‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे ९९’ ला शुभेच्छा!

राजकुमार हिरानी, आर. माधवन, शर्मन जोशी आणि रितेश देशमुख यांनी शेअर केला ट्रेलर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची धमाल अनुभवण्यासाठी सज्ज झालेला ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट २३ मे रोजी प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाच्या ट्रेलरने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे, ‘थ्री इडियट्स’सारख्या आयकॉनिक चित्रपटाच्या टीमने – राजकुमार हिरानी, आर. माधवन, शर्मन जोशी आणि रितेश… Read More ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे ९९’ ला शुभेच्छा!

‘एप्रिल मे ९९’ आता २३ मे रोजी होणार प्रदर्शित

उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टाल्जिक सफर मोठ्या पडद्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणी जागवणारा आणि ९० च्या दशकातील बालमैत्रीचा सुगंध घेऊन येणारा ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट अखेर २३ मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि गाण्यांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. स्मार्टफोन नसलेली ती मजेशीर पिढी… Read More ‘एप्रिल मे ९९’ आता २३ मे रोजी होणार प्रदर्शित

‘एप्रिल मे ९९’ मध्ये ‘जाई’ची एंट्री, यंदाची उन्हाळ्याची सुट्टी होणार अविस्मरणीय

रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटात कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश या खट्याळ तिघांच्या मैत्रीत आता एक नवीन मैत्रीण जाईची भर पडली आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये सतत दिसणारा पाठमोरा चेहरा कोणी असेल, याबाबतची उत्कंठा अखेर संपली आहे. ही व्यक्तिरेखा साकारतेय अभिनेत्री साजिरी जोशी, जी प्रसिद्ध अभिनेत्री ऋजुता देशमुख यांची कन्या आहे. ‘एप्रिल मे ९९’ या… Read More ‘एप्रिल मे ९९’ मध्ये ‘जाई’ची एंट्री, यंदाची उन्हाळ्याची सुट्टी होणार अविस्मरणीय

‘एप्रिल मे ९९’ – उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा चित्रपट १६ मे रोजी प्रदर्शित

सध्या प्रचंड उकाडा असतानाच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना एक गोड, थोडा खट्याळ आणि अत्यंत नॉस्टॅल्जिक वळण देणारा ‘एप्रिल मे ९९’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा मस्तीने भरलेला टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश या तिघांची धमाल मस्ती प्रेक्षकांच्या बालपणाच्या आठवणींना उजाळा देत आहे. स्मार्टफोन आणि वायफायपूर्व काळातली… Read More ‘एप्रिल मे ९९’ – उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा चित्रपट १६ मे रोजी प्रदर्शित

मित्र पुन्हा भेटले मैत्रीच्या चित्रपटासाठी… रेमो डिसूझाच्या हस्ते ‘ताकुंबा’ गाण्याचे लाँचिंग

उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या आठवणींना उजाळा देणारा ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटातील ‘ताकुंबा’ हे धमाकेदार गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांच्या हस्ते हे गाणं सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. परीक्षा संपल्यानंतर सुरू होणाऱ्या मस्त आणि बेफिकीर सुट्टीच्या दिवसांची आठवण करून देणाऱ्या या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात नोस्टालजियाची सैर घडवली आहे. सुट्टीतील बालमैत्रीची धमाल झळकली गाण्यात वार्षिक… Read More मित्र पुन्हा भेटले मैत्रीच्या चित्रपटासाठी… रेमो डिसूझाच्या हस्ते ‘ताकुंबा’ गाण्याचे लाँचिंग

‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे– मात्र, आणखी एक प्रमुख चेहरा अद्याप गूढ!

रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आणि त्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटातील कलाकारांबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली. अखेर या चित्रपटातील तिघा कलाकारांची नावं समोर आली आहेत – आर्यन मेंगजी (कृष्णा), श्रेयस थोरात (प्रसाद) आणि मंथन काणेकर (सिद्धेश). मात्र, चित्रपटातील आणखी एक प्रमुख चेहरा अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे, त्यामुळे… Read More ‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे– मात्र, आणखी एक प्रमुख चेहरा अद्याप गूढ!

‘एप्रिल मे ९९’चा टीझर प्रदर्शित, १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला धमाकेदार चित्रपट

लवकरच परीक्षा संपून मुलांच्या शाळांना सुट्टी लागेल, आणि यंदाची उन्हाळ्याची सुट्टी अधिक धमाकेदार करण्यासाठी मापुस्कर ब्रदर्सचा ‘एप्रिल मे ९९’ १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याआधीच, या चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. रितेश देशमुखने सोशल मीडियावरून दिल्या शुभेच्छा महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुख यांनी आपल्या सोशल मीडियावरून ‘एप्रिल मे… Read More ‘एप्रिल मे ९९’चा टीझर प्रदर्शित, १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला धमाकेदार चित्रपट

नवीन वर्षात मापुस्कर ब्रदर्स घेऊन येत आहेत…‘एप्रिल मे ९९’

चित्रपटसृष्टीतील नावाजलेली मापुस्कर ब्रदर्स जोडी, राजेश मापुस्कर आणि रोहन मापुस्कर, प्रेक्षकांसाठी २०२५ या नववर्षात एक खास चित्रपट घेऊन येत आहेत – ‘एप्रिल मे ९९’. या चित्रपटाच्या निमित्ताने रोहन मापुस्कर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून, चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एप्रिल मे ९९ मापुस्कर ब्रदर्सचा पहिला एकत्रित प्रोजेक्ट आहे. राजेश मापुस्करांचा अनुभव आणि रोहन मापुस्करांचं… Read More नवीन वर्षात मापुस्कर ब्रदर्स घेऊन येत आहेत…‘एप्रिल मे ९९’