Home

  • मराठी चित्रपटाचा सुपरस्टार स्वप्नील जोशी आता दिसणार या गुजराती चित्रपटात !

    गुजराती सिनेमा मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशी याच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे आणि कारण म्हणजे तो 2025 मध्ये रिलीज होणाऱ्या एका अत्यंत अपेक्षित चित्रपटाद्वारे गुजराती चित्रपट इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. “शुभचिंतक” अस या चित्रपटाचं नाव आहे.  त्याच्या अपवादात्मक अभिनय पराक्रमासाठी आणि अष्टपैलुत्वासाठी ओळखला जाणारा स्वप्नील गुजराती प्रेक्षकांना आश्चर्यचकित नक्कीच करणार आहे. तो कायम अनपेक्षित आणि ग्राउंडब्रेकिंग दोन्ही भूमिका अगदी उत्तमपणे साकारतो यात शंका नाही. या चित्रपटात स्वप्नील सोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री मानसी पारेख देखील मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय.

    2024 वर्षात स्वप्नील ने बॅक टू बॅक चित्रपट करून प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन केलं आहे आहे प्रेक्षकांना स्वप्नील येणाऱ्या वर्षात एका नव्या कोऱ्या गुजराती चित्रपटात दिसणार आहे. स्वप्नील गुजराती चित्रपटात विश्वात पदार्पण करतोय ही मराठी चित्रपटसृष्टी साठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. वैविध्यपूर्ण भूमिकाच्या सोबतीने बहुभाषिक चित्रपट करण्याकडे नेहमीच स्वप्नीलचा कल असतो आणि आता तो त्याचा पहिला वहिला गुजराती चित्रपट करण्यासाठी सज्ज आहे.

    शुभचिंतक या गुजराती चित्रपटात स्वप्नीलची एन्ट्री !

    या रोमांचक आणि कमाल प्रकल्पाची निर्मिती पार्थिव गोहिल आणि मानसी पारेख त्यांच्या सोल सूत्र या बॅनरखाली करत असून गोलकेरी, कच्छ एक्स्प्रेस आणि झामकुडी या गाजलेल्या हिट चित्रपटांनंतर त्यांची ही चौथी निर्मिती असणार आहे. निसर्ग वैद्य दिग्दर्शित, ज्यांनी यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते सिद्धार्थ रांदेरियासोबत गुजराती चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते ते हा चित्रपट एक डार्क कॉमेडी थ्रिलर असल्याचं सांगतात.

    या पहिल्या वहिल्या गुजराती चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त करताना स्वप्नील म्हणाला “गुजराती चित्रपट उद्योग वेगाने विकसित होत आहे आणि वैविध्यपूर्ण विषयांची निर्मिती करत आहे जी दूरवरच्या प्रेक्षकांना ऐकू येते आहे. सिनेमाची जादू सार्वत्रिक असावी यावर माझा नेहमीच विश्वास आहे. एक कलाकार म्हणून ही संधी माझ्यासाठी नक्कीच खास आहे आणि गुजराती चित्रपट विश्वात काहीतरी वेगळं निमित्तानं करायला मिळतंय याचा आनंद आहे. मी नेहमीच मानसीची एक अभिनेत्री म्हणून प्रशंसा केली आहे आणि तिच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा पूर्ण होत आहे. या भूमिकेने मला नक्कीच आव्हान दिल आहे आणि ही भूमिका साकारण्यासाठी मी उस्तुक आहे”

    या आगामी चित्रपटाची मुख्य अभिनेत्री-निर्माती मानसी पारेख पुढे म्हणाली, “स्वप्नील या चित्रपटात ऑनबोर्ड  झाला आहे याचा आम्हाला सगळ्यांना आनंद झाला आहे. स्वप्नील सोबत स्क्रीन स्पेस शेअर करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. आम्ही लुक टेस्ट आणि वर्कशॉपसाठी आधीच भेटलो आहोत आमच्या सुरुवातीच्या नोट्सची देवाणघेवाण केली आणि आता कधी एकदा रोल होतोय याची वाट पाहत आहोत.

    मराठी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार स्वप्नील आता गुजराती चित्रपट विश्वात दमदार पाऊल ठेवून कमालीचा अभिनय करणार आहे यात शंका नाही ! स्वप्नीलने चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील आपल्या अविस्मरणीय कामगिरीने कायम प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन केले आहे आता शुभचिंतक या नव्या गुजराती चित्रपटाची कथा काय ? तो काय भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

  • सावली होईन सुखाची’ मालिकेत मोठा ट्विस्ट; मालिकेचे नवे पर्व सुरु होणार

    ‘सन मराठी’वरील ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेचे नवे पर्व सुरु होणार आहे. मालिकेत रुद्र व गौरीच्या मृत्यूनंतर राधा म्हणजेच बिट्टीने गौरीची खानावळ सुरु ठेवली आहे. या खानावळचं  रूपांतर तिने गौराई मिसळ सेंटरमध्ये केलं आहे. गौराई मिसळ सेंटरचं मोठं हॉटेल करायचं असं तिच्या पार्टनरचं म्हणजेच रुद्रचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. अशातच तिच्या आयुष्यात विराजस बिराजदारची एन्ट्री होते. नाशिक मधले सुप्रसिद्ध मसाल्याचे व्यापारी विजयेंद्र बिराजदार यांचा एकुलता एक मुलगा विराजस नुकताच परदेशातून शिकून आला आहे. अत्यंत श्रीमंत कुटुंबात वाढला असला तरी विराजसला पैशांचा माज नाही. बिझनेसमध्येही त्याला फार रुची नाही. आयुष्य छान जगावं एवढंच त्याचं ध्येय आहे पण आपलं रक्तच आपला बिझनेस पुढे नेणार या वडिलांच्या हट्टापायी विराजसला बिझनेसमध्ये उतरावं लागणार आहे. इकडे पैशांचा माज नसलेला विराजस आणि दुसरीकडे अनाथ पण मोठी स्वप्न बघून ती पूर्ण करण्याची जिद्द असलेली राधा. आता या दोघांची गाठ कशी जुळणार? राधा व विराजस यांची प्रेमकथा सुरु होणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. विराजस बिराजदारच्या भूमिकेत अभिनेता अमेय बर्वे पाहायला मिळणार आहे तर राधा म्हणजेच बिट्टीच्या भूमिकेत अभिनेत्री प्रतिक्षा  पोकळे पाहायला मिळणार आहे. अमेय व प्रतिक्षाने या दोघांनीही बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी यापूर्वी एकाच मालिकेतही काम केलं होत आणि आता पुन्हा एकदा छोट्यापडद्यावर दोघेही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.  

    विराजसच्या  भूमिकेबद्दल अभिनेता अमेय बर्वे म्हणाला की, “अभिनयाच्या प्रवासात ‘सावली होईन सुखाची’ मालिकेत पहिल्यांदाच मी मुख्य भूमिका साकारत आहे. विराजस हे पात्र समंजस, साधा,दयाळू, श्रीमंतीचा अजिबात गर्व नसलेला आहे.मी मूळचा नाशिकचा आहे. जेव्हापासून कलाक्षेत्रात पाऊल ठेवलं तेव्हापासून मुंबईला जायची ओढ होती.बऱ्याच मालिकांचं काम मी मुंबई मध्ये केलं आहे. पण आता या  मालिकेच शूटिंग नाशिकमध्ये सुरु आहे. त्यामुळे ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेत मला मुख्य भूमिकातर मिळालीच पण मी पुन्हा माझ्या घरी परतलो आहे. आता सेटवर दररोज आईच्या हातचा जेवणाचा डब्बा घेऊन जातो. या सगळ्यामुळे आई-बाबा खुश आहेत. सेटवरील वातावरण अगदी सुंदर आहे. मी व प्रतिक्षाने एकत्र काम केलय त्यामुळे ‘सावली होईन सुखाची’ मालिकेत काम करणं आणखी सोपं झालं आहे.”

    राधा म्हणजेच बिट्टीच्या भूमिकेबद्दल अभिनेत्री प्रतिक्षा पोकळे म्हणाली की,” खूप वर्षांपासून मुख्य भूमिकेची वाट पाहत होते. ‘सन मराठी’ वाहिनी  व ‘सावली होईन सुखाची’ मालिकेमुळे मुख्य भूमिका साकारायची संधी मिळाली. बिट्टी हे पात्र खूप मॅजिकल आहे. अनाथ मुलीचं आयुष्य ती जगली असेल तरीही इतरांना सुखात ठेवायचं. आयुष्यात कितीही दुःख आलं तरीही त्यावर मात करून आनंदाचा मार्ग शोधायचा असे तिचे विचार आहेत. या भूमिकेमुळे मलाही खूप शिकायला मिळत आहे. मी व अमेय पुन्हा एकदा एकत्र काम करतोय त्यामुळे छान वाटत. जेव्हा मला कळलं की, अमेय माझ्याबरोबर काम करणार आहे तेव्हा काम करताना अजून मज्जा येईल ही खात्री मला  मिळाली. या भूमिकेमुळे माझ्या आई बाबांचं स्वप्न पूर्ण झालं. प्रोमो पाहिल्यानंतर आनंदाने आईला रात्रभर झोप लागली नव्हती. त्यामुळे आता माझी जबादारी वाढली आहे.”

  • उमेद अभियान’मुळे उद्योजिकांच्या स्वप्नांना मिळणार बळ

    ‘उमेद अभियान व SBI फाऊंडेशन’मुळे स्त्रियांच्या स्वप्नांना मिळणार बळ. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने पहिल्यांदाच ‘उमेद अभियान’ अंतर्गत महिला स्वयंसहायता समुहातील महिला उद्योजकांसाठी येतोय नवा कोरा टी व्ही शो ‘घे भरारी- मला पंख मिळाले’ दिनांक १३ डिसेंबर २०२४, संध्या. ४.१५ वा TV9 मराठी या लोकप्रिय चॅनेलवर. स्त्रियांचं आयुष्य म्हंटल तर संसार, चूल, मूल यांसारख्या असंख्य गोष्टी सांभाळण्यात जातं पण सध्याच्या बदलत्या काळात स्त्री संसार सांभाळून स्वतःच्या पायावर खंबीर उभं राहिलेली पाहायला मिळत आहे. ही अगदीच कौतुकाची बाब आहे पण तरीही स्त्रीला प्रोत्सहन, योग्य मार्गदर्शन मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी ‘उमेद अभियान’ स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी घेऊन येत आहे ‘घे भरारी- मला पंख मिळाले’ हा नवा कोरा कार्यक्रम.

    SBI फाऊंडेशनतर्फे निवडक महिलांना सहाय्य निधी मिळणार

    अनेकदा महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रोत्सहन दिलं जातं पण ‘उमेद अभियान’ अंतर्गत ‘घे भरारी- मला पंख मिळाले’ या कर्यक्रमातून तब्बल ७० लाख महिलांना प्रेरणा मिळणार आहे. ‘उमेद अभियानने’ या अनोख्या कार्यक्रमासाठी ३९ महिलांची निवड केली आहे. या महिलांची यशोगाथा ऐकून इतर महिला प्रोत्सहीत होतील व त्यांनाही त्यांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऊर्जा मिळेल. महाराष्ट्रातील उद्द्योजिका अनघा घैसास व उद्योजक विशाल सोलासकर आणि राहुल पापल यांचं मार्गदर्शन महिलांना मिळणार आहे. यामध्ये महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी लागणार भांडवल, निधी हे SBI फाऊंडेशनतर्फे मिळणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रायोजकत्व SBI फाऊंडेशनने घेतल्यामुळे नाविन्यपूर्ण असा शो महाराष्ट्राला आणि देशाला अनुभवायला मिळणार आहे.

    महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानचे मुख्य अधिकारी रुचेश जयवंशी या अभियानात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. ‘घे भरारी’ या कार्यक्रमाबद्दल बोलताना रुचेश म्हणाले, “प्रत्येक ग्रामीण महिलेले तिची स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळायला हवी. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तब्बल ७० लाख महिलांपर्यंत पोहचण्याच ध्येय आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक महिला उद्योजिका बनली पाहिजे. बदलत्या काळानुसार महिलांनी आणखी पुढे यायला हवं आणि त्यासाठीच ‘उमीद अभियान’ हे अभियान राबवत आहेत. या कार्यक्रमाचा परिणाम हा राज्याच्या ग्रामीण अर्थशास्त्राचा पाया मजबूत करण्यासाठी होणार आहे. अनेक महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरणा या कार्यक्रमातून मिळणार आहे.”

    या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री श्रेया बुगडे करणार आहे. या कार्यक्रमाबद्दलच श्रेया म्हणते, “स्त्रियांना प्रत्येक कठीण प्रसंगातून जावं लागत. मुख्यतः ग्रामीण भागातील महिलांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन, प्रोत्सहन मिळत नाही. पण ‘उमेद अभियान’ अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन नक्की मिळेल. या कार्यक्रमातून ३९ महिलांची यशोगाथा ऐकायला मिळणार आहे आणि मुख्य म्हणजे हा अनुभव मला प्रत्यक्ष त्या स्त्रियांसह संवाद साधून अनुभवता येणार आहे. प्रत्येक महिलेच्या आयुष्यात खचून जाणारा क्षण येतोच पण आता प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची नवी उमेद मिळेल. आता स्त्री फक्त चूल, मूल सांभाळणारी नसेल तर ती एक उद्योजिका ही असेल. ‘उमेद अभियान’ चं खूप कौतुक वाटतं आणि या अभियानाचा मला एक भाग होता येतंय या गोष्टीचा आनंद आहे. ‘घे भरारी- मला पंख मिळाले’ या कार्यक्रमाद्वारे स्वबळावर उभ्या राहिलेल्या ३९ महिलांशी संवाद साधण्यास व त्यांची यशोगाथा ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे.”

  • मराठी चित्रपटसृष्टीत नवा प्रयोग: ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ होणार सिनेमागृहात प्रदर्शित

    मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच मराठी चित्रपट नाट्यगृहात प्रदर्शित होणार आहे  आणि हा मान ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटाला मिळाला आहे. या चित्रपटाचा भव्य प्रीमियर २० डिसेंबर २०२४ रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत होणार आहे. चित्रपटातील कलाकार सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्या उपस्थितीत हा खास कार्यक्रम होणार असून या ऐतिहासिक प्रीमियरसाठी विनामूल्य प्रवेश असून नाट्यगृहातच तिकीट उपलब्ध होणार आहेत.

    ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा चित्रपट लग्नसंस्थेवर आधारित असून, आधुनिक विचारसरणी यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अथश्री आणि गायत्री ही दोन परस्परविरोधी स्वभावाची पात्रे एकमेकांना पहिल्यांदा भेटतात आणि त्यांच्या पहिल्या भेटीतून काही मजेदार काही भावनिक घटना घडतात. त्यांच्या विचारांच्या देवाण-घेवाणीतून काही रहस्ये देखील समोर येतात, ज्यामुळे कथा अधिक मनोरंजक बनते.

    सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्या उपस्थितीत २० डिसेंबर रोजी पुण्यात भव्य प्रीमियर

    चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, “मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये नेहमीच मर्यादित स्क्रीन मिळतात, त्यामुळे आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. नाट्यगृहात चित्रपट प्रदर्शित करणं हा एक आव्हानात्मक निर्णय आहे आणि हे आव्हान आम्ही पेललं आहे. या पद्धतीने आम्ही अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू आणि त्यांना एक नवा अनुभव देऊ शकू. नाट्यगृहातील या भव्य प्रीमियरसाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.

    चित्रपटाचे निर्माते शेखर विठ्ठल मते म्हणतात हा चित्रपट प्रायोगिक तत्वावर असून पूर्वनियोजित नाटकांच्या खेळांना कोणत्याही प्रकारचा धक्का न लागू देता नाट्यगृहामध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा हा एक प्रयत्न आहे. तसेच यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांना मराठी चित्रपट व नाटक या दोन्हीचा आस्वाद एकाच ठिकाणी घेता येईल ’’

    ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटात प्रथमच प्रेक्षकांना सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. या प्रमुख कलाकारांसोबत प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, आणि शर्मिष्ठा राऊत हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शुभम फिल्म प्रॅाडक्शन निर्मित, आनंद दिलीप गोखले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे शेखर विठ्ठल मते निर्माते आहेत.

  • Shadow Fame Singer Singga’s Opens Up On Battling Depression And How He Rebuilt Himself With A Powerpack Comeback

    Punjabi singer-actor Singga, renowned for his electrifying performances and powerful voice, recently opened up about a deeply personal battle. Behind his vibrant public persona, Singga was quietly struggling with severe depression. The mental health challenges led him down a difficult path, causing him to gain significant weight and lose touch with his physical and emotional well-being.

    After battling intense emotional struggles, Singga realized the need to reclaim his life. Singga revealed that his battle with depression left him feeling powerless.”I wasn’t myself. I didn’t feel like doing anything. I was ignoring my health and work, and every day felt like a struggle, But then, one fine day, something changed. Something hit me, and I realized I needed to give myself a second life. I had to rebuild myself—not just for me but for my family, who must have been worried seeing me in that state.”

    Singga on his transformation says, “I began my mornings early, with rigorous gym sessions that helped me channel my energy positively. I pushed my limits by running under the blazing sun in June and July, often between 1–2 PM. “Sweating was my therapy,” I’ve seen the sweat change the color of the soil beneath my feet.”Determined to build abs and tone his body, Singga says, “I controlled my sugar and salt intake and adopted a diet rich in green vegetables and fruits. Drinking warm water and maintaining hydration were key elements of my regime. I started learning about exercises and techniques on YouTube. It’s amazing how much you can achieve when you put your mind to it.”

    For Singga, the gym became more than his physical space—it was his sanctuary, his medicine for healing with depression.“ Every drop of sweat felt like I was leaving my pain behind. I stopped worrying about what people thought and kept my focus on my goals, as I feel, you unlock a new level of freedom,” he shared.

    Through his efforts, Singga has emerged stronger, healthier, and more driven than ever. From battling depression to sculpting a physique that inspires millions, Singga’s journey is a reminder that with dedication and self-love, transformation is always possible.

    https://www.instagram.com/p/DDTyr5EIKKj/?img_index=1

    And now, Singga is all set for a powerpack comeback with his debut film FAKKAR for which he has once again undergone a major transformation, to bring the character reality to life. We are sure that Singga not only inspired us and made us fall in love with his soulful music but also his personal life journey and his battle with Depression as this is also an inspiration to all his fans that No matter how dark it feels, there is always a way to rebuild yourself.

  • Ankush Bahuguna: The content creator who dominated 2024

    Ankush Bahuguna, the accomplished all-rounder and affable social media star, has turned 2024 into his personal playground! From breaking boundaries in the world of beauty to owning lifestyle and entertainment, Bahuguna has been busy carving his name across industries and rewriting the content creation rulebook. Starting his journey as a comic influencer, he has risen to become one of India’s leading content creators, overcoming societal beauty standards that initially challenged his foray into beauty content creation.

    In 2024 alone, Ankush collaborated with 55+ brands, redefining the landscape for aspiring beauty creators and inspiring countless creators from across the county. His unique style and authenticity has made him a trusted voice for both budding creators and established brands. Beauty giants like Sephora, Maybelline, Lakmé, Nykaa, Vaseline, and Garnier have placed their faith in his work, benefiting from his ability to connect with a diverse and engaged audience.

    Ankush Bahuguna’s beauty and lifestyle handle titled ‘Wing It with Ankush’,  has witnessed phenomenal growth in 2024. Starting the year 2024 with 590k followers, the page skyrocketed to 1.1 million by year’s end, cementing Ankush’s position as a leading content creator in the beauty industry. His makeup hacks, including viral tutorials like “How to Apply Your Concealer” and “The Correct Way to Apply Eyeliner”, garnered over 20 million views and reached audiences worldwide, including makeup artists like Sir John and Zuhair Murad. Notably, his concealer video caught the attention of renowned international makeup artist Robert Welsh, who reviewed it, further boosting its popularity.

    Ankush’s YouTube series, ‘Wing It with Ankush,’ featuring stars such as Shruti Haasan, Shreya Pilgaonkar, Kusha Kapila, and Prajakta Koli, also gained massive traction, racking up millions of views. Global icons like Jameela Jamil and Daniella Walters, along with renowned dermatologists such as Dr. Rashmi Shetty, have engaged with Ankush’s content, amplifying his influence on a global scale.

    Besides beauty, Ankush has also partnered with major lifestyle brands such as Samsung, Colgate, Google Maps, and Fastrack, further solidifying his influence and reach. His impactful content and dedication have not only garnered audience trust but have also paved the way for new standards in content creation within the beauty and lifestyle space.

    Expanding his creative reach, Ankush collaborated with luxury fashion brands like Coach, Louboutin, Canali, and Tod’s, showcasing his versatility. He made a dazzling impression at prestigious international events such as the Cannes Film Festival and Milan Fashion Week, where his distinctive style turned heads and solidified his presence in the fashion world.

    In 2024, Ankush also earned a spot on Forbes Top 100 Digital Stars, appearing on a Spoyl billboard. Adding to his accomplishments, Ankush made a cameo appearance on a Netflix show, delighting his fans. Recognized as Best Dressed by GQ, Ankush also received praise from leading fashion publications.  He was also featured on Ananya Panday’s popular podcast, So Positive, where his candid and inspiring conversation garnered immense appreciation and love from audiences.

    By challenging stereotypes and creating inclusive, relatable content, Ankush has become a transformative figure in redefining beauty standards for men. His influence has not only opened new doors for male representation in the beauty industry but also inspired others to embrace self-expression. His impressive long list of accolades include Elle Beauty Influencer of the Year, Entrepreneur India Beauty Blogger of the Year, Navbharat Times Beauty Influencer of the Year, and Global Excellence Beauty Influencer of the Year, all of which underscore his trailblazing impact on the industry.

    Looking ahead, the buzz around Ankush’s next ventures is growing. Speculations about him launching his own beauty brand for men or exclusive makeup lines in collaboration with leading global brands have fans and industry insiders eagerly waiting. With potential international brand partnerships and appearances at global fashion weeks, Ankush’s journey promises even more exciting milestones.

  • ‘इलू इलू’ म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

    एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे बॅाक्स ऑफीसवर काही मराठी चित्रपट भरघोस कमाई करताना दिसत आहेत. त्यामुळे हिंदीपासून इतर भाषिक कलाकार मराठी सिनेसृष्टीकडे आकर्षित झालेले पहायला मिळत आहेत. यात आता प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री एली आवराम हे नाव देखील सामील झालं आहे. एव्हाना बॉलीवूड मध्ये आपला चांगला जम बसवलेली एली ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

    फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ मनोरंजक लव्हस्टोरी ३१ जानेवारीला आपल्या भेटीला येत आहे.  या चित्रपटाचा रंगतदार टिझर एका शानदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटातील ‘इलू इलू’ या रोमँटिक गाण्यावर बहारदार परफॉर्मन्स करत एली आवरामने उपस्थितांची मने जिंकली.

    २०१३ मध्ये ‘मिकी व्हायरस’ या चित्रपटाद्वारे हिंदीत दाखल झालेल्या एलीनं आजवर ‘किस किस को प्यार करूं’, ‘नाम शबाना’, ‘पोस्टर बॅाईज’, ‘बाझार’, ‘मलंग’, ‘कोई जाने ना’, ‘गुडबाय’ या हिंदी चित्रपटांसोबतच तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटात एली ‘मिस पिंटो’ या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पण हि व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारण्यासाठी एलीनं खूप मेहनत घेतली आहे. आपल्याला अवगत नसलेल्या भाषेतील चित्रपटातील मुख्य भूमिका तिनं मोठ्या धाडसानं आणि आत्मविश्वासानं साकारल्याचं चित्रपट पाहताना प्रेक्षकांना जाणवेल.

    ‘इलू इलू’ ३१ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होतोय.

    मराठीत एन्ट्री करण्याबाबत एली म्हणाली की, ‘मला नेहमीच नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. स्वीडीश, हिंदी, तामिळ आणि कन्नड चित्रपटांनंतर ‘इलू इलू’ च्या निमित्तानं मराठी भाषेची गोडी चाखण्याची संधी मिळाली आहे. यातील कॅरेक्टर माझ्या आजवर साकारलेल्या व्यक्तीरेखांपेक्षा खूप वेगळं आहे. एका नव्या लुकमध्ये मी प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुरुवातीला जेव्हा या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा थोडं दडपण जाणवलं होतं, पण पटकथा आणि कॅरेक्टर समजल्यावर मराठीत एंट्री करण्यासाठी हीच अचूक संधी असल्याची जाणीव झाल्यानं होकार दिल्याचंही एली म्हणाली’.

    मराठमोळ्या रूपातील एलीला पाहण्यासाठी मराठी प्रेक्षकांसोबतच तिचे चाहतेही आतुरले आहेत. 

    एलीसोबत वीणा जामकर, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ, वनिता खरात, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, आनंद कारेकर, निशांत भावसार, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात आहेत.

    ‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत.  छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे  यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत.

  • प्रेम, काळजी आणि नात्याचे उलगडले नवे रंग ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ मधील भावनिक गाणे ‘जीवापाड जपतो’ प्रदर्शित!

    शुभम फिल्म प्रॉडक्शनचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा चित्रपट येत्या २० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपताच्या  ट्रेलर आणि धमाकेदार गाण्यांनी रसिकवर्गाची मने जिंकली आहेत. अशातच चित्रपटातील आणखी एक भावनिक गाणे ‘जीवापाड जपतो’ नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून या गाण्याने थेट प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. 

    ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटातील ‘जीवापाड जपतो’ हे गाणे प्रेम, काळजी आणि नात्यांच्या बंधांचे अनोखे दर्शन घडवते. हा केवळ संगीताचा अनुभव नसून एखाद्या व्यक्तीवरील निस्सीम प्रेम आणि तिची काळजी कशी घेतली जाते, याचे भावनिक चित्रण यातून दिसते. गाण्यात सुबोध भावे आणि केयामधील नातं उत्कटपणे उलगडत जाते. त्यांच्या भावभावनांमधील नाजूक क्षण या गाण्यात मांडला गेला आहे.

    ‘जीवापाड जपतो ’ हे गाणे मंदार चोळकर यांच्या लेखणीतून साकारले असून पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केले आहे. तर  अभय जोधपुरकर यांचा या गाण्याला आवाज लाभला आहे. या चित्रपटात सुबोध भावे, तेजश्री प्रधान, प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, आणि शर्मिष्ठा राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शेखर विठ्ठल मते यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून आनंद दिलीप गोखले यांनी याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

    चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, “जीवापाड जपतो’ हे गाणं केवळ शब्दांपुरताच मर्यादित नाही तर भावना आणि नात्यांच्या गाठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारं आहे. गाण्याची शब्दरचना, संगीत आणि सुबोध भावे यांचा प्रभावी अभिनय यामुळे ते प्रेक्षकांच्या हृदयात नक्कीच घर करेल. आम्हाला खात्री आहे की, हे गाणे प्रेक्षकांच्या आयुष्यातील काही खास माणसांची आठवण करून देणारे आहे.

    चित्रपटाचे निर्माते शेखर विठ्ठल मते म्हणतात, “हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा मनोरंजनाबरोबरच भावनिक गोष्टींना प्राधान्य देणारा चित्रपट आहे. ‘जीवापाड जपतो’ हे गाणं प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. या कमाल संगीत टीमने या गाण्याला एक उंची दिली आहे.”

  • निर्धार’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

    समाजातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या ‘निर्धार’ या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच कोल्हापूरमध्ये पूर्ण करण्यात आले. कोल्हापूर आणि आसपासच्या विविध रिअल लोकेशन्सवर ‘निर्धार’चे चित्रीकरण करण्यात आले.

    जयलक्ष्मी क्रिएशन या निर्मिती संस्थेअंतर्गत निर्मात्या पद्मजा वालावलकर यांनी ‘निर्धार’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिलीप भोपळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाचं लेखन दिनानाथ वालावलकर यांनी केलं आहे. भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करण्यासाठी संघर्ष करत समाजापुढे नवा आदर्श ठेवणाऱ्या तरुण पिढीची कथा या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाद्वारे भ्रष्ट समाजव्यवस्थेवर प्रहार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. देशातील ज्वलंत मुद्द्यावर भाष्य करण्याचा, किंबहुना तो कसा नष्ट होईल हे सांगण्याचा प्रयत्न ‘निर्धार’ या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकांनी फार सुंदररित्या केला आहे.

    ‘निर्धार’मध्ये डॅा. गिरीश ओक, सौरभ गोगटे, पल्लवी पटवर्धन, प्रज्ञा केळकर, मिलिंद ऊके, उमेश बोळके, अभिनव कुरणे, जान्हवी सावंत, ऋतुजा कनोजिया, अभय पाटील, श्रेयस मोहिते, दिनानाथ वालावलकर, युवराज झुगर, केतकी पाटील, पल्लवी प्रसाद, आनंद पाटील, सुरेंद्र केतकर, विद्या डांगे, एन. डी. चौगुले, महेंद्र पाटील, कोमल रणदिवे आदी कलाकार अभिनय करत आहेत. कला दिग्दर्शनाचं काम विकी बिडकर पाहात असून, डिओपी अतुल सुपारे यांनी सिनेमॅटोग्राफी करत आहेत. अतुल शिधये रंगभूषा करत असून, प्रशांत पारकर यांनी वेशभूषाची जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शक संग्राम भालकर असून क्रिएटिव्ह प्रोड्यूसर महेंद्र पाटील आहेत. संतोष जाधव  सहदिग्दर्शक असून राहुल पाटील प्रमुख सहाय्य्क  दिग्दर्शक आहेत. निर्मिती व्यवस्थापक कैलास भालेराव असून अजय खाडे लाईन प्रोड्युसर आहेत.

  • “लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर…; कथानक ऐकताच मालिकेसाठी होकार दिला”

    ‘सन मराठी’ वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अव्वल ठरली आहे. ‘सन मराठी’ने नेहमीच वेगवेगळ्या कथानक असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या आहेत. अशातच सोशल मिडीयावर एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. लवकरच ‘सन मराठी’वर ‘जुळली गाठ गं’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.’जुळली गाठ गं’ या मालिकेचा एक टिझर समोर आला आहे. सोशल मिडीयावर या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. यामध्ये अभिनेत्री पायल मेमाणे ‘सावी’ ही व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळणार आहे.

    मालिकेतील मुख्य भूमिकेबद्दल व्यक्त होत पायल म्हणाली,”‘सन मराठी’ या वाहिनीच्या सगळ्याच मालिका प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत आणि आता मी सुद्धा ‘सन मराठी’वर काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. ‘जुळली गाठ गं’ या मालिकेसाठी मला प्रॉडक्शन मधून कॉल आला. ऑडिशन, लुकटेस्ट या पद्धतीनेच माझं सिलेक्शन झालं. या मालिकेत मी सावी हे मुख्य पात्र साकारत आहे. जेव्हा मला सावीच्या स्वभावाबद्दल समजलं तेव्हा मी तिच्या प्रेमातच पडली. सावी ही इन्फ्लुएन्सर आहे. कोल्हापूरमधील सगळ्याच चविष्ट पदार्थांचं ती व्हिडीओ करून युट्युबवर अपलोड करते. बिनधास्त, मनमोकळी, अन्याय सहन न करणारी असा सावीचा स्वभाव आहे.” 

    पुढे ती म्हणाली, “मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलच पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात त्या पुढे पोहचल्या पाहिजेत. लग्नानंतर मुलींचं आयुष्य बदलतं पण स्त्रियांना बंधनात न अडकवता त्यांना मोकळीक दिली पाहिजे. खेड्यागावात अजूनही लग्नानंतर स्त्रिया फक्त घरातलीच काम करतात पण असं नाही झालं पाहिजे. लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर खऱ्या अर्थाने सुरु होत.ही मालिका याच विषयावर आधारित आहे. जस सावीला तिच्या घरी जितकी मोकळीक दिली गेलीये तशीच मोकळीक तिला सासरी मिळेल का? सावी सासरच्या मंडळींचे विचार बदलू शकेल का? सावीची गाठ कोणाबरोबर जुळेल या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. मालिकेच कथानक खूप सुंदर आहे. त्यामुळे लगेचच मालिकेसाठी होकार दिला. मी मूळची पुण्याची आहे. माझ्यासाठी कोल्हापुरी भाषा शिकणं  हा टास्क होता पण मला प्रॉडक्शनने यासाठी खूप मदत केली. सावी  या भूमिकेमुळे मी फूड वलॉगिंग शिकली. या पुढे मलाही सावीचा पुढचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. लग्नानंतर सावीच आयुष्य कसं बदलेल हे जाणून घेण्यासाठी मी सुद्धा उत्सुक आहे.”