‘राणा दा’चा आता नवा स्वॅग; ‘द ट्रॅप’मध्ये दिसणार हार्दिक जोशीचा भलताच अंदाज

हार्दिक जोशीसह ‘द ट्रॅप’मधून नवोदित अभिनेता सुजित जाधवची दमदार एंट्री मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय आणि डॅशिंग अभिनेता हार्दिक जोशी पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित ‘द ट्रॅप’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून, या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. पोस्टरमधील… Read More ‘राणा दा’चा आता नवा स्वॅग; ‘द ट्रॅप’मध्ये दिसणार हार्दिक जोशीचा भलताच अंदाज

“फुला” चित्रपटातून अस्सल संगीताची मेजवानी

संगीतमय “फुला” चित्रपटाचा पोस्टर आणि संगीत प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीचा वेध घेत एका स्त्रीची कहाणी “फुला” या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अस्सल लोकसंगीताची मेजवानी देणाऱ्या या चित्रपटात बऱ्याच काळानंतर सात गाण्यांचा भरभक्कम अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातील नवोदित तरुणांनी एकत्र येऊन हा चित्रपट साकारला असून त्यांच्या या… Read More “फुला” चित्रपटातून अस्सल संगीताची मेजवानी

‘आपली यारी… गावावर भारी!’

‘पिफ्फ’मध्ये तिहेरी सन्मान पटकावलेला ‘बाप्या’ १५ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवलेला आणि अनोख्या संकल्पनेमुळे चर्चेत असलेला ‘बाप्या’ हा आगळावेगळा मराठी चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. ‘आपली यारी… गावावर भारी!’ अशी हटके टॅगलाईन असलेला हा चित्रपट १५ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत… Read More ‘आपली यारी… गावावर भारी!’

पोलिसांच्या वर्दीत पूजा सावंतचा जबरदस्त अंदाज

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पूजा सावंत मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणे तसं दुर्मिळच मानलं जातं. मात्र आगामी ‘सालबर्डी’ या चित्रपटात ही चौकट मोडत अभिनेत्री पूजा सावंत एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. पी.आय. मनोरमा प्रधान असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असून नुकताच या चित्रपटाचा दमदार टिझर आणि कलाकारांचे प्रभावी… Read More पोलिसांच्या वर्दीत पूजा सावंतचा जबरदस्त अंदाज

स्वतंत्र, सक्षम स्त्रीचा संदेश देत ‘तिघी’ टीमची कॅन्सर प्रतिबंध मोहिमेत भागीदारी

स्त्री सशक्तीकरणाचा ठाम संदेश देत ‘तिघी’चे महाराष्ट्रभर जोरदार प्रमोशन स्त्रीच्या भावविश्वाचा, तिच्या स्वाभिमानाचा आणि तिच्या अंतर्गत ताकदीचा वेध घेणाऱ्या ‘तिघी’ या चित्रपटाचे महाराष्ट्रभर जोरदार प्रमोशन सुरू आहे. आई-मुलींच्या नात्याची भावनिक कथा सांगणारा हा चित्रपट केवळ नात्यांचा प्रवास नाही, तर तो स्त्री सशक्तीकरणाचा ठाम संदेश देणारा आहे. याच विचारांशी सुसंगत पाऊल टाकत *‘तिघी’*च्या टीमने पुण्यातील रूबी… Read More स्वतंत्र, सक्षम स्त्रीचा संदेश देत ‘तिघी’ टीमची कॅन्सर प्रतिबंध मोहिमेत भागीदारी

स्वावलंबी ज्येष्ठांसोबत ‘तिघी’ टीमची रंगली सात्विक होळी

स्त्रीच्या स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा ठाम संदेश देणाऱ्या ‘तिघी’ चित्रपटाच्या टीमने यंदाची होळी एका अर्थपूर्ण उपक्रमातून साजरी केली. पुण्यातील ‘मातोश्री ओल्डएज होम’ येथे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसोबत भारती आचरेकर, नेहा पेंडसे बायस, सोनाली कुलकर्णी आणि दिग्दर्शिका जिजीविषा काळे यांनी रंग, गाणी आणि आनंदाची उधळण करत एक वेगळाच संदेश दिला. स्वाभिमान आणि स्वावलंबनाचा ठाम विचार ‘तिघी’मध्ये ज्येष्ठ, स्वाभिमानी… Read More स्वावलंबी ज्येष्ठांसोबत ‘तिघी’ टीमची रंगली सात्विक होळी

प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय तुंबाडची मंजुळा

झी स्टुडिओजच्या नव्या रहस्यमय चित्रपटाची घोषणा; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो निसर्गरम्य सागरकिनारा, हिरवाईने नटलेली डोंगररांग आणि गावागावांत फिरणाऱ्या गूढ, रहस्यमय कथा. भूत-प्रेतांच्या गोष्टी, चुलीपाशी रंगणाऱ्या गजाली आणि वीतभर घडलेली गोष्ट हातभर करून सांगण्याची गावकुसातील शैली — या सगळ्या वातावरणातून एक नवा चित्रपट आकाराला येत आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत ‘तुंबाडची… Read More प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय तुंबाडची मंजुळा

नव्या मराठी कलाकृतीसाठी मनवा नाईक आणि गौरी कालेलकर-चौधरी एकत्र

सर्जनशील मनं एकत्र आली की कलाकृतीला नवी उंची मिळते, आणि असाच एक सुंदर योग आता मराठी मनोरंजन विश्वात घडतो आहे. निर्माते सिद्धेश चौधरी, गौरी कालेलकर-चौधरी आणि लेखिका-दिग्दर्शिका-अभिनेत्री मनवा नाईक हे तिघे पहिल्यांदाच एका नव्या मराठी चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. या नव्या कलाकृतीमुळे मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळी आणि उत्सुकता वाढवणारी घडामोड घडताना दिसत आहे. माघी गणेश… Read More नव्या मराठी कलाकृतीसाठी मनवा नाईक आणि गौरी कालेलकर-चौधरी एकत्र