देवमाणूसमध्ये नवा वळण – ‘माहेरची साडी’ घेऊन आली अलका कुबल!

झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेचा नवा अध्याय प्रेक्षकांची मने जिंकणारी ‘देवमाणूस’ ही मालिका पुन्हा एकदा नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘देवमाणूस – मधला अध्याय’ हे नवीन पर्व येत्या २ जूनपासून रात्री १० वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे. मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आता एका नव्या प्रोमोमुळे मालिकेबाबत आणखी उत्सुकता वाढली आहे. सई… Read More देवमाणूसमध्ये नवा वळण – ‘माहेरची साडी’ घेऊन आली अलका कुबल!

ह्रृषीकेश युवराज चव्हाण आणि श्रुती राऊळ यांनी पटकावली ‘चल भावा सिटीत’ ची ट्रॉफी आणि ₹१० लाखांचे बक्षीस

ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचं अनोखं मिलन ‘झी मराठी’वर काही महिन्यांपूर्वी सुरू झालेला ‘चल भावा सिटीत’ हा अनोखा रिऍलिटी शो प्रेक्षकांचा लाडका बनला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच “कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय!” म्हणत धडाकेबाज प्रवेश झाला होता. ग्रामीण आणि शहरी पार्श्वभूमी असलेल्या स्पर्धकांना एकत्र आणणाऱ्या या शोने रिऍलिटी शोच्या पारंपरिक चौकटी मोडून टाकल्या. जीवनाच्या वेगवेगळ्या बाजू समजून घेणारा… Read More ह्रृषीकेश युवराज चव्हाण आणि श्रुती राऊळ यांनी पटकावली ‘चल भावा सिटीत’ ची ट्रॉफी आणि ₹१० लाखांचे बक्षीस

वामन हरी पेठे ज्वेलर्स कान्समध्ये! भारतीय दागिन्यांचे सौंदर्य जागतिक रंगमंचावर!

राजेशाही दागिन्यांनी कान्समध्ये केली ग्लॅमरस एंट्रीमुंबईतून कान्सपर्यंतचा हा प्रवास वामन हरी पेठे ज्वेलर्ससाठी ऐतिहासिक ठरला. २०२५ च्या कान्स चित्रपट महोत्सवात त्यांच्या दागिन्यांनी रेड कार्पेटवर प्रेक्षकांची नजर खिळवली. नेहा पेंडसेच्या लूकची खासियत – पोल्की आणि पन्ना हारप्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे हिने वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या ब्रायडल कलेक्शनमधील पारंपरिक पोल्की आणि पन्ना हार घालून ग्लोबल मंचावर भारतीय… Read More वामन हरी पेठे ज्वेलर्स कान्समध्ये! भारतीय दागिन्यांचे सौंदर्य जागतिक रंगमंचावर!

‘ये रे ये रे पैसा ३’ १८ जुलैपासून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरहिट विनोदी फ्रँचायझी ‘ये रे ये रे पैसा’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘ये रे ये रे पैसा ३’ हा तिसरा भाग १८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून धमाल पात्रं आणि नव्या ट्विस्टसह हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवीन पोस्टरने वाढवली उत्सुकता सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाचे नवीन पोस्टर… Read More ‘ये रे ये रे पैसा ३’ १८ जुलैपासून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

मृण्मयी देशपांडे सहा नायकांसोबत एका फ्रेममध्ये? ‘मना’चे श्लोक चित्रपटाची घोषणा

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या दर्जेदार आणि नावीन्यपूर्ण चित्रपटांची लाट आहे. अशाच एका वेगळ्या संकल्पनेचा नवा चित्रपट ‘मना’चे श्लोक’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गणराज स्टुडिओ, संजय दावरा एक्सपरिअन्स, आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त निर्मितीतील हा चित्रपट १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे उत्सुकता वाढवणारी झलक चित्रपटाचा पहिला टीझर व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर… Read More मृण्मयी देशपांडे सहा नायकांसोबत एका फ्रेममध्ये? ‘मना’चे श्लोक चित्रपटाची घोषणा

सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान, व्यक्तिमत्वांचा — ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’

प्रसारमाध्यमे ही केवळ माहितीचा स्रोत नसून समाजाचे प्रतिबिंब आणि दिशादर्शक ठरतात. त्यांच्या भक्कम जडणघडणीत अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे योगदान लाभले आहे. या कार्यकर्त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी ‘माई मीडिया २४’ व ‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’ तर्फे ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’ हा पुरस्कार सोहळा ३ जून रोजी शिवाजी पार्क, दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात संपन्न होणार आहे. माध्यमविश्वातील… Read More सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान, व्यक्तिमत्वांचा — ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’

१२ वर्षांनंतरही ‘नैना तलवार’च्या स्टाईलचे चाहते! दीपिका पदुकोणच्या ‘ये जवानी है दीवानी’ मधील लुक्स आजही आयकॉनिक

बॉलिवूडची ग्लॅम दिवा दीपिका पदुकोण ही केवळ अभिनयातच नव्हे तर स्टाईलमध्येही एक आयकॉन आहे. तिच्या प्रत्येक सिनेमातील लूक ट्रेंडसेटर ठरतो. पण १२ वर्षांपूर्वी आलेल्या ‘ये जवानी है दीवानी’मधील नैना तलवार हा तिचा एक असा अविस्मरणीय आणि कालातीत किरदार ठरला आहे, जो आजही प्रेक्षकांच्या मनात ताजा आहे. या चित्रपटाने फक्त मैत्री, प्रेम आणि शोध यांची गोष्ट… Read More १२ वर्षांनंतरही ‘नैना तलवार’च्या स्टाईलचे चाहते! दीपिका पदुकोणच्या ‘ये जवानी है दीवानी’ मधील लुक्स आजही आयकॉनिक

कुस्तीच्या आखाड्यात रंगणार थरार; ‘जुळली गाठ गं’ मालिकेत मोठा ट्विस्ट

‘सन मराठी’वरील ‘कॉन्स्टेबल मंजू’ आणि ‘जुळली गाठ गं’ या दोन्ही मालिका रोज रात्री ८ ते ९.३० या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येतात. ‘जुळली गाठ गं’ या मालिकेत लवकरच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे – सावी आणि धैर्य यांचं नातं मैत्रीच्या पलीकडे जाण्याच्या वाटेवर आहे. प्रेमाची कबुली देणार धैर्य, साठी आखाड्यात उतरतो या रोमांचक वळणात धैर्य… Read More कुस्तीच्या आखाड्यात रंगणार थरार; ‘जुळली गाठ गं’ मालिकेत मोठा ट्विस्ट