संगीतप्रधान ‘अष्टपदी’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित

३० मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘अष्टपदी’ चित्रपटाबाबत रसिकांमध्ये वाढली उत्सुकता ‘अष्टपदी’ या संगीतप्रधान मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, रसिकांच्या मनात चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. ३० मे २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होत असून, संगीत, प्रेम आणि भावनांच्या संमिश्रतेची ही कलाकृती रसिकांच्या मनावर गारुड घालणार आहे. काव्यगंध आणि सुमधूर… Read More संगीतप्रधान ‘अष्टपदी’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित

सत्य घटनेवर आधारित ‘शातिर: द बिगिनिंग’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

‘…तर ही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल’ या जबरदस्त संवादाने सुरुवात करणारा ‘शातिर: द बिगिनिंग’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. २३ मे २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात वास्तवात घडलेल्या अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांचे भेदक दर्शन घडणार आहे. समाजमन हेलावणारी कहाणी… Read More सत्य घटनेवर आधारित ‘शातिर: द बिगिनिंग’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

‘एप्रिल मे ९९’ आता २३ मे रोजी होणार प्रदर्शित

उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टाल्जिक सफर मोठ्या पडद्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणी जागवणारा आणि ९० च्या दशकातील बालमैत्रीचा सुगंध घेऊन येणारा ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट अखेर २३ मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि गाण्यांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. स्मार्टफोन नसलेली ती मजेशीर पिढी… Read More ‘एप्रिल मे ९९’ आता २३ मे रोजी होणार प्रदर्शित

भावनांची भटकंती! – ‘बंजारा’ मधील टायटल साँग प्रदर्शित

मैत्री, निसर्ग आणि आत्मशोधाचा भावस्पर्शी संगम मैत्रीचा आणि निसर्गाच्या साक्षीने घडलेल्या भटकंतीचा सुरेल अनुभव देणारे ‘बंजारा’ चित्रपटाचे टायटल सॉंग नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘बंजारा’ या शब्दातच भटकंती, मुक्तता आणि अनुभवांची एक भावनात्मक खोली आहे. हे गाणे या भावनांना सुस्पष्ट करत, प्रेक्षकांना एका अंतर्मुख करणाऱ्या प्रवासावर घेऊन जाते. संगीताची आत्मा – अवधूत गुप्ते, विशाल दादलानी आणि… Read More भावनांची भटकंती! – ‘बंजारा’ मधील टायटल साँग प्रदर्शित

एका घटस्फोटाची धमाल गोष्ट २३ मेपासून मोठ्या पडद्यावर

‘मंगलाष्टका रिटर्न्स’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित लग्नाच्या थाटामाटाबद्दल अनेक चित्रपटांतून कथा पाहायला मिळाल्या असल्या, तरी घटस्फोटाचं सेलिब्रेशन अशी भन्नाट कल्पना घेऊन येणारा ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ हा चित्रपट २३ मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सुलट प्रेमाची उलट गोष्ट’ अशी हटके टॅगलाइन असलेल्या या चित्रपटाचा धमाल ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. वीरकुमार शहा यांची निर्मिती, योगेश भोसले यांचं… Read More एका घटस्फोटाची धमाल गोष्ट २३ मेपासून मोठ्या पडद्यावर

गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’

गौतमी पाटीलच्या ठसकेबाज अदांनी रंगत आणलीमहाराष्ट्राची लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील हिने या गाण्यात तिच्या खास अदा, नखरे आणि एनर्जीने प्रेक्षकांची मनं पुन्हा एकदा जिंकली आहेत. तिचा हॉट अंदाज, वैशाली सामंत यांचा दमदार आवाज, सुचिर कुलकर्णी यांचं संगीत आणि तरंग वैद्य यांचे बोल यामुळे हे गाणं चांगलंच गाजत आहे. चित्रपटात स्त्री सन्मान आणि संघर्षाची कथा‘वामा’ चित्रपटाची… Read More गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’

३० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ‘अष्टपदी’ लग्नसंस्थेवर भाष्य करणाऱ्या कथानकाची उत्सुकता शिगेला

अनोख्या शीर्षकाने आणि आशयघनतेने लक्ष वेधणाऱ्या ‘अष्टपदी’ या मराठी चित्रपटाची प्रतीक्षा आता संपणार आहे. महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशन निर्मित हा सिनेमा ३० मे २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवीन आणि लक्षवेधी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, त्यावर लग्नाच्या पार्श्वभूमीत प्रमुख व सहाय्यक कलाकार झळकत आहेत. दिग्दर्शक-निर्माता उत्कर्ष जैन… Read More ३० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ‘अष्टपदी’ लग्नसंस्थेवर भाष्य करणाऱ्या कथानकाची उत्सुकता शिगेला

“चिडिया”आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेला चित्रपट २३ मे २०२५ पासून चित्रपटगृहात

विनय पाठक, अमृता सुभाष आणि प्रतिभावान बालकलाकारांचा दमदार अभिनय अनेक नामवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये यशस्वी ठरलेला, भावनांनी भरलेला आणि आशावादाने झळाळणारा हिंदी चित्रपट “चिडिया” अखेर २३ मे २०२५ रोजी भारतात चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं नवीन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे आणि त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शानू, बुआ आणि… Read More “चिडिया”आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेला चित्रपट २३ मे २०२५ पासून चित्रपटगृहात