‘भूमिका’ नाटकात समिधा गुरु एका महत्त्वाकांक्षी गृहिणीच्या सशक्त भूमिकेत दिसणार

‘भूमिका’ नाटकातून अभिनेत्री नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला मनोरंजन क्षेत्रात नेहमीच विचारपूर्वक आणि आशयघन भूमिका साकारणारी समिधा गुरु आता ‘भूमिका’ या नव्या नाटकात ‘उल्का’ या महत्त्वाकांक्षी गृहिणीच्या भूमिकेत झळकणार आहे. क्षितीज पटवर्धन लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित हे नाटक जिगिषा अष्टविनायक निर्मित असून याचा शुभारंभ २८ मार्चपासून रंगमंचावर होतो आहे. उल्का – एक गृहिणी, पण स्वतंत्र… Read More ‘भूमिका’ नाटकात समिधा गुरु एका महत्त्वाकांक्षी गृहिणीच्या सशक्त भूमिकेत दिसणार

अंजू उडाली भुर्र लवकरच बालरंगभूमीवर येणार

गेल्या अनेक वर्षांपासून बालरंगभूमीची सेवा करत आलेले श्री अशोक पावसकर आणि सौ. चित्रा पावसकर हे समर्पित दाम्पत्य आता नव्या जोमाने पुन्हा एकदा ‘अंजू उडाली भुर्र’ या गाजलेल्या बालनाट्याचे पुनर्रूपांतरण घेऊन येत आहे. डॉ. सलील सावंत या तरुण निर्मात्याच्या साथीने ‘प्रेरणा थिएटर्स’ निर्मित हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ५५ वर्षांपूर्वी सादर झालेल्या नाटकाचे नव्या रूपात… Read More अंजू उडाली भुर्र लवकरच बालरंगभूमीवर येणार

चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर, २१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर

एखादा कलाकार कितीही मोठा झाला, कितीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले, तरी रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. रंगमंचावर वाजणारी ती तिसरी घंटा, त्यासोबत कलाकाराचं व्यक्तिरेखेत शिरणं, आणि प्रयोगांमधून प्रेक्षकांशी जोडणं — हेच खरं कलाकौशल्याचं व्यासपीठ आहे. सचिन खेडेकर — तब्बल दोन दशके आणि पुन्हा रंगमंचावर मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे सचिन खेडेकर… Read More चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर, २१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर

महेश मांजरेकर यांची ‘फिल्टर कॉफी’

रंगभूमीवर थ्रिलर नाट्याचा नवा स्वाद कॉफीची नजाकत काही वेगळीच! मग ती कोल्ड असो वा हॉट! कॉफीच्या शौकिनांची संख्या कमी नाही. कॉफीचा खरपूस दरवळ जसा घरभर पसरतो, तसाच आता रंगभूमीवर कॉफीचा दरवळ पसरणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी ही ‘फिल्टर कॉफी’ नाट्यरसिकांसाठी आणली आहे. अद्वैत आणि अश्वमी थिएटर्स प्रकाशित महेश वामन मांजरेकर सादर करीत… Read More महेश मांजरेकर यांची ‘फिल्टर कॉफी’

‘रणरागिणी ताराराणी’ नाटकाचा दिमाखदार शुभारंभ

फुलांची मोहक सजावट, मंगल सनई-चौघड्यांचे सूर, आणि शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेले नाट्यरसिक—अशा भारावलेल्या वातावरणात ‘रणरागिणी ताराराणी’ या ऐतिहासिक नाटकाचा भव्य शुभारंभ संपन्न झाला. या प्रसंगी आमदार महेश सावंत, निर्माता-दिग्दर्शक अशोक हांडे, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, कॅप्टन शिवाजी महाडकर, लेखक सुखद राणे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘रणरागिणी ताराराणी’ नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद नाटकाच्या पहिल्याच… Read More ‘रणरागिणी ताराराणी’ नाटकाचा दिमाखदार शुभारंभ

‘रणरागिणी ताराराणी’ रंगभूमीवर – मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा नव्या पिढीसमोर!

महाराष्ट्राचा गौरवशाली ‘शिवइतिहास’ घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने आणि कर्त्या व्यक्तींच्या असामान्य कर्तृत्वाने! त्यात कर्त्या स्त्रियांचादेखील महत्त्वाचा सहभाग होता. अशाच एका पराक्रमी महाराणी ताराराणींचा इतिहास आता मराठी रंगभूमीवर भव्य नाट्यरूपात उलगडणार आहे! आपल्या कर्तबगारीने मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या रणरागिणी ताराराणी यांच्या इतिहासावर आधारित नाटकाची निर्मिती श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ(ट्रस्ट) यांच्या सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटीने केली आहे.… Read More ‘रणरागिणी ताराराणी’ रंगभूमीवर – मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा नव्या पिढीसमोर!

कोण म्हणतं येणार नाही!’.. मराठी रंगभूमीवरील कौटुंबिक अ’राजकीय’ धमाल विनोदी नाटक

‘भद्रकाली प्रॉडक्शन्स’ तर्फे आतापर्यंत ५८ वैविध्यपूर्ण नाट्यकृतींची निर्मिती झाली. आता नुकतीच ‘भद्रकाली ‘ तर्फे ५९ वी नाट्यकृती जाहीर केली. मराठी रंगभूमीवरील कौटुंबिक अ’राजकीय’ धमाल विनोदी नाटक….” कोण म्हणतं येणार नाही! “ २०२५ मध्ये रंगभूमीवर दाखल होणार आहे. या विनोदी नाटकाचे लेखन चैतन्य सरदेशपांडे याचे असून दिग्दर्शन गणेश पंडित करणार आहेत.याविषयी सांगताना ‘ भद्रकाली ‘ चे… Read More कोण म्हणतं येणार नाही!’.. मराठी रंगभूमीवरील कौटुंबिक अ’राजकीय’ धमाल विनोदी नाटक

चाळीस वर्षांनी ‘पुरुष’ पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी

जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘पुरुष’ या नाटकाने एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवली. स्त्री- पुरुष संबंध, सामाजिक विषमता आणि स्त्री च्या संघर्षाची कथा यात दाखवण्यात आली होती. नाटकातील संवेदनशील आणि सामाजिक संवादामुळे त्यावेळी हे नाटक मराठी रंगभूमीवर एक मैलाचा दगड ठरले होते. मराठी रंगभूमीवरील ही महत्वपूर्ण कलाकृती सुमारे चाळीस वर्षांनंतर नाट्यप्रेमींना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.… Read More चाळीस वर्षांनी ‘पुरुष’ पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी