Home

  • नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शनचे ‘जयभीम पँथर’ एक संघर्ष द्वारे पदार्पण

    निशांत धापसे दिग्दर्शित नवा चित्रपट लवकरच

    बहुजन तरुणांना नवी दिशा देण्यासाठी समाज प्रबोधनासाठी नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन “जयभीम पँथर” एक संघर्ष या चित्रपटाची निर्मिती करत आहे. निशांत नाथाराम धापसे दिग्दर्शित या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतेच अशोका विजयादशमीच्या मुहूर्तावर छत्रपती संभाजीनगर येथे लाँच करण्यात आलं असून, एका संघर्षाची कहाणी या चित्रपटातून मांडली जाणार आहे. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय किर्तीचे पु.भ. विशुद्धानंद बोधी महायेरे, मा. खा.इम्तियाज जलील, पोलिस आयुक्त मनोज लोहिया , श्रीमती सूर्यकांता गाडे, भीमराव हत्तीअंबीरे तसेच चित्रपटाचे निर्माते,दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ टीम उपस्थित होते.

    भ. शीलबोधी यांच्या नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शनद्वारे निर्मिती होत असलेला “जयभीम पँथर” एक संघर्ष हा महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. आयु. रामभाऊ तायडे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संपूर्ण बौद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील भारत निर्माण करण्यासाठी चित्रपट, मालिका अशा माध्यमातून नवनिर्मिती करण्याचा या निर्मिती संस्थेचा मानस आहे. लेखक दिग्दर्शक निशांत नाथाराम धापसे यांनी आतापर्यंत हलाल , भोंगा, भारत माझा देश आहे अशा अनेक चित्रपटांचे लेखक म्हणून, तर “अंकुश”, “रंगीले फंटर” हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या चित्रपटांना अनेक महोत्सवांमध्ये पुरस्कार, राज्य पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. नागराज दिवाकर हे छायाचित्रण, संकलन नीलेश गावंड, प्रकाश सिनगारे कलादिग्दर्शन यांचे असून राहुल सुहास यांचे या चित्रपटला संगीत लाभणार आहे. संतोष गाडे हे प्रोजेक्ट हेड तर बाबासाहेब पाटील हे कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहणार आहेत.

    सध्याच्या सामाजिक कोलाहलात आताची पिढी अडकल्यास त्यांचे आयुष्य अयोग्य मार्गावर जाईल, त्यांचं वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्यामुळे संविधानिक मूल्यांचं रक्षण होण्याच्या उद्देशानं जबाबदारीची जाणीव करून देणारं कथानक “जयभीम पँथर” एक संघर्ष या चित्रपटात मांडण्यात येणार असल्याचे निर्माते भदंत शीलबोधी यांनी सांगितले. चित्रपटाचं दमदार नाव, कसदार लेखक दिग्दर्शक यांची घोषणा झाली असली, तरी चित्रपटात कलाकार कोण असणार यासाठी मात्र अजुन थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

  • Veronica Vanij enjoyed the day with family on occasion of Dussehra

    Veronica Vanij is someone who’s recently been in the news and limelight for the right reasons. Be it for her projects or for her sensational social media posts, she tends to grab attention everywhere effortlessly. The diva is a perfect blend of desi emotions alongside western swag and well, no wonder, it’s so difficult to not crush on her. She values her culture and traditions and when it comes to spending festivals and holidays, she puts priority into spending time with family.

    After having enjoyed her Navratri days with her Garba spree, the diva
    witnessed Ravan Dahan and spent the day with her family. Regarding her opinion on Dussehra, the actress shares and we quote,
    “Dussehra is extremely significant in our lives as it is a very important reminder for all of us. It keeps us clear about the fact that, come what may, the good and the truth will always dominate the evil and negativity at the end of the day. Owing to our regular pressure of personal and professional lives, we often tend to forget to draw the line and keep our conscience clear. This day is henceforth extremely significant that way. For years, I have been witnessing Ravan Dahan with family and this year too, it is no different. I visited the ground near our home where Ravan Dahan takes place every year. It is a festival of happiness, positivity and joy. I wish all my fans and well-wishers a very Happy Dussehra.”

  • Alankrita Sahai is sharing her latest stylish snaps from her Thailand diary.


    Alankrita Sahai is one of the most captivating and beautiful artistes in the Indian entertainment industry. The actress certainly knows how to effortlessly stab hearts in a fraction of seconds and no wonder, we all love it in the true and genuine sense of the term. Over the years, the diva has mastered the art of balancing between her personal and professional life and that’s a life hack we all want to crack, don’t we? She experiences wanderlust like no one else and that’s why, whenever she gets an opportunity to take time away from her busy schedule for vacations, she indulges in the same without any second thoughts? Well, guess what’s her present vacay spot now to chill and have fun? Well, it’s none other than Thailand.



    Alankrita took to her social media handle to share some mesmerizing and captivating snaps from her Thailand diaries and well, seeing the same, we all feel like teleporting ourselves over there, don’t we? The diva has got her fashion game on point over there and that’s why, she’s seen maintaining the perfect blend of class and swag in her outfit diaries. Want to check out the same? Well, here’s your golden opportunity. Check out the beautiful snaps below –

    Well, aren’t these photos an absolute visual delight and extremely pleasing to the eyes? Share your thoughts and let us all know your views. On the work front, the talented actor is all set to have a spree of interesting releases, the announcements of which will happen soon as per the ideal timelines.

  • निळावंती’ ती येतिय… चित्रपटाचं उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित

    चित्रपटसृष्टीमध्ये नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहायला मिळतात. आता ‘निळावंती’ चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. पोस्टर पाहून हा थरारक चित्रपट असल्याचे लक्षात येतेय. पोस्टरमध्ये एक स्री हातात कंदील घेऊन जंगलात चालताना दिसत आहे. ती येतिय… या टॅगलाईनचा नेमका अर्थ काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात चलबिचल करत आहे .याव्यतिरिक्त पोस्टरमध्ये असलेली ती पाठमोरी अभिनेत्री नक्की कोण आहे, याची उत्सुकताही प्रेक्षकांना लागली आहे.

    ‘निळावंती’ हा एक ग्रंथ आहे. या ग्रंथाबद्दल फार क्वचित लोकांना माहित आहे. हा ग्रंथ कोणी सहसा वाचत नाही कारण अनेक अफवा या ग्रंथाबद्दल पूर्वी पसरल्या होत्या. या सर्व गोष्टी सत्य घटनेवर आधारित आहेत की नाही त्याचीच संपूर्ण कथा आता आपल्या समोर चित्रपटाच्या माध्यमातून सचिन दाभाडे दाखवणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून ‘निळावंती’ राक्षसी की दैवी रूप आहे, ही अफवा आहे की सत्य या अनेक गूढ गोष्टींचे रहस्य उलगडणार आहे.

    लेखक, दिग्दर्शक सचिन दाभाडे म्हणतात, ” लवकरच `निळावंती` चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तुम्हाला दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. लवकरच त्यांचा चेहरा माध्यमांसमोर येईल. ज्या व्यक्तींना `निळावंती` ग्रंथाबद्दल माहित असेल त्या व्यक्तींसाठी त्याची पूर्ण माहिती चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनेक लोकांना हा शब्द देखील नवीन असेल त्यांना देखील याबद्दल जाणून घेण्याची आवड निर्माण होईल, अशी ही गूढ कथा आहे.

  • महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा वेध घेणाऱ्या ‘कलम ३७६’ चित्रपटाचे पोस्टर लाँच


    ‘ना कोर्ट न खटला, जो चुकला त्याला ठोकला’

    हजारो वर्षांची संस्कृती सांगणाऱ्या भारत देशात स्त्रियांवरील अत्याचार हा मोठाच सामाजिक प्रश्न आहे. त्यातही स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार, शोषणाचा प्रश्नाचा वेध घेणाऱ्या कलम ३७६ या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

    ‘ना कोर्ट न खटला, जो चुकला त्याला ठोकला’ अशी धडाकेबाज टॅगलाईन असलेल्या कलम ३७६ या चित्रपटाची निर्मिती आशिष धोत्रे आणि समीर गोंंजारी यांनी केली आहे. सचिन धोत्रे आणि रवींद्र माठाधिकारी यांनी चित्रपटाचं लेखन, तर एम. बी.अल्लीकट्टी यांनी छायांकन केलं आहे. चित्रपटाचं पोस्टर अतिशय लक्षवेधी आहे. फाईलवर ठेवलेलं पिस्तुल आणि मागे भिंतीवर सावरकरांचा फोटो, महाराष्ट्र पोलिसची पाटी दिसते. त्यामुळे चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

    आतापर्यंत अनेक चित्रपटांतून स्त्रियांते प्रश्न हाताळण्यात आले आहेत. मात्र स्त्रियांचं लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार कायद्याच्या दृष्टिकोनातून, हार्डहिटिंग पद्धतीनं, कोर्टरूम ड्रामा पद्धतीनं मांडल्याची उदाहरणं मराठीत अगदीच मोजकी आहेत. त्यामुळे “कलम ३७६” हा चित्रपट कथानक कशा पद्धतीनं मांडणार याकडे लक्ष लागले आहे.

    चित्रपटाविषयी दिग्दर्शक संतोष धोत्रे म्हणाले, की
    लैंगिक गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे. गेल्या चार दशकांत इतर गुन्ह्यांच्या तुलनेत बलात्काराचे प्रमाण सर्वाधिक वाढले असून गुन्हेगारांना शिक्षा देण्यात आपण मागे पडत आहोत. दोन वर्षांच्या मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत बलात्काराच्या बळी ठरत आहेत. अशा स्थितीत कोणतीही कठोर कारवाई करण्याऐवजी आपल्या चुका लपवण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणारे नेहमीच नवनवीन सबबी शोधत असतात. वृत्तमाध्यमांतून महिलांवरील बलात्कार आणि विनयभंगाच्या बातम्या रोज दाखवल्या जातात, पण ते रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची कुठेही चर्चा होत नाही. असे अत्याचार कधी थांबणार? आपण फक्त मूक प्रेक्षक बनून आपली पाळी येण्याची वाट पाहणार आहोत का? मुलींवर अत्याचार पूर्वीही होत होते आणि आजही होत आहेत. ते थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर…? आजही आपल्या समाजात अत्याचार करणारे खुलेआम फिरतात आणि निष्पाप पीडित मुलीकडे वाईट आणि अपमानास्पद नजरेने पाहिले जाते. समाज किंवा सरकार आपली जबाबदारी नीट पार पाडत नाही. अशा परिस्थितीत मुलीला सुरक्षित वाटेल, ही आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. याच मुद्द्यांचा वेध चित्रपटात घेतला जाणार आहे.

  • अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारं नाटक

    भरत जाधव दिसणार एका वेगळ्याच भूमिकेत

    नवनवीन कथा, आशय असणारी वेगवेगळ्या जॉनरची नाटके रंगभूमीवर येत असतानाच आता अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे एक कौटुंबिक नाटक नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. भरत जाधव एण्टरटेनमेंट निर्मित ‘अस्तित्व’ हे नाटक लवकरच नाट्यप्रेमींच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. स्वप्नील जाधव लिखित, दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या नाटकाचा येत्या ३ नोव्हेंबर रोजी शुभारंभाचा प्रयोग असून यात चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव, श्याम घोरपडे, जयराज नायर आणि भरत जाधव प्रमुख भूमिकेत आहेत. भरत जाधव हे एक हरहुन्नरी अभिनेते आहेत. आजवर त्यांनी विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. बऱ्याच विनोदी भूमिका साकारल्या. नकारात्मक भूमिकाही त्यांनी केल्या. मात्र आता बऱ्याच काळानंतर भरत जाधव या नाटकाच्या माध्यमातून एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

    ही कथा एका अशा कुटुंबाची कहाणी आहे, जे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे. कुटुंबातील एकमेव कमावणाऱ्या आणि नोकरीतून लवकरच निवृत्त होणाऱ्या संतोष हसोळकरची ही कथा आहे. ज्याने निवृत्तीनंतर मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्याच्या या निर्णयाला घरच्यांचा विरोध असून प्रत्येक जण आपल्या अस्तित्वाच्या शोधात आहेत. त्यामुळे आता त्यांची ही धडपड यशस्वी होणार का? याचे उत्तर आपल्याला येत्या काळात मिळणार आहे.

    या नाटकाच्या निमित्ताने सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव हे नवोदित कलाकार व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहेत. साई पियुष यांचे या नाटकाला संगीत लाभले असून सरीता भरत जाधव या नाटकाच्या निर्माती आहेत.

    नाटकाबद्दल दिग्दर्शक स्वप्नील जाधव म्हणतात, ” सर्वसामान्यांना भावणारी आणि हृदयाला स्पर्श करणारी ही कथा आहे. आपण नेहमीच सगळ्यांकडून कळत नकळत अपेक्षा ठेवत असतो. या अपेक्षांसोबत मेळ साधताना कुठेतरी आपण आपले अस्तित्व हरवून बसतो. अशा वेळी हे नाटक प्रत्येकाला नक्कीच सकारात्मक मार्ग दाखवणारे ठरेल. या अपेक्षांच्या गर्तेत गुरफटलेल्या अस्तित्वाचा शोध घेणारे हे नाटक, नाट्यगृहातून बाहेर पडताना प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडेल. आपल्याच घरात किंवा आपल्या आजूबाजूला घडणारी ही कथा आहे, त्यामुळे प्रेक्षक या नाटकाशी समरूप होतील. एवढं नक्की की हे भावनिक नाटक कुटुंबाशी असलेले नाते अधिक घट्ट करण्यास मदत करेल.”

  • निराळ्या संकल्पनेवर आधारित “८ दोन ७५” चित्रपट येतोय १९ जानेवारीला

    ९० हून अधिक पुरस्कारप्राप्त चित्रपट

    एका महत्त्वाच्या व संवेनशील विषयावर आधारित ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ हा अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाची मोठी चर्चा असून, देहदान ही संकल्पना आणि त्याबाबत जागृती करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे.

    उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे सुधीर कोलते, विकास हांडे, लोकेश मांगडे हे ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची पटकथा शर्वाणी – सुश्रुत यांनी लिहिली आहे, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे – विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी, अनुष्का पिंपुटकर, अक्षय मिटकल अशी चित्रपटाची दमदार स्टारकास्ट असून अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. उत्तम कलाकार, उत्तम विषय ही या चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत.

    चित्रपटाच्या नावामुळे आणि टीजर प्रदर्शित केल्यापासून चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. त्याशिवाय आजवर फ्रान्स , सर्बिया, सिंगापूर युनायटेड स्टेट्स, भूतान, यूगोस्लाव्हिया, इटली येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्स सह भारतात, पोंडेचेरी, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, मुंबई, उटी, सिक्कीम येथील चित्रपट महोत्सवांमध्ये ९० पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी या चित्रपटाने केली आहे. एका आगळ्यावेगळ्या व संवेदनशील विषयावर आधारित आहे. मात्र चित्रपटासारख्या माध्यमातून या विषयाची हाताळणी कशी केली आहे याबाबत कुतूहल आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना १९ जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

  • Disney+ Hotstar has launched the poster of the upcoming season 3 of ‘ Legends of Hanuman


    Disney+ Hotstar celebrates the grand homecoming with a powerful motion poster for season 3 of ‘Legends of Hanuman’. Following the fiery battle between the good and the evil, the timeless tale of Hanuman has lots more to tell and the third season will take the legend forward.

  • अमृता पवार करणार ‘२१७ पद्मिनी धाम’ या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण

    नाटक हा अनेक कलाकारांचा जिव्हाळ्याचा विषय. मालिका सिनेमा करत असताना सुद्धा अनेक कलाकार प्रायोगिक असो वा व्यावसायिक रंगभूमीवर आपल्या अभिनयाची परीक्षा घेतच असतात. आता पुन्हा एकदा एक अभिनेत्री व्यावसायिक रंगभूमीवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना एक गूढ अनुभव देण्यासाठी सज्ज होत असून ही अभिनेत्री म्हणजे ‘अमृता पवार’. शाळेपासून अभिनयाची कास धरून आपल्या हळूहळू प्रेक्षकांच्या मनात जागा करणारी अमृता पवार ‘२१७ पद्मिनी धाम’ या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. शाळा ते कॉलेज आणि मग मालिका असा अभिप्रेत अभिनयाचा प्रवास करणारी अभिनेत्री अमृता ही पहिल्यांदा कॆमेरासमोर आली ती म्हणजे दुहेरी या मालिकेतून, तिथून तिचा सुरु झालेला प्रवास हा आज पर्यंत कधी थांबला नाही. ‘ललित २०५’ या मालिकेतील तिने साकारलेली ‘भैरवी’ प्रेक्षकांना चांगलीच भावली. या नंतर ती स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत जिजाऊ स्वीकारताना दिसली. जिजामाताची आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी अमृताने शिवकालीन युद्ध कलेचे आणि घोडेस्वारीचे चोख प्रशिक्षण घेतलं होत. या ऐतिहासिक भूमिके नंतर अमृता जिगरबाज या मालिकेत दिसली. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत सुद्धा ती प्रमुख भूमिकेत होती. ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ या मालिकेने छोट्या पडद्यावरून एक्झीट घेतली असली तरी या मालिकेतील अमृता ने साकारलेली ‘ तानिया ‘ अनेकांच्या लक्षात आहे. मालिका विश्वात आपल्या अभिनयाने अमृताने मिळवलेल्या प्रेक्षक वर्गाला ती आता नाट्यगृहाकडे येण्यासाठी खुणावत आहे. करण भोगले निर्मित रत्नाकर मतकरी यांच्या कामगिरी कथेवर आधारित आणि संकेत पाटील दिग्दर्शित ‘२१७ पद्मिनी धाम’ या नाटकात ती पद्मिनी ची भूमिका साकारत आहे. हे पात्र या नाटकाचं मध्यवर्ती पात्र आहे. या नाटकाच कथानक ‘पद्मिनी’ मुळे घडत असत. पद्मिनी साकारणारी अमृता हीच हे पहिलं वहिलं व्यावसायिक नाटक असल तरी रंगभूमीवर काम करण्याचा अनुभव तिला आहे. रावराजेची एकुलती एक मुलगी पद्मिनी आणि मुरंजन अशा त्रिकुट भोवती या नाटकाची कथा घडत असते. पद्मिनी साकारण्यासाठी सज्ज असलेली अमृता सध्या जोमाने तालीम करत आहे. लवकरच रंगभूमीवर येणार हे ‘२१७ पद्मिनी धाम’ या नाटकाच संगीत शुभेम ढेकळे करत असून नेपथ्य संदेश बेंद्रे करत आहेत. तर नाटकांची प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असून नाटकाची सूत्र कल्पेश बाविस्कर आणि नितीन नाईक सांभाळत आहे.

    आपल्या पहिल्या व्यवसायिक नाटकाच्या पदार्पणा विषयी अधिक माहिती देताना अमृता पवार म्हणाल्या, २०१६ पासून मालिका आणि मनोरंजनसृष्टीत मी काम करतेय. पण नाटक करण्याची संधी कधी मिळाली नाही. स्वतःच्या अभिनयाची प्रगल्भता ही नाटकानेच समजून येते. आता नाटक करावं म्हणून नाटक शोधत असतानाच २१७ पद्मिनी धाम साठी विचारणा झाली. रत्नाकर मतकरीच्या कथेवरील या नाटकांच वाचन जेव्हा माझ्यासोबत करण्यात आलं त्याच्या दुसऱ्याच क्षणी मी करतेय असं मी जाहीर केलं. या नाटकाचा दिग्दर्शक संकेत पाटील नवीन आहे तो संगीत दिग्दर्शक म्हणून अनेकांना माहिती असला तरी त्याची दिग्दर्शकाची बाजू किती दृढ आहे याचा मला प्रत्यय या नाटकाच्या निमित्ताने येतोय. एकांकिका करून मोठं होत असताना एकत्र येऊन एक मोठी कलाकृती उभं करण्यासाठीची धडपड जी माझ्यात होती ती मला या माझ्या या नाटकाच्या टीम मध्ये जाणवते. नाटकाचा शुभारंभ लवकरच होईल, आणि प्रेक्षकांना गूढ मनोरंजनाचा अनुभव आम्ही देऊ हे नक्कीच.

  • For the very first time, a Bollywood film “APURVA” has it’s first look launch at the mega Ramlila, Delhi!

    Apurva On Hotstar

    In a grand event at Delhi’s prestigious Lav Kush Ramlila at Red Fort, Producers StarStudios and MuradKhetani unveiled the first look of the survival thriller Apurva. The ensemble cast, including TaraSutaria, Rajpal Yadav, and Abhishek Banerjee, along with director Nikhil Nagesh Bhat, graced the occasion. Excitingly, Apurva is set to premiere on DisneyPlusHotstar on November 15, 2023.