरवर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दणक्यात साजरं केलं जातं. यंदाही गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी ‘शेलार मामा फाऊंडेशन’ आणि ‘प्लॅनेट मराठी’च्या वतीने नववर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यात आलं. ‘चिरायू २०२४’ साठी अवघं मराठी कलाविश्व एकवटलं होतं.

    ‘शेलार मामा फाऊंडेशन’ आणि ‘प्लॅनेट मराठी’च्या वतीने आयोजित ‘चिरायू २०२४’ चे वैशिष्ट्य म्हणजे नवोन्मेषाच्या आनंदासोबतच पडद्यामागे राबणाऱ्या कलाकर्मींची दखल ‘चिरायू’ च्या मंचावर आवर्जून घेतली गेली. कलेच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या सतीश लिंगाप्पा खवतोडे (कपडेपट), देविदास दरवेशी  (नेपथ्य), डॉ. खुशाले (रुग्णसेवा),  रेखा सावंत (केशभूषा) यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. यंदाच्या या  सोहळ्यात रील स्टार्स रोहित मावळे  (फूड व्लागर),  आरजे प्रणित (स्टंड अप कामेडी), रोहन पाटकर (वाईल्ड लाईफ फोटोग्राफी),  वैष्णवी नाईक (फॅशन एंड लाईफस्टाईल) सुमन धामणे आजी  (खाद्यपदार्थ/ फूड) यांचाही गौरव करण्यात आला. ‘श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या सायली, रुद्र, हंसिका या लहानग्यांनी सुरेख गुढ्यांची निर्मिती केल्याबद्दल त्यांचं खास कौतुक ‘चिरायू’ च्या मंचावर करण्यात आलं. 

    याप्रसंगी बोलताना‘चिरायू’चे सुशांत शेलार यांनी सांगितले की, ‘नव्या उमेदीने आम्ही नववर्षाची सुरुवात करीत असून मनोरंजनाच्या माध्यमातून कलेचा वसा समृद्धपणे जपण्याचा तसेच  मराठी सृष्टीला नाविन्याचा आयाम देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

    याप्रसंगी बोलताना‘चिरायू’चे सुशांत शेलार यांनी सांगितले की, ‘नव्या उमेदीने आम्ही नववर्षाची सुरुवात करीत असून मनोरंजनाच्या माध्यमातून कलेचा वसा समृद्धपणे जपण्याचा तसेच  मराठी सृष्टीला नाविन्याचा आयाम देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. वीणा ग्रुप, मुंबई बीट्स, नील ग्रुप, समर्थ व्हिजन हे यंदाच्या ‘चिरायू २०२४’ चे प्रायोजक होते.

  • गारवा फेम गायक मिलिंद इंगळे यांचे नवीन गाणे “सुंदर कोकणराज..

    उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात कोकणात जाण्याचे… म्हणूनच सप्तसूर म्युझिकनं कोकणाचं सौंदर्य दाखवणारा म्युझिक व्हिडिओ लाँच केला आहे. गारवा फेम गायक मिलिंद इंगळे यांनी हे गाणं गायलं असून, ‘आमच्या मनात एकच ध्यास, होवचो कोकण सुंदर राज’ असे शब्द असलेल्या या म्युझिक व्हिडिओमध्ये प्रभाकर मोरे, वैष्णवी जोशी चमकले आहेत.   

    सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी कोकणराज या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. मंगेश केरकर यांनी गीतलेखन केलं आहे. संगीत संयोजन कलमेश भडकमकर यांचं आहे. कृतिक माझिरे यांनी कोरिओग्राफी आणि दिग्दर्शन केलं आहे. कोकणी पद्धतीनं गाऱ्हाणं मनोहर गोलांबरे यांनी घातलं आहे. सप्तसूर म्युझिकनं आतापर्यंत केलेल्या अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये या नव्या म्युझिक व्हिडिओची भर पडली आहे.

    गावच्या वेशीवरचा वेताळ, आजीच्या हातच्या घासापासून कोकणाच्या संस्कृतीचं दर्शन या म्युझिक व्हिडिओत घडवण्यात आलं आहे. म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून कोकणी जगण्याची जणू गोष्टच सांगण्यात आली आहे. अतिशय श्रवणीय असलेल्या या गीताला प्रभाकर मोरे आणि वैष्णवी जोशी यांच्या अभिनयानं आणखी खुलवलं आहे. त्याशिवाय नेत्रसुखद चित्रीकरणाचीही त्याला जोड लाभलीय. त्यामुळे प्रत्येकाला हा म्युझिक व्हिडिओ आपलासा वाटेल यात शंका नाही. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात कोकणाची संस्कृती अनुभवासाठी कोकणराज म्युझिक व्हिडिओ पाहायलाच हवा.

    Song Link*

    https://youtu.be/P61rR1Pgmdo

  • आयुष शर्मा नायक असलेल्या ‘रुस्लान’च्या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना भावला

    ‘वजूद क्यों ढूंढे तू,जब हुनर ही तेरा साथी है’ या ‘रुस्लान’ चित्रपटाच्या दमदार संवादाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. शुक्रवारी मुंबईत प्रदर्शित झालेल्या ‘रुस्लान’च्या  ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या कथेची झलक पाहायला मिळाली,ज्यामध्ये आपल्याला नायक स्वतःचा शोध घेताना दिसतो.

    यात नायकाची मुख्य भूमिका आयुष शर्मा याने साकारलेली आहे.त्याची ओळख शोधण्यासाठी तो अथक प्रवासाला निघतो ज्यामुळे त्याचे जग उदध्वस्त होण्याची भीती असते. दिग्दर्शक करण एल. बुटानीच्या दूरदर्शी कथेमध्ये जबरदस्त व्हिज्युअल आणि थरारक ॲक्शन सीक्वेन्स आहेत जे प्रेक्षकांना त्यांच्या आसनांवर खिळवून ठेवतात.
    ‘रुस्लान’मध्ये थरार, सस्पेन्स व्यतिरिक्त अनेक मुद्दे आहेत जे ओळख आणि जीवनातील उद्देशांसंदर्भात भाष्य करताात.या गोष्टी प्रेक्षकांना चित्रपटाशी जोडतात. दमदार कथा आणि हृदयस्पर्शी दृश्यांसह ‘रुस्लान’चा ट्रेलर प्रेक्षकांना त्यांच्या जागेवर खिळवून ठेवतो.सुश्री मिश्राची ओळख या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून करण्यात आली आहे.

    चित्रपटाबद्दल आयुष शर्मा म्हणतो की, “’रुस्लान’चा ट्रेलर जगासमोर सादर करण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत होतो. मी माझा प्रवास सर्व प्रेक्षकांसोबत शेअर करायला फार उत्सुक आहे. सज्ज व्हा, कारण ‘रुस्लान’ तुम्हाला अशा प्रवासाला घेऊन जाणार जो प्रवास तुम्ही कधीही विसरणार नाही !”

    अभिनेते सुश्री मिश्रा यांनी  सांगितले की, “एक अभिनेता म्हणून ‘रुस्लान’चा एक भाग बनणे हा एक रोमांचक आणि आव्हानात्मक प्रवास आहे.आमच्या ट्रेलर द्वारे मी आम्ही बनवलेल्या जगाची झलक प्रेक्षकांना दाखवण्यासाठी उत्सुक आहे. मला खात्री आहे की प्रेक्षक ‘रुस्लान’च्या कथेत हरवून जातील. हा एक असा चित्रपट आहे जो पाहणाऱ्या प्रत्येकावर कायमची छाप सोडेल.”

    दिग्दर्शक करण एल.बुटानी म्हणतात, “‘रुस्लान’चा ट्रेलर पाहून माझा उर अभिमानाने भरुन आला आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी आम्ही फार मेहनत घेतली आहे. प्रेक्षकांना आमच्या कथेशी समरस करुन घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

    तर चित्रपटाचे निर्माते के.के. राधामोहन (श्री सत्य साई आर्ट्स) म्हणतात, “आम्ही एक मनोरंजक ॲक्शन थ्रिलर बनवण्याचा प्रयत्न केला आहे जो प्रेक्षकांना आकर्षित करेल. या चित्रपटात भावना, ॲक्शन सस्पेन्स आणि मनोरंजनाचे प्रत्येक घटक आहेत.” चित्रपटाच्या ट्रेलरने आमच्या प्रेक्षकांना कथेची झलक दिली आहे आणि मला खात्री आहे की कथा त्यांना नक्कीच आवडेल.”

    चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आल्याने  प्रेक्षकांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढताना दिसून येत आहे. ही अनोखी कहाणी पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटात आयुष शर्मा, सुश्री मिश्रा, जगपती बाबू आणि विद्या मालवदे मुख्य भूमिकेत आहेत.  ‘रुस्लान’चे दिग्दर्शन करण एल. बुटानी यांनी केले असून याची निर्मिती के. के. राधामोहन (श्री सत्य साई आर्ट्स) यांनी केली आहे. हा चित्रपट 26 एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. तर एनएच स्टुडिओद्वारे ‘रुस्लान’ जगभरात प्रदर्शित केला जाईल.

  • आई -मुलीतील केमिस्ट्री उलगडणार ‘मायलेक’ जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

    ‘मायलेक’ या नावावरूनच हा मराठी चित्रपट आई आणि मुलीच्या नातेसंबंधावर बेतलेला आहे, याची कल्पना आतापर्यंत सर्वांनाच आली असेल. रिअलमधील मायलेकींनी रिलमधील अनोखी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा एक कमाल कौटुंबिक चित्रपट असल्याचे दिसतेय.  या ट्रेलर लाँच सोहळ्याला हिंदी सिनेसृष्टीत आपली छाप उमटवणारी  आदी मान्यवर उपस्थित होते.

    ट्रेलरमध्ये आईमुलीचे स्ट्राँग बाँडिंग दिसत असतानाच त्यांच्या या सुंदर नात्यात दुरावा येत असल्याचेही दिसतेय. आता हा दुरावा का येतोय, यात उमेशची भूमिका काय? या ‘मायलेक’ पुन्हा एकत्र येणार, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट पाहून मिळणार आहेत.

    ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटाची सोनाली आनंद निर्माती असून या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कल्पिता खरे, बिजय आनंद  सहनिर्मिती या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत. आई आणि मुलीची सुंदर केमिस्ट्री ‘मायलेक’मधून पाहायला मिळणार असून येत्या १९ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

    चित्रपटाबद्दल निर्माती, अभिनेत्री सोनाली खरे म्हणते, ”हा चित्रपट प्रत्येक आईमुलीची गोष्ट सांगणारा आहे. खूप संवेदनशील असे हे नाते आहे. हे नाते कधी मैत्रीचे असते तर कधी एका वेगळ्याच वळणावर जाते. त्यामुळे हे नाजूक नाते उत्तमरित्या, विचारपूर्वक हाताळणे खूप गरजेचे आहे. ‘मायलेक’मधून कोणताही संदेश देण्यात आलेला नसून तुमच्या आमच्या घरातील ‘मायलेकी’ची ही जोडी आहे. ज्या धमाल, मजामस्ती करत आहेत. वाईट काळात मोठे निर्णय घेताना एकमेकींना साथही देत आहेत. त्यामुळे ‘मायलेक’ तुम्हाला विशेषतः आईमुलीला खूप जवळचा वाटेल. माझे आणि सनायाचे नातेही असेच आंबटगोड आहे. त्यामुळे पडद्यावर या व्यक्तिरेखा साकारणे सहज शक्य झाले. हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा आहे.”

  • मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वनमध्ये समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरी दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

    स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली लाडकी जोडी अर्थात शुभम आणि कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वनच्या गुढीपाडवा विशेष भागात समृद्धीला सूत्रसंचालनात साथ देणार आहे अभिनेता हर्षद अतकरी.

    यंदाच्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे स्पर्धक जोडीने नृत्य सादर करतात. आई-मुलगी, गुरु-शिष्य, मामा-भाचे, बहिणी-बहिणी अशी अनेक नाती आणि त्यांची नृत्यकला या मंचावर पहायला मिळत आहे. स्पर्धकांसोबतच सूत्रसंचालनही जोडीने सादर होतंय. समृद्धीसोबतच स्टार प्रवाह परिवारातले कलाकार सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडतात. मन धागा धागा मालिकेतील सार्थक आणि साधी माणसं मालिकेतील सत्यानंतर आता अभिनेता हर्षद अतकरी सूत्रसंचानलाची भूमिका पार पाडताना दिसेल. समृद्धी आणि हर्षदच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. त्यामुळे ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा पहाण्याची संधी मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वनचा मंच घेऊन आला आहे. तेव्हा पाहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

  • Kaabil Have Showcased The Raw Reality Of Today’s Generation’s Love Life

    In an era where music serves as a universal language, “KAABIL” is poised to make its mark, leaving a lasting impression on listeners worldwide. Delbar Arya and Pratik Sehajpal bring us KAABIL, a music video that delves into the story of modern relationships, and betrayal.

    “KAABIL” is entirely a story of betrayal and false promises. The story unfolds with Delbar Arya and Pratik Sehajpal deeply in love, only for their relationship to be shattered by Delbar’s cheating on Pratik with another man.  However, the cycle of betrayal continues as Delbar finds herself cheated by another man as well.

    Delbar Arya shares insights into the inspiration behind “KAABIL,” stating, “We wanted to capture the essence of modern relationships, where trust is fragile, and love often comes with a price. Through our song, Kaabil we aim to shed light on the harsh realities of betrayal and the raw reality of today’s generation’s love life, and I am sure this song will surely remind you of the person with whom you have ever been cheated. And Stebin’s voice is surely adding a more touch to this heartbreak anthem. The entire team has worked very hard to deliver this song and I hope that the song gets appreciated and loved by everyone.”

    Sharing his experience of working with Pratik she says, ” We shot this song in Sweden. I had a great time shooting with him. He is a gem of a person, kind, and a dear friend now. I hope our chemistry is visible in our song. “

    Pratik Sehajpal also expresses admiration for his co-star, Delbar Arya, stating, “I loved working with Delbar. She’s hardworking and sweet and an amazing actress. We had a great time shooting together. I used to chidaoo her on set also, we had a lot of fun.”

    Moreover, the music video is a visual spectacle, filmed in breathtaking locations that serve as a metaphor for the highs and lows of love. Reflecting on their collaboration, Indeed, the chemistry between Delbar and Pratik is palpable. Their camaraderie shines through in every frame, underscoring the depth of their bond both on and off-screen. The song is presented by the music label PROBEATS and produced by Images International.

    “KAABIL” promises to resonate with anyone who has experienced the tumultuous journey of love, loss, and redemption.

  • Aaj ki Taaza Khabar! Disney+ Hotstar announces the second season of Bhuvan Bam starrer Taaza Khabar



    Mumbai, 05 April, 2024: Zindagi badi ajeeb hai, kabhi kabhi maut se shuru hoti hai. A grim revelation, strained relationships and a story of one man stumbling upon magical powers and the ripples it creates in his life. The long wait is over, as this time around Vasya (Bhuvan Bam) is set out to rewrite his own destiny in Disney+ Hotstar’s action-drama series, Hotstar Specials ‘Taaza Khabar.

    Produced by Rohit Raj & Bhuvan Bam under the banner BB Ki Vines productions, directed by Himank Gaur and written by the duo Hussain & Abbas Dalal, starring the social media sensation Bhuvan Bam along  with Shriya Pilgaonkar, Mahesh Manjrekar,  Deven Bhojani, Shilpa Shukla, Prathmesh Parab, Nitya Mathur, and others in pivotal roles.

    Gaurav Banerjee, Head – Content, Disney+ Hotstar & HSM Entertainment Network, Disney Star said, “The resounding success of Taaza Khabhar season 1 is a testament to Disney+ Hotstar’s commitment in its pursuit of bringing quality entertainment. With Bhuvan Bam at the forefront, the series has piqued curiosity among fans across the globe. We are thrilled to announce Taaza Khabhar Season 2, offering audiences an immersive journey into the world of Vasya.”

    Popular content creator and actor Bhuvan Bam said, “Taaza Khabar Season 1 was loved and appreciated by everyone and I cannot thank all my fans enough for this massive support. Vasya is very close to my heart and I resonate with him on many levels. His journey nudged me to delve deeper into his mind and understand the character more. Slipping back into the skin of Vasya for Taaza Khabar Season 2 is an enriching experience and I can’t wait to explore more intricacies of the character. As a concept, the show has been relatable for the viewers and I am glad to have made my debut with this one. Season 2 will take audiences on a thrilling ride and leave them intrigued and wanting for more. I am super excited for this one and am thankful to Disney+ Hotstar for this opportunity.”

    Talking about Taaza Khabar season 2, Director Himank Gaur said,  “When we made the first season, we wished to bring a world of magical powers to the audiences and how it could have adverse consequences on reality. Bhuvan Bam is a household name and he has indeed made a space for himself as Vasya in the hearts of the audiences. We are elated to bring to audiences Season 2, where Vasya sets the stakes higher and everything around him changes. We can’t wait to give you a gripping story with this new season.”

    Disney+ Hotstar is India’s leading streaming platform that has changed the way Indians watch their entertainment – from their favourite TV shows and movies to sporting extravaganzas. With the widest range of content in India, Disney+ Hotstar offers more than 140,000+ hours of TV Shows and Movies in 19 languages and coverage of major global sporting events.