१६ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘बंजारा’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला

वी. एस. प्रॉडक्शन्स निर्मित आणि मोरया प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘बंजारा’ हा चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मैत्री आणि आत्मशोध या दोन्ही भावनांचा अनोखा मेळ असलेल्या या चित्रपटातील ‘होऊया रिचार्ज’ हे प्रेरणादायी गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. शान आणि अवधूत गुप्ते यांच्या आवाजात मैत्रीचा ऊर्जादायी प्रवास बॉलिवूडचा लोकप्रिय… Read More १६ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘बंजारा’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला

सोनू निगम यांच्या मधुर स्वरात ‘सजना’ चित्रपटाचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेक्षकांच्या मनात प्रेमाची नाजूक भावना जागवणारं ‘सजना’ चित्रपटाचं शीर्षक गीत नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम आणि राजेश्वरी पवार यांच्या भावस्पर्शी आवाजात सादर झालेलं हे गीत प्रेमातील हळवे क्षण, आठवणी आणि नात्यांच्या गहिराईला सुरावटीत गुंफतं. संगीत, शब्द आणि सौंदर्य यांचा अद्वितीय संगम गाण्याला संगीत दिलं आहे ओंकारस्वरूप यांनी, तर बोल लिहिले आहेत सुहास… Read More सोनू निगम यांच्या मधुर स्वरात ‘सजना’ चित्रपटाचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला

के. एस. चित्रा यांच्या आवाजातलं पहिलं मराठी गाणं  ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता’ प्रदर्शित

पद्माराज राजगोपाल नायर लिखित व दिग्दर्शित ‘माझी प्रारतना’ या मराठी चित्रपटाचं पहिलं गाणं ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, प्रेक्षकांमध्ये या गीताने उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार पद्माराज नायर आणि अनुषा अडेप यांच्यात खुलत जाणाऱ्या नाजूक प्रेमभावना या गाण्यातून खास रेखाटण्यात आल्या आहेत. शेताच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालेलं हे गीत दृश्य आणि… Read More के. एस. चित्रा यांच्या आवाजातलं पहिलं मराठी गाणं  ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता’ प्रदर्शित

‘वाजीव दादा’ गाण्याच्या माध्यमातून झापुक झुपूकची धमाल वाढली

जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमातलं नवीन गाणं ‘वाजीव दादा’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, ते रसिकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. हळदी समारंभात रंग भरणारं धमाल गाणं मराठमोळ्या हळदी समारंभातील पारंपरिक उत्साह आणि आधुनिक मस्ती यांचा मिलाफ असलेलं ‘वाजीव दादा’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. लग्नाच्या प्लेलिस्टमध्ये याची… Read More ‘वाजीव दादा’ गाण्याच्या माध्यमातून झापुक झुपूकची धमाल वाढली

“बुंगा फाईट” गाण्यानं केला सोशल मीडियावर धुमाकूळ!

शशिकांत धोत्रे दिग्दर्शित “सजना” या आगामी मराठी चित्रपटातील “बुंगा फाईट” हे धमाकेदार गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. मराठमोळ्या गावरान भाषेचा आणि लोकसंगीताचा बहारदार संगम असलेलं हे गाणं प्रेक्षकांच्या तोंडपाठ झालंय. डान्स फ्लोअरपासून ते स्पर्धांपर्यंत सगळीकडेच हे गाणं वाजताना आणि त्यावर थिरकताना प्रेक्षक दिसत आहेत. आनंद शिंदेंचा लाईव्ह परफॉर्मन्स, प्रेक्षकांचा टाळ्यांचा वर्षावया गाण्याला लोकप्रिय गायक… Read More “बुंगा फाईट” गाण्यानं केला सोशल मीडियावर धुमाकूळ!

‘एप्रिल मे ९९’ मध्ये ‘जाई’ची एंट्री, यंदाची उन्हाळ्याची सुट्टी होणार अविस्मरणीय

रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटात कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश या खट्याळ तिघांच्या मैत्रीत आता एक नवीन मैत्रीण जाईची भर पडली आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये सतत दिसणारा पाठमोरा चेहरा कोणी असेल, याबाबतची उत्कंठा अखेर संपली आहे. ही व्यक्तिरेखा साकारतेय अभिनेत्री साजिरी जोशी, जी प्रसिद्ध अभिनेत्री ऋजुता देशमुख यांची कन्या आहे. ‘एप्रिल मे ९९’ या… Read More ‘एप्रिल मे ९९’ मध्ये ‘जाई’ची एंट्री, यंदाची उन्हाळ्याची सुट्टी होणार अविस्मरणीय

गूढकथांच्या चाहत्यांसाठी खास मेजवानी, ‘जारण’ सिनेमातील प्रमुख भूमिकेत अमृता सुभाष

हृषीकेश गुप्ते दिग्दर्शित ‘जारण’ या मराठी भयपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले आणि प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. आता या चित्रपटातील पहिला प्रमुख चेहरा समोर आला आहे — अमृता सुभाष. आपल्या वेगळ्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अमृता या चित्रपटातही एक गूढ, आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. गूढतेचा वेध घेणारी कथा ‘जारण’ ही केवळ एक… Read More गूढकथांच्या चाहत्यांसाठी खास मेजवानी, ‘जारण’ सिनेमातील प्रमुख भूमिकेत अमृता सुभाष

लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’मध्ये ‘आलेच मी’ म्हणत सई ताम्हणकरचा लावणीवर पहिलावहिला धमाका!

मराठी सिनेसृष्टीत सौंदर्य, उत्साह आणि पारंपरिक ठसका घेऊन ‘देवमाणूस’ चित्रपटात सई ताम्हणकर पहिल्यांदाच लावणीवर थिरकताना दिसणार आहे. ‘आलेच मी’ या धमाकेदार गाण्याच्या माध्यमातून सईने प्रेक्षकांना एक नवंच, आकर्षक रूप दाखवण्याचा निर्णय घेतला असून हे गाणं तिच्या करिअरमधील एक खास टप्पा ठरणार आहे. सईचा झगमगता लावणी लूक आणि दमदार सराव सईने या लावणीसाठी तब्बल ३३ तास… Read More लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’मध्ये ‘आलेच मी’ म्हणत सई ताम्हणकरचा लावणीवर पहिलावहिला धमाका!