खुळ्या भावंडांची इरसाल गोष्ट ‘फसक्लास दाभाडे!’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या चित्रपटांची खासियत म्हणजे ते वास्तववादी असल्याने प्रेक्षक त्याच्याशी एकरूप होऊ शकतात. नुकतेच ‘झिम्मा’ या चित्रपटाचे दोन भाग प्रचंड गाजले. आता आपल्या गावच्या मातीतील चित्रपट घेऊन हेमंत ढोमे पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावरून ‘फसक्लास दाभाडे’ या आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा… Read More खुळ्या भावंडांची इरसाल गोष्ट ‘फसक्लास दाभाडे!’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘नाद’ चित्रपटाचा दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळा संपन्न…

रोमँटिक चित्रपटांनी नेहमीच रसिकांवर मोहिनी घालण्याचं काम केलं आहे. त्यामुळे नेहमीच लेखक-दिग्दर्शकांनाही रुपेरी पडद्यावर सुरेल प्रेमकथा सादर करण्याचा मोह आवरत नाही. ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा नवा कोरा रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. एका हार्ड लव्हस्टोरीला धडाकेबाज अ‍ॅक्शनचा तडका देताना सुमधूर संगीताची जोड देण्याचा प्रयत्न ‘नाद’मध्ये करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरला… Read More ‘नाद’ चित्रपटाचा दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळा संपन्न…

प्रत्येकाच्या मनातील प्रेमगीत ‘स्पंद अंतरीचे’ प्रेक्षकांच्या भेटीला

कपाटावरून किंवा एखाद्या संदुकीतून ५० वर्षांपूर्वीचा जुना अल्बम काढला की, काही क्षण का होईना तो अल्बम आपल्याला त्या काळात घेऊन जातो. मग नकळत त्या आठवणींमध्ये आपण रमतो. काही आठवणी नव्याने उलगडतात. त्या फोटोंवरून हात फिरवताना कित्येक वर्षं पुन्हा जगली जातात. असेच जुन्या आठवणींमध्ये रममाण करणारे ‘स्पंद अंतरीचे…’ हे प्रत्येकाच्या मनातील प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.… Read More प्रत्येकाच्या मनातील प्रेमगीत ‘स्पंद अंतरीचे’ प्रेक्षकांच्या भेटीला

‘लाईक आणि सबस्क्राईब’ सिनेमातून जुई भागवतचे रुपेरी पडद्यावर पदार्पण

काही दिवसांपूर्वीच सोशल मिडीयावर एका चित्रपटाचे उत्सुकता वाढवणारे पोस्टर झळकले होते. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ असे नाव असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, अमेय वाघ आणि आणखी एक चेहरा झळकला होता. काहींनी हा चेहरा ओळखला. तर काहींना हा नवीन चेहरा कोणाचा, असा प्रश्न पडला होता.  तर ही अभिनेत्री आहे, ‘तुमची मुलगी काय करते?’ या मालिकेत महत्वपूर्ण… Read More ‘लाईक आणि सबस्क्राईब’ सिनेमातून जुई भागवतचे रुपेरी पडद्यावर पदार्पण

सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे खेळणार ‘एक डाव भुताचा’

मराठी चित्रपटसृष्टीत मकरंद अनासपूरे, सिद्धार्थ जाधव हे अष्टपैलू अभिनेते म्हणून सुपरिचित आहेत. “दे धक्का” सारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे. आता “एक डाव भूताचा” या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपूरे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव एकत्र आले असून, येत्या ४ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च… Read More सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे खेळणार ‘एक डाव भुताचा’

पुष्कर जोग – आनंद पंडित मोशन पिक्चर्स पुन्हा घेऊन येत आहेत एक जबरदस्त चित्रपट

आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांनी एकत्र येऊन मराठी सिनेसृष्टीला नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपट दिले आहेत. ‘ती आणि ती’, ‘वेल डन बेबी’, ‘व्हिक्टोरिया’, ‘बापमाणूस’ आणि ‘मुसाफिरा’ असे नातेसंबंधांवर भाष्य करणारे सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना दिल्यानंतर पुष्कर जोग आणि आनंद पंडित मोशन पिक्चर्स आपला नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. आनंद पंडित आणि… Read More पुष्कर जोग – आनंद पंडित मोशन पिक्चर्स पुन्हा घेऊन येत आहेत एक जबरदस्त चित्रपट

‘सूर्याची पिल्ले’ नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर

सुनील बर्वे यांनी ‘हर्बेरियम’ उपक्रमांतर्गत काही अभिजात नाटकांचे २५ प्रयोग रंगभूमीवर सादर केले होते. त्यापैकीच एक वसंत कानेटकर लिखित ‘सूर्याची पिल्ले’ हे नाटक. या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला ‘हाऊसफुल्ल’ची पाटी झळकली. इतके प्रेम नाट्यरसिकांनी या नाटकावर केले.  याच प्रेमाखातर ‘सूर्याची पिल्ले’ हे तीन अंकी नाटक रंगभूमीवर येण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. सुबक निर्मित नवनित प्रकाशित… Read More ‘सूर्याची पिल्ले’ नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर

धडाकेबाज ‘फौजी’ १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात

देशभक्तीने प्रेरीत अनेक चित्रपट  पडद्यावर येत असतात. त्यातल्या अनेकांना  प्रेक्षकांचाही  जोरदार पाठिंबा मिळत असतो. आपल्या प्राणांची  बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांप्रती आपलीही निष्ठा तेवढीच मोलाची असते. असाच एक  स्फूर्तीदायक मराठी चित्रपट ‘फौजी’ येत्या १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होत आहे. मातृपितृ फिल्म्स निर्मित घनशाम येडे प्रस्तुत ‘फौजी’चित्रपटात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शौर्याची स्फूर्तीदायक कथा पहायला मिळणार आहे.… Read More धडाकेबाज ‘फौजी’ १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात