२१ मार्चपासून आर्ची – परश्या भेटीला येणार — ‘सैराट’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर

झी स्टुडिओज आणि आटपाट निर्मित ‘सैराट’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत एक अजरामर इतिहास रचला. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सशक्त दिग्दर्शनाखाली साकारलेली ही हृदयस्पर्शी प्रेमकथा केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. आता हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असून, २१ मार्चपासून ‘सैराट’ पुन्हा चित्रपटगृहांत प्रदर्शित होतो आहे. १००… Read More २१ मार्चपासून आर्ची – परश्या भेटीला येणार — ‘सैराट’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर

रीलस्टार’मध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार भूषण मंजुळे

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच विविधांगी विषयावर चित्रपट बनत असतात. यापैकी काही चित्रपट फुल टू मनोरंजन करणारे विनोदी, तर काही मनोरंजनासोबतच प्रबोधन करणारेही असतात. समाजातील वास्तव चित्र दाखवताना प्रेक्षकांचं सहकुटुंब परीपूर्ण मनोरंजनही करणाऱ्या ‘रीलस्टार’ या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे दुसरे शेड्यूल सध्या सुरू असून या चित्रपटात एक असा चेहरा मुख्य भूमिकेत झळकणार आहे, ज्याने आजवर काही गाजलेल्या… Read More रीलस्टार’मध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार भूषण मंजुळे