Home

  • आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ लवकरच…

    एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार असून  नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. बियु प्रॉडक्शन निर्मित  ‘धर्मा- दि एआय स्टोरी’चे  पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शक आहेत. पुष्कर जोग यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके विषय दिले आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा नाविन्यपूर्ण असतो, त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी भन्नाट पाहायला मिळेल.  या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. तर पुष्कर सुरेखा जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यात प्रमुख भूमिकेत दिसतील.

    आतापर्यंत आपण एआय टेक्नॉलॉजी आपण फक्त सोशल मीडिया आणि इतर वेगवेगळ्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर पाहिली होती. आता हाच विषय थेट आपल्याला मराठी चित्रपटात पाहायला मिळणार असल्याने ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ विषयीची उत्सुकता आता वाढलेली दिसत आहे.

       चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात,” मराठी मनोरंजन विश्वात हा प्रयोग पहिल्यादांच होत आहे. या चित्रपटाचा विषय नवीन असून यामध्ये तुम्हाला अनेक नवीन गोष्टी दिसतील. हा विषय एआयवर आधारित आहे. कसा एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून वैयक्तिक सूड उगवण्याचा प्रयत्न करत एका निष्ठावंत बापाच्या मुलीचे अपहरण केले जाते. आपल्या मुलीला पुन्हा जिवंत पाहाण्यासाठी धर्म मुक्तीच्या धोकादायक प्रवासाला निघालेल्या या बापाची कहाणी यात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात सुरू झाली असून सप्टेंबर महिन्यात ही फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”

  • रीलस्टार’मध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार भूषण मंजुळे

    मराठी सिनेसृष्टीत नेहमीच विविधांगी विषयावर चित्रपट बनत असतात. यापैकी काही चित्रपट फुल टू मनोरंजन करणारे विनोदी, तर काही मनोरंजनासोबतच प्रबोधन करणारेही असतात. समाजातील वास्तव चित्र दाखवताना प्रेक्षकांचं सहकुटुंब परीपूर्ण मनोरंजनही करणाऱ्या ‘रीलस्टार’ या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे दुसरे शेड्यूल सध्या सुरू असून या चित्रपटात एक असा चेहरा मुख्य भूमिकेत झळकणार आहे, ज्याने आजवर काही गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. सुप्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांचा भाऊ भूषण मंजुळे ‘रीलस्टार’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

    ‘रीलस्टार’ची निर्मिती जे ५ एन्टरटेन्मेंट आणि इनिशिएटिव्ह फिल्म या बॅनर्सखाली करण्यात येत आहे. मराठीसह हिंदीतही रिलीज झालेल्या मल्टिस्टारर ‘अन्य’ या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक सिम्मी जोसेफ आणि रॅाबिन वर्गिस ‘रीलस्टार’चं दिग्दर्शन करीत आहेत. ‘रीलस्टार’च्या माध्यमातून एक वेगळा विषय हाताळण्याचं शिवधनुष्य उचलण्यात आलं आहे. अशा महत्त्वपूर्ण चित्रपटात नायकाची भूमिका साकारण्याची संधी भूषण मंजुळेला मिळाली आहे. भूषणने यापूर्वी ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘कारखानिसांची वारी’, ‘घर बंदूक बिर्याणी’ या मराठी चित्रपटांसोबतच ‘झुंड’ या हिंदी चित्रपटात सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. ‘रीलस्टार’च्या निमित्ताने तो प्रथमच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आजवर भूषणने साकारलेल्या व्यक्तिरेखांचं नेहमीच कौतुक करण्यात आलं आहे. त्यामुळे ‘रीलस्टार’मधील भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारी ठरणार आहे. या चित्रपटासाठी भूषण कसून मेहनत घेत असून, आपल्या कॅरेक्टरमधील बारकावे कॅमेऱ्यासमोर सादर करण्यासाठी सर्वतोपरी अभ्यास करत आहे. भूषणच्या निवडीबाबत सिम्मी जोसेफ म्हणाले की, आम्हाला नायकाच्या भूमिकेसाठी एक फ्रेश चेहरा हवा होता, जो प्रेक्षकांना नवखाही वाटता कामा नये. भूषणने आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं असल्यानं प्रेक्षकांना तो ठाऊक आहे. त्याची अभिनयशैली उत्तम असून, या चित्रपटातील नायकाला तो व्यवस्थित न्याय देऊ शकेल याची खात्री असल्याने भूषणची निवड केली गेली. कथानक ऐकताच क्षणी भूषण खूप भारावून गेला. एका वेगळ्या धाटणीचं कथानक असलेल्या चित्रपटाद्वारे नायकाच्या रूपात रसिकांसमोर येण्याची संधी मिळाल्याने त्याने ‘रीलस्टार’ची आॅफर आनंदानं स्वीकारली. यासाठी सध्या तो कसून मेहनत घेत असल्याचेही ते म्हणाले.

    ‘रीलस्टार’ची उत्कंठावर्धक पटकथा आणि संवादलेखन रॉबिन वर्गीस व सुधीर कुलकर्णी यांनी केलं आहे. भूषणसोबत यात उर्मिला जगताप, प्रसाद ओक, रुचिरा जाधव, मिलिंद शिंदे, स्वप्नील राजशेखर, सुहास जोशी, विजय पाटकर, कैलास वाघमारे, महेश सुभेदार, शिवाजी पाटने, महेंद्र पाटील, दीपक पांडे, गणेश रेवडेकर, अभिनव पाटेकर आदी कलाकार आहेत. बालकलाकार अर्जुन गायकर, तनिष्का म्हाडसे यांनी ‘रीलस्टार’मध्ये साकारलेल्या भूमिकाही महत्त्वाच्या आहेत. सिनेमॅटोग्राफर शिनोब यांनी सिनेमॅटोग्राफी, तर राहूल शर्मा यांनी प्रॉडक्शन डिझाईन केलं आहे. महेंद्र पाटील या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर तसेच नंदू आचरेकर सहदिग्दर्शक आहेत. गुरु ठाकूर, मंदार चोळकर व प्रशांत जामदार यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार विनू थॅामस यांनी संगीतसाज चढवला आहे. रंगभूषा भागवत सोनावणे यांनी केली असून, वेशभूषा राणी वानखडे यांनी केली आहे.

  • “अप्सरा” चित्रपटाच्या निमित्ताने गीतकार मंगेश कांगणे यांच संगीतकार म्हणून पदार्पण

    सूर निरागस हो, माझा आनंद हरपला अशा उत्तमोत्तम गाण्यांचे गीतकार मंगेश कांगणे आता संगीतकार झाले आहेत. आगामी “अप्सरा” या चित्रपटातील गाणी मंगेश कांगणे यांनी संगीतबद्ध केली असून या निमित्ताने गीतकाराने संगीतकार होण्याचा दुर्मीळ योग साधला गेला आहे. लेखक, दिग्दर्शक  प्रवीण तरडे आणि अभिनेता, निर्माता मंगेश देसाईं यांच्या शुभहस्ते चित्रपटाचे म्युझिक लॉन्च करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटाची संपूर्ण टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या १० मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

    सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची  कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. मंगेश कांगणे गेली अनेक वर्षं मराठी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या लेखणीनं अनेक हिट गाणी मराठी चित्रपटांना दिली आहेत. त्या शिवाय अनेक म्युझिक अल्बमसाठीही त्यांनी गाणी लिहिली आहेत. भावगर्भ, सहजपणे तोंडी रुळणारी शब्दरचना, व्यक्तिरेखेची नेमकी अभिव्यक्ती, कथानकाची नेमकी गरज ओळखून गीतलेखनामध्ये मंगेश कांगणे माहीर आहेत. आता गीतलेखनाच्या पुढे जात मंगेश यांना सुरांचीही संगत लाभली आहे.

    २०१३ मध्ये माझी पहिली फिल्म दुनियादारी आली आणि त्यातील” टिकटिक वाजते डोक्यात” या माझ्या पहिल्याच गीताला रसिक प्रेक्षकांचे अफाट प्रेम मिळाले. आज जवळपास १० वर्षांहून अधिक या क्षेत्रात काम करुन जवळपास  १२५हुन अधिक चित्रपटांसाठी मी काम केले आहे. अनेक दिग्गज लोकांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. खुप नवनवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या. यातूनच आपणही संगीतकार म्हणून या क्षेत्रात पाऊल टाकावे   या गोष्टींसाठी मी उत्सुक होतो आणि “अप्सरा” च्या निमित्ताने मला ही संधी चित्रपटाचे निर्माते सुनील भालेराव आणि दिग्दर्शक चंद्रकांत पवार यांनी मला दिली यासाठी मी त्यांचा आभारी आहे.

    “अप्सरा” चित्रपटातील तीन गाणी मंगेश कांगणे यांनी केली आहेत. या तीनही गाण्यांचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश यांनी केले आहे. गायक अभय जोधपूरकर गायिका आनंदी जोशी, ओंकार स्वरुप,  भैय्या मोरे, मेघा मुसळे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत. सुयश झूंजुरके, मयूरी आव्हाड, अक्षता पाडगावकर, मेघा घाडगे, शशांक शेंडे, विट्ठल काळे  विजय निकम, मयूर पवार, राजेश भोसले, आशिष वारंग आदी कलाकारांच्या या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. राजा फडतरे यांनी कॅमेरामन, निलेश राठोड संकलन तर सुबोध आरेकर, इमरान मालगुणकर,कृतिक माज़िरे यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.

    अप्सरा चित्रपटात एक अनोखी प्रेम कथा अतिशय रंजकपणे मांडण्यात आली असून अप्सरा कोण असेल हे समजून घेण्यासाठी आपल्याला अजुन थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आजवर गीतकार म्हणून हिट गाणी नावावर केलेल्या मंगेश कांगणे यांच्या नावावर संगीतकार म्हणून ही हिट गाणी जोडली जातील यात शंका नाही


    Thanks & Regards

    Darshan S.Musale

    (Media Planet)

  • जुनं फर्निचर’चा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात संपन्न

    काय अपेक्षा आहेत आमच्या अशा त्यांच्याकडून… दिवसातून एकदा आमच्या खांद्यावरून हात फिरवून विचार ना.. आई कशी आहेस? बाबा कसे आहात? मन सुन्न करणारे हे वाक्य नकळत डोळ्यांच्या कडा पाणावणारे आहे. आपल्याकडे अनेकदा वयस्कर व्यक्तींना आऊटडेटेड, अडगळीतले सामान असे म्हटले जाते. परंतु याच सामानाची किंमत आणि ताकद काय आहे, हे सांगणारा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. या सोहळ्याला अधिक रंगात आणण्यासाठी वैभव जोशी यांच्या ‘सोबतीचा करार’ या संगीत मैफलचेही आयोजन यावेळी करण्यात आले. यात स्वप्नील बांदोडकर, केतकी माटेगावकर, पवनदीप राजन यांचाही सहभाग होता. यावेळी महेश मांजरेकर यांनी ‘काय चुकले सांग ना?’ या मनाला स्पर्शून जाणाऱ्या गाण्याच्या काही ओळी गायल्या.

    ‘जुनं फर्निचर… या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा !” ट्रेलरवरूनच हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे, हे कळतेच. मुलांप्रती असलेल्या कर्तव्यांमध्ये आपण कमी पडणार याची चिंता आईवडिलांना नेहमीच असते. परंतु तीच चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात? वृद्धापकाळात मुलांकडून चार प्रेमाचे शब्द ऐकण्याची इच्छा असते. ती इच्छाही ही पिढी पूर्ण करू शकत नसेल, तर आई वडिलांनी या वयात कोणाकडून प्रेमाची अपेक्षा ठेवावी,  असा प्रश्न ट्रेलर पाहून मनात उद्भवतो. आपल्या पोटच्या मुलावरच आईच्या मृत्यूचा आरोप गोविंद पाठक यांनी लावला असून आता या प्रकरणाचा निकाल काय लागणार, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे.

    सत्य- सई फिल्म्स आणि स्कायलिंक एन्टरटेनमेंट प्रस्तुत ‘जुनं फर्निचर’ चे यतिन जाधव निर्मित ‘जुनं फर्निचर’ची कथा, पटकथा, संवाद  महेश वामन मांजरेकर यांनी लिहिले असून यात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर,  समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

    या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा !

    चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर म्हणतात, ‘’ जुनं फर्निचर… या नावातच चित्रपट काय आहे, याचा संदर्भ लागतो. अनेक घरांमध्ये हल्ली असे चित्र दिसतेय. बाहेरही अनेक ठिकाणी ज्येष्ठांना जुनं फर्निचर म्हणूनच संबोधले जातेय आणि याबाबतचा किस्सा मी स्वतः पाहिला आहे. त्यातूनच मला हा विषय सुचला. मी या चित्रपटाबद्दल एकच सांगेन ‘जुनं फर्निचर’ला कमी समजू नका. त्यांच्यात जी ताकद आहे, ती आताच्या तकलादू फर्निचरमध्ये अजिबात नाही. ही ताकद फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्याही तितकीच खमकी आहे. हा चित्रपट प्रत्येकाने आपल्या मुलांसोबत नक्की पाहावा, त्यातून कदाचित मुलांचा दृष्टीकोन बदलेल.’’

  • ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ह्या मालिकेतील वसुंधराचे मुंबई लोकल मध्ये चाहते !

    ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ह्या मालिकेत सध्या वसुंधराची भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे नायिका अक्षया हिंदाळकर हिच्याशी  संवाद साधताना अक्षयाने अभिनयाच्या आपल्या प्रवास बद्दल सांगितले. “अगदी शाळेत असल्यापासून माझ्या आई ची खूप इच्छा होती की मी ह्या क्षेत्रात काही तरी करावे. तेव्हा माझी आई वृत्तपत्रात ज्या जाहिराती यायच्या की बालकलाकार हवे आहेत त्या पाहून मग तिथे आम्ही जायचो. पण नंतर अभ्यासमुळे ते मागे पडलं. मग दहावी झाल्यावर  मी एका थिएटर ग्रुप मध्ये सहभागी झाले. माझे गुरु मिलिंद पेडणेकर ज्यांच्याकडे मी ६ वर्ष शिकले. नाटकानंतर एक ३-४ महिन्याच्या कठीण काळा नंतर मला एक मालिका मिळाली. माझा स्ट्रगलचा काळ खूप कमी होता पण तो प्रवास आज ही आठवला तरी खूप सुख देऊन जातो. मला कित्येक वर्षापासून झी मराठी वर काम करायचे होते. मी इतकं मॅनिफेस्ट केले की अखेरीस माझी इच्छा ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेच्या निमित्ताने पूर्ण झाली . मी खूप खुश आहे वसुंधराची भूमिका माझ्यापर्यंत काहीशी  अशी आली, मी ह्या आधी ह्याच निर्मिती संस्थेची एक मालिका केली होती. भक्ती मॅडमने मला विचारले की आम्ही एक मालिका आणतोय तुझी इच्छा आहे का त्यात प्रमुख भूमिकेत काम करण्याची. माझ्यानंतर ही खूप ऑडिशन्स झाल्या, जेव्हा मला कळले की इतक्या जणींमधून माझी निवड झाली आहे याचा मला प्रचंड आनंद झाला. जेव्हा माझ्या ऑडिशन्स चालू होत्या मी थोडी शाशंक होते की मी माझ्याहुन ७-८ वर्ष मोठ्या वयाच्या भूमिकेला न्याय देऊ शकेन? पण सर्वांचा माझ्यावर १०० टक्के विश्वास होता की मी हे करू शकेन.

    मालिकेसाठी लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. मला एक गोष्ट सांगावीशी वाटतेय की माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती झी मराठीवर काम करण्याची आणि ते फायनली जुळून आलं. मी ह्या आधी ही इतर मालिकांमध्ये काम केलंय. पण झी मराठीचा रिच इतका आहे की ‘पुन्हा कर्तव्य आहे’ चा पहिला प्रोमो आला आणि लोकं मला ओळखायला लागली. एक किस्सा सांगते, मी नवी मुंबई मध्ये राहते. ट्रॅफिक अव्हॉइड करण्यासाठी ट्रेनचा प्रवास करत होते आणि मी भूक लागली म्हणून काहीतरी खायला मास्क काढला आणि माझ्यासमोर ज्या बायका होत्या त्या सर्वानी मला एकत्र ओळखल तो माझ्यासाठी इतका भारी मोमेन्ट होता, त्यांनी मालिकेच्या प्रोमोची प्रशंसा तर केलीच आणि मला विचारले की तुम्हीच आहातना ‘पुन्हा कर्तव्य आहे’ च्या प्रोमो मध्ये. मी इतकं काम केले पण कोणीही अशी ओळख दिली नाही जी झी मराठीच्या ह्या मालिकेच्या पहिल्याच प्रोमोने दिली. प्रेक्षकांकडून असा प्रतिसाद मिळत आहे तेव्हा काम करण्याची ऊर्जा ही अजून वाढली आहे.”

    तेव्हा पाहायला विसरू नका ‘पुन्हा कर्तव्य आहे’ दररोज रात्री ९:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

  • प्रथमेश परब म्हणतोय ‘होय महाराजा’…

    गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आगामी विनोदी चित्रपटाची घोषणा…

    मराठी चित्रपट आज जगभरातील प्रेक्षकांवर मोहिनी घालण्याचं काम करत आहेत. देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांसोबतच पुरस्कार सोहळ्यांमध्येही मराठी चित्रपटांची सरशी होत असून, आशयघन मराठी सिनेमे तिकिटबारीवरही गर्दी खेचत आहेत. अशाच प्रकारची काहीशी कामगिरी करणारा तसेच एका पेक्षा एक अफलातून विनोदवीरांची मांदियाळी असलेल्या चित्रपटाची गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घोषणा करण्यात आली आहे. ‘होय महाराजा’ असं शीर्षक असलेला हा चित्रपट रसिकांचे संपूर्ण पैसे वसूल मनोरंजन करणार आहे. या चित्रपटाच्या रूपात एक कौटुंबिक मनोरंजन करणारा धम्माल विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    एलएमएस फिल्म्स प्रा. लि. या बॅनरखाली दिग्दर्शक शैलेश एल. एस. शेट्टी यांनी ‘होय महाराजा’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता प्रथमेश परब ‘होय महाराजा’ म्हणत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. करियरच्या सुरुवातीपासून प्रथमेशनं साकारलेल्या विविधांगी व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे या चित्रपटात प्रथमेश कोणत्या भूमिकेत दिसणार याबाबत कुतूहल आहे. क्राईम-कॅामेडी प्रकारात मोडणारा हा चित्रपट एका अनोख्या संकल्पनेवर आधारलेला आहे. एक सर्वसामान्य तरुण आपल्या प्रेमाखातर कशा प्रकारे लढा देतो याची रोमांचक कहाणी ‘होय महाराजा’मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रथमेशसोबत अंकिता ए. लांडे ही अभिनेत्री दिसणार आहे. याखेरीज अभिजीत चव्हाण, संदीप पाठक, वैभव मांगले, समीर चौगुले असे एका पेक्षा एक अफलातून विनोदवीर या चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    ‘होय महाराजा’ चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन संचित बेद्रे यांनी केलं आहे. गुरु ठाकूरने लिहिलेल्या गीतांना चिनार-महेश या संगीतकार जोडीचं संगीत लाभलं आहे. डिओपी वासुदेव राणे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, संकलन निलेश नवनाथ गावंड यांनी केलं आहे. पार्श्वसंगीत अमेया नरे, साजन पटेल यांनी दिलं असून, नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकरने केलं आहे. फाईट मास्टर मोझेस फेर्नांडीस यांची अॅक्शन चित्रपटात पाहायला मिळणार असून, कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांनी केलं आहे. जान्हवी सावंत सुर्वे यांनी वेशभूषा केली आहे.

  • गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘नाद – द हार्ड लव्ह’चा फर्स्ट लूक प्रदर्शित…

    गुढीपाडव्याच्या मूहूर्तावर नवोन्मेषाची गुढी उभारून हिंदू नववर्षाचं स्वागत करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. आजही त्या परंपरेचं मोठ्या उत्साहानं, जल्लोषात आणि आत्मीयतेनं पालन केलं जातं. या दिवशी मराठी सिनेसृष्टीतही बऱ्याच नावीन्यपूर्ण गोष्टी घडत असतात. ‘नाद – द हार्ड लव्ह’  या आगामी महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवसाचं औचित्य साधत रिलीज करण्यात आलं आहे.

    शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांची निर्मिती असलेल्या ‘नाद – द हार्ड लव्ह’ चित्रपटाचे निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर आहेत. आजवर ‘मिथुन’, ‘रांजण’, ‘बलोच’ अशा विविध विषयांवरील आव्हानात्मक चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘देवमाणूस’ या गाजलेल्या छोट्या पडद्यावरील मराठी मालिकेत शीर्षक रोल साकारून महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत रिलीज करण्यात आलेल्या फर्स्ट लूकमध्ये किरणच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिंबळे हे कलाकारही आहेत. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतो, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरणार आहे. त्याच्या जोडीला असलेल्या सपना माने आणि यशराज डिंबळे यांच्या या चित्रपटातील व्यक्तिरेखाही महत्त्वपूर्ण आहेत. हि एक परिपूर्ण प्रेमकथा आहे. प्रेमकथेच्या जोडीला समाजात घडणाऱ्या घटनांवर प्रकाशझोत टाकणारं कथानक यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रिलीज करण्यात आलेल्या फर्स्ट लूकबाबत दिग्दर्शक प्रकाश पवार म्हणाले की, ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा चित्रपट खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना खूप काही वेगळं देणारा आहे. ‘द हार्ड लव्ह’ ही टॅगलाईनच खूप काही सांगणारी आहे. गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी या चित्रपटाचा फर्स्ट लूक मायबाप रसिकांच्या भेटीला आल्याचा एक वेगळाच आनंद असल्याची भावनाही पवार यांनी व्यक्त केली आहे.

    आशयघन कथानक, सहजसुंदर अभिनय आणि नेत्रसुखद सादरीकरण ही ‘नाद’ चित्रपटाची वैशिष्ट्ये ठरणार आहेत. संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. डॉ. विनायक पवार यांनी पटकथा व संवादलेखन केलं आहे. याखेरीज विनायक यांनी वैभव देशमुख यांच्यासोबत ‘नाद’साठी गीतलेखनही केलं आहे. संगीतकार पंकज पडघन यांनी या गीतांना संगीत देण्याचं काम केलं आहे. या गाण्यांवर सिद्धेश दळवीने कोरिओग्राफी केली आहे. सिनेमॅटोग्राफी डिओपी अमित सिंह यांनी केली असून, सतीश चिपकर यांनी कला दिग्दर्शनाचं काम पाहिलं आहे. निगार शेख यांनी वेशभूषा केली असून कास्टिंग डायरेक्टरची जबाबदारी रमेश शेट्टी यांनी सांभाळली आहे. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सुजित मुकटे यांनी सांभाळली असून, आमिरा शेख या चित्रपटाच्या क्रिएटिव्ह हेड आहेत. लाइन प्रोड्युसर आहेत संकेत चव्हाण.

  • Varun Sharma lends his voice to Garfield in Hindi

    The world-famous lasagna-loving, Monday-hating indoor cat, Garfield, is hitting the big screens in an adventurous and wild twist as it leaps into theatres this summer. The trailer for ‘The Garfield Movie’ has generated massive excitement, as fans eagerly await to witness this sassy cat’s legacy on the big screen. Indian audiences have another reason to celebrate, as the hugely successful and entertaining actor Varun Sharma of ‘Fukrey’ fame will be lending his voice to the Hindi version of the film.

    Known for his comic sense of humor and quick wit, Varun Sharma has carved a special place in audiences’ hearts with his iconic roles. Now voicing the Hindi version of the film, Varun Sharma will inject an extra layer of excitement and adventure into Garfield’s outdoor escapades.

    Speaking about lending his voice to Garfield in Hindi, Varun Sharma shared, ” For me, lending my voice for ‘The Garfield Movie’ has been a character I have followed since my childhood, and I resonate with his quirks. The entire dubbing process was an amazing experience, allowing me to relive all the best of my childhood memories. I am thankful to Sony Pictures Releasing International for this opportunity. I am eagerly waiting for the audience to have an absolute blast watching the film.

    Shony Panjikaran, General Manager and Head of Sony Pictures Releasing International (SPRI) India, shares, “We are thrilled to collaborate with Varun Sharma for the Hindi version of ‘The Garfield Movie’. Garfield has a quirky personality, and Varun’s phenomenal and humorous performances in recent films makes him the perfect choice.”

    _Sony Pictures Entertainment India releases ‘The Garfield Movie’ exclusively in cinemas on 24th May 2024 in English, Hindi and Tamil, also in 3D._

  • मुखवट्यांचा “बोहाडा” येतोय प्राचीन रुढीची परंपरा आणि नव्याची गुढी बांधायला..

    वेगवेगळे मुखवटे धारण करत.. माणसाचा खरा चेहरा त्याला दाखवणारा सगळ्यात मोठा देव म्हणजे निसर्ग.. आणि ह्या निसर्गाचा गौरव, भारतीय  पुराणातील भव्य दिव्य मुखवट्यांना पूजून  करायचा उत्सव म्हणजे “बोहाडा”

    २०२५ या वर्षात भेटीला येणाऱ्या   बोहाड्या ची घोषणा नुकतीच करण्यात आली असून दाक्षिणात्य निर्माता मणीगंडन मंजुनाथन ‘बोहाडा’ची निर्मिती करणार आहेत.

    राहुल सतिश पाटील, कृतिका तुळसकर देवरूखकर सहनिर्मिती, विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन अंबर विनोद हडप यांनी केले आहे. सध्या तरी या चित्रपटात कोण कलाकार झळकणार, याबाबत गोपनीयता आहे.

    या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, ” निसर्गाची आपल्यावर जी कृपा आहे, त्याचे आभार मानण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. खंत या गोष्टीची आहे की, आतापर्यंत हा उत्सव लोकांना माहित नव्हता. हा परंपरागत उत्सव आहे, त्यामुळे या रूढी, परंपरा या चित्रपटातून मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. या चित्रपटाच्या माध्यमातून हा उत्सव लोकांपर्यंत पोहोचेल, अशी आशा आहे. चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे निसर्गाशी संबंधित असल्याने यात मजा, सस्पेन्स, थ्रिलर यांचे मिश्रण असणार. त्यामुळे प्रेक्षकांना एक जबरदस्त अनुभव येणार आहे. वर्षात ५२ आठवडे असतात, ५२ सोंगेही असतात, जे त्यांचे अस्तित्व दाखवत असतात. परंतु याचा थांगपत्ता आपल्याला नसतो. हेच या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या विषयाचे नावीन्यही अफाट आहे, महाराष्ट्राच्या जंगलात लपलेल्या संस्कृतीवर आधारीत चित्रपट करण्याचा मोह दाक्षिणात्य निर्मात्यांनाही आवरला नाहीये. मराठी सिने दिग्दर्शक म्हणून मला अभिमान वाटतोय की, आपल्या विषयाला दाक्षिणात्य निर्माता पसंती दर्शवत आहेत.”

  • गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बहुचर्चित संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान”चे पहिले पोस्टर

    येत्या दिवाळीत सजणार, मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार, सुरेल गीतांचा आवाज…!

    जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” चे पहिले पोस्टर आज गुढीपाडव्याचे औचित्य साधून प्रदर्शित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी करताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आणि आज या पोस्टरमध्ये सुबोध भावेंचा चित्रपटातील एक वेगळा लूक आणि पेहराव पाहता या चित्रपटाची भव्यता झळकून येत आहे.

    या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार असून, ‘कट्यार काळजात घुसली‘ तसंच ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर‘ या चित्रपटाची संपूर्ण टीम ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे. आणि त्याचबरोबर मुख्य म्हणजे प्रसिध्द संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे.

    जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या अजरामर कलाकृतीवरून प्रेरित, “संगीत मानापमान” हा संगीतमय चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शनास सज्ज होणार आहे.