आशु आणि नेहाच्या लग्नात शिवा कोणता धुमाकूळ घालेल ?

‘शिवा’ या मालिकेत लवकरच आशु आणि नेहाच्या लग्नाची शहनाही वाजणार आहे. सीताई आणि किर्ती आनंदात आहेत, पण रामभाऊ, लक्ष्मण, आणि उर्मिला यांची नाराजी उघड झाली आहे. मात्र, या सगळ्यात शिवा खूप खुश आहे. ती म्हणते, “आशु काय करतोय हे त्याला अजून कळत नाहीये, पण मला खात्री आहे की हळूहळू त्याला माझ्याबद्दलच्या भावना जाणवतील.” शिवा तिच्या… Read More आशु आणि नेहाच्या लग्नात शिवा कोणता धुमाकूळ घालेल ?

स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत रंगणार श्री आणि सौ स्पर्धा

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आता या मालिकेत प्रेक्षकांना रंगतदार श्री आणि सौ स्पर्धा पाहायला मिळणार आहे. मुळशी परिसरातील उद्योजकांसह जानकी-ऋषिकेश, ऐश्वर्या-सारंग, आणि अवंतिका-सौमित्र या तीन प्रमुख जोड्या या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत २५ लाख रुपयांचं बक्षीस विजेत्या जोडीला जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे या स्पर्धेकडे… Read More स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत रंगणार श्री आणि सौ स्पर्धा

‘इलू इलू’ ३१ जानेवारीला चित्रपटगृहात

प्रेम म्हणजे मनाला लागलेली मोरपीसी चाहूल. प्रेम अनावधानाने, चोरपावलांनी अलगद येते आयुष्यात. सुंदर क्षणांची आठवण असणारे प्रेम कित्येकांसाठी आयुष्यभराची साठवणदेखील असते. पहिल्या प्रेमाची अनुभूती आपल्यातील प्रत्येकानेच कधी ना कधी घेतलेली असतेच. या प्रेमाची आठवण विसरता येत नाही. आपण आयुष्यात पुढे जातो, पण या आठवणी आपल्या कायम सोबत असतात. प्रेमाच्या याच अलवार भावनेची हलकी झुळूक घेऊन… Read More ‘इलू इलू’ ३१ जानेवारीला चित्रपटगृहात

नाशिकच्या गोदा आरतीमधे तल्लीन झाले ‘सावली होईन सुखाची’ मालिकेचे कलाकार

‘सावली होईन सुखाची’ या मालिकेत बघायला मिळणार गोदावरीची महाआरती ‘सन मराठी’ वरील ‘सावली होईन सुखाची’ मालिकेच्या नव्या पर्वात राधा म्हणजेच बिट्टी आणि विराजस यांची मैत्री अधिक फुलताना पाहायला मिळते. मात्र मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. राधा आणि विराजस यांच्या मैत्रीत एक वेगळं वळण येणार असल्याचं संकेत मिळत आहेत. विराजसला वडिलांच्या अटी आणि बिझनेसच्या जबाबदाऱ्यांमुळे बिट्टीसोबत… Read More नाशिकच्या गोदा आरतीमधे तल्लीन झाले ‘सावली होईन सुखाची’ मालिकेचे कलाकार

‘सन मराठी’कडून महिला पोलिसांच्या कार्याला सलाम

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘सन मराठी’ वाहिनीकडून महिला पोलिसांना त्यांच्या निस्वार्थ सेवेबद्दल अनोखी मानवंदना देण्यात आली. देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही क्षण निवांतपणे जगता यावेत, या उद्देशाने ‘सोहळा सख्यांचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात महिला पोलिसांना साडी आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, या महिलांना… Read More ‘सन मराठी’कडून महिला पोलिसांच्या कार्याला सलाम

रामराज्याच्या दिशेने नवे पाऊल : ‘मिशन अयोध्या’ २४ जानेवारीपासून चित्रपटगृहात!

मुंबई, २२ जाने., (प्रतिनिधी): अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण वर्षपूर्तीचे औचित्य साधत, शुक्रवार २४ जानेवारी २०२५ पासून ‘मिशन अयोध्या’ हा बहुचर्चित चित्रपट महाराष्ट्रभरातील १०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. प्रभू श्रीरामांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या रामराज्याची संकल्पना पुढे नेण्यासाठी प्रेरणादायी ठरणारा हा चित्रपट त्याच्या सशक्त कथेमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यातही अव्वल आहे. एक… Read More रामराज्याच्या दिशेने नवे पाऊल : ‘मिशन अयोध्या’ २४ जानेवारीपासून चित्रपटगृहात!

गाव सोडून शहराकडे जाणाऱ्या तरुणाईसाठी, ‘गाव बोलावतो’; मोशन पोस्टर रिलीज

सध्या गावातील अनेक तरुण शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने शहराकडे वळताना दिसतात. यामुळे अनेक गावांमध्ये फक्त वयस्कर लोक शिल्लक राहतात आणि गावांमध्ये प्रगतीचा अभाव जाणवतो. शहरं झपाट्याने प्रगत होत असताना, गावं मात्र ओसाड होताना दिसत आहेत. याच गंभीर विषयावर भाष्य करणारा ‘गाव बोलावतो’ हा चित्रपट ७ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण… Read More गाव सोडून शहराकडे जाणाऱ्या तरुणाईसाठी, ‘गाव बोलावतो’; मोशन पोस्टर रिलीज

स ला ते स ला ना ते’मध्ये उपेंद्र लिमये झळकणार

जोगवा, ॲनिमल अशा अनेक चित्रपटांतून दमदार अभिनय केलेले उपेंद्र लिमये आता ‘स ला ते स ला ना ते’ या अनोख्या नावाच्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. उपेंद्र लिमये यांनी नेहमीच भूमिकांमधील वैविध्य जपत उत्तम अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. या चित्रपटात ते हसनभाईची भूमिका साकारणार असून, त्यांची भूमिका कशी असेल याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. चित्रपटाची निर्मिती… Read More स ला ते स ला ना ते’मध्ये उपेंद्र लिमये झळकणार