
-
कान्स महोत्सवात पोहोचला ‘खालिद का शिवाजी’; अमेरिकन नागरिक मायकेल थेवर यांचा सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर

मुंबई / प्रतिनिधी
अमेरिकेत स्थायिक असलेले आणि मूळचे तामिळ भाषिक असलेले निर्माता मायकेल थेवर यांच्या ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाची निवड थेट फ्रान्सच्या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवासाठी झाली आहे. येत्या १३ मेपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात ‘खालिद का शिवाजी’ हा सिनेमा जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे.शिवाजी महाराजांचा वेगळा पैलू अधोरेखित करणारी निर्मिती
छत्रपती शिवाजी महाराजांचा एक वेगळा सामाजिक, आध्यात्मिक आणि वैचारिक पैलू उलगडणारा ‘खालिद का शिवाजी’ हा सिनेमा यापूर्वी अजंता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवडला गेला होता. तिथे परीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेला हा सिनेमा आता थेट जागतिक पातळीवर पोहोचत आहे.
मायकेल थेवर यांचा संघर्षमय प्रवास
मायकेल थेवर मूळचे तामिळ भाषिक असून ९० च्या दशकात शिक्षणासाठी मुंबईत आले. निर्मला निकेतन आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथून त्यांनी समाजकार्य आणि सामाजिक अभ्यासाचे शिक्षण घेतले. शिक्षण घेत असताना त्यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात सामाजिक संस्थांमध्ये कार्य केलं. त्या काळात त्यांना केवळ आर्थिक अडचणींचा नाही तर सांस्कृतिक संघर्षांचाही सामना करावा लागला.
अमेरिकेतील यशस्वी उद्योग आणि सामाजिक जाण
पुढे मायकेल आणि त्यांची पत्नी सुषमा गणवीर अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी ओमनी सर्व्हिसेस नावाची वैद्यकीय क्षेत्रातील कंपनी सुरू केली. आज ते यशस्वी उद्योजक आहेत. आपल्या मराठी शिक्षण आणि समाजाचे उपकार लक्षात ठेवून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा निर्माण करण्याचा निर्णय घेतला. सुषमा गणवीर या या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत.
ग्रामीण कलाकारांना दिली संधी, राज मोरे यांचे दिग्दर्शन

‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे दिग्दर्शन राज मोरे यांनी केलं असून प्रसिद्ध अभिनेते गणेश अनासपुरे प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटात ग्रामीण भागातील अनेक नवोदित कलाकारांना देखील संधी देण्यात आली आहे. सध्या हा सिनेमा कान्स महोत्सवामुळे चर्चेत असून जागतिक चित्रपटप्रेमींमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची जागतिक ओळख अधोरेखित करणारा ‘खालिद का शिवाजी’ हा सिनेमा लवकरच सर्वांसमोर येणार आहे.
-
‘पी.एस.आय. अर्जुन’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित — वर्दीतील अंकुश चौधरीची ॲक्शनपॅक्ड एंट्री!

अंकुश चौधरीचा डॅशिंग वर्दीतील अंदाज
बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘पी.एस.आय. अर्जुन’ चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्राचा ‘स्टाईल आयकॉन’ अंकुश चौधरी याचा फुल ॲक्शन लूक आणि कमाल डायलॉग्स यामुळे प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता होती. ट्रेलर लाँचचा भव्य सोहळा नवापूर पोलीस स्टेशनच्या रिक्रिएटेड सेटवर पार पडला, जिथे अंकुशला बेड्यांसह जेलमध्ये आणत पोलिसांची एंट्री सादर करण्यात आली.
ट्रेलरमधील रहस्य आणि थरार
ट्रेलरमध्ये अंकुशची व्यक्तिरेखा पोलिस आहे की चोर? हा संभ्रम निर्माण करणारा आहे. ॲक्शन, रोमान्स, सस्पेन्स आणि थराराने भरलेला हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये कथा जाणून घेण्यासाठी उत्सुकता वाढली आहे. ट्रेलरमध्ये बिनधास्त डायलॉग्स आणि भेदक सीन्स यामुळे चित्रपटाची झलक अधिक प्रभावी वाटते.
दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे विचार

दिग्दर्शक भूषण पटेल म्हणतात, “मराठी प्रेक्षकांसाठी काहीतरी दमदार करायचं होतं. अंकुश चौधरीसारखा स्टार, सशक्त कथा आणि ताकदीची टीम यामुळे ‘पीएसआय अर्जुन’ हे परिपूर्ण मनोरंजन आहे.”
तर निर्माता विक्रम शंकर म्हणतात, “ट्रेलर लाँच जेलमध्ये करण्याचा प्रयोग खूप वेगळा ठरला. डायलॉग्स आणि गाण्यांना मिळणारा प्रतिसाद आम्हाला प्रेरणा देतो आहे.”भक्कम स्टारकास्ट आणि जबरदस्त टीम
या चित्रपटात अंकुश चौधरीसोबत किशोर कदम, राजेंद्र शिसटकर, नंदू माधव, कमलाकर सातपुते आणि अक्षया हिंदळकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
दिग्दर्शक भूषण पटेल, निर्माते विक्रम शंकर आणि ध्रुव दास, प्रस्तुतकर्ता व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा आणि ड्रीमविव्हर एंटरटेनमेंट.‘पी.एस.आय. अर्जुन’ चित्रपट ९ मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हे सिनेमॅटिक ॲक्शन आणि सस्पेन्सचं परिपूर्ण पॅकेज असल्याने यावर्षीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ठरणार आहे, यात शंका नाही. -
महाराष्ट्र दिनानिमित्त ‘Vision for Maharashtra 2047’ या उपक्रमाच्या माध्यमातून नवतरुणांना पुढच्या महाराष्ट्राच्या घडणीत सहभागी होण्याचे आवाहन

ठाणे, १ मे २०२५ :
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अर्पण फाउंडेशन आणि सेवा और सहयोग या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने “Vision for Maharashtra 2047” हा विचारप्रवर्तक उपक्रम प्लॅनेट हॉलिवूड, ठाणे येथे यशस्वीरित्या पार पडला.
या उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्राच्या पुढील दोन दशकांच्या विकासासाठी नव्या पिढीतील विचारवंत, उद्योजक, आणि बदल घडवणाऱ्या नेतृत्वाला एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हाच होता.या कार्यक्रमाचे आयोजन हिरानंदानी इस्टेटचे माजी नगरसेवक आणि भाजप ठाणे शहरातील माजी नगरसेवक गटनेते श्री. मनोहर डुंबरे आणि पुरस्कारप्राप्त NGO सेवा और सहयोगचे संस्थापक तसेच ठाण्यातील तरुण आणि गतिमान नेता श्री. आदित्य चौहान यांनी केले. आदित्य यांना CRISIL, NewsX, महाराष्ट्र क्षत्रिय समाज यांच्यासह अनेक संस्थांनी सन्मानित केले असून, याच उपक्रमाची संकल्पना त्यांच्या नेतृत्वातून साकारली गेली.
या उपक्रमाला अर्पण फाउंडेशनच्या आधारस्तंभ भावना डुंबरे यांचेही मोलाचे योगदान लाभले.बबल कम्युनिकेशनच्या डायरेक्टर आरती नोतियाल यांनी कार्यक्रमाच्या दृष्टीकोनाशी स्वतःची बांधिलकी जपताना या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. २०११ मध्ये त्यांनी प्रसिद्ध जाहिरातपटू प्रल्हाद कक्कर यांच्या सोबत बबलची सह-स्थापना केली होती.
या कार्यक्रमात शिक्षण, शाश्वत विकास, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, आरोग्य आणि सर्वसमावेशक प्रगती या विषयांवर युवा सहभागींकडून नवीन कल्पनांची मांडणी झाली. निवडक सादरीकरणांची झलक देण्यात आली, ज्यामुळे महाराष्ट्राच्या भविष्यातील विकासावर उत्तम संवाद घडला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी मान्यवर व्यक्तींनी उपस्थित राहून तरुणांना प्रेरणा दिली. उपस्थित मान्यवरांमध्ये होते —
कृपाशंकर सिंह (माजी गृह मंत्री, महाराष्ट्र), निरंजन डावखरे (MLC), संदीप लेले (भाजप महाराष्ट्र सचिव) आणि संजय वाघुले (ठाणे भाजप अध्यक्ष).
त्यांच्या उपस्थितीमुळे सामाजिक सहभाग, नेतृत्व विकास आणि सामूहिक कृतीचे महत्त्व अधोरेखित झाले.श्री. मनोहर डुंबरे यांनी आपल्या भाषणात सांगितले —
“महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आपली तरुण पिढी सक्षम करणे ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. अशा उपक्रमातून कल्पनांना कृतीत रूपांतरित होण्याची ठिणगी पेटते.”आदित्य चौहान म्हणाले —
“हा कार्यक्रम केवळ भविष्याची कल्पना करण्यासाठी नाही, तर ते सामूहिकपणे घडवण्यासाठी आहे. ‘महाराष्ट्र 2047’ या तरुणांच्या हातात आहे आणि आजचे विचार उद्याचं वास्तव ठरवू शकतात.”कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांची विचारमंचावर उपस्थिती विशेष ठरली.
पत्रकार संजय सिंग यांनी सामाजिक बदलावर भाष्य केले, शरन बाबानी (सतगुरु बिल्डर्सचे संचालक) यांनी पायाभूत विकासावर, डॉ. चिनू क्वात्रा (खुशियाँ फाउंडेशनचे संस्थापक) यांनी पर्यावरण आणि शाश्वततेवर, विनोद टिकमानी (V.L. Tikmani and Associates) यांनी उद्योजकतेवर, अभिनेत्री गौरी टोंक यांनी सकारात्मक प्रभावाच्या वापराबाबत, विशाल आनंद (बजाज इलेक्ट्रिकल्सचे हेड ऑफ एक्स्पोर्ट्स) यांनी इनोव्हेशन व व्यापारावर, आणि डॉ. प्रबोध हळदे (खाद्यतज्ज्ञ) यांनी आरोग्य आणि पोषण या विषयांवर विचार मांडले.युवांमध्ये सामाजिक जाणीव जागवणाऱ्या आणि कम्युनिटी एंगेजमेंटसाठी सन्मानित केलेल्या प्रभावशाली व्यक्तींमध्ये होते —
सुशील नवाडकर, साहिल कदम, अंजुरी सिन्हा, दिशा पाटील आणि सिमरन शर्मा.
या सर्वांनी आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरून सकारात्मक बदल घडवण्यासाठी भरीव कामगिरी केली आहे.बबल कम्युनिकेशनने या कार्यक्रमासाठी अधिकृत मीडिया आणि इन्फ्लुएन्सर पार्टनर म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. प्लॅटफॉर्म्सवर कार्यक्रमाचा प्रभाव वाढवणे, तरुण सहभाग आणि नागरिकीय संवाद उभा करणे हे सर्व त्यांनी उत्कृष्टपणे साध्य केले.
2RUE आणि Planet Hollywood हे या उपक्रमाचे प्रायोजक होते — आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने तरुणाईची उर्जा, सार्वजनिक नेतृत्व आणि दूरदृष्टी यांचा सुरेख संगम इथे पाहायला मिळाला.कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भव्य चौहान यांनी अत्यंत उत्साही आणि आकर्षक शैलीत केलं, ज्यामुळे सादरीकरणं आणि चर्चा यांना एक सुसंगत दिशा मिळाली आणि उपस्थितांची उत्सुकता शेवटपर्यंत कायम राहिली.
Vision for Maharashtra 2047 या उपक्रमाने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राजकीय, सामाजिक, तांत्रिक, आरोग्य, रिअल इस्टेट, स्टार्टअप्स आणि पर्यावरण क्षेत्रातील विचारवंतांना एकत्र आणून महाराष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी एक प्रेरणादायी विचारमंच उभारला.
-
‘महाराष्ट्र दिनी’ सन मराठी वाहिनीचा अर्थपूर्ण बदल!

१ मे पासून वाहिनीच्या लोगोमध्ये बदल, प्रगतीशील महाराष्ट्राला मानवंदनासंयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या १०५ हुतात्म्यांना अभिवादन करत, महाराष्ट्राच्या ६५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ‘सन मराठी’ वाहिनीने एक महत्त्वाचं आणि भावनिक पाऊल उचललं आहे. १ मे २०२५ पासून या वाहिनीच्या लोगोच्या ठिकाणी बदल करण्यात येणार असून, तो TV पडद्याच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात झळकणार आहे.
‘आनंदाने मान उंचावूया’ हे ब्रीद वाक्य जपणाऱ्या ‘सन मराठी’ने वाहिनीच्या नव्या ओळखीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रगतीशीलतेला आणि सांस्कृतिक वैभवाला सलाम केला आहे.
वाहिनीवरील मालिकांपासून ते विशेष कार्यक्रमांपर्यंतची विविधता जशी प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे, तशीच या नव्या बदलालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वास वाहिनीने व्यक्त केला आहे. -
“चाल तुरु तुरु” म्हणत बिग बॉस नंतर अभिजीत सावंत घेऊन येतोय एक नवं सुरम्य गाणं!

२० वर्षांच्या संगीत प्रवासानंतर जुन्या आठवणींना नव्याने उजाळा
तरुणाईच्या मनात घर करून असलेला आणि ‘इंडियन आयडल’ ते ‘बिग बॉस’ पर्यंतच्या प्रवासात रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारा गायक अभिजीत सावंत पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसाठी खास गाणं घेऊन येतोय. अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर “चाल तुरु तुरु” या गाजलेल्या गाण्याचं खास नवीन व्हर्जन अभिजीतने जाहीर केलं असून हे गाणं २ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
जुनं गाणं, नव्या शैलीत – हटके ट्वीस्टसह!
‘चाल तुरु तुरु’ हे गाणं मराठी रसिकांच्या आठवणींमध्ये खोलवर रूजलेलं. आता याच गाण्याला एक आधुनिक स्पर्श देत, अभिजीतने आपल्या आवाजात नव्या युगाला साजेसं रूप दिलं आहे. जुन्या चालींचा आत्मा राखून, आधुनिक संगीतसज्जतेने ते अधिक आकर्षक करण्यात आलं आहे.२० वर्षांचा संगीतमय प्रवास आणि नवे प्रयोग
अभिजीतसाठी २०२५ हे वर्ष खास आहे – कारण त्याच्या संगीत प्रवासाला यंदा २० वर्षं पूर्ण होत आहेत. या प्रवासाला अभिवादन म्हणून आणि चाहत्यांच्या प्रेमाला उत्तर म्हणून त्याने हे गाणं सादर केलं आहे. जुन्या आठवणींना उजाळा देत, नवे रंग भरताना अभिजीतने पुन्हा एकदा दाखवून दिलं की तो केवळ स्पर्धेचा विजेता नाही तर श्रोत्यांच्या हृदयाचा राजा आहे.प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला

बिग बॉस नंतर अभिजीतने काय नवं घेऊन येणार याची उत्सुकता होतीच – आणि आता या नव्या गाण्याच्या निमित्ताने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ‘चाल तुरु तुरु’च्या नव्या व्हर्जनने प्रेक्षकांच्या अपेक्षा कशा पूर्ण होतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
नव्या पिढीसाठी जुनी गाणी नव्याने जिवंत
जुन्या पिढीच्या आठवणी आणि नव्या पिढीच्या अपेक्षा यांना एकत्र आणत अभिजीतने हे गाणं नव्या स्वरूपात पुन्हा जिवंत केलं आहे. सादरीकरण, संगीत आणि व्हिज्युअल्स – सर्व काही हटके आणि मोहक ठरणार आहे, असा विश्वास अभिजीतने व्यक्त केला आहे.२ मे रोजी हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तेव्हा लक्षात ठेवा – “चाल तुरु तुरु” म्हणत येतोय अभिजीत सावंत — जुन्या आठवणींसोबत नव्या उत्साहाचा सुरावटीचा उत्सव साजरा करायला! -
‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा रंजक टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपटांनी कथानक, सादरीकरण आणि आशय यामध्ये सातत्याने नवे प्रयोग केले आहेत. ‘आतली बातमी फुटली’ या नव्या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून, रहस्य, विनोद आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली कथा यातून उलगडण्याची झलक प्रेक्षकांना मिळाली आहे.
सिद्धार्थ जाधव, मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टगंडी यांची पहिलीच जुगलबंदी
या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टगंडी यांसारखे अनुभवी आणि लोकप्रिय कलाकार एकत्र झळकणार आहेत. त्यांच्या अभिनयातून तयार होणारी धमाल आणि रहस्यांची गुंफण ही प्रेक्षकांसाठी मोठी आकर्षण ठरणार आहे.
‘खूनाची सुपारी’ आणि कोसळणाऱ्या बातम्यांच्या गदारोळात रंगणार कथानक
‘आतली बातमी फुटली’ हा चित्रपट एका खूनाच्या सुपारीभोवती फिरणारा कॉमेडी-थ्रिलर असून, त्यात ये.णारे गोंधळ, विचित्र प्रसंग आणि चटकदार ट्विस्ट हे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहेत. टिझरमधूनच या सगळ्याची हलकीशी झलक प्रेक्षकांना मिळाली आहे.
तगडी स्टारकास्ट आणि कसदार टीम

या चित्रपटात विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे आणि त्रिशा ठोसर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या कलाकारांच्या अभिनयाचा मेळ आणि मोकळा विनोद प्रेक्षकांना नक्कीच भावणार आहे.
६ जूनपासून मोठ्या पडद्यावर धमाका
दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि लेखक जैनेश इजरदार यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘आतली बातमी फुटली’ हा चित्रपट ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वीजी फिल्म्स प्रस्तुत आणि ग्रीष्मा अडवाणी निर्मित या चित्रपटाचे वितरण फिल्मास्त्र स्टुडिओज करणार आहेत.
प्रेक्षकांना रहस्य, विनोद आणि चपखल अभिनय यांचं भन्नाट मिश्रण अनुभवायला मिळणार आहे — आणि हे सगळं ‘आतली बातमी फुटली’मध्ये!
-
आ. आशिष शेलार, सचिन पिळगांवकर, जॉनी लिव्हर, भरत जाधव आणि अनेक कलाकारांच्या उपस्थितीत ‘अशी ही जमवा जमवी’ ची स्टार-स्टडेड संध्याकाळ

प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या चित्रपटाचं विशेष स्क्रिनिंग
‘अशी ही जमवा जमवी’ या कौटुंबिक आणि हलक्याफुलक्या विनोदांनी परिपूर्ण चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सहज संवाद, दिलखुलास अभिनय आणि भावस्पर्शी कथानकामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीने सजलेला भव्य सोहळा
या चित्रपटाचं विशेष स्क्रिनिंग नुकतंच मुंबईत पार पडलं, ज्यात मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती होती. यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आ. आशिष शेलार यांनी उपस्थित राहून चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आणि मनमोकळा संवाद साधला. याशिवाय ज्येष्ठ निर्माता किरण शांताराम यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला.
चित्रपटाच्या टीमला मिळाल्या सेलिब्रिटींच्या शुभेच्छा
या विशेष प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, वंदना गुप्ते, प्रसिद्ध विनोदवीर जॉनी लिव्हर, सचिन पिळगांवकर, भरत जाधव, सुनील बर्वे, ओमकार कुलकर्णी, चैत्राली गुप्ते, तनिष्का विशे आणि संगीतकार अमितराज यांनीही उपस्थिती लावली. सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे स्क्रिनिंगचे वातावरण उत्साही आणि आनंददायक झाले.
पहिल्या निर्मितीतून भावनिक आणि मनोरंजक सादरीकरण
‘अशी ही जमवा जमवी’ हा चित्रपट राजकमल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली प्रदर्शित झाला असून व्ही. शांताराम यांचे नातू राहुल शांताराम यांची ही पहिली निर्मिती आहे. लोकेश गुप्ते दिग्दर्शित या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात उबदार जागा मिळवली असून, कौटुंबिक चित्रपटप्रेमींना भावणारी ही कलाकृती ठरली आहे.
-
शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ चित्रपटातील “आभाळ रातीला” या नवीन गाण्याने रसिकांच्या हृदयाला दिला नवा स्पर्श

प्रेमभावना आणि मराठी परंपरेचं सुरेल मिश्रण
‘सजना’ या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटातील “आभाळ रातीला” हे नवीन गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. प्रेम, नाते आणि भावनांच्या सुरेल गुंफणीसह हे गाणं प्रेमभावनेचा अनुभव सूर आणि शब्दांतून व्यक्त करतं.
परंपरा, ढोलताशा आणि मराठी अस्मितेचा उत्सव
‘आभाळ रातीला’ गाणं हे केवळ एक रोमँटिक गीत नसून मराठी संस्कृतीच्या वैभवाचा जल्लोष आहे. ढोल-ताशांचा गगनभेदी नाद, लेझीमच्या तालावर थिरकणारी तरुणाई, आणि देवीच्या मंगल स्तुतीचा एकत्रित अनुभव प्रेक्षकांना एका धार्मिक व सांस्कृतिक उंचीवर घेऊन जातो.
भव्य चित्रीकरण आणि दृश्यांचा नयनरम्य अनुभव
गाण्याचं चित्रीकरण मोठ्या मिरवणुकीत, आकर्षक पारंपरिक पोशाखात आणि लोभस नृत्य रचना असलेल्या दृश्यांमध्ये केलं गेलं आहे. गाण्यात प्रत्येक फ्रेम ही मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करताना दिसते.
कलात्मक टीमची सर्जनशील मेहनत
गाण्याचे बोल सुहास मुंडे यांनी लिहिले असून, संगीतकार म्हणून ओंकारस्वरूप यांचं संगीत गाण्याला भावनिक ताकद देतं. आदर्श शिंदे आणि राजेश्वरी पवार यांचे आवाज ‘आभाळ रातीला’ मध्ये भावनांचा उत्कट प्रवास घडवतात.
२३ मेपासून सजना तुमचं मन जिंकायला सज्ज
‘सजना’ चित्रपट हा शशिकांत धोत्रे यांचा रोमँटिक सिनेमा असून, कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी स्वतः पार पाडल्या आहेत. २३ मे २०२५ पासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘आभाळ रातीला’ या गाण्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
-
‘हुकुमाची राणी ही’ मालिकेतील राणीने ‘असा’ साजरा केला कामगार दिन

कामगार दिनाच्या निमित्ताने मालिकेत विशेष एपिसोड
‘सन मराठी’वरील ‘हुकुमाची राणी ही’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील राणी आणि इंद्रजीत ही नवीन जोडी प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसत आहे. या मालिकेत यंदा कामगार दिनाचा विशेष भाग साजरा करण्यात येत असून मालिकेच्या कथानकातही या दिवशीला महत्त्व दिलं आहे.
जयसिंगराव महाडिकचा इंद्रजीतसाठी खास प्रयोग
मालिकेत इंद्रजीतचे वडील जयसिंगराव महाडिक इंद्रजीतला कामगारांच्या खऱ्या जीवनाची ओळख करून देण्यासाठी त्याला नकळतपणे कामगार वस्तीत घेऊन जातात. तिथल्या वास्तवामुळे इंद्रजीत गोंधळतो. याचवेळी राणी त्याच्यावर कामगारांसोबत कामगार दिन साजरा करण्यासाठी आग्रह करते. आता इंद्रजीत राणीच्या इच्छेला मान देतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
खऱ्या फॅक्टरीमध्ये कामगारांसोबत साजरा झाला दिवस
मालिकेचं शूटिंग साताऱ्यातील एका प्रत्यक्ष फॅक्टरीमध्ये सुरु आहे. १ मे रोजी त्या फॅक्टरीतील प्रत्यक्ष कामगारांसोबत राणी म्हणजे वैभवी चव्हाणने संवाद साधला. गप्पा मारल्या आणि त्यांच्या आयुष्याचा अनुभव घेतला. याविषयी वैभवी म्हणते, “खऱ्या कामगारांसोबत हा दिवस साजरा करणं ही माझ्यासाठी भावनिक गोष्ट होती. त्यांच्या कष्टांना सलाम करताना मला राणीची भूमिका अधिक चपखल कशी साकारता येईल याची जाणीव झाली.”
इंद्रजीतची भूमिका साकारणाऱ्या अक्षय पाटीलची भावनिक भावना
अभिनेता अक्षय पाटील म्हणतो, “आज आम्ही कलाकार समोर दिसतो, पण आमच्यामागे उभा असतो तो एक मोठा टीमचा आधार. विशेषतः आमचे स्पॉट दादा – दिलीप मामा, जे प्रत्येक क्षणी आमच्यासाठी तत्पर असतात. त्यांच्या मेहनतीला आजच्या दिवशी मान दिला गेला हे खूप समाधानाचं आहे.”
कामगार दिनाच्या निमित्ताने मालिकेतून दिला एक हृदयस्पर्शी संदेश
‘हुकुमाची राणी ही’ या मालिकेतून यानिमित्ताने कामगारांच्या कष्टाला मान्यता देण्याचा आणि त्यांच्या महत्त्वाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे विशेष एपिसोड प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करतील, अशी अपेक्षा आहे.
-
TENALI RAMA FAME PRIYAMVADA KANT: A TRULY VERSATILE ICON WINS TWO PRESTIGIOUS OTT RISING STAR AWARDS

A Double Win That Marks a Milestone
Priyamvada Kant, the dynamic and multi-talented actress known for her standout performances across television and OTT platforms, has achieved a remarkable feat — winning two coveted OTT Rising Star Awards in the same month. This dual recognition not only affirms her versatility but also cements her position as a prominent and rising force in the Indian entertainment industry.Recognized by Two Esteemed Platforms
Her first accolade came from Adgully’s Women Disruptors OTT Rising Star Award, which honors pioneering women in digital entertainment. This was followed swiftly by the Times Applaud OTT Rising Star Award, which she received from the celebrated actress Divya Dutta — adding a touch of cinematic elegance to the honor. These recognitions celebrate her ever-expanding impact and the strong connection she has established with both viewers and critics alike.A Flourishing Career in the Spotlight
Priyamvada’s journey in the industry began over a decade ago, with her debut role as Kaumudi in Colors TV’s Bairi Piya (2010). Since then, she has captivated audiences with powerful performances in shows like Tenali Rama, Kullfi Kumarr Bajewala, Santoshi Maa, Naagin, Yeh Rishta Kya Kehlata Hai, and Tera Mera Saath Rahe. She also starred in Peechha Karti Parchhaiyaa, a Cineplay on ZEE5 with legends Ila Arun and KK Raina.From Reality TV to OTT Stardom
Her popularity soared after she won MTV Splitsvilla 12, making her a beloved face among younger audiences. Today, she continues to ride that momentum with critically acclaimed roles on OTT platforms. As the lead character Sharda in Tenali Rama, and her roles in Chaahatein (ZEE5), Kill Dil (Amazon MX Player), and Bada Naam Karenge (Sony LIV), she showcases a wide emotional range and consistent screen charisma.An Artist Driven by Passion and Purpose
Speaking about her back-to-back wins, Priyamvada expressed heartfelt gratitude: “I’m overwhelmed with gratitude for these awards, and I believe they’re a testament to the love and support of my fans and the trust placed in me by the industry.” She added, “As an artist, I’m constantly inspired by the diversity of roles I get to play, and I’m excited to continue pushing boundaries and exploring new horizons in my career.”A Promising Path Ahead
With an impressive portfolio and a growing presence in both mainstream and digital media, Priyamvada Kant is carving out a distinctive space for herself in the entertainment landscape. As she continues to embrace challenging roles and new formats, she stands tall as one of the most promising and dynamic performers in Indian entertainment today.
