‘फसक्लास दाभाडे’मधील धमाल ‘यल्लो यल्लो’ गाणं प्रदर्शित.

सध्या सगळीकडे लग्नसराईचा हंगाम सुरू असून लग्नातील हळदी समारंभ हा सर्वात खास आणि धमाल समारंभ असतो. याच धमाल वातावरणात, ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटातील ‘यल्लो यल्लो’ गाणं एक नवा रंग घेऊन आलं आहे. नुकताच दाभाडे कुटुंबियांच्या घरातील हळदी सोहळा मोठ्या दणक्यात पार पडला. यानिमित्ताने ‘यल्लो यल्लो’ हे हळदीचे खास गाणंही प्रदर्शित करण्यात आलं. या सोहळ्यात दाभाडे कुटुंबाने… Read More ‘फसक्लास दाभाडे’मधील धमाल ‘यल्लो यल्लो’ गाणं प्रदर्शित.

लग्नाची नवी परिभाषा सांगणारा ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

शुभम फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, ट्रेलर पाहून या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता आता प्रचंड वाढली आहे. खरंतर टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात कुतूहल होते. ‘लग्न’संस्थेबाबतचे आधुनिक काळाचे विचार अतिशय हलक्याफुलक्या आणि मजेशीर पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आल्याचे टिझरमध्ये दिसत होते. आता ट्रेलर पाहून  या… Read More लग्नाची नवी परिभाषा सांगणारा ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

आठवणीतल्या पहिल्या प्रेमाची गोष्ट ‘इलू इलू’

पहिल्या प्रेमाच्या आठवणींचा एक हळवा कोपरा प्रत्येकजण आपल्या मनात सदैव जपत असतो. मनाच्या कोपऱ्यातील या गोड आठवणी आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर सदैव आपल्या सोबत असतात. कधीतरी या गोड आठवणींनी मन हळवं होतं. त्या पहिल्या नजरेने, पहिल्या स्पर्शाने झालेलं ‘इलू इलू’ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतं. प्रेमाच्या याच अलवार भावनेची हलकी झुळूक घेऊन प्रत्येकाच्या मनात दडलेल्या पहिल्या… Read More आठवणीतल्या पहिल्या प्रेमाची गोष्ट ‘इलू इलू’

सैराट’ मधील आर्चीचा नवा सिनेमा.. ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. नुकताच जिजाई चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात ‘सैराट फेम’ रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर अपूर्वा… Read More सैराट’ मधील आर्चीचा नवा सिनेमा.. ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

चाळीस वर्षांनी ‘पुरुष’ पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी

जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘पुरुष’ या नाटकाने एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवली. स्त्री- पुरुष संबंध, सामाजिक विषमता आणि स्त्री च्या संघर्षाची कथा यात दाखवण्यात आली होती. नाटकातील संवेदनशील आणि सामाजिक संवादामुळे त्यावेळी हे नाटक मराठी रंगभूमीवर एक मैलाचा दगड ठरले होते. मराठी रंगभूमीवरील ही महत्वपूर्ण कलाकृती सुमारे चाळीस वर्षांनंतर नाट्यप्रेमींना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.… Read More चाळीस वर्षांनी ‘पुरुष’ पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी संगीतमय चित्रपट ‘संगीत मानापमान’ चा भव्य म्युझिक लाँच सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न !

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२४ : मायानगरी मुंबईत, जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मॅग्नम ऑपस संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” चा ग्रँड म्यूझिक लाँच सोहळा पार पडला. १० जानेवारी २०२५ ला “संगीत मानापमान” हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा म्हणजे कला, संस्कृती आणि संगीताचा एक उत्सव. चित्रपटात शंकर-एहसान-लॉय या संगीत विश्वातील दिग्गज त्रिकुटानी संगीतबद्ध… Read More जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी संगीतमय चित्रपट ‘संगीत मानापमान’ चा भव्य म्युझिक लाँच सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न !

‘श्री गणेशा’ चित्रपटातील ‘मधुबाला…’ प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये ‘श्री गणेशा’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. मराठीतील आगळा वेगळा रोड मूव्ही असलेल्या या चित्रपटाच्या मोशन पोस्टरने सुरुवातीलाच लक्ष वेधल्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टिझरने उत्सुकता वाढवली. आता या चित्रपटातील नवे कोरे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. फॅमिली एन्टरटेनर रोड मूव्ही असलेल्या ‘श्री गणेशा’मधील ‘आली मधुबाला…’ हे गाणे संगीतप्रेमींचा आनंद द्विगुणीत… Read More ‘श्री गणेशा’ चित्रपटातील ‘मधुबाला…’ प्रेक्षकांच्या भेटीला

शंकर महादेवन, महेश काळे आणि राहुल देशपांडे या संगीतातील तीन उस्तादांच “वंदन हो” मानापमान चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

संगीत नाटके हा मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ मानला जातो आणि हीच परंपरा जपत, संगीत मानापमान या अजरामर नाटकावरून प्रेरीत लवकरच प्रदर्शित होणाऱ्या “संगीत मानापमान” या सिनेमाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव पडद्यावर पहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा एक अप्रतिम टिझर रोहित शेट्टीच्या “सिंघम अगेन” या सिनेमासोबत रिलीज झाला होता ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.… Read More शंकर महादेवन, महेश काळे आणि राहुल देशपांडे या संगीतातील तीन उस्तादांच “वंदन हो” मानापमान चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला