धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार…

१५ नोव्हेंबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा प्रेमाची नवी व्याख्या सांगणारा चित्रपट खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांच्या कक्षा रुंदावणारा ठरणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’च्या रूपात दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेला संगीतप्रधान रोमँटिक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेद्वारे महाराष्ट्राच्या घरोघरी लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड… Read More धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार…

‘नाद’ चित्रपटाचा अ‍ॅक्शनपॅक्ड ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपटांची परंपरा खऱ्या अर्थाने जपत रसिकांचे परिपूर्ण मनोरंजन करणारा ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा मराठी चित्रपट २५ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची चुणूक दाखवणाऱ्या टिझरनंतर रिलीज झालेल्या अ‍ॅक्शनपॅक्ड ट्रेलरने खऱ्या अर्थाने लक्ष वेधण्याचे काम केले आहे. अलिकडच्या काळात मराठी सिनेसृष्टीत बनणाऱ्या विविधांगी आणि नावीन्यपूर्ण चित्रपटांपैकी एक… Read More ‘नाद’ चित्रपटाचा अ‍ॅक्शनपॅक्ड ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

‘नाद’ चित्रपट २५ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

घोषणा झाल्यापासून ‘नाद – द हार्ड लव्ह’  हा मराठी चित्रपट सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर या चित्रपटाचा लक्षवेधी टिझर रसिकांच्या भेटीला आला आहे. ‘नाद’चा टिझर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. खऱ्या अर्थाने चित्रपटाची झलक दाखवणारा टिझर ‘नाद’मध्ये प्रेक्षकांना एक संगीतमय प्रेमकथा पाहायला मिळणार असल्याचे संकेत देतो. चित्रपटाच्या शीर्षकासोबत असलेल्या… Read More ‘नाद’ चित्रपट २५ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘नाद – द हार्ड लव्ह’चा फर्स्ट लूक प्रदर्शित…

गुढीपाडव्याच्या मूहूर्तावर नवोन्मेषाची गुढी उभारून हिंदू नववर्षाचं स्वागत करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. आजही त्या परंपरेचं मोठ्या उत्साहानं, जल्लोषात आणि आत्मीयतेनं पालन केलं जातं. या दिवशी मराठी सिनेसृष्टीतही बऱ्याच नावीन्यपूर्ण गोष्टी घडत असतात. ‘नाद – द हार्ड लव्ह’  या आगामी महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवसाचं औचित्य साधत रिलीज… Read More गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘नाद – द हार्ड लव्ह’चा फर्स्ट लूक प्रदर्शित…