अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यातील जबरदस्त जुगलबंदी २ ऑगस्टला पडद्यावर दिसणार

डॉक्टरांचे आधुनिक विचार आणि किरवंतामध्ये खोलवर रुजलेली परंपरेची मुळे या दोघांमधील वैचारिक तफावत दाखवणारा ‘लाईफलाईन’ चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. टिझर पाहून अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यातील जबरदस्त जुगलबंदी पाहाण्यासाठी प्रेक्षक आतुर असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अशोक सराफ, माधव अभ्यंकर, भरत दाभोळकर, हेमांगी कवी, जयवंत वाडकर,… Read More अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यातील जबरदस्त जुगलबंदी २ ऑगस्टला पडद्यावर दिसणार

धनंजय भावलेकर दिग्दर्शित ‘कर्मवीरायण’ उद्या १९ जुलै पासून संपूर्ण महाराष्ट्रात..

‘कर्मवीरायण’ शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहचवण्यासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट, महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीरांची भूमिका साकारली असून, अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेला हा चित्रपट आता उद्या म्हणजे… Read More धनंजय भावलेकर दिग्दर्शित ‘कर्मवीरायण’ उद्या १९ जुलै पासून संपूर्ण महाराष्ट्रात..

डॉ.शरद भुताडिया आणि सुषमा देशपांडे मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र

अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची  ताकद असणारे  ज्येष्ठ अभिनेते डॉ.शरद भुताडिया आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे हे दोन उत्तम कलावंत प्रथमच मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींशी  जोडलेले आणि प्रामुख्याने मराठी  रंगभूमीवर सक्रिय असणारे हे  दोन कलावंत आगामी ‘घरत गणपती’ या  चित्रपटात दिसणार आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेले शरद भुताडिया हे मराठी रंगभूमी आणि… Read More डॉ.शरद भुताडिया आणि सुषमा देशपांडे मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र

‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ गोष्ट… ‘घरत गणपती’

कोकणी माणसाचं आणि गणेशोत्सवाचं अजोड नातं आहे. ‘गणपती’ असा शब्दोच्चार जरी झाला तरी एक वेगळीच लहर कोकणी माणसाच्या मनाला स्पर्शून जाते. कोकणी माणसाला गणपतीत गावची ओढ लागण्याचं आणखी एक कारण कोकणवासी खरोखरच गोतावळा प्रिय असतो. नातेसंबंध जपण्यासाठी, पाहुणचारासाठी त्याची विशिष्ट अशी ओळख आहे. या सणाच्या निमित्ताने  नात्यांचे  बंध जपत  उत्सवाचा आनंद  द्विगुणीत करण्यासाठी याहून अनोखी… Read More ‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ गोष्ट… ‘घरत गणपती’

बॉलीवूड स्टार सोनम कपूर लंडनमध्ये विम्बल्डन महिलांच अंतिम फेरीतील सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणार।

वैश्विक फॅशन आयकन आणि बॉलीवुड स्टार सोनम कपूर 2024 च्या विम्बलडन महिलांच्या अंतिम सामन्यात चमकदार उपस्थिती साठी  सज्ज आहे. ऐतिहासिक ऑल इंग्लंड क्लबमध्ये या वर्षाच्या इव्हेंटमध्ये सोनमची उपस्थिती या प्रतिष्ठित स्थळाला अधिक ग्लॅमर देणार आहे, जे महान टेनिस सामन्यांचे आयोजन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. विम्बलडन चॅम्पियनशिप, जी 1877 मध्ये स्थापन झाली, ही जगातील सर्वात जुनी आणि… Read More बॉलीवूड स्टार सोनम कपूर लंडनमध्ये विम्बल्डन महिलांच अंतिम फेरीतील सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणार।

गोड बातमीची घाई असलेल्यांसाठी, एक नवा, धमाल चित्रपट “एक दोन तीन चार

आजच्या काळातील आजच्या जोडप्यांची कथा आणि व्यथा असलेला “एक दोन तीन चार” या चित्रपटाचा अफलातून असा ट्रेलर आता रिलीझ झालाय. ट्रेलरच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नक्की पुढे काय घडेल हा एक सस्पेन्सच आहे. चित्रपटातील जोडपं, समीर आणि सायलीच्या लव्ह स्टोरीच्या आनंदी आयुष्याचं रूपांतर रोलरकोस्टर राईड प्रमाणे कोणकोणत्या वळणावर जातं याची हिंट हा ट्रेलर पाहिल्यावर आपल्याला येते.… Read More गोड बातमीची घाई असलेल्यांसाठी, एक नवा, धमाल चित्रपट “एक दोन तीन चार

मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्सची घोषणा

ख्यातनाम नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्यनिर्माता, चित्रपटनिर्माता अशा बहुविध भूमिकेतून रसिकांना अखंड रिझवणारे ज्येष्ठ लेखक कै.मधुसूदन कालेलकर यांचं मनोरंजन सृष्टीतील योगदान अमूल्य आहे. कै.मधुसूदन कालेलकर यांच्यानंतर त्यांचे पुत्र सिद्धहस्त लेखक अनिल कालेलकर यांनी वडिलांचा कलेचा वारसा पुढे चालवला. हाच वारसा समर्थपणे पुढे नेण्यासाठी मधुसूदन कालेलकर यांची पुढची पिढी आता सज्ज झाली आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे… Read More मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्सची घोषणा

मल्टीस्टारर “ये रे ये रे पैसा ३” चित्रपटाचं चित्रीकरण मुंबई येथे सुरू

बहुचर्चित “ये रे ये रे पैसा ३” या मल्टिस्टारर चित्रपटात आता अभिनेत्री वनिता खरात, नागेश भोसले, जयवंत वाडकर यांची भर पडली आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त आमदार योगेश टिळेकर, निर्माते/दिग्दर्शक अभिजीत पानसे, मनसे नेते संदीप देशपांडे, नानूभाई जयसिंघानी यांच्या हस्ते संपन्न होऊन चित्रपटाच्या चित्रीकरणला मुंबई येथे सुरुवात झाली. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रद्य… Read More मल्टीस्टारर “ये रे ये रे पैसा ३” चित्रपटाचं चित्रीकरण मुंबई येथे सुरू