चित्रपट निर्मितीच्या सुविधा आता एकाच छताखाली!

फिल्मसिटीमध्ये कॅमेरा टू क्लाउड व्यवस्था उभारणार; इफ्फी बाजारच्या नॉलेज सिरीज परिसंवादात स्वाती म्हसे पाटील यांचे प्रतिपादन पणजी २३: महाराष्ट्रातील विविध लोकेशन्स चित्रीकरणासाठी अत्यंत अनुकूल असल्याने देश-विदेशातील चित्रपटकर्मींची महाराष्ट्राला कायमच विशेष पसंती आहे. याच पार्श्वभूमीवर आता फिल्मसिटीमध्ये कॅमेरा टू क्लाउड प्रणाली उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वित होत असल्याची घोषणा महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय… Read More चित्रपट निर्मितीच्या सुविधा आता एकाच छताखाली!

व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते झाले चित्रनगरीच्या स्टॉलचे उद्घाटन

माध्यमकर्मी व चित्रकर्मींसोबत साधला संवाद पणजी, २२ — देशविदेशातील चित्रपटकर्मी, भारतीय प्रादेशिक चित्रपटांचे प्रतिनिधी, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या उत्साही उपस्थितीमुळे ५६ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गजबजून गेला आहे. या महोत्सवातील वेव्हज फिल्म बाजार विभागात दादासाहेब फाळके चित्रनगरीने उभारलेला आकर्षक आणि भव्य स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या… Read More व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते झाले चित्रनगरीच्या स्टॉलचे उद्घाटन

चित्रनगरीच्या `बाप्पा’च्या मंडपात मराठी कलाकारांचा सन्मान!

दादासाहेब फाळके चित्रनगरीत रंगला चित्रसंवाद मुंबई, ता. ३ : दादासाहेब फाळके चित्रनगरीची परंपरा असलेल्या गणेशोत्सवात आयोजित केलेल्या चित्रसंवाद कार्यक्रमात व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते मराठी कलाकार व माध्यमकर्मींचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम चित्रनगरीच्या `बाप्पा’च्या मंडपात मोठ्या उत्साहात पार पडला. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जायंदाच्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने राज्यभरात गणपती महोत्सव मोठ्या… Read More चित्रनगरीच्या `बाप्पा’च्या मंडपात मराठी कलाकारांचा सन्मान!