रीलस्टार’मध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार भूषण मंजुळे

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच विविधांगी विषयावर चित्रपट बनत असतात. यापैकी काही चित्रपट फुल टू मनोरंजन करणारे विनोदी, तर काही मनोरंजनासोबतच प्रबोधन करणारेही असतात. समाजातील वास्तव चित्र दाखवताना प्रेक्षकांचं सहकुटुंब परीपूर्ण मनोरंजनही करणाऱ्या ‘रीलस्टार’ या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे दुसरे शेड्यूल सध्या सुरू असून या चित्रपटात एक असा चेहरा मुख्य भूमिकेत झळकणार आहे, ज्याने आजवर काही गाजलेल्या… Read More रीलस्टार’मध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार भूषण मंजुळे

जुनं फर्निचर’चा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात संपन्न

काय अपेक्षा आहेत आमच्या अशा त्यांच्याकडून… दिवसातून एकदा आमच्या खांद्यावरून हात फिरवून विचार ना.. आई कशी आहेस? बाबा कसे आहात? मन सुन्न करणारे हे वाक्य नकळत डोळ्यांच्या कडा पाणावणारे आहे. आपल्याकडे अनेकदा वयस्कर व्यक्तींना आऊटडेटेड, अडगळीतले सामान असे म्हटले जाते. परंतु याच सामानाची किंमत आणि ताकद काय आहे, हे सांगणारा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी… Read More जुनं फर्निचर’चा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात संपन्न

प्रथमेश परब म्हणतोय ‘होय महाराजा’…

मराठी चित्रपट आज जगभरातील प्रेक्षकांवर मोहिनी घालण्याचं काम करत आहेत. देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांसोबतच पुरस्कार सोहळ्यांमध्येही मराठी चित्रपटांची सरशी होत असून, आशयघन मराठी सिनेमे तिकिटबारीवरही गर्दी खेचत आहेत. अशाच प्रकारची काहीशी कामगिरी करणारा तसेच एका पेक्षा एक अफलातून विनोदवीरांची मांदियाळी असलेल्या चित्रपटाची गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घोषणा करण्यात आली आहे. ‘होय महाराजा’ असं शीर्षक असलेला हा… Read More प्रथमेश परब म्हणतोय ‘होय महाराजा’…

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘नाद – द हार्ड लव्ह’चा फर्स्ट लूक प्रदर्शित…

गुढीपाडव्याच्या मूहूर्तावर नवोन्मेषाची गुढी उभारून हिंदू नववर्षाचं स्वागत करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. आजही त्या परंपरेचं मोठ्या उत्साहानं, जल्लोषात आणि आत्मीयतेनं पालन केलं जातं. या दिवशी मराठी सिनेसृष्टीतही बऱ्याच नावीन्यपूर्ण गोष्टी घडत असतात. ‘नाद – द हार्ड लव्ह’  या आगामी महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवसाचं औचित्य साधत रिलीज… Read More गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘नाद – द हार्ड लव्ह’चा फर्स्ट लूक प्रदर्शित…

मुखवट्यांचा “बोहाडा” येतोय प्राचीन रुढीची परंपरा आणि नव्याची गुढी बांधायला..

वेगवेगळे मुखवटे धारण करत.. माणसाचा खरा चेहरा त्याला दाखवणारा सगळ्यात मोठा देव म्हणजे निसर्ग.. आणि ह्या निसर्गाचा गौरव, भारतीय  पुराणातील भव्य दिव्य मुखवट्यांना पूजून  करायचा उत्सव म्हणजे “बोहाडा” २०२५ या वर्षात भेटीला येणाऱ्या   बोहाड्या ची घोषणा नुकतीच करण्यात आली असून दाक्षिणात्य निर्माता मणीगंडन मंजुनाथन ‘बोहाडा’ची निर्मिती करणार आहेत. राहुल सतिश पाटील, कृतिका तुळसकर देवरूखकर सहनिर्मिती,… Read More मुखवट्यांचा “बोहाडा” येतोय प्राचीन रुढीची परंपरा आणि नव्याची गुढी बांधायला..

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बहुचर्चित संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान”चे पहिले पोस्टर

जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” चे पहिले पोस्टर आज गुढीपाडव्याचे औचित्य साधून प्रदर्शित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी करताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आणि आज या पोस्टरमध्ये सुबोध भावेंचा चित्रपटातील एक वेगळा लूक आणि… Read More गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बहुचर्चित संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान”चे पहिले पोस्टर

मनोज जरांगे पाटील यांच्या रांगड्या व्यक्तिमत्त्वासारखंच “मर्दमावळा”

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध घेणाऱ्या “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” या चित्रपटाची अवघ्या महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा आहे.  चित्रपटाचा टीजर तसेच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या “उधळीन मी…” या सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या गाण्याला रसिक प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटातलं “मर्दमावळा…: हे धडाकेबाज गाणं लाँच करण्यात… Read More मनोज जरांगे पाटील यांच्या रांगड्या व्यक्तिमत्त्वासारखंच “मर्दमावळा”

परंपरा”च्या निमित्ताने अभिनेते मिलिंद शिंदे आणि वीणा जामकर एकत्र

आपल्या संस्कृतीमध्ये अनेक विविध परंपरा आहेत. या परंपरा पाळताना अनेकदा आर्थिक ओझंही येतं. अशाच एका परंपरेची गोष्ट “परंपरा” या आगामी चित्रपटात मांडली जाणार असून, उत्तम स्टारकास्ट असलेला ‘परंपरा’ हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबोलो यांच्या स्टार गेट मूव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत “परंपरा” या चित्रपटाची निर्मिती करण्यात… Read More परंपरा”च्या निमित्ताने अभिनेते मिलिंद शिंदे आणि वीणा जामकर एकत्र