पुन्हा एकदा साडे माडे तीन’ च्या चित्रीकरणाचा शुभारंभ

काही दिवसांपूर्वी अंकुश चौधरी दिग्दर्शित  ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली होती. सतरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील कुरळे ब्रदर्सने अवघ्या महाराष्ट्राला आपलेसे केले. आता पुन्हा एकदा हे कुरळे ब्रदर्स धमाका करायला येणार असून नुकताच ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या चित्रीकरणाचा शुभारंभ झाला आहे. सर्वात मोठी स्टार कास्ट या… Read More पुन्हा एकदा साडे माडे तीन’ च्या चित्रीकरणाचा शुभारंभ

गुलाबी’ उलगडणार स्त्रियांच्या भावविश्वाचा रंग

नुकतीच सोशल मीडियावर या चित्रपटाची अनोख्या पद्धतीने तारीख जाहीर केली असून व्हॅायलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘गुलाबी’ चित्रपट येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर, स्वप्नील भामरे निर्माते आहेत. ‘गुलाबी’ चित्रपटात श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, सुहास जोशी, शैलेश दातार, अभ्यंग कुवळेकर… Read More गुलाबी’ उलगडणार स्त्रियांच्या भावविश्वाचा रंग

‘पुन्हा एकदा चौरंग’ चित्रपटाचा टिझर आणि पोस्टर प्रदर्शित…

मराठी सिनेसृष्टीला ज्वलंत विषयावर वास्तवदर्शी चित्रपट बनवण्याची फार मोठी परंपरा आहे. आजवर अनेक सिनेमांनी समाजातील दाहक विषय मोठया पडद्यावर मांडत समाजाला आरसा दाखवला आहे. याच वाटेवरील असलेला ‘पुन्हा एकदा चौरंग’ हा आगामी मराठी चित्रपट एका ज्वलंत विषयाला वाचा फोडणार आहे. ‘पुन्हा एकदा चौरंग’ या सिनेमाचा टिझर आणि पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘आता मेणबत्ती… Read More ‘पुन्हा एकदा चौरंग’ चित्रपटाचा टिझर आणि पोस्टर प्रदर्शित…

पाण्याच्या बाटलीवर नवसाचा नवरा 😃

“नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटाची गाणी, टीजर, ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यात आता या चित्रपटाला अनोखा मान मिळाला आहे. हा चित्रपट आता  सुप्रसिद्ध अशा पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या बॉटलवर झळकत असून याची चर्चा चांगलीच रंगली आहे. “नवरा माझा नवसाचा 2” हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. सुश्रिया चित्र… Read More पाण्याच्या बाटलीवर नवसाचा नवरा 😃

‘येक नंबर’च्या टिझरमधील ‘त्या’ आवाजाने वेधले सर्वांचे लक्ष

सुरुवातीलाच प्रचंड जनसमुदायाने भरलेली सभा…  महाराष्टाच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची झलक… जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो, हा अवघ्या महाराष्ट्राच्या ओळखीचा कणखर आवाज… उत्साह… दिसत आहे. तर दुसऱ्या क्षणी दंगल, मारामारी, जाळपोळ, धुडगूस दिसत असून ‘ठाकरे साहेब’ असा हलकासा आवाजही कानावर येत आहे. झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’… Read More ‘येक नंबर’च्या टिझरमधील ‘त्या’ आवाजाने वेधले सर्वांचे लक्ष

फुलवंती चित्रपटातील भव्यदिव्य टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

पुनवेच्या तारांगणी शुक्राची मी चांदणी लखलखत्या तेजाची, झगमगत्या रूपाची…. रंभा जणू मी देखणी”.. असे म्हणत आपल्या मनमोहक अदाकारीने आणि नृत्याने सर्वांना भुरळ पाडायला ‘फुलवंती’च्या रूपात आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी; ११ ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहात. पेशवाईत लोककला आणि लोककलावंत ह्यांना मोठा राजश्रय मिळत असे, ह्याच काळात ‘फुलवंती’ आपली कला सादर करण्यासाठी मुघल दरबारात हजर… Read More फुलवंती चित्रपटातील भव्यदिव्य टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

लाडक्या “बाप्पाचा बोलबाला”

दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवात येणारी नवनवी गाणी गणेशभक्तांना फार आनंद देतात. पण मात्र, यंदाच्या गणेशोत्सवात “बाप्पाचा बोलबाला” हे गाणं सगळीकडे वाजणार आणि गाजणार सुद्धा आहे. “बाप्पाचा बोलबाला” हा म्युझिक व्हिडिओ नुकताच लाँच करण्यात आला आहे. पॉवर पॅक्ड आणि एनर्जी ने भरपूर असा हा गणेशाचा ट्रॅक असून या गाण्याचे गायक संगीतकार स्वरूप भालवणकर हे आहेत.… Read More लाडक्या “बाप्पाचा बोलबाला”

२७ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या “धर्मवीर – २” चा धडाकेबाज नवा ट्रेलर लाँच

‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा’ अशी थेट आणि स्पष्ट गर्जना करणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर “धर्मवीर – २” या चित्रपटात उलगडणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे अंगावर अक्षरशः काटा येत असून २७  सप्टेंबरला “धर्मवीर – २” प्रदर्शित होण्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. “धर्मवीर -२” या चित्रपटाची निर्मिती झी… Read More २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या “धर्मवीर – २” चा धडाकेबाज नवा ट्रेलर लाँच