
-
विश्व मराठी संमेलनात दादासाहेब फाळके चित्रनगरीचा लक्षवेधी दालन

नाशिक येथे भरलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे दादासाहेब फाळके चित्रनगरी दालन विशेष आकर्षण ठरत आहे. या दालनाला विशेषतः तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सिनेसृष्टीत करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी हे दालन माहितीचा खजिना ठरत आहे.
महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हे दालन उभारण्यात आले आहे.

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हे दालन उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत चित्रपट क्षेत्रासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवले जातात. एक खिडकी योजना, दर्जेदार मराठी चित्रपटांसाठी अर्थसहाय्य योजना, राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा, तसेच चित्रपताका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यांसारख्या उपक्रमांची सविस्तर माहिती येथे दिली जात आहे.
कंटेंट क्रिएशन झोनला तरुणाईचा प्रतिसाद
या दालनातील सर्वाधिक लक्षवेधी उपक्रम म्हणजे खास तरुणांसाठी उभारलेला ‘कंटेंट क्रिएशन झोन’. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नवोदित तरुणांना कंटेंट क्रिएटर बनण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी येथे प्रत्यक्ष कॅमेऱ्यासमोर उभे राहून स्वतःचा कंटेंट सादर करण्याची संधी देण्यात येत आहे. या अनुभवातून चित्रीकरणाचे विविध पैलू समजण्यास मदत होत आहे. विशेष म्हणजे या झोनमध्ये तरुणांसोबत ज्येष्ठ नागरिकही उत्साहाने सहभाग घेताना दिसत आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्तेला घाबरू नका – तंत्रज्ञानाचा स्वीकार करा
भविष्यातील माध्यमविश्व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर अधिक वेगाने विकसित होणार असल्याचा संदेश या दालनातून देण्यात येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला घाबरण्याऐवजी योग्य प्रशिक्षण घेऊन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन नवोदित तरुणांना करण्यात आले आहे.
तरुणांसाठी विशेष प्रशिक्षण वर्गांची माहिती
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि Film and Television Institute of India (एफटीआयआय) यांच्या सामंजस्य करारातून विविध प्रशिक्षण वर्ग चालवले जात आहेत. चित्रपटनिर्मिती, दिग्दर्शन, तांत्रिक कौशल्य आणि माध्यम प्रशिक्षणाबाबतची माहिती या दालनात सविस्तरपणे देण्यात आली आहे.
विश्व मराठी संमेलनात उभारलेले हे दादासाहेब फाळके चित्रनगरी दालन केवळ माहितीपर नाही, तर नव्या पिढीला सिनेविश्वाकडे प्रेरित करणारे व्यासपीठ ठरत आहे.
-
‘तलास’ चित्रपटातील धम्माल हळदी गीताचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न

मराठी सिनेसृष्टीत आशयघन आणि उत्कंठावर्धक चित्रपटांची परंपरा कायम राहिली आहे. त्याच परंपरेत भर घालणारा आगामी रहस्यमय चित्रपट ‘तलास’ सध्या चर्चेत आहे. शीर्षकातून नेमकी कथा उलगडत नसली, तरी कुतूहल मात्र नक्कीच वाढते. नुकतेच या चित्रपटातील धम्माल हळदी गीताचा दिमाखदार प्रकाशन सोहळा पार पडला आणि चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली.
रहस्यमय कथानकाची उत्कंठा

दीपतारांगण क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्मात्या दीपा सावंत-खोत यांनी ‘तलास’ या रहस्यमय-रोमांचक चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री, गुंतागुंतीच्या घटना आणि शेवटच्या टप्प्यावर उलगडणारे रहस्य अशी या चित्रपटाची मांडणी आहे. दिग्दर्शक उदय गणपत जाधव यांनी अभ्यासपूर्ण दिग्दर्शन करत कथा आणि पटकथाही स्वतः लिहिली आहे. संवादलेखनाची जबाबदारी रुपाली कुटे यांनी सांभाळली आहे.
धम्माल हळदी गीताचा रॉयल जल्लोष
दादर क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात ‘या गो बायांनो हळद घेऊनशी…’ या गाण्याचे प्रकाशन करण्यात आले. हळदीच्या सोनसळी रंगात न्हालेलं, जल्लोषमय आणि रॉयल थाटात साकारलेलं हे गीत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गीतकार आणि संगीतकार विजय गाडेकर यांच्या लेखणीतून अवतरलेले आणि संगीतबद्ध केलेले हे गाणे महाराष्ट्राची लाडकी गायिका वैशाली सामंत यांनी गायले आहे.
या गाण्यावर गौतमी पाटील हिने ठसकेबाज नृत्य सादर केले असून नृत्यदिग्दर्शन नरेंद्र पंडित यांनी केले आहे. पारंपरिक हळदीच्या सोहळ्याला ग्लॅमर आणि ऊर्जा देणारी ही सादरीकरणशैली प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
कलाकारांची दमदार फळी

चित्रपटात चिन्मयी सुमित, गणेश यादव, प्रणव रावराणे, राहुल पाटील, पूजा जैस्वाल, निलेश भेरे, वेदांत खोत, रेखा राणे, अजय पाध्ये आणि गौतमी पाटील अशी दमदार कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे. विविध भूमिकांमधून ही टीम कथानकाला अधिक प्रभावी बनवणार आहे.
तांत्रिक बाजू भक्कम
चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी सचिन लोखंडे यांनी केली असून कलादिग्दर्शन अनिल केदार, वेशभूषा धनश्री सालेकर, रंगभूषा सुनील सावंत, छायाचित्रण पंकज पटेल यांनी सांभाळले आहे. पोस्ट प्रॉडक्शन संमित स्टूडियो येथे झाले असून संकलन सुबोध नारकर आणि ध्वनीआरेखन विशाल राणे यांनी केले आहे. कार्यकारी निर्माता सदानंद टेंबुलकर, निर्मिती व्यवस्थापक संदीप मोरे आणि डीआय कलरिस्ट भूषण दळवी यांनी तांत्रिक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
रहस्य, थरार आणि उत्सवाचा संगम असलेला ‘तलास’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे, यात शंका नाही.
-
मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका

अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले
मुंबई: मराठीचे वैभव जागतिक स्तरावर पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘मराठी मूड’ चॅनलतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित ‘बोला मराठी’ पुरस्कार सोहळा प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये दिमाखात पार पडला. अवघ्या एका आठवड्यात या उपक्रमाने राज्यासह देश-विदेशातील मराठीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत डिजिटल विश्वात आपला ठसा उमटवला.

एका आठवड्यात देश-विदेशातून प्रतिसाद
२१ फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक येथील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे भारताबाहेरून पाकिस्तान आणि दुबईसह विविध देशांतील सहभागीही या स्पर्धेत सामील झाले. अमराठी भाषिकांनीही मराठी भाषेत सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.“मराठी माझ्यासाठी काय आहे?” या संकल्पनेवर सादरीकरणे
“मराठी माझ्यासाठी काय आहे?” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित स्पर्धेत वय वर्षे ५ पासून ते ६५ वर्षांच्या ज्येष्ठ स्पर्धकांपर्यंत सर्वांनी कविता, कथाकथन, गाणी आणि स्टँड-अप कॉमेडीच्या माध्यमातून मराठीबद्दलचे आपले विचार मांडले. मराठी भाषेची ओढ आणि अभिमान या विविध कलाविष्कारांतून ठळकपणे उमटला.मान्यवरांची उपस्थिती आणि परीक्षण
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून दिग्दर्शक संजय जाधव, ज्येष्ठ साहित्यिक व बालकवी एकनाथ आव्हाड आणि लोकप्रिय कंटेंट क्रिएटर नील साळेकर (Just Neel Things) उपस्थित होते. अभिनेत्री संजना पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संपूर्ण कार्यक्रम ‘marathimood’ या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध होणार आहे.
चार गटांमधून अंतिम १६ विजेते
बालगट, शालेय गट, महाविद्यालयीन गट आणि खुला गट अशा चार गटांतील सादरीकरणांचे परीक्षण करून परीक्षकांनी अंतिम १६ विजेत्यांची निवड केली. गटानुसार विजेत्यांची नावे २७ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ‘मराठी मूड’ यूट्यूब चॅनलवर जाहीर करण्यात येणार आहेत.रोख पारितोषिकांची घोषणा
चारही गटांतील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी १ लाख, ७५ हजार, ५० हजार आणि २५ हजार रुपये अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. तसेच स्पर्धेतील सहभागी पर्शियन बीता आणि पाकिस्तानी जहानवी यांना २५ हजार रुपयांचा विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.मान्यवरांचे कौतुक आणि पुढील वर्षी मोठी योजना
मराठी भाषेसाठी असे उपक्रम सातत्याने होत राहिले पाहिजेत आणि ‘बोला मराठी’मुळे मराठीला जागतिक मंच मिळत असल्याचे मत संजय जाधव यांनी व्यक्त केले. छोटे चॅनल असूनही मोठे पाऊल उचलून अल्पावधीत यशस्वी उपक्रम राबवल्याबद्दल एकनाथ आव्हाड यांनी कौतुक केले. नव्या पिढीला मराठीचे बाळकडू देण्याचे काम ‘मराठी मूड’ करत असल्याचे मत नील साळेकर यांनी मांडले.‘बोला मराठी’ उपक्रमाला अवघ्या सात दिवसांच्या तयारीनंतर मिळालेला प्रतिसाद थक्क करणारा असून पुढील वर्षी हा उपक्रम अधिक भव्य स्वरूपात राबवला जाईल, अशी माहिती ‘मराठी मूड’चे चॅनल हेड शंतनु जोशी यांनी दिली.
मराठी भाषेचा जागतिक जागर करण्यासाठी उचललेले हे पाऊल आता डिजिटल विश्वात नवा अध्याय लिहित आहे.
-
अभिजात मराठीचा जयघोष! २७ फेब्रुवारीला भेटीस येत आहे नवे कोरे गीत ‘गौरव माय मराठीचा’

मराठी साहित्य आणि संस्कृतीचा स्वरमयी जागर! ‘मराठी भाषा गौरव दिनी’ उलगडणार ‘गौरव माय मराठीचा’!
मराठी ही केवळ आपल्या राज्याची अधिकृत भाषा नसून त्याला नुकताच ‘अभिजात भाषा’ हा बहुमान प्राप्त झाला आहे. या ऐतिहासिक निर्णयाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि २७ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून, श्री गुरु एस. नायर यांच्या प्रॉडक्शनतर्फे ‘गौरव माय मराठीचा’ हे भव्य गीत रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे गुरु एस. नायर मी.यांनीच या गीताचे दिग्दर्शनही केले आहे.
मराठी भाषेचा सांगीतिक जागर
गेल्या अनेक वर्षांपासून कला क्षेत्रात सक्रिय असलेले आणि अनेक नामवंत कलावंतांचे यशस्वी स्टेज शो आयोजित करणारे गुरु नायर यांनी मराठी भाषेच्या प्रेमापोटी या गीताची निर्मिती केली आहे. मराठी भाषेचा समृद्ध इतिहास, विविधतेने नटलेली परंपरा आणि भाषेचा गौरव मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे. हे गीत बालकलाकार कुमार आदित्य जी. नायर आणि कोरस यांनी गायले असून, मराठी साहित्याचे आणि संस्कृतीचे दर्शन यातून घडणार आहे.
बालकलाकार आदित्यची भरारी

गायक कुमार आदित्य जी. नायर याने अत्यंत कमी वयात आपल्या गायकीची मोहोर उमटवली आहे. त्याने यापूर्वी कविता पौडवाल, उत्तरा केळकर, वैशाली सामंत, नागेश मोरवेकर आणि अभिजीत सावंत यांसारख्या दिग्गज गायकांसोबत गाणी गायली आहेत. आता ‘गौरव माय मराठीचा’ या गाण्यातून तो पुन्हा एकदा आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करण्यास सज्ज झाला आहे.
दिग्गज तंत्रज्ञांची साथ

या गीताचे शब्द आणि संगीत किशोर मोहिते (वादक, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम) यांनी दिले आहे. किशोर मोहिते यांनी यापूर्वीही आदित्यच्या अनेक गीतांना संगीतबद्ध केले आहे. संगीताची अधिक रंगत वाढवण्याचे काम संगीत संयोजक सुदेश गायकवाड यांनी केले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण गीताचे दिग्दर्शन स्वतः गुरु एस. नायर यांनी केले आहे.
मराठी भाषेचा आदर वाढावा आणि भाषेची महती सर्वांपर्यंत पोहोचावी, या सामाजिक भावनेतून निर्माण केलेल्या या गीताला सर्व मराठी प्रेमींनी उदंड प्रतिसाद द्यावा आणि आपल्या गोड प्रतिक्रिया द्याव्यात, अशी अपेक्षा निर्माते गुरु नायर यांनी व्यक्त केली आहे.
-
लाडकी विहीण योजना : मराठी रंगभूमीवर हास्याची नवी लाट

मराठी रंगभूमीवर पुन्हा एकदा खळखळून हसवणारा, ताणतणाव विसरायला लावणारा आणि कौटुंबिक नात्यांतील गंमती-जमती हलक्याफुलक्या शैलीत मांडणारा नवा प्रयोग रंगत आहे. ‘लाडकी विहीण योजना’ हे नाव जरी शासकीय वाटत असलं तरी ही योजना आहे शंभर टक्के मनोरंजनाची. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवणं आणि त्यांना दोन-अडीच तासांचा दिलखुलास विरंगुळा देणं, हाच या नाटकामागचा खरा हेतू आहे.
‘योजना’ पण मनोरंजनाची – कागदपत्रांशिवाय!
नावात ‘योजना’ असली तरी यात कोणत्याही अटी-शर्ती नाहीत, अर्ज नाहीत, कागदपत्रांचा पसारा नाही. आहे फक्त मिश्किल संवाद, खुसखुशीत विनोद आणि मराठी घराघरांत घडणाऱ्या प्रसंगांचं जिवंत चित्रण. कौटुंबिक वास्तवावर विनोदी पद्धतीने भाष्य करत हे नाटक प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं आश्वासन देतं. पत्रकार परिषदेत कलाकारांनी स्पष्ट केलं की ही कोणतीही शासकीय योजना नसून ही खास रसिकांसाठीची मनोरंजन योजना आहे.
निर्मिती सावंत यांची ‘माहेरी’ परतफेड

या नाटकाचं खास आकर्षण म्हणजे अभिनेत्री निर्मिती सावंत यांची रंगभूमीवर पुनरागमन. “नाटक म्हणजे माझं माहेर,” असं सांगताना त्यांनी भावनिक शब्दांत रंगभूमीशी असलेलं नातं व्यक्त केलं. चित्रपटाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे मधल्या काळात नाटकापासून दूर राहावं लागलं, मात्र ‘लाडकी विहीण योजना’च्या निमित्ताने पुन्हा रंगभूमीवर उभं राहण्याचा आनंद त्यांच्यासाठी खास आहे. “प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं, तर तोच माझा खरा लाभ,” असं त्या म्हणाल्या.
दिग्दर्शन, लेखन आणि दमदार टीम

‘लाडकी विहीण योजना’ची निर्मिती अष्टविनायक आणि पंचशील एण्टरटेन्मेंटने केली आहे. नाटकाचे लेखन प्रथमेश शिवलकर यांचे असून दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे आहे. “शासनाची नाही, ही सावंतांची योजना आहे,” असं विनोदी भाष्य करत दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी या नाटकामागील भक्कम टीमचं कौतुक केलं.
लेखक प्रथमेश शिवलकर यांचं हे पहिलं व्यावसायिक नाटक असून इतक्या मातब्बर कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणं ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे. संहितेवर पूर्ण विश्वास असल्याचं निर्माते दिलीप जाधव यांनी सांगत, हे नाटक १५० हून अधिक प्रयोग गाठेल असा ठाम विश्वास व्यक्त केला.
कलाकारांची ताकद आणि रंगतदार साथ
नाटकात निर्मिती सावंत यांच्यासोबत स्नेहा रायकर, पुर्णिमा अहिरे-केंडे, अधोक्षज कऱ्हाडे, सुनील जाधव, मुकेश जाधव आदी कलाकारांची साथ आहे. निर्माते दिलीप जाधव आणि प्रसाद ओक असून सहनिर्माते स्वप्नील जोशी, मंजिरी ओक, तृप्ती पाटील आणि संजय मेमाणे आहेत.
नेपथ्य प्रदीप मुळ्ये, संगीत अजित परब, प्रकाशयोजना सुनील जाधव, गीतलेखन क्षितीज पटवर्धन, गायिका राधिका भिडे, वेशभूषा पुर्णिमा ओक, रंगभूषा मदन गायकवाड आणि सूत्रधार प्रणित बोडके अशी तांत्रिक टीम नाटकाला अधिक समृद्ध करते.
शुभारंभाचे रंगतदार प्रयोग
या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग पुढीलप्रमाणे होणार आहेत –
गुरुवार ५ मार्च, दुपारी ४.०० वा., प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह
शुक्रवार ६ मार्च, दुपारी ४.०० वा., दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह
शनिवार ७ मार्च, दुपारी ४.०० वा., यशवंत नाट्य मंदिर
रविवार ८ मार्च, दुपारी १.०० वा., यशवंतराव चव्हाण नाट्यगृहहास्य, मॅडनेस आणि उत्तम कलाकार-तंत्रज्ञांची भट्टी यामुळे ‘लाडकी विहीण योजना’ मराठी रंगभूमीवर नक्कीच वेगळी छाप पाडेल, असा विश्वास संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे. रंगभूमीवरील ही ‘मनोरंजन योजना’ प्रेक्षकांना किती आनंद देते, हे आता प्रयोगांनंतरच ठरणार आहे.
-
‘Z’ कडून नॅशनल झी शॉर्ट फिल्म कॉन्टेस्टची घोषणा; भारतभरातील नव्या दिग्दर्शकांसाठी मोठं व्यासपीठ

सात भाषांमधील प्रतिभावंत कथाकथनकारांचा राष्ट्रीय शोध
संस्कृती, सर्जनशीलता आणि व्यापकतेवर आधारित भविष्योन्मुख कॉन्टेन्ट इकोसिस्टम उभारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत ‘Z’ तर्फे झी शॉर्ट फिल्म कॉन्टेस्ट या देशव्यापी उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. देशभरातील नवोदित चित्रपटनिर्मात्यांचा शोध घेऊन त्यांना मार्गदर्शन, व्यासपीठ आणि संधी उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. हा उपक्रम ओम्नीचॅनेल स्वरूपात राबवला जाणार असून भारतीय मनोरंजन क्षेत्रातील बहुभाषिक प्रतिभेला राष्ट्रीय स्तरावर आणण्याचा प्रयत्न यातून होणार आहे.
हिंदी ते कन्नड – सात प्रमुख भाषांचा समावेश

या स्पर्धेत हिंदी, मराठी, बंगाली, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या सात प्रमुख भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे. विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि चित्रपट परंपरांमधील कथाकथनकारांना एकत्र आणून त्यांना राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित मंच देण्याचा ‘Z’चा प्रयत्न आहे.
दिग्गज दिग्दर्शकांचे प्रभावी परीक्षक पॅनल
या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शकांचे परीक्षक मंडळ. हिंदी चित्रपटसृष्टीत धाडसी आशयासाठी ओळखले जाणारे अनुराग कश्यप, मराठीतील सांस्कृतिक प्रभाव असलेले चित्रपट घडवणारे रवि जाधव, बंगाली चित्रपटसृष्टीतील आशयघन दिग्दर्शक सृजित मुखर्जी, भव्यतेसाठी प्रसिद्ध असलेले तेलुगू दिग्दर्शक नाग अश्विन, सामाजिक विषयांवरील प्रभावी चित्रपट करणारे समुथिरकणी, मल्याळम चित्रपटसृष्टीतील दृश्यात्मक धाडसासाठी ओळखले जाणारे लिजो जोस पेलिसेरी आणि कन्नडमधील भावनिक कथाकथनासाठी प्रसिद्ध हेमंत राव हे या परीक्षक मंडळात सहभागी झाले आहेत.
नवोदितांना मार्गदर्शन, संधी आणि रोख बक्षिसे
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या फिल्ममेकर्सना केवळ राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्याची संधी नाही, तर रोख बक्षिसांसह ‘Z’च्या व्यापक कॉन्टेन्ट इकोसिस्टममधील विविध सहकार्याच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. डिजिटल, टेलिव्हिजन आणि चित्रपटगृह अशा तिन्ही माध्यमांवर प्रभावी कथा सादर करण्याची क्षमता विकसित करण्यावर या उपक्रमाचा भर आहे.
राष्ट्रीय पातळीवर संधींना संस्थात्मक रूप
झी आणि झी5चे चीफ मार्केटिंग ऑफिसर कार्तिक महादेव यांनी या उपक्रमामागील दृष्टी स्पष्ट करताना सांगितले की, भारतातील वैविध्यपूर्ण कथाकथन परंपरेला राष्ट्रीय स्तरावर संस्थात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. झी शॉर्ट फिल्म कॉन्टेस्ट ही केवळ स्पर्धा नसून भविष्यातील भारतीय चित्रपटकार घडवण्याच्या दृष्टीने उचललेले धोरणात्मक पाऊल आहे.
दिग्दर्शकांचा नव्या पिढीला संदेश
अनुराग कश्यप यांनी नवोदितांना प्रोत्साहन देताना शॉर्ट फिल्ममुळेच आपल्या करिअरला दिशा मिळाल्याचे सांगितले. सृजित मुखर्जी यांनी मनाशी जोडलेली कथा सांगण्याचा सल्ला दिला, तर लिजो जोस पेलिसेरी यांनी स्वतःवर विश्वास ठेवून मोठी झेप घेण्याचे आवाहन केले. नाग अश्विन यांनी कथांच्या सामर्थ्यावर भर दिला. हेमंत राव यांनी मनात सतत घोळणारी कथा सादर करण्यास प्रोत्साहित केले. रवि जाधव यांनी प्रतिभा आणि दृष्टीकोन यांचे महत्त्व अधोरेखित केले, तर समुथिरकणी यांनी नवोदितांना सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
भारतीय मनोरंजनाच्या भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा
संस्कृतीशी जोडलेली व्यापकता, विश्वासार्हता आणि नवोन्मेष यांच्या बळावर ‘Z’ची वाटचाल सुरू असून झी शॉर्ट फिल्म कॉन्टेस्ट हा उपक्रम भारतीय मनोरंजन क्षेत्रातील पुढील पिढीतील चित्रपटकार घडवण्यासाठी एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे. हा उपक्रम केवळ नव्या आवाजांचा शोध घेणार नाही, तर त्यांना संरचित आणि स्पष्ट मार्गही उपलब्ध करून देणार आहे.
-
यूफोरिया: झिलेनियल युगातील नवे आध्यात्मिक एंटरटेनमेंट मूव्हमेंट

मुंबई, दिनांक — अहमदाबादमधील दोन यशस्वी शो नंतर, यूफोरिया Chp. पार्थ यांनी मुंबईत आपला पहिला प्रयोग सादर केला. आधुनिक तंत्रज्ञान, आध्यात्मिक आशय आणि भव्य दृश्य मांडणी यांचा संगम साधणारा हा कार्यक्रम केवळ एक कॉन्सर्ट नसून एक अनुभव म्हणून समोर आला.
जगातील पहिला हेक्झामर्सिव™️ व्हिज्युअल-कॉन्सर्ट अनुभव
या कार्यक्रमात जगातील पहिला हेक्झामर्सिव™️ व्हिज्युअल-कॉन्सर्ट अनुभव सादर करण्यात आला. सहा-स्क्रीनच्या षटकोनी रचनेवर आधारित हा फॉर्मॅट सुमारे 360 अंशांचा दृश्य विस्तार निर्माण करतो. प्रेक्षक केवळ स्टेजसमोर बसलेले नसून त्या अनुभवाच्या केंद्रस्थानी असल्याची जाणीव या मांडणीमुळे होते.
हृतुल यांच्या संकल्पनेतून साकारलेले स्टोरीटेलिंग
हृतुल यांच्या संकल्पना आणि दिग्दर्शनातून साकारलेल्या या शोने पारंपरिक सादरीकरणाच्या चौकटी मोडून काढल्या. कथा, संगीत, प्रकाशयोजना आणि डिजिटल व्हिज्युअल्स यांचा एकात्म अनुभव तयार करत या निर्मितीने एक वेगळे स्टोरीटेलिंग फॉर्मॅट प्रेक्षकांसमोर ठेवले. दृश्य आणि ध्वनी यांच्या संयोजनातून प्रेक्षकांना कथानकाच्या भावविश्वात नेण्याचा प्रयत्न स्पष्टपणे जाणवला.
अहमदाबादमधील यशानंतर मुंबईतील दमदार पदार्पण
अहमदाबादमध्ये मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावर आधारित हा मुंबईतील पदार्पण सोहळा अधिक भव्य स्वरूपात सादर झाला. तेथील कार्यक्रमाने स्थळाला ध्वनी आणि प्रकाशाच्या गतिमान कॅनव्हासमध्ये रूपांतरित केले होते. त्या अनुभवाची झलक मुंबईत आणखी परिपूर्णतेने साकार झाली.
सहा स्क्रीनची गतिमान मांडणी आणि 360 अंशांचा अनुभव
मुंबईतील प्रयोगात सहा भव्य स्क्रीन कथेनुसार हालचाल करत, विभाजित होत आणि पुन्हा एकत्र येत राहिल्या. या सतत बदलणाऱ्या दृश्यरचनेमुळे प्रेक्षकांनी कथा समोरून पाहण्याऐवजी स्वतःला त्या कथेमध्येच अनुभवले. पारंपरिक मंचावरील सादरीकरणापेक्षा ही मांडणी अधिक सहभागी आणि immersive ठरली.
यूफोरिया हा केवळ एक शो नसून झिलेनियल पिढीसाठी आध्यात्मिक आशय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधणारे एक नवे एंटरटेनमेंट मूव्हमेंट म्हणून आकार घेत आहे.
-
प्रतिष्ठेचा ‘इंका अवॉर्ड्स’ १५ व १६ एप्रिल रोजी मुंबईत

इंडियन नॅशनल सिने अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात Indian National Cine Academy Awards (INCA Awards) यांच्या पहिल्या पर्वाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, हा भव्य सोहळा १५ आणि १६ एप्रिल रोजी मुंबईत संपन्न होणार आहे. भारतातील १२ प्रमुख चित्रपट उद्योगांना एका समान व्यासपीठावर आणणारा ‘इंका’ हा देशातील पहिला राष्ट्रीय चित्रपट अकॅडमी मंच ठरणार आहे.
१२ चित्रपटसृष्टींचा राष्ट्रीय व्यासपीठावर संगम
भाषाभेद आणि प्रांतिक सीमारेषा ओलांडून भारतीय सिनेमाची व्यापकता, वैविध्य आणि जागतिक महत्त्व यांचा समतोल सन्मान करण्याचा हा दूरदृष्टीपूर्ण उपक्रम आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सांस्कृतिक एकात्मतेला संस्थात्मक स्वरूप देणारा हा उपक्रम उद्योगासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
सीसीएल आणि सायमा प्रेरित संकल्पना; विष्णू वर्धन इंदुरी यांचे नेतृत्व
‘इंका’ची संकल्पना Celebrity Cricket League (CCL) आणि South Indian International Movie Awards (SIIMA) या उपक्रमांशी संबंधित संस्थापकांच्या कल्पनेतून साकारली आहे. या नव्या उपक्रमाचे नेतृत्व विष्णू वर्धन इंदुरी करत आहेत.
प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचा पाठिंबा; कल्याण ज्वेलर्स प्रस्तुत प्रायोजक
Producers Guild of India या उपक्रमाचे प्रमुख म्हणून कार्यरत असून त्यामुळे ‘इंका’ला संस्थात्मक विश्वासार्हता आणि व्यापक दृष्टी लाभली आहे. पहिल्या ‘इंका अवॉर्ड्स’चे प्रस्तुत प्रायोजक म्हणून Kalyan Jewellers सहभागी झाले आहेत. उत्कृष्टता, परंपरा आणि विश्वास या समान मूल्यांवर आधारित ही भागीदारी सोहळ्याच्या भव्यतेत अधिक भर घालणारी आहे.
अकॅडमी-शैलीतील पारदर्शक सन्मान प्रणाली
‘इंका’ची रचना अकॅडमी-शैलीतील सन्मान पद्धतीवर आधारित असून पारदर्शकता, तज्ज्ञांकडून मान्यता आणि विश्वसनीयता हा याचा केंद्रबिंदू आहे. १२ भारतीय भाषांतील प्रत्येक चित्रपट उद्योगासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या प्रमुख पुरस्कारांचा समावेश असेल. याशिवाय दिग्दर्शन, अभिनय, संगीत, तांत्रिक कौशल्य आणि पदार्पण अशा विविध राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांद्वारे उत्कृष्टतेचा सन्मान केला जाईल.
मराठी चित्रपटांसाठी प्रवेशिका आमंत्रित
२०२५ वर्षात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांसाठी ‘इंका’तर्फे निर्माते आणि दिग्दर्शकांना अधिकृत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पात्रता: १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान प्रदर्शित मराठी चित्रपट.
अंतिम दिनांक: १ मार्च २०२६.
नोंदणी संकेतस्थळ: www.INCA.in‘इंका’ हा केवळ पुरस्कार सोहळा नाही; तो भारतीय चित्रपटसृष्टीच्या एकात्मिक सांस्कृतिक अभिव्यक्तीचा राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.
-
शिवजयंतीच्या उत्साहात ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चे अर्धशतक साजरे; दुहेरी जल्लोषात रंगला सोहळा

मराठी माध्यमाच्या अस्मितेला ठाम आवाज देणाऱ्या क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २७ कोटींहून अधिक कमाई करत अभिमानास्पद यश संपादन केले आहे. या चित्रपटाने चित्रपटगृहात ५० यशस्वी दिवस पूर्ण करत अर्धशतक गाठले असून, हा टप्पा साजरा करतानाच शिवजयंतीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यामुळे हा सोहळा अक्षरशः दुहेरी जल्लोषात रंगला.
मुंबईत जल्लोषमय सेलिब्रेशन; ढोल-ताशा, लेझीम आणि बालशिवरायांचे आगमन

मुंबईतील एका चित्रपटगृहात हा सोहळा दणक्यात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर वातावरण भारावून गेले. घोड्यावरून ‘बालशिवरायां’चे आगमन होताच उपस्थितांमध्ये उत्साहाची लाट उसळली. शिवगर्जना ऐकताना प्रेक्षक स्तब्ध झाले आणि पुढच्याच क्षणी टाळ्यांचा कडकडाट झाला. घोषणांचा नाद आणि मराठी अस्मितेचा अभिमान यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी चित्रपटाच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत विद्यार्थ्यांसह हा विशेष सोहळा साजरा केला.
प्रेक्षकांसोबत चित्रपट पाहण्याचा भावनिक क्षण
चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांसोबत बसून चित्रपट पाहिला. पडद्यावर चालणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला उत्स्फूर्त टाळ्या, शिट्ट्या आणि भावनिक प्रतिक्रिया उमटत होत्या. अनेकांनी आपल्या शाळेच्या आठवणींना उजाळा दिला, तर नव्या पिढीतील विद्यार्थ्यांनीही चित्रपटाशी मनापासून नाते जोडले. प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेण्याचा क्षण टीमसाठी अत्यंत समाधानकारक ठरला.
दिग्दर्शक हेमंत ढोमे यांची भावना
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, “आजचा दिवस खूप खास आहे. एका बाजूला चित्रपटाचे ५० दिवस पूर्ण झाले आणि त्याच वेळी आपण शिवजयंती साजरी करत आहोत. मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी असलेला हा चित्रपट आणि शिवरायांचा प्रेरणादायी वारसा यांचा सुंदर संगम आज अनुभवायला मिळाला. प्रेक्षकांसोबत चित्रपट पाहण्याचं समाधान शब्दांत मांडणं कठीण आहे. उद्यापासून शोजही वाढत आहेत, हे सर्व प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शक्य झाले.”
आठव्या आठवड्यात वाढलेले शोज आणि चित्रपटगृहांची संख्या
आठव्या आठवड्यात पदार्पण करताना चित्रपटगृहांची संख्या शंभरच्या पुढे गेली असून शोजची संख्याही वाढत आहे. वाढत्या प्रतिसादामुळे चित्रपटाची यशस्वी घोडदौड अधिकच वेग घेत आहे.
कलाकारांची दमदार फळी आणि निर्मितीची धुरा
या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले असून निर्मितीची धुरा क्षिती जोग यांनी सांभाळली आहे. सहनिर्माते म्हणून विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ यांचा सहभाग आहे.
-
‘जल वाणी’ उपक्रमातून दररोज पाणी वाचवण्याचा संदेश

भारतामध्ये पाण्याची टंचाई, प्रदूषित नद्या आणि अनियमित पाणीपुरवठा ही गंभीर समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर National Water Mission आणि Ministry of Jal Shakti यांच्या सहकार्याने ‘मिर्ची’ने ‘जल वाणी’ ही देशव्यापी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश साधा आहे — पाण्याचा अपव्यय थांबवणे आणि प्रत्येक नागरिकाने दररोज लहान कृतींमधून पाणी संवर्धनात सहभागी होणे.
सेलिब्रिटींचा सहभाग आणि सामाजिक संदेश
या उपक्रमाला गायक मोहित चौहान, अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा पाठिंबा लाभला आहे. मोहिमेअंतर्गत लोकांना नळ बंद ठेवणे, गळती रोखणे, आणि पाण्याचा जपून वापर करणे यासारख्या साध्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले जात आहे. “प्रत्येक थेंब जपणे हीच खरी सुरुवात,” असे मत व्यक्त करत मोहिमेत सहभागी कलाकारांनी सामूहिक जबाबदारीवर भर दिला आहे.
दिल्लीतील ‘जल वॉरियर्स’ प्रयोग
दिल्लीमध्ये आरजे नवेद यांनी एक प्रयोग राबवला. गर्दीच्या ठिकाणी मुद्दाम एक नळ गळत ठेवण्यात आला. अनेकांनी दुर्लक्ष केले, परंतु काही सजग नागरिकांनी थांबून तो नळ बंद केला. या छोट्याशा कृतीसाठी त्यांना ‘जल वॉरियर्स’ म्हणून गौरवण्यात आले. या प्रयोगातून एक स्पष्ट संदेश मिळाला — बदलाची सुरुवात छोट्या कृतीतूनच होते.
पाण्याच्या संकटामागची वस्तुस्थिती
‘जल वाणी’ मोहिमेत सहभागी झालेल्या वॉटर वॉरियर्सनी स्पष्ट केले की, भारतातील पाण्याची समस्या ही अनेक वर्षांच्या अतिवापर, प्रदूषण आणि नैसर्गिक साधनांकडे दुर्लक्ष यामुळे निर्माण झाली आहे. ही केवळ संसाधनांची समस्या नाही, तर विचारसरणीची देखील आहे. शासन योजना आखू शकते; पण पाणी ही मर्यादित आणि सर्वांची समान संपत्ती आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे.
डिजिटल माध्यमांतून जनजागृतीचा प्रयत्न
आरजे आणि डिजिटल कंटेंटच्या माध्यमातून ही मोहीम विशेषतः शहरांतील आणि तरुणांपर्यंत पोहोचवली जात आहे. ‘जल वाणी’ उपक्रमातून National Water Mission आणि Ministry of Jal Shakti पाण्याकडे मौल्यवान संसाधन म्हणून पाहण्याची मानसिकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
दररोजच्या छोट्या कृती — नळ बंद ठेवणे, पाणी वाया जाऊ न देणे, आणि संवर्धनाची सवय लावणे — हाच या मोहिमेचा मुख्य संदेश आहे.
