शाळेतल्या निरागस आठवणींना उजाळा देणारं ‘तू शिसपेन्सिल माझी..मी तुझा शार्पनर’ गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल!

शाळेतला वर्ग, मित्रमैत्रीणी, बाक, गृहपाठ, मधली सुट्टी या आठवणी माणूस कधीच विसरू शकत नाही. अशीच शाळेतील एक सुंदर आठवण सांगणार ॲक्रोश्री प्रस्तुत ‘तू शिसपेन्सिल माझी..मी तुझा शार्पनर’ हे गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा बॉलिवूड सिने निर्माते महेश कोरडे यांच्या हस्ते व अनेक बालकलाकारांच्या उपस्थितीत आनंदात पार पडला. जॉली एलएलबी २, चुंबक,… Read More शाळेतल्या निरागस आठवणींना उजाळा देणारं ‘तू शिसपेन्सिल माझी..मी तुझा शार्पनर’ गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल!

“जुळली गाठ गं’ मालिकेच्या माध्यमातून खेड्यागावातील स्त्रियांचं जीवन बदलेल”- संकेत निकम 

‘सन मराठी’ वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. अश्यातच ‘सन मराठी’वर ‘जुळली गाठ गं’ ही नवी मालिका येत्या १३ जानेवारीपासून सोमवार ते रविवार दररोज  रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोशल मीडियावर ‘जुळली गाठ गं’ मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या नव्या प्रोमोमध्ये अभिनेत्री पायल मेमाणेसह अभिनेता संकेत निकम धैर्य ही मुख्य भूमिकेत… Read More “जुळली गाठ गं’ मालिकेच्या माध्यमातून खेड्यागावातील स्त्रियांचं जीवन बदलेल”- संकेत निकम 

मित्रांची धमाल घेऊन येतोय ‘संगी’

अर्मोक्स फिल्म्स आणि यंत्रणा फिल्म्स निर्मित , सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि सत्यम ज्वेलर्स प्रस्तुत ‘संगी’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित कुलकर्णी यांनी केले असून लेखन थोपटे विजयसिंह सर्जेराव यांचे आहे. रोहन भोसले, अरुण प्रभुदेसाई, पिंटू सॉ, मोनिका प्रभुदेसाई, प्रतीक ठाकूर, सुमित कुलकर्णी हे ‘संगी’चे निर्माते आहेत. तर लालासाहेब… Read More मित्रांची धमाल घेऊन येतोय ‘संगी’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जिओ स्टुडिओज् प्रस्तुत ‘संगीत मानापमान‘ चित्रपटाचा भव्य दिव्य ट्रेलर प्रदर्शित !

नववर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप खास ठरणार आहे. कारण ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघताय तो संगीतमय चित्रपट संगीत मानापमान नववर्षाच्या सुरवातीला प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणविस ह्यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा पार पडला.  शौर्याला,… Read More मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जिओ स्टुडिओज् प्रस्तुत ‘संगीत मानापमान‘ चित्रपटाचा भव्य दिव्य ट्रेलर प्रदर्शित !

फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज

काही दिवसांपूर्वीच दाभाडे कुटुंबीयांनी गुलाबी थंडीत मस्त ‘यल्लो यल्लो’ हळदीचा जबरदस्त समारंभ साजरा केला. त्यावेळी या दाभाडे कुटुंबाची थोडी तोंडओळख प्रेक्षकांना झालीच. मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून ही दाभाडे फॅमिली का फसक्लास आहे, याचा अंदाजही प्रेक्षकांना आला आहे. ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर झळकला असून या कुटुंबाला भेटण्याची आता प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली… Read More फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज

सन मराठी’ वरील ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेतील सत्या-मंजूच्या रोमँटिक गाण्याची प्रेक्षकांना पडणार भूरळ

‘सन  मराठी’ वाहिनीवरील नंबर वन मालिका म्हणजेच ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सत्याला मंजूबद्दलच्या प्रेमाची जाणीव झाल्यानंतर मालिका एका रंजक वळणावर आली आहे. याचनिमित्ताने *पहिल्यांदाच* ‘सन मराठी’ वाहिनी लाडक्या प्रेक्षकांसाठी सत्या-मंजूच खास रोमँटिक गाणं भेटीला घेऊन येणार आहे. येत्या सोमवारी  म्हणजेच २३  डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता  हा भाग ‘सन मराठी’ वाहिनीवर… Read More सन मराठी’ वरील ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेतील सत्या-मंजूच्या रोमँटिक गाण्याची प्रेक्षकांना पडणार भूरळ

नागेश भोसलेंचा ‘अनुजा’ लघुपट ऑस्करच्या शर्यतीत

ऑस्कर २०२५ ची सध्या चांगलीच चर्चा आहे. ऑस्कर २०२५ सोहळा पुढील वर्षी थाटामाटात संपन्न होणार आहे. भारताचे प्रतिनिधित्व करत इथल्या संस्कृतीशी नाळ जोडणाऱ्या ‘अनुजा’ या भारतीय लघुपटानेही यंदाच्या ऑस्करच्या लघुपट श्रेणीत स्थान मिळवले आहे. ‘लाइव्ह-अ‍ॅक्शन’ शॉर्ट फिल्ममध्ये ‘अनुजा’ १८० शॉर्ट फिल्मसमधून निवडण्यात आली आहे. ‘अनुजा’ची निर्मिती सुचित्रा मटाई यांची असून गुनीत मोंगा या लघुपटाच्या कार्यकारी… Read More नागेश भोसलेंचा ‘अनुजा’ लघुपट ऑस्करच्या शर्यतीत

सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चित्रपटाच शंकर महादेवन आणि बेला शेंडे यांच्या सूमधुर आवजातल गाणं ‘ऋतु वसंत’ झाल प्रदर्शित !!

वसंत ऋतुच्या सौंदर्याने आणि मोहकतेने संगीत मानापमान चित्रपटालाही भूरळ घातली आहे. या चित्रपटात वसंत ऋतूच्या उत्सवाला साजर करणारं एक गाणं नुकतंच रिलीज झाल आहे. सुबोध भावे, वैदेही परशुरामी बरोबरच खुद्द शंकर महादेवन आणि बेला शेंडे ही या बहारदार गाण्यावर थिरकताना दिसतायत.   ५००हून अधिक डान्सर्स, पारंपरिक वेशभुषा, कमालीचं  नृत्य, गाण्यातील साधेपणा थेट मनाला भिडणारे बोल असं… Read More सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चित्रपटाच शंकर महादेवन आणि बेला शेंडे यांच्या सूमधुर आवजातल गाणं ‘ऋतु वसंत’ झाल प्रदर्शित !!