Home

  • मालिकांमधल्या नायकांची प्रेम भाषा !

    ‘शिवा’चा आशु म्हणजेच शाल्व किंजवडेकर जो चॉकलेट बॉय म्हणून ही ओळखला जातो त्याची प्रेम व्यक्त करण्याची भाषा एकदम आगळी वेगळी आहे. शाल्वने सांगितले,” हा व्हॅलेंटाईन माझ्यासाठी खूप खास आहे कारण माझी मालिका व्हॅलेंटाईनच्या दोन दिवस आधी १२ फेब्रुवारीला प्रसारित होतं आहे. त्यासोबत माझी एंगेजमेंट ऍनीव्हर्सरी ही १२ फेब्रुवारीलाच असते तर मी खूप उत्सुक आहे. मला माझ्या प्रेमाच्या व्यक्तींना जेवण बनून खायला घालायला खूप आवडत. जेव्हा मला वेळ मिळतो मी काहीतरी खास बनवून प्रेझेन्ट करतो. त्यासोबत मला वाटतं की नात्यांमध्ये समज असली पाहिजे त्यांनी खूप काही सरळ होऊन जातं. माझ्या जीवनातल्या खास व्यक्तीला एक निरोप आहे की बाबांनी बनवलेले सगळे मफीन मुंबईला येताना घेऊन ये आणि ते सगळे मी खाणार आहे तुला एखादा-दुसरा देईन हा विनोदाचा भाग. पण हैप्पी ऍनीव्हर्सरी!

    ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मधील अधिपती म्हणजे हृषिकेश शेलारने सांगितले, “मला माझ्या प्रिय व्यक्ती बरोबर वेळ घालवायला आवडतो आणि माझा नेहमी प्रयत्न असतो की किती ही व्यस्त असलो तरी मी माझ्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढतो. कारण मटेरिअलिस्टिक गोष्टीं पेक्षा आठवणींचा साठा मोलाचा असतो . नात्यामध्ये स्वातंत्र्य असणं खूप गरजेचं आहे. मी माझ्या त्या खास व्यक्तीला हेच सांगेन की नेहमी तुझ्यासाठी आणि तुझ्यासोबत खंबीर उभा असेन.

    ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेच्या अर्जुन म्हणजे रोहित परशुरामने त्याची प्रेमाची भाषा व्यक्त करताना म्हणाल, खरंतर “प्रेम व्यक्त करायला लागलंच नाही पाहिजे. ते आपल्या वागण्याबोलण्यातून दिसतं. जेव्हा तिची मासिकपाळी वेळी तेव्हा मी सकाळी तिच्या आधी उठून एक कप चहा बनवून सोबत थोडा केक अशी डिश सजवून तिच्यासमोर धरली की पुढचे चार दिवस तिचे खूप छान जातात. प्रत्येक वेळी I love you म्हणूनच प्रेम व्यक्त करायची गरज नसते. पाण्याचा २० लिटरचा जार तिने न सांगता हंड्यात ओतून दिला तर I love you पेक्षा जास्त प्रभाव करतो हे मी अनुभवावरून सांगतो. हा ! हा ! हा ! मालिका करणाऱ्या आर्टिस्टचे असे काही स्पेशल प्लान्स नाही बनत कारण अर्जुनवर आणि ‘अप्पी आमची कलेक्टर’ वर अपार प्रेम करणारे चाहते रोज एपिसोडची वाट पाहत असतात तर त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद देणंही मी माझं कर्तव्य मानतो. माझ्या २०० पिढ्यांनी बुधवारचा उपवास केला असेल तर ह्या १४ फेब्रुवारीच्या बुधवारी शूटला सुट्टी मिळेल. सुट्टी मिळाली तर तेच खूप मोठं गिफ्ट असेल बाकी केक तर कापुच. शेवटी पूजाला फक्त एक निरोप द्यायचा आहे की तू जशी आहेस तशीच कायम रहा !! तुझ्यात मला माझं बाळ दिसतं !

    ‘सारं काही तिच्यासाठी’ मध्ये निशी आणि नीरजची प्रेम कथा खूपच गाजत आहे. तर जेव्हा नीरज गोस्वामीशी बोलणं झाले कि त्याची प्रेमाची भाषा काय आहे तेव्हा नीरज म्हणाला, ” पटकथा लेखनामध्ये एक म्हण आहे की ‘कॅरॅक्टर इज ऍक्शन’. माझं असं मत आहे प्रेम आहे हे बोलण्यापेक्षा, तुमच्या वागणुकीत दिसून आलं पाहिजे. १०० वेळा I love you बोलणं सोप्प आहे. पण जेव्हा मतभेद होतात तेव्हा तुम्ही ते कश्याप्रमाणे सोडवता ते खूप काही सांगून जातं तुमच्या नात्या बद्दल आणि माझ्यासाठी ते महत्वाचे आहे. माझ्या जीवनातल्या त्या खास व्यक्तीला निरोप देताना मी फक्त इतकंच सांगेन आपल्याला खूप चांगल्यागोष्टी अनुभवायच्या आहेत, दुनिया बघायची आहे, खूप शिकायचं आहे तर माझ्यावर विश्वास ठेव. आपण स्मरणात ठेवण्यासारखे आणि जपण्यासारखे जीवन बनवूया. व्हॅलेंटाईन डे हा प्रतीकात्मकपणे आपल्या प्रियजनांसोबत घालवण्याचा दिवस आहे आणि माझे प्रेम हे माझं काम आहे त्यामुळे मला आशा आहे की त्या दिवशी मी ‘सारं काही तिच्यासाठीच’ शूटिंग करत असेन.

    तेव्हा पाहायला विसरू नका ‘अप्पी आमची कलेक्टर’ संध्या ७ वा. ,’तुला शिकवीन चांगलाच धडा’ रात्री ८ वा, ‘सारं काही तिच्यासाठी’ रात्री ८:३० वा, आणि नवी मालिका ‘शिवा’ १२ फेब्रुवारीपासून रात्री ९ वा.

    नातं हे प्रेमाच, नुसत्या नजरेनेच जुळतं!! सगळ काही मनातल न बोलताच समजतं !!

  • एल अँड टी मुंबई ओपन डब्लूटीए१२५, टेनिस स्पर्धेत एकेरीत स्टॉर्म हंटर, एरियन हार्टोनो यांचा मानांकित खेळाडूंवर विजय

    महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएलटीए) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित एल अँड टी मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या स्टॉर्म हंटर, नेदरलँडच्या एरियन हार्टोनो यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आगेकुच केली. तर, दुहेरीत पहिल्या फेरीत भारताच्या वैष्णवी आडकर व सहजा यमलापल्ली यांचे आव्हान संपुष्टात आले.

    क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या स्टॉर्म हंटर हिने ब्राझीलच्या पाचव्या मानांकित लॉरा पिगोसीचा ६-३, ६-३ असा पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. संघर्षपूर्ण लढतीत लात्वियाच्या सहाव्या मानांकित दरजा सेमेनिस्तेजा हिने फ्रान्सच्या अमनदिनी हासेचा २-६, ६-४, ६-४ असा तीन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. एकेरीत पहिल्या पाचही मानांकित खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले आहे.

    दुहेरीत पहिल्या फेरीत स्लोवाकियाच्या दलीला जाकुपोवीच व अमेरिकेच्या सबिना सांतामारिया यांनी भारताच्या वैष्णवी आडकर व सहजा यमलापल्ली या जोडीचा ६-३, ७-६(१) असा पराभव केला. ग्रीसच्या सापफो साकीलारेड्डी व ऑस्ट्रेलियाच्या ऑलीविया जान्द्रामुलीया या जोडीने रशियाच्या एकतेरिना माकारोव्हा व जपानच्या हिमेनो साकात्सुमे यांचा ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. जॉर्जियाच्या नातेला जालामिडझे व हंगेरीच्या पन्ना उदवर्दी यांनी तैपेईच्या एन-शु लियांग व ची-यी साओ यांचा सुपरटायब्रेकमध्ये ४-६, ६-४, १०-७ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

    एकेरीत मंगळवारी झालेल्या पहिल्या फेरीत सहजा यमलापल्ली हिने अव्वल मानांकित कायला डे वर सनसनाटी विजय मिळवताना दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. दुसऱ्या फेरीत गुरुवारी सहजा हिच्यापुढे पॉलिना कुडेरमेटोव्हा हिचे आव्हान असणार

    निकाल: एकेरी: दुसरी फेरी:
    स्टॉर्म हंटर(ऑस्ट्रेलिया)वि.वि.लॉरा पिगोसी(ब्राझील)(५) ६-३, ६-३;
    एरियन हार्टोनो(नेदरलँड)वि.वि.एरिना रोडीनोव्हा(ऑस्ट्रेलिया)(४) ६-४, ६-४;
    दरजा सेमेनिस्तेजा(लात्विया)(६)वि.वि.अमनदिनी हासे (फ्रांस)२-६, ६-४, ६-४;

    दुहेरी: पहिली फेरी:
    सापफो साकीलारेड्डी(ग्रीस)/ऑलीविया जान्द्रामुलीया(ऑस्ट्रेलिया)वि.वि.एकतेरिना माकारोव्हा(रशिया)/हिमेनो साकात्सुमे (जपान)६-२, ६-३;
    दलीला जाकुपोवीच(स्लोवाकिया)/सबिना सांतामारिया(अमेरिका)वि.वि.वैष्णवी आडकर(भारत)/सहजा यमलापल्ली(भारत) ६-३, ७-६(१);
    नातेला जालामिडझे(जॉर्जिया)/पन्ना उदवर्दी(हंगेरी)वि.वि.एन-शु लियांग(तैपेई)/ची-यी साओ(तैपेई)४-६, ६-४, १०-७;

  • प्लॅनेट मराठी ओटीटी येणार आता नवीन रूपात

    जगातील पहिले मराठी ओटीटी हा मान मिळवणाऱ्या ‘प्लॅनेट मराठी’ने आपल्या जगभरातील मराठी प्रेक्षकांना कायमच दर्जेदार कॉन्टेन्ट दिला. अनेक उत्कृष्ट चित्रपट, वेबफिल्म्स, वेबसीरिज, शॉर्ट फिल्म्स त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल्या. अनेक चित्रपटांनी चित्रपट महोत्सव, राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवली. आता प्लॅनेट मराठीने पुन्हा एकदा विस्तार करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे आणि याचाच भाग म्हणून प्लॅनेट मराठीच्या डायरेक्टर कॉन्टेन्ट बोर्डवर अभिजित पानसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभिजीत पानसे यांनी यापूर्वी अनेक चित्रपटांसाठी लेखन, दिग्दर्शन केले आहे. त्यांची ‘रानबाजार’ या वेबसीरिजने इंडस्ट्रीमध्ये खळबळ माजवली होती. प्रेक्षकांसह, शाम बेनेगल, एन. चंद्रा अशा अनेक मान्यवरांनी त्यांच्या या वेबसीरिजचे कौतुक केले. अनेक धाडसी, ज्वलंत, संवेदनशील विषयांना वाचा फोडणे, ही अभिजित पानसे यांची खासियत. या कारणामुळेच त्यांची कलाकृती ही नेहमीच इतरांपेक्षा हटके आणि सुपरहिट झाली आहे. आता ते प्लॅनेट मराठीसोबत जोडले गेल्यामुळे येत्या काळात प्लॅनेट मराठीचा चढता आलेख पाहायला मिळणार आहे.

    याव्यतिरिक्त अभिजीत पानसे यांचे रावण फ्युचर प्रोडक्शन्स आणि श्रीरंग गोडबोले यांचे इंडियन मॅजिक आयने एकत्र येऊन, प्लॅनेट मराठीच्या सहकार्याने प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आणि भन्नाट घेऊन येण्यासाठीही सज्ज झाले आहेत. याबाबतची घोषणा त्यांनी नुकतीच केली असून येत्या काळात प्रेक्षकांना ‘रानबाजार २’ आणि जयवंत दळवी यांच्या ‘पुरुष’ या नाटकावर प्रेरित होऊन एक नवीन वेबसीरिज प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.

    अभिजित पानसे डायरेक्टर कॉन्टेन्ट बोर्डवर

    या नियुक्तीबद्दल अभिजित पानसे म्हणतात, ” हिंदी आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये जसे एकमेकांचे हात पकडून भव्यदिव्य कलाकृती निर्माण केली जाते. तसे मराठी इंडस्ट्रीमध्ये फार कमी घडते. मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक जण स्वतंत्ररित्या काम करतात. फार कमी असे आहेत जे एकत्र येऊन काम करतात. त्यामुळे मराठीत जर अशी भव्यदिव्य कलाकृती निर्माण करायची असेल तर मराठी इंडस्ट्रीने एकत्र येऊन एखादी संघटना उभारणे गरजेचे आहे. याचाच आरंभ म्हणून मी आणि इंडियन मॅजिक आय एकत्र आलो. महाराष्ट्राच्या विविध भागांत असंख्य प्रतिभाशाली कलावंत आहेत, ज्यांना कलाकृती सादर करण्यासाठी, एक उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याच्या आमचा हा प्रयत्न आहे. अशा प्रकारचा मराठीतील पहिला स्टुडिओ उभारण्याचा आमचा मानस आहे. त्यात प्लॅनेट मराठी सारखे व्यासपीठ लाभल्याने हे अधिकच आनंददायी आहे.”

    या नवीन उपक्रमाबद्दल दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले म्हणतात, ” मागील तीस वर्षांपासून मी या क्षेत्रात कार्यरत आहे. यादरम्यान मला एक जाणवले, आजवर अनेक उत्तम कलाकृती सादर केल्या. परंतु त्या देशभर, जगभर पोहोचवण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतो. त्यामुळे आता प्लॅनेट मराठी सारख्या जगातील पहिले मराठी ओटीटीच्या, अक्षय बर्दापूरकर, अभिजित पानसे यांच्या सहकार्यांने आम्ही या मराठी कलाकृती जगाच्या पटलावर आणू.”

    प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” अभिजित पानसे डायरेक्टर कॉन्टेन्ट म्हणून रुजू झाल्यामुळे त्यांची जी मराठी इंडस्ट्रीबद्दलची दूरदृष्टी आहे, जी प्लॅनेट मराठीच्या विस्तारासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे, हे मी खात्रीने सांगू शकतो. त्यांच्यासोबतच तीन दशकांहून अधिक काळ या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारे श्रीरंग गोडबोले, ज्यांनी २५ हून अधिक मालिका केल्या आहेत. पाच चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे. हा त्यांचा दांडगा अनुभव आमच्या पुढील वाटचालीसाठी नक्कीच उपयोगी येणार आहे. या सगळ्याच्या सहयोगानेच मराठीत एक मोठे युनिट उभे राहू शकते.”

  • Shrivalli Bhamidipaty stuns second seed Nao Hibino; Rutuja Bhosale, Prarthana Thombare also win at L&T Mumbai Open Tennis Championships

    A day after wild carder Sahaja Yamalapalli sent the top seed Kayla Day of USA crashing out of the tournament, Indian qualifier Shrivalli Bhamidipatty pulled off another stunning upset, defeating second seed Nao Hibino of Japan in the first round of the L&T Mumbai Open WTA 125K Series Tennis Championships, being organized by the Maharashtra State Lawn Tennis Association (MSLTA) and the Cricket Club of India (CCI) and played at the floodlit CCI courts on Tuesday.

    Ranked No. 520 in the world and playing against a top 100 player for the first, the 22-year-old Bhamidipaty, who won two matches in qualifying to reach the main draw, recovered from the loss of the first set to oust the three-time WTA titlist Hibino 2-6, 6-1, 7-6 (5) in two hours and 17 minutes. The Indian will take on 16-year-old Russian Alina Korneeva for a spot in the pre-quarter-finals.

    Earlier in the day, Asian Games mixed doubles gold medallist Rutuja Bhosale scored a straight sets win over Thailand’s Peangtarn Plipuech 6-4, 7-5 to make it three Indians advancing to the second round of the biggest professional women’s tennis tournament in the country this year. Later, Indian No. 1 Ankita Raina went down tamely to American 8th seed Katie Volynets in straight sets 6-4, 6-2.

    There was also good news for local fans in the doubles draw with India No 1 Prarthana Thombare and Dutch partner Arianne Hartono reaching the quarter-finals with a 6-4, 2-6, 10-6 upset win over the fourth-seeded Thai duo Luksika Kumkhum/ Peangtarn Plipuech.

    Fourth seed Arina Rodionova, who created history this week by becoming the oldest woman to make her top 100 debut at the age of 34, scored a 6-2, 7-5 win over Dutch player Suzan Lamens.

    The tournament’s third seed Tamara Zidansek pulled out of the tournament and was replaced by lucky loser Camilia Rosatello, who scored a 7-5, 3-6, 6-2 win over Anastasia Tikhonova. Seventh seeded Kimberly Birrel was also knocked out in a two-hour, 35-minute battle, going down to Hungary’s Dalma Galfi 2-6, 6-4, 5-7.

    Results – Singles (Round 1):
    Shrivalli Bhamidipaty (IND) beat 2-Nao Hibino (JPN) 2-6, 6-1, 7-6(5);
    4-Arina Rodionova (AUS) bt Suzan Lamens (NED) 6-2, 7-5;
    Dalma Galfi (HUN) bt Kimberly Birrell (AUS) 6-2, 4-6, 7-5;
    Polina Kudermetova bt Anastasia Zakharova 7-6 (8), 6-0;
    Moyuka Uchijima (JPN) bt Carole Monnet (FRA) 6-3, 6-3
    WC-Rutuja Bhosale (IND) Q-Peangtarn Plipuech (THA) 6-4, 7-5;
    Storm Hunter (AUS) bt Q-Fanny Stollar (HUN) 3-0 retd.
    Q-Amandine Hesse (FRA) bt Q-Lina Glushko (ISR) 6-1, 6-1;
    LL-Camilia Rosatello (ITA) bt Anastasia Tikhonova 7-5, 3-6, 6-2.
    8-Katie Volynets (USA) bt WC-Ankita Raina (IND) 6-4, 6-2

    Doubles (Round 1):
    A Hartono (NED) / P. Thombare (IND) bt 4-L. Kumkhum (THA) / P. Plipuech (THA) 6-4, 2-6, 10-6.
    C. Monnet (FRA) / E. Yashina def. V. Grammatikopoulou (GRE) / D. Semenistaja (LAT) 7-6, 6-4

    About the L&T Mumbai Open WTA 125 Series:

    L&T Mumbai Open Tennis Championships is returning to Mumbai after a gap of six years, with reigning Australian Open champion Aryna Sabalenka winning the inaugural edition in 2017 as a teenager and Thailand’s Luksika Kumkhum winning the title in 2018.

  • Nirup Bhandari’s next is titled ‘Sathya – Son of Harishchandra’

    Nirup Bhandari and Sai Kumar, the successful duo behind ‘RangiTaranga’, have joined forces again for a new film with an intriguing storyline. Titled ‘Sathya – Son of Harishchandra’, this production, supported by Ankket Cinemas, unveiled its title and first look today. The initial glimpse is captivating, showcasing a vibrant blend of colors. Nirup Bhandari shines as the son, while Sai Kumar impresses with his bold portrayal of the father. Director Sachin’s choice of the tagline, ‘My father… My villain..’ adds an extra layer of intrigue to the poster, leaving audiences eager for more.

    Given the father-son theme, it was apt that the film’s first look was jointly revealed by the hero’s father and the producer’s father. Set against the stunning landscapes of Thirthahalli and Channagiri, ‘Sathya – Son of Harishchandra’ delves into the conflict between truth and falsehood, weaving together comedy and family drama. Alongside Nirup Bhandari and Sai Kumar, the film features a talented ensemble cast including Brinda Acharya, Ankita Amar, Swathi Gurudutt, MK Mata, Chetan Durga, and more.

    Produced by Ankit Sonigara for Ankket Cinemas, ‘Sathya – Son of Harishchandra’ is helmed by director Sachin Vaali. Ankit, hailing from Pune, is producing a Kannada film driven by his passion for the language, which is truly commendable. Co-produced by Prashant Mulage, the film boasts cinematography by Sandeep Valluri, music by Sachin Basrur, editing by Ujwal Chandra, costume design by Zoha Kabir, and art direction by Ullas Hydoor.

  • जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ८ मार्चला ‘तेरवं’ मोठ्या पडद्यावर

    स्त्रीशक्तीचं अनोख दर्शन घडवणारा ‘तेरवं’

    गेल्या काही शतकांमध्ये समाजात बदल घडले असले, स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अद्यापही फारसा पुढारलेला नाही. त्यामुळे एका कणखर स्त्रीची गोष्ट सांगणारा “तेरवं” हा चित्रपट जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ८ मार्चला मोठ्या पडद्यावर येत आहे. हरिष इथापे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात संदीप पाठकसह अनेक कसलेले कलाकार दिसणार आहेत.

    तेरवं या चित्रपटाचं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. नरेंद्र जिचकार यांच्या अंजनीकृपा प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेतर्फे तेरवं चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. नरेंद्र राहुरीकर सहनिर्माता आहेत. श्याम पेठकर यांनी तेरवं चित्रपटाचं लेखन केलं आहे. तर सुरेश देशमाने यांनी छायांकन, वीरेंद्र लाटणकर यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. किरण खोजे, संदीप पाठक, किरण माने, नेहा दंडाळे, शर्वरी पेठकर, प्रवीण इंगळे, संहिता इथापे असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत.

    तेरवं हा चित्रपट जनाबाई या स्त्रीची प्रेरणादायी कथा सांगतो . कौटुंबिक ते सामाजिक आव्हानं येऊनही खंबीरपणे त्याला कस सामोरं जात वेगळं काम निर्माण करणाऱ्या जनाबाईच्या स्त्रीशक्तीचं दर्शन या चित्रपटात घडवण्यात आलं आहे. त्यामुळे यंदाचा महिला दिन नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे यात शंका नाही.

  • अवधूत गुप्ते यांच्या ‘दूर दूर’ गाण्याचा टिझर प्रदर्शित

    अवधूत गुप्ते यांच्या ‘विश्वामित्र’ या अल्बममधील ‘विश्वामित्र’, ‘तुझ्या विना’ या श्रवणीय गाण्यांनंतर आता ‘दूर दूर’ हे तिसरे बहारदार गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचा जबरदस्त टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. अवधूत गुप्ते यांचे संगीत, बोल असलेल्या ‘दूर दूर’ या गाण्याला आवाजही त्यांचाच लाभला आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येकालाच आजूबाजूला ‘त्या’ खास व्यक्तीचा भास होतो. परंतु कधी कधी ‘त्या’ व्यक्तीला विसरण्याचा प्रयत्न केला तरी सर्वत्र तीच व्यक्ती दिसते. प्रेमातील हीच तळमळ या गाण्यातून व्यक्त होत आहे. अवधूत गुप्ते यांची खासियत या गाण्यातून दिसत असून उडत्या चालीचे हे गाणे सगळ्यांनाच आवडेल असे आहे. याचे सादरीकरणही उल्लेखनीय आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वामित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी असून येत्या ९ फेब्रुवारीला ‘दूर दूर’ गाणे प्रदर्शित होणार आहे.

    या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, ” जिव्हाळा, आठवणी, दुरावा, भास या सगळ्या गोष्टींचा माणूस प्रेमात अनुभव घेतो. हे सगळे अनुभव दाखवणारे ‘दूर दूर’ हे गाणे आहे. मनाला भावतील असे या गाण्याचे बोल आहेत. सर्वत्र तिचाच भास होत असल्याचे या गाण्यातून सांगण्यात येत आहे. जुन्या प्रेमाची आठवण करून देणारे, एकांतात ‘ती’ची आठवण करून देणार हे गाणे आहे. हे गाणे माझ्या दोस्तांना नक्कीच आवडेल.”

  • बहुचर्चित ‘लोकशाही’ चित्रपट ९ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार!

    कनुकत्याच प्रदर्शित झालेल्या अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत लोकशाही चित्रपटाच्या ट्रेलर आणि गीतांनी महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. लोकशाही चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना चित्रपटगृहात विलक्षण अनुभव घेता येणार आहे.

    राजकारणातील महिलांचं अस्तित्व, घराणेशाही, सत्तासंघर्ष, निवडणुकांची रणधुमाळी, राजकीय कुरघोडी, पक्षांचा प्रचार आणि विजयाचा गुलाल चित्रपटात पहायला मिळणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या भूमिका प्रेक्षकांना खिळवून ठेवणार असून अंकित मोहन, गिरीश ओक, समीर धर्माधिकारी, भार्गवी चिरमुले, अमित रियान, शंतनु मोगे, प्रसन्न केतकर, सुश्रुत मंकणी, अजिता कुलकर्णी, सोनल वाघमारे हे सुप्रसिद्ध कलाकार राजकारणाच्या भयाण खेळात धुरळा उडवणार आहेत.

    लोकशाही ही एका घराणेशाहीतल्या एका मुलीच्या वैयक्तिक पेचप्रसंगाची कथा आहे, जी तणावग्रस्त राजकीय नाटकाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या नैतिक अनैतिक कृत्यांवर आधारित आहे. समाजकारणात रस असलेल्या राजकारणी घराण्यात वाढलेल्या मुलीच्या आयुष्यात अनपेक्षित घटनांची साखळी घडत जाते. जी साखळी तिच्या वडिलांच्या हत्येचं कारण बनते. सत्तेच्या हव्यासापोटी रक्ताच्याच नात्यांनी तिच्या वडिलांचा जीव घेतला आहे, मात्र हत्या आणि हत्यामागचा कट कोणाचा आहे हे चित्रपटात कळणार आहे.

    लोकशाही चित्रपट सुशीलकुमार अग्रवाल यांनी निर्मित केले असून संजय अमर यांनी कथा, पटकथा आणि दिग्दर्शित केले आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन संजय-राजी या जोडीने केले असून चित्रपटातील गाणी जयदीप बागवडकर आणि राजलक्ष्मी संजय यांनी गायले आहेत, तसेच संजय अमर आणि अल्ट्रा मराठीचे बिझनेस हेड शाम मळेकर यांनी गीतांना शब्द दिले आहेत.

    “पैसा आणि सत्ता माणसाला वेडं बनवून टाकते. सत्तेसाठी भुकेले असणाऱ्या अशा लोकांचा संघर्ष आणि त्याचे परिणाम लोकशाही चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. उत्तमोत्तम कथा प्रेक्षकांना सादर करताना एक निर्माता म्हणून अभिमानास्पद भावना आहे. असे अनेक आशयघन चित्रपटांची निर्मिती करून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत राहणार आहोत.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

  • Sahaja Yamalapalli stuns top seed Kayla Day for the biggest career win in the first round of L&T Mumbai Open Tennis Championships

    India’s No. 2 ranked player, Sahaja Yamalapalli, pulled off a sensational upset over top seed Kayla Day, of the United States, in a three-set battle in the first round of the L&T Mumbai Open WTA 125K Series Tennis Championships, being organized by the Maharashtra State Lawn Tennis Association (MSLTA) and the Cricket Club of India (CCI) on Monday evening.

    Ranked No. 335 in the world and playing against a top 100 player for the first time in her career, the 23-year-old wild card entrant put aside the loss of a second set to win 6-4, 1-6, 6-4 in two hours and 43 minutes and advance to the second round.

    Earlier in the day, another Indian wild card entrant Vaishnavi Adkar put on an impressive show before going down in three sets to South Korea’s Sohyun Park while the Indian duo Ankita Raina/ Rutuja Bhosale bowed out in the first round of the doubles event.

    19-year-old Adkar, ranked No 841 in the world, was originally scheduled to play qualifier Himeno Sakatsume but the latter was forced to pull out which put Park into the main draw as a lucky loser. Playing an opponent ranked more than 500 spots above her in the rankings, Adkar took the second set before Park came out on top 6-2, 2-6, 6-1 in just under two hours.

    In the doubles draw, the all-Indian duo of Raina/ Bhosale was narrowly defeated by Hungary’s Fanny Stollar and Great Britain’s Naiktha Bains 6-3, 2-6, 8-10 in the first round.

    Elsewhere in the draw, 16-year-old Alina Korneeva, who trains at the Rafa Nadal Academy in Spain, defeated Frenchwoman Chloe Paquet 6-1, 6-3 to move into the second round. Korneeva won the Australian and French Open junior singles titles in 2023, becoming the top-ranked junior in the world before transitioning to the pro tour where she is already ranked inside the world’s top 150.

    Fifth seed Laura Pigossi, of Brazil, sixth seed Darja Semneistaja, of Latvia, and Dutchwoman Arianna Hartono also won their opening main draw matches on Monday to move into the second round.

    L&T Mumbai Open WTA 125K Series Results, Monday February 5, 2024

    Singles First Round

    Sahaja Yamalapalli (IND) def. (1) Kayla Day (USA) 6-4, 1-6, 6-4
    (5) Laura Pigossi (BRA) def. Ekaterina Makarova 6-1, 3-0 retd.
    (6) Darja Semenistaja (LAT) def. Panna Udvardy (HUN) 7-5, 3-6, 6-2
    Sohyun Park (LL) (KOR) def. Vaishnvai Adkar (IND) 6-2, 2-6, 6-1
    Arianne Hartono (NED) def. Irina Bara (ROM) 6-4, 6-4
    Alina Korneeva def. Chloe Paquet (FRA) 6-1, 6-3

    Doubles First Round
    Naiktha Bains (GBR)/ Fanny Stollar (HUN) def. Ankita Raina (IND)/ Rutuja Bhosale (IND) 3-6, 6-2, 10-8player, Sahaja Yamalapalli, pulled off a sensational upset over top seed Kayla Day, of the United States, in a three-set battle in the first round of the L&T Mumbai Open WTA 125K Series Tennis Championships, being organized by the Maharashtra State Lawn Tennis Association (MSLTA) and the Cricket Club of India (CCI) on Monday evening.

    Ranked No. 335 in the world and playing against a top 100 player for the first time in her career, the 23-year-old wild card entrant put aside the loss of a second set to win 6-4, 1-6, 6-4 in two hours and 43 minutes and advance to the second round.

    Earlier in the day, another Indian wild card entrant Vaishnavi Adkar put on an impressive show before going down in three sets to South Korea’s Sohyun Park while the Indian duo Ankita Raina/ Rutuja Bhosale bowed out in the first round of the doubles event.

    19-year-old Adkar, ranked No 841 in the world, was originally scheduled to play qualifier Himeno Sakatsume but the latter was forced to pull out which put Park into the main draw as a lucky loser. Playing an opponent ranked more than 500 spots above her in the rankings, Adkar took the second set before Park came out on top 6-2, 2-6, 6-1 in just under two hours.

    In the doubles draw, the all-Indian duo of Raina/ Bhosale was narrowly defeated by Hungary’s Fanny Stollar and Great Britain’s Naiktha Bains 6-3, 2-6, 8-10 in the first round.

    Elsewhere in the draw, 16-year-old Alina Korneeva, who trains at the Rafa Nadal Academy in Spain, defeated Frenchwoman Chloe Paquet 6-1, 6-3 to move into the second round. Korneeva won the Australian and French Open junior singles titles in 2023, becoming the top-ranked junior in the world before transitioning to the pro tour where she is already ranked inside the world’s top 150.

    Fifth seed Laura Pigossi, of Brazil, sixth seed Darja Semneistaja, of Latvia, and Dutchwoman Arianna Hartono also won their opening main draw matches on Monday to move into the second round.

    L&T Mumbai Open WTA 125K Series Results, Monday February 5, 2024

    Singles First Round

    Sahaja Yamalapalli (IND) def. (1) Kayla Day (USA) 6-4, 1-6, 6-4
    (5) Laura Pigossi (BRA) def. Ekaterina Makarova 6-1, 3-0 retd.
    (6) Darja Semenistaja (LAT) def. Panna Udvardy (HUN) 7-5, 3-6, 6-2
    Sohyun Park (LL) (KOR) def. Vaishnvai Adkar (IND) 6-2, 2-6, 6-1
    Arianne Hartono (NED) def. Irina Bara (ROM) 6-4, 6-4
    Alina Korneeva def. Chloe Paquet (FRA) 6-1, 6-3

    Doubles First Round
    Naiktha Bains (GBR)/ Fanny Stollar (HUN) def. Ankita Raina (IND)/ Rutuja Bhosale (IND) 3-6, 6-2, 10-8

  • ७ वर्षाच्या कबीरने सोलापुरात ४२ डिग्री तापमानात सलग १२ दिवस केला अनवाणी पायाने प्रवास

    पीफ” मध्ये “जिप्सी” चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला “स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान

    नुकत्याच पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल” मध्ये “जिप्सी” हा चित्रपट दाखविण्यात आला होता. या चित्रपटातील “जोत्या’ नावाच्या एका डोंबाऱ्याच्या लहान मुलाची भूमिका अतिशय चोखपणे पार पाडणाऱ्या अवघ्या ७ वर्षाच्या कबीर खंदारे या बालकलाकराला “स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर ” या सन्मानाने गौरविण्यात आले. प्रेक्षकांबरोबरच अनेक  समीक्षक, पत्रकार आणि मान्यवरांनी  कबीरचे खूप कौतुक केलं.

    कबीरच्या अभिनयाची सुरुवात खरं सांगायचं तर तो
    त्याच्या आईच्या पोटात अवघ्या सहा महिन्याचा असतानाच झाली. पुण्यातील एका दिग्दर्शकाला एक गर्भवती स्त्रीच्या भूमिकेसाठी एका कलाकराची गरज होती त्यावेळी  कबीरच्या आईने तो रोल केला होता. त्याच्यानंतर अगदीच काही महिन्याचा असताना महेश खंदारे दिग्दर्शित “मारेकरी” या शॉर्ट फिल्ममध्ये त्याने लहान बाळाचे काम केलं. त्यानंतर दिग्दर्शक शशि चंद्रकांत खंदारे यांच्या “द लास्ट पफ” नावाच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये साधारणतः एक  वर्षाचा असताना त्यांने काम केलं होतं. त्याने आता पर्यंत अनेक नामांकित दिग्दर्शकांसोबत लघुपट, जाहिराती, माहितीपट तसेच नुकत्याच एका हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केली आहे. दिग्दर्शक शशि चंद्रकांत खंदारे दिग्दर्शित “सुरमा” या लघुपटामध्ये त्यांने एक महत्वपूर्ण भूमिका साकारली   आहे, त्या भूमिकेसाठी कबीरला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांमध्ये चार वेळा “बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट” म्हणून गौरविण्यात आला आहे.

    शशि चंद्रकांत खंदारे दिग्दर्शित “जिप्सी” आता लवकरच प्रदर्शित होणार

    ‘जिप्सी’ चे दिग्दर्शक  शशि चंद्रकांत खंदारे यांना कबीरच्या इतक्या निरागस अभिनयाच्या  पाठीमागचं रहस्य काय आहे? असं विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की, मुळातच कबीर हा अतिशय उत्तम अभिनेता आहे. आणि त्याला अभिनयाची खूप आवड आहे. त्याला एखादी गोष्ट कशी करायची हे करून दाखवलं की, त्याच्यापेक्षा अतिशय उत्तम पद्धतीने तो साकारतो. त्याचबरोबर अभिनयासाठी असणारी सोशिकता, सहनशक्ती त्याच्याकडे खूप आहे. शूटिंग दरम्यान  सोलापूरच्या जवळजवळ ४२ डिग्री तापमानामध्ये आम्ही शूट करत होतो आणि त्याच्या कॅरेक्टर नुसार सुरुवातीचे काही सिन त्याच्या पायामध्ये चप्पल नाही. तर जवळजवळ सलग बारा दिवस तो अनवाणी पायाने जंगल, माळरान, डांबरी रोड, गावभर चेहऱ्यावरती किंचितही वेदना न दाखवता फिरत होता. त्याचबरोबर कोकणामध्ये आम्ही पावसाचा सिक्वेन्स वेगवेळ्या वेळेस सलग आठ दिवस शूट केला आहे. तर पावसात भिजत त्याने ते सीन दिले आहेत. एक वेळ तर अशी होती की सिनेमाचा आम्ही महत्त्वाचा भाग शूट करत होतो, आणि सलग भिजल्यामुळे तो आजारी पडला होता. पण आम्हाला शूट थांबवणं शक्य नव्हतं, तर आम्ही पहाटे चार वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत पावसात शूट करत होतो.  तर आम्ही त्याला शॉट झाला की जनसेटच्या मागे उब लागण्यासाठी उभं करायचो. कित्येक शॉट त्याला औषध पाजून घेतले आहेत.

    सध्या कबीरला नामांकित दिग्दर्शक आणि प्रोडक्शन हाऊसचे मुख्य भूमिका असलेले दोन चित्रपट मिळाले आहेत. नुकतीच त्यातल्या एका चित्रपटाची लुक टेस्ट झाली आहे.