Home

  • ‘वॉर २’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित – ऋतिक रोशन, एनटीआर आणि कियारा अडवाणी यांचा त्रिवेणी संगम

    या वर्षातील सर्वात मोठा अ‍ॅक्शनपट

    यश राज फिल्म्सने आज वर्षातील सर्वात मोठ्या आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘वॉर २’ चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात सुपरस्टार ऋतिक रोशन, एनटीआर जूनियर आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. अ‍ॅक्शन आणि थरार यांची पराकाष्ठा दाखवणाऱ्या या ट्रेलरमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

    २५ जुलै रोजी कलाकारांच्या गौरवाच्या निमित्ताने ट्रेलर रिलीज

    भारतीय सिनेमातील दोन दिग्गज कलाकार – ऋतिक रोशन आणि एनटीआर – यांच्या २५ वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा गौरव करण्यासाठी, २५ जुलै या खास दिवशी ‘वॉर २’ चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. चाहत्यांसाठी हा एक मेजवानी ठरतो आहे.

    वाईआरएफ स्पाय युनिव्हर्सचा भाग असलेला महत्त्वाचा चित्रपट

    ‘वॉर २’ हा यश राज फिल्म्सच्या ‘वाईआरएफ स्पाय युनिव्हर्स’मधील एक महत्त्वाचा भाग आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात दोन महाशक्तीशाली व्यक्तिरेखा एकमेकांविरुद्ध भिडणार असून ही लढत प्रेक्षकांच्या मनात खोलवर ठसणारी ठरणार आहे.

    कियारा अडवाणीची प्रभावी भूमिका

    या चित्रपटात कियारा अडवाणी एका महत्त्वाच्या आणि प्रभावी महिला भूमिकेत झळकणार आहे. तिची भूमिका चित्रपटाच्या कथेला एक वेगळी दिशा देणारी आहे, असे ट्रेलरमधून दिसून येते.

    १४ ऑगस्टपासून जगभरात प्रदर्शित होणार

    ‘वॉर २’ हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अ‍ॅक्शनप्रेमी प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणी ठरणार असून, भारतीय सिनेमाच्या जागतिक पातळीवरील प्रभावाची पुन्हा एकदा साक्ष मिळणार आहे.

  • ‘वेल डन आई’मध्ये विशाखा सुभेदारची धम्माल

    १४ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

    शिकलेली किंवा अशिक्षीत, मॅाडर्न किंवा साधीभोळी, शांत किंवा तापट – कशीही असली तरी आई ही आई असते. निसर्गाने दिलेल्या पुनर्निमितीच्या वरदानामुळे आईला देवानंतरचं सर्वोच्च स्थान दिलं जातं. आजवर अनेक कवींनी आणि चित्रपट निर्मात्यांनी आईवर आधारित कलाकृती सादर केल्या, तरीही आईच्या प्रेमाची महती संपत नाही. आता त्याच भावनेला विनोदी बाज देणारा ‘वेल डन आई’ हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

    मोशन पोस्टर आणि प्रदर्शनाची घोषणा

    दीपाली प्रोडक्शन प्रस्तुत ‘वेल डन आई’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. चित्रपट १४ नोव्हेंबर रोजी राज्यभरात प्रदर्शित होणार असून, पोस्टरमध्ये चाळीच्या पार्श्वभूमीवर थम्प-अप करणारी आईच्या रूपातील विशाखा सुभेदार लक्ष वेधून घेतात. ‘वेल डन आई’ या शीर्षक गीतासह हे पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.

    विशाखा सुभेदारची आईच्या भूमिकेत धमाल

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम विनोद कलाकार विशाखा सुभेदार या चित्रपटात एका अशा आईची भूमिका साकारत आहेत, जी आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करते. मुलाच्या सुखासाठी नवऱ्याशी आणि संपूर्ण जगाशी वैर घेणारी, खानावळीत काम करत संसार चालवणारी, लहानसहान व्यवसाय करणारी ही आई म्हणजे असंख्य सामान्य आईंचं प्रतिक आहे.

    कलाकार आणि तांत्रिक बाजूचा भक्कम संच

    या चित्रपटात विशाखा सुभेदारसोबत विजय निकम, आयुष पाटील, जयवंत वाडकर, सिमरन खेडेकर, बीना सिद्धार्थ, तन्वी धुरी, विपुल खंडाळे यांच्यासारखे अनुभवी कलाकार सहभागी आहेत. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शंकर अर्चना बापू धुलगुडे यांनी केले असून, निर्मिती सुधीर पाटील यांची आहे. छायांकन रंजीत साहू, संकलन निलेश गावंड, संगीत निशाद गोलांबरे, पार्श्वसंगीत ऍग्नेल रोमन, तर गीते संदीप गचांडे यांची आहेत.

    तांत्रिक टीमची भक्कम साथ

    कलादिग्दर्शन देवेंद्र तावडे, वेशभूषा प्रतिभा गायकवाड, रंगभूषा माधव म्हापणकर, केशभूषा मयुरी बस्तावडेकर, नृत्य दिग्दर्शन चिनी चेतन, सहदिग्दर्शन मानस रेडकर यांनी जबाबदारी सांभाळली आहे. पोस्ट प्रोडक्शन आय फोकस स्टुडिओ (विजय दिनेश) यांनी केलं असून, विज्युअल प्रमोशन प्रेमांकुर बोस यांचं आहे. चित्रपटाचं वितरण सिनेपोलीस करत आहे.

    आईच्या अस्सल प्रेमाची विनोदी मांडणी

    ‘वेल डन आई’ हा चित्रपट आईच्या अस्सल प्रेमाचा विनोदी आणि भावनिक अविष्कार असून, आईच्या संघर्षातलं हास्य आणि हळवेपण प्रेक्षकांच्या मनाला भिडणार आहे. १४ नोव्हेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये पाहायला विसरू नका!

  • Mic Check & Mind Blown: Podcasters Take Center Stage on The Great Indian Kapil Show

    Interviewers Become the Interviewed

    They’re known for their sharp questions and viral interviews — but this Saturday, the mic flips. On The Great Indian Kapil Show Season 3, four of India’s most talked-about podcasters — Saurabh Dwivedi, Samdish, Kamiya Jani, and Raj Shamani — step out of their usual roles and onto Kapil Sharma’s infamous couch for a one-of-a-kind crossover episode.

    Kapil’s Quip and the Perfect Line-Up

    As always, Kapil knows how to set the tone. “Inn chaaro ne lagbhag har bade celebrity ka interview le liya hai, aur inn sabke wishlist mein ek common naam tha, toh socha ki chaaro ko ek saath mein hi bula loon!” he quips, instantly setting up the playful tension. These aren’t just guests — they’re professionals used to running the show, now in the hands of Kapil and his gang.

    Behind the Mic: Real Stories, Real Struggles

    What follows is a rare peek into the lives of these modern media voices. Saurabh and Samdish get candid about their riskiest assignments and jaw-dropping field moments. Raj Shamani dives into the backstory of how he convinced Vijay Mallya to give him an exclusive, extended interview — a feat few thought possible. Meanwhile, Kamiya Jani drops a truth bomb: when it comes to celebrities, forget controversy — the real way to their heart is through food.

    Kapil Gang Unleashes ‘Investigative Comedy’

    Just as the conversation gets deeper, the chaos begins. Krushna and Kiku, in their avatars Sona and Mona, jump into action with a hilarious “investigative comedy” segment. Their mission? To uncover the “trade secrets” of the podcasting world. Sunil Grover, as Engineer Chumbak Mittal, isn’t far behind with his loyal (yet suspiciously small) fanbase, attempting to poach the guests into his eccentric influencer world.

    Laughter Meets Perspective in the Most Unexpected Crossover

    This episode isn’t just about laughs — it’s about perspective. What happens when today’s most influential conversationalists become the conversation? It’s an episode full of insight, unpredictability, and offbeat energy. In Kapil’s world, even the most seasoned voices let their guard down… and the results are equal parts inspiring and side-splitting.

    Don’t Miss It: This Saturday, 26th July on Netflix

    Get ready for a laughter-packed ride with a serious twist as The Great Indian Kapil Show welcomes the podcasters who normally stay behind the mic. Season 3 has never been louder, wiser, or funnier.

  • अखेर नियतीने बांधली राणी-इंद्राची लग्नगाठ

    ‘सन मराठी’वरील ‘हुकुमाची राणी ही’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील कथानक सध्या अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेत विवाह विशेष भाग सुरू आहेत, याचसह राणीची लगीनघाई सुरू असलेली पाहायला मिळते.

    प्रोमोतून उलगडली नाट्यमय घटना

    राणीच्या लग्नाचे सोहळे म्हणजेच मुहूर्तमेढ, मेहंदी आणि हळदीचे विधी जल्लोषात पार पडत असतानाच एक अनपेक्षित घटना घडते. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. हळदीच्या समारंभात नकळत इंद्राची उष्टी हळद राणीला लागते.

    हुंड्यामुळे मोडलं लग्न, इंद्राचा धक्कादायक निर्णय

    मुख्य विवाह मुहूर्तावर हुंड्याच्या कारणावरून राणीचं लग्न मोडतं आणि तिच्या कुटुंबाला चारचौघात अपमान सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत, राणीच्या घरच्यांची इज्जत वाचवण्यासाठी इंद्रा स्वतः राणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतो. इंद्राच्या या निर्णयामुळे सगळ्यांना धक्का बसतो. अखेर राणी-इंद्राचं लग्न थाटात पार पडतं.

    महाडिक कुटुंब करणार राणीचा स्वीकार?

    पण इंद्राचा हा निर्णय महाडिक कुटुंबाला मान्य नाही. आता महाडिक कुटुंब राणीचा स्वीकार करतील का? राणी-इंद्राच्या नव्या नात्याची पुढील वाटचाल कशी असणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

    वैभवी चव्हाणचा नववधू म्हणून अनुभव

    मालिकेत राणी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री वैभवी चव्हाण म्हणाली, “मालिका सुरू झाल्यापासूनच राणी-इंद्रा या जोडीचा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. राणीचं लग्न ठरलं तेव्हा प्रेक्षकांचे मेसेज येऊ लागले. पण हुंडा न दिल्यामुळे राणीचं लग्न मोडतं आणि त्याच वेळी इंद्रा राणी बरोबर लग्न करायला तयार होतो. हा प्रोमो पाहून प्रेक्षकवर्ग खूप खुश झाला आहे.”

    लग्नाच्या शूटिंगदरम्यान मजामस्ती

    “प्रेक्षकांचं प्रेम पाहून काम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते. अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्यापासून पहिल्यांदा मी नवरी म्हणून बोहोल्यावर चढली आहे. खरंच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सर्व कलाकार आणि पडद्यामागील टीमला भरपूर मेहनत घ्यावी लागते. लग्नाचे भाग शूट होत असताना कामाबरोबर आम्ही सुंदर फोटोशूट करत धमाल, मस्ती केली.”

  • “वीण दोघातलीही तुटेना” : जबाबदाऱ्यांतून फुललेलं एक कोमल प्रेमकथन

    सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान – प्रथमच एकत्र झी मराठीवर

    मराठी टेलिव्हिजनच्या दुनियेत दोन अत्यंत प्रिय कलाकार – सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान – पहिल्यांदाच एका मालिकेत एकत्र झळकणार आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवर येणारी ‘वीण दोघातलीही तुटेना’ ही नवीन मालिका प्रेक्षकांसाठी ही खास भेट घेऊन येत आहे. मालिकेचा प्रोमो प्रसिद्ध होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली असून, सोशल मीडियावर चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

    प्रोमोच्या पहिल्याच झलकांनी जिंकलं प्रेक्षकांचं मन

    ‘वीण दोघातलीही तुटेना’ मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी या नव्या जोडीला भरभरून प्रेम दिलं आहे. सुबोध आणि तेजश्री यांची केमिस्ट्री, संवादांतील गहिरेपणा आणि शीर्षकातील सहज ओळख निर्माण करणारी लय – या साऱ्यांनी मालिकेबद्दलचा ओढा आणखी वाढवला आहे.

    स्वानंदी आणि समर – जबाबदाऱ्या आणि प्रेम यामधून गुंफलेली वीण

    मालिकेत तेजश्री प्रधान स्वानंदी सरपोतदार या जबाबदारीने आयुष्य जगणाऱ्या ३५ वर्षीय स्त्रीची भूमिका साकारते, जिला प्रेम आणि लग्नाच्या कल्पना सदा मागे ठेवाव्या लागल्या आहेत. दुसरीकडे सुबोध भावे समर राजवाडे या यशस्वी, परंतु मनाने अत्यंत भावुक व्यावसायिकाची भूमिका करतो. आपल्या भावंडांचं आई-वडिलांप्रमाणे संगोपन करणारा समर आणि आपल्या घरासाठी स्वतःला झिजवणारी स्वानंदी – हे दोघं नियतीनं एकत्र येतात, आणि तडजोडीतून सुरू झालेलं नातं हळूहळू समजुतीत आणि प्रेमात परिवर्तित होतं.

    कथेच्या मुळाशी प्रगल्भ लेखन आणि दिग्दर्शन

    या मालिकेचं लेखन मधुगंधा कुलकर्णी आणि मुग्धा गोडबोले यांनी केलं असून, दिग्दर्शनाची जबाबदारी चंद्रकांत गायकवाड यांनी पार पाडली आहे. पुष्पगंधा प्रोडक्शन प्रस्तुत ही मालिका जबाबदाऱ्यांच्या जाळ्यात अडकलेल्या दोन माणसांची हळुवार प्रेमकथा मांडते आणि एक नवं आयुष्य सुरू होऊ शकतं यावर विश्वास ठेवते.

    नात्यांची उब पुन्हा अनुभवण्यासाठी सज्ज व्हा

    ‘वीण दोघातलीही तुटेना’ ही मालिका केवळ एक प्रेमकथा नाही, तर प्रेक्षकांच्या मनात खोलवर असलेल्या नात्यांची ओल पुन्हा जागवणारी कथा आहे. स्व:तःला मागे ठेवून कुटुंबासाठी जगणाऱ्या व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या सहवासात नव्याने उमलतात, तेव्हा त्यांच्या आयुष्याला लाभते एक नवी, सुंदर वीण.

    ११ ऑगस्टपासून दररोज संध्या ७.३० वाजता केवळ झी मराठीवर

    हे भावनांनी भरलेलं नात्याचं प्रवासचित्र अनुभवण्यासाठी विसरू नका – ‘वीण दोघातलीही तुटेना’ ११ ऑगस्टपासून दररोज संध्याकाळी ७.३० वाजता, फक्त आपल्या झी मराठीवर.

  • अमेरिकन संसदेने घेतली ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२५’ची दखल

    मराठी संस्कृतीचा झेंडा अमेरिकेच्या संसदेत

    सॅन होजे, दि. २३ (प्रतिनिधी) : नॉर्थ अमेरिकेत मराठी चित्रपटांना लोकप्रियता मिळावी आणि आपल्या समृद्ध मराठी संस्कृतीची महती संपूर्ण अमेरिकेतील लोकांना परिचित व्हावी, यासाठी प्रसिद्ध उद्योजक आणि ‘देऊळ’ व ‘भारतीय’ या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते अभिजीत घोलप यांनी ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन’ची (नाफा) स्थापना गेल्यावर्षी केली आहे.

    अमेरिकन संसदेत मराठी महोत्सवाचे कौतुक

    कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे आयोजित होणाऱ्या या वार्षिक मराठी चित्रपट महोत्सवाची नुकतीच अमेरिकन संसदेने दखल घेतली आहे. अमेरिकेतील मराठी खासदार श्री. ठाणेदार यांनी संसदेत ‘नाफा’ महोत्सवाची आणि अभिजीत घोलप यांची माहिती देत गौरव केला. भाषणाच्या शेवटी त्यांनी “नाफा साठी या मराठी खासदाराकडून खूप खूप शुभेच्छा” असं मराठीतून म्हटलं.

    संस्कृती जपणारा सांस्कृतिक दुवा

    संसदेत बोलताना श्री. ठाणेदार म्हणाले, “मॅडम स्पीकर, ‘नाफा’ संस्थेच्या कार्यातून मराठी चित्रपट, कला आणि महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरांचे जतन होत आहे. अभिजीत घोलप हे ‘नाफा’च्या माध्यमातून महाराष्ट्र आणि नॉर्थ अमेरिकेसाठी सांस्कृतिक दुवा ठरत आहेत. या संस्थेला माझ्याकडून शुभेच्छा.”

    हॉलिवूडच्या शेजारी मराठी वैभव

    हॉलिवूडच्या बेव्हर्ली हिल्सपासून अवघ्या काही मैलांवर असलेल्या सॅन होजे येथे यावर्षी ‘नाफा’चा तीन दिवसांचा महोत्सव रंगणार आहे. मराठी आणि हॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांसह, ‘स्नोफ्लॉवर’, ‘मुक्ताई’, ‘छबीला: प्रेमाची गोष्ट २’ आणि ‘रावसाहेब’ या चित्रपटांचे वर्ल्ड प्रीमियर या महोत्सवात होणार आहेत.

    घोलप यांचा आभारपूर्वक प्रतिसाद

    “नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२५” बाबत खासदार ठाणेदार यांनी संसदेत दिलेल्या गौरवामुळे आमचा आत्मविश्वास दुणावला आहे. कॅलिफोर्नियाचे महापौर मॅट महन, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार आणि सर्व मान्यवर कलावंतांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा संस्मरणीय ठरणार आहे,” असे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनी सांगितले.

    महोत्सवाचे स्वरूप आणि आकर्षण

    २५ ते २७ जुलै २०२५ दरम्यान सॅन होजेच्या ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये हा महोत्सव पार पडणार आहे. २५ जुलैला ‘फिल्म अ‍ॅवॉर्ड्स नाईट’, तर पुढील दोन दिवस पाच मराठी चित्रपटांचे वर्ल्ड प्रीमियर शोज, १६ शॉर्ट फिल्म्स, ‘स्टुडंट्स सेक्शन’, ‘मास्टर क्लासेस’, ‘मीट अँड ग्रीट’, ‘लाईव्ह परफॉर्मन्सेस’ असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

    मराठी सेलिब्रिटींची भव्य उपस्थिती

    या महोत्सवात डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, महेश कोठारे, अश्विनी भावे, संध्या गोखले, सोनाली कुलकर्णी, गजेंद्र अहिरे, स्वप्नील जोशी, अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर यांसारख्या दिग्गज कलाकारांची उपस्थिती असणार आहे.

    महाराष्ट्र मंडळांचा सक्रीय सहभाग

    अमेरिकेतील बीएमएमच्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य ‘नाफा’ महोत्सवासाठी लाभले असून, या एकत्रित प्रयत्नातून मराठी चित्रपट आणि संस्कृतीला जागतिक व्यासपीठ मिळत आहे.

  • कोण म्हणतं संधी शोधावी लागते? अभिनेत्री किरण खोजेच्या आयुष्यानं तिला शोधलं

    स्वतःवरच्या विश्वासातून अभिनयाची वाट

    ‘हिंदी मिडीयम’, ‘सुपर ३०’, ‘लव्ह सोनिया’, ‘ज्यूस’, ‘तलवार’, ‘हंटर’, ‘तेरवं’, ‘ताजमहाल’, ‘उ उषाचा’, ‘पांढऱ्या’, ‘रुद्रम’, आणि ‘इमली’ — या चित्रपट व मालिकांमधून आपल्या ठाम आणि संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी किरण खोजे आता ‘आता थांबायचं नाय’मध्ये ‘अप्सरा’च्या भूमिकेतून पुन्हा लक्ष वेधून घेत आहे. याच चित्रपटाने तिच्या प्रवासात एक नवा महत्त्वाचा टप्पा जोडला — आणि तो प्रवास सुरू झाला होता एका शाळेच्या गॅदरिंगमधून.

    एका छोट्याशा भूमिकेने दिला मोठा आत्मविश्वास

    त्या वेळी भूमिका उरलेली नव्हती, पण रोज प्रॅक्टिसला जाणाऱ्या, एका संधीसाठी वाट पाहणाऱ्या त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बाईंनी पाहिला — आणि एका छोट्याशा पार्टमध्ये तिला घेतलं. त्या क्षणाने एका झपाटलेल्या अभिनेत्रीचा जन्म झाला. तीच मुलगी — किरण खोजे.

    NSD च्या शिक्षणानं घडवलेली अभिनेत्री

    पुण्यातील नाट्यशिबिरं, सहा अभिनय पारितोषिकं, एकपात्री सादरीकरणं, राज्य नाट्य स्पर्धा — हे सगळं करताना तिचं मन एकाच गोष्टीकडे झुकलेलं होतं: NSD. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश मिळवून, अभिनय केवळ तंत्र नाही तर तत्व आहे, हे तिनं शिकलं. ती साडेतीन वर्षं — तिनं स्वतःला, समाजाला, आणि कलाकृतीला नव्यानं समजून घेतलं.

    संघर्षातून उभारलेलं मुंबईतलं अस्तित्व

    ‘Kingdom of Dreams’मध्ये दीड वर्षाच्या कामानंतर, एरियल परफॉर्मन्स शिकून ती मुंबईत आली. इथे मात्र पहिलं वर्ष अत्यंत संघर्षाचं ठरलं. काम नव्हतं. आर्थिक अडचणी होत्या. पण वडिलांनी सांगितलेली स्थिर नोकरीची वाट सोडून किरणनं निवडलं स्वतःचं स्टेज.

    छोट्या पडद्यापासून मोठ्या चित्रपटापर्यंतचा प्रवास

    ‘मायलेकी’पासून सुरू झालेला व्यावसायिक प्रवास नंतर झपाट्यानं वाढत गेला — हिंदी-मराठी चित्रपट, टीव्ही मालिका, वर्कशॉप्स आणि आता एक बर्लिन इंडो–को-प्रॉडक्शन आंतरराष्ट्रीय चित्रपट पूर्ण करणे ही तिच्या कारकिर्दीतील नवी भर आहे.

    ‘अप्सरा’मधून पुन्हा एकदा स्वतःला रंगवत

    ‘आता थांबायचं नाय’मधील ‘अप्सरा’सारख्या भूमिकेला ती स्वतःचं बालपण मानते — “लहानपणी मी सुद्धा अप्सरेसारखीच होते, चंचल, तडफदार, आणि आतून खूप भावूक,” असं ती सांगते. दिग्दर्शक शिवराज वायचळ यांच्या या चित्रपटात, ओंकार गोखले, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, पर्ण पेठे, रोहिणी हट्टंगडी, आणि आशुतोष गोवारीकर यांसारख्या प्रतिभावान कलाकारांसोबत तिनं काम केलं आहे. BMC कर्मचाऱ्यांच्या सत्यकथेवर आधारित ही कथा माणूसपणाचा, गरिमेचा आणि लढ्याचा विजयी आवाज आहे.

    चित्रपटगृहात यशस्वी आठवडे आणि आता टेलिव्हिजनवर प्रवेश

    चित्रपटाने चित्रपटगृहात ७ आठवडे प्रेक्षकांची पसंती मिळवली असून, आता तो झी टॉकीज टेलिव्हिजनवर प्रसारित होणार आहे. किरण चा ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट रविवार, २७ जुलै — दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीजवर पाहायला मिळेल.

    ‘तेरवं’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नामांकन

    ‘तेरवं’ चित्रपटासाठी तिला महाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या नामांकनात स्थान मिळालं असून, तिचा अभिनयकौशल्याचा प्रवास कोणत्याही दिखाव्याशिवाय पुढे चालू आहे.

    कारण खरंच — आता थांबायचं नाय

    ती थांबली नाही. आजही ती शोधते आहे, रंगवते आहे, शिकते आहे… कारण खरंच — ‘आता थांबायचं नाय.’

  • पुष्कर श्रोत्री सांगतोय ‘श्श… घाबरायचं नाही’ पण…

    गूढतेच्या रंगभूमीवर पुन्हा एकदा नव्या रूपात पुष्कर श्रोत्री

    मराठी रंगभूमीने अनेक प्रयोगशीलतेचे सोनेरी पर्व पाहिले आहे. अशाच एका प्रयोगशील सादरीकरणात अभिनेता पुष्कर श्रोत्री पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांपुढे येत आहे. ‘श्श… घाबरायचं नाही’ या आगामी नाट्यप्रयोगाविषयी बोलताना त्याने प्रेक्षकांच्या मानसिकतेबद्दल आणि रंगभूमीवरील आशयघनतेविषयी महत्त्वाचे विचार मांडले.

    “मी काय वेगळं करू शकतो?” – या प्रश्नातून साकारलेलं सादरीकरण

    पुष्कर श्रोत्रीने आपल्या नाट्य कारकिर्दीत विनोदी, भावनिक, गंभीर अशा विविध छटांमध्ये अभिनय केला आहे. पण या सादरीकरणाच्या वेगळेपणाबद्दल सांगताना तो म्हणतो, “या वेळी विचार केला की मी काय वेगळं करू शकतो. मतकरींच्या गूढ साहित्याला रंगमंचावर सादर करणं ही खूप जबाबदारी आहे.” त्याच्या अभिनय कारकीर्दीतली ही एक नवी वाट असल्याचं स्पष्ट होतं.

    गूढ साहित्याचा रंगमंचीय प्रवास – मतकरींच्या कथांना नवं रूप

    ‘श्श… घाबरायचं नाही’ हे रत्नाकर मतकरी यांच्या दोन गूढ कथांचं नाट्यरूपांतर आहे. ही केवळ वाचनापुरती मर्यादित न राहता, प्रकाश, आवाज, अभिनय आणि दृश्यसंपृक्ततेच्या माध्यमातून सजीव अनुभवात रूपांतरित होते. या प्रयोगाद्वारे प्रेक्षकांना एका थरारक व अनुभूतीपूर्ण प्रवासाची अनुभूती मिळणार आहे.

    मतकरींच्या शब्दांमध्ये भय नव्हे तर अंतर्मनाशी संवाद

    रत्नाकर मतकरी हे मराठी गूढ साहित्याचे अध्वर्यू. त्यांच्या कथांमधलं गूढ भयभीत करणारं नसून, अंतर्मनात डोकावणाऱ्या प्रश्नांची मालिका असते. ‘श्श… घाबरायचं नाही’ हा प्रयोग त्यांच्या लेखनशैलीला नव्या पिढीकडे नेणारा संवेदनशील सांस्कृतिक दुवा ठरणार आहे.

    प्रेक्षकांचा बदललेला दृष्टिकोन आणि प्रयोगशीलतेची गरज

    पुष्कर श्रोत्री सांगतो की आजच्या तरुण प्रेक्षकांना सस्पेन्स, थ्रिलर, मिस्ट्री अशा जॉनरचं आकर्षण असतं. मग मराठी रंगभूमीनेही हे स्वीकारायला हवं. “मतकरींची भाषा बोलायला मिळणं हे माझं भाग्य आहे आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य,” असं तो म्हणतो.

    बदाम राजा प्रॉडक्शनच्या माध्यमातून साकारतेय नाट्यसंपदा

    या सादरीकरणाची निर्मिती ‘बदाम राजा प्रॉडक्शन’ने केली आहे. नावीन्य आणि परंपरा यांचा समतोल साधणाऱ्या या संस्थेने यापूर्वीही धाडसी प्रयोग सादर केले आहेत. ‘श्श… घाबरायचं नाही’ हे सादरीकरण त्यांच्या प्रयोगशीलतेला साजेसं उदाहरण आहे.

    ३१ जुलै २०२५ रोजी ओपेरा हाऊस येथे शुभारंभ

    ‘श्श… घाबरायचं नाही’ या नाटकाचा पहिला प्रयोग बुधवार, ३१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता मुंबईतील ओपेरा हाऊस येथे रंगणार आहे. मराठी गूढ साहित्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा प्रयोग म्हणजे एक वेगळी अनुभूती ठरणार आहे.

  • अभिनेता स्वप्निल जोशी याच्या विशेष उपस्थितीत रंगला “मुंबई लोकल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

    लोकल प्रवासात फुलणारी प्रेमाची गोष्ट “मुंबई लोकल” १ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात

    मुंबईच्या जीवनशैलीला आरसा ठरणाऱ्या लोकल ट्रेनच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘मुंबई लोकल’ हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता स्वप्निल जोशी यांच्या विशेष उपस्थितीत लाँच करण्यात आला. ‘मुंबई लोकल’ चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अभिजीत यांनी केलं असून बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, आनंदी एंटरटेनमेंट आणि स्प्लेंडिड प्रॉडक्शन्स यांनी याची निर्मिती केली आहे. निलेश राठी, प्राची राऊत, सचिन अग्रवाल आणि तन्वी माहेश्वरी हे निर्माते असून त्र्यंबक डागा हे सहनिर्माते आहेत.

    प्रेमकथेचा प्रवास सुरू होतो मुंबई लोकलच्या गर्दीतून

    या चित्रपटात प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवर झळकणार आहे. आयुष्यातील सर्व काही हरवलेल्या ‘ती’ आणि प्रत्येक लढाईत हरत असलेल्या ‘तो’ एकमेकांना मुंबई लोकलच्या प्रवासात भेटतात. त्यांच्या नजरा जुळतात, आणि तेथून सुरू होते एक प्रेमकथा. प्रवासात हिरवा सिग्नल मिळालेलं हे नातं नंतर कोणत्या वळणांवरून जातं याची उत्कंठावर्धक गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

    ट्रेलरनेच वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

    ‘मुंबई लोकल’च्या ट्रेलरमध्ये या नात्याची सुरुवात, गूढता आणि हळुवारपणा दाखवण्यात आला आहे. ट्रेलरमधून उलगडत जाणारा कथानकाचा प्रवास आणि संवादांनी निर्माण होणारी भावना प्रेक्षकांना थेट भिडते. अभिनय, लेखन, छायांकन, संगीत अशा सर्वच विभागांमध्ये हा चित्रपट प्रभावी असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होते. म्हणूनच हा चित्रपट प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    प्रभावी कलाकारांची साथ आणि तांत्रिक बाजूंचं भक्कम योगदान

    या चित्रपटात मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे हे दमदार कलाकार आपल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार आहेत. छायांकन योगेश कोळी यांचे असून, संकलन स्वप्निल जाधव यांनी केले आहे. विनोद शिंदे हे क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि डॉ. सुमित पाटील यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी राहुल ठोंबरे यांनी पार पाडली आहे.

    संगीत, गीत आणि पार्श्वसंगीत यांचा सुरेल समन्वय

    चित्रपटातील गाणी गीतकार अभिजीत कुलकर्णी आणि अभिजीत यांनी लिहिली असून, देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी आणि हर्षवर्धन वावरे यांनी संगीत दिलं आहे. पार्श्वसंगीत समीर सप्तिसकर यांनी दिलं असून, त्यातून कथानकाला एक सुस्पष्ट गती लाभली आहे. असोसिएट प्रोड्यूसर म्हणून निकुंज मालपाणी यांचं योगदान महत्त्वाचं ठरलं आहे.

    प्रेक्षकांच्या मनात घर करण्यासाठी सज्ज ‘मुंबई लोकल’

    १ ऑगस्ट रोजी ‘मुंबई लोकल’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. स्थानिक प्रवासातून उलगडणाऱ्या प्रेमकथेचा हा प्रवास प्रेक्षकांना भावेल असा विश्वास निर्मात्यांना आहे. त्यामुळे एक वेगळी प्रेमकथा अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन ‘मुंबई लोकल’ची सफर जरूर करावी.

  • पारंपरिक भक्तीला मॉडर्न बीटची जोड : अमेय डबली आणि भगवंत प्रभूंचा जादूई अनुभव

    मुंबईच्या NCPA मध्ये ‘कृष्णा – म्युझिक, ब्लिस अ‍ॅण्ड बियॉन्ड’ कार्यक्रमाची भव्यता

    मुंबईतील प्रतिष्ठित जमशेद भाभा थिएटर (NCPA) मध्ये अलीकडेच ‘कृष्णा – म्युझिक, ब्लिस अ‍ॅण्ड बियॉन्ड’ या अनोख्या भक्तिमय कार्यक्रमाचा भव्य सोहळा पार पडला. सुप्रसिद्ध गायक अमेय डबली यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांच्या मनात गोड, आत्मिक ठसा उमटवला. देशभरातील ११ शहरांमध्ये आयोजित या दौऱ्याचा मुंबईतील हा भाग होता, आणि विशेष म्हणजे दोन्ही शो हाऊसफुल्ल ठरले.

    प्रेक्षकांच्या मनात खोलवर भिनलेली भक्तीची उत्सवी अनुभूती

    लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला. पारंपरिक भक्तीगीतांना आधुनिक साज चढवून त्यात नवचैतन्य ओतणाऱ्या या संध्याकाळी सगळीकडे टाळ्यांचा गजर, तालावर ठेका आणि भक्तीत न्हालेली अनुभूती होती. संगीत, कथाकथन आणि संवाद यांच्या माध्यमातून अमेय डबली यांनी एक अखंड आध्यात्मिक उत्सव घडवून आणला.

    भगवंत प्रभूंचा आधुनिक रॅप – नव्या भक्तीची नवी दिशा

    या कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरले भारतातील सर्वात तरुण आध्यात्मिक इन्फ्लुएंसर भगवंत भागवत प्रभू. त्यांनी भगवद्गीतेवर आधारित जोशपूर्ण रॅप सादर करत प्रेक्षकांना थक्क करून सोडलं. भक्ती म्हणजे गंभीर, पारंपरिक आणि एकसुरी असे रूढ विचार धुडकावून लावत त्यांनी सिध्द केलं की भक्ती मॉडर्न, स्टायलिश आणि हृदयस्पर्शी देखील असू शकते.

    अमेय डबली यांची भावस्पर्शी भावना आणि प्रेरणा

    अमेय डबली म्हणाले, “या संकल्पनेचा उद्देशच हा आहे की भारतात भक्तीला ‘कूल’ म्हणून स्वीकारलं जावं. भक्ती म्हणजे केवळ ध्यानधारणा नव्हे, तर आनंदाने भरलेली ऊर्जा आहे. जेव्हा मी एखाद्या लहानग्याला भक्तीत रमताना पाहतो, तेव्हा त्याच्यात मला कृष्णाचं दर्शन घडतं.” त्यांची ही भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी संगीत, अनुभव आणि भक्ती यांचे त्रिसूत्री माध्यम वापरले.

    एक गायक नव्हे तर संपूर्ण आध्यात्मिक अनुभव

    ‘कृष्णा – म्युझिक, ब्लिस अ‍ॅण्ड बियॉन्ड’ हा कार्यक्रम केवळ एक संगीतशृंखला नव्हे, तर आत्म्याला भिडणारा अनुभव होता. अमेय डबली यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की ते गायक म्हणूनच नव्हे, तर संपूर्ण आध्यात्मिक अनुभूती घडवणाऱ्या कलाकार म्हणूनही लक्षात राहतात. त्यांच्या सादरीकरणातून श्रोत्यांना केवळ भक्ती नव्हे, तर अंतर्मनातला दिव्य प्रकाश अनुभवता आला.