“दुर्गे दुर्घट भारी” – भक्ती, श्रद्धा आणि उर्जेचा सुरेल गजर आता रसिकांसमोर

‘’पुन्हा शिवाजी राजे भोसले’’ या चित्रपटातील पहिले गीत ‘दुर्गे दुर्घट भारी’ नुकतेच प्रदर्शित झाले असून हे गीत रसिकांच्या मनात भक्तीचा, नवचैतन्याचा संचार करत आहे. पारंपरिक स्तोत्राला आधुनिक संगीताची नवी छटा देत हे गीत महाराष्ट्रभर गुंजत आहे. या गीतातून दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी पहिल्यांदाच संगीतकार म्हणून पदार्पण केले आहे. श्रद्धा आणि संगीतरसाचा सुंदर संगम साधत त्यांनी या… Read More “दुर्गे दुर्घट भारी” – भक्ती, श्रद्धा आणि उर्जेचा सुरेल गजर आता रसिकांसमोर

श्री चिंतामणीच्या दरबारात ‘देवघर ऑन रेंट’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

२८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शितअसंख्य गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील चिंचपोकळीच्या श्री चिंतामणीच्या दरबारात ‘देवघर ऑन रेंट’ या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर मोठ्या थाटात प्रदर्शित करण्यात आला. शीर्षकामुळे मनात उत्सुकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटाच्या टिमने चिंतामणीचे दर्शन घेतले आणि गणरायाच्या आशीर्वादाने टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या प्रसंगी कलाकार, निर्माते, दिग्दर्शक व तंत्रज्ञ उपस्थित होते. हा… Read More श्री चिंतामणीच्या दरबारात ‘देवघर ऑन रेंट’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!

‘अरण्य’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी सांगणाऱ्या या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. आता या चित्रपटातील ‘रेला रेला’ हे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गाण्यातील सांस्कृतिक रंगत हार्दिक जोशी आणि वीणा जगताप यांच्या लग्नसोहळ्यावर चित्रित हे गाणे ऊर्जा, उत्साह आणि पारंपरिक… Read More हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच ‘अरण्य’ या मराठी चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले. अमोल दिगांबर करंबे लिखित व दिग्दर्शित हा चित्रपट सामाजिक वास्तवावर प्रकाश टाकणारी प्रभावी कहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहे. ‘अरण्य’ हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहांत झळकणार आहे. मानवी नात्यांचा हृदयस्पर्शी प्रवास सामान्य कुटुंबातील एका बापाची आणि त्याच्या मुलीच्या नात्यावर… Read More मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

‘वडापाव’मध्ये गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

मराठी चित्रपटसृष्टीत कौटुंबिक कथांना नेहमीच प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. अगदी तशीच रुचकर मेजवानी घेऊन ‘वडापाव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या धमाल टीझरवरून हा सिनेमा एक गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असल्याचं स्पष्ट होतंय. प्रसाद ओक यांच्या अभिनयाची शतकपूर्ती हा चित्रपट विशेष ठरण्याचं आणखी एक कारण म्हणजे प्रसाद ओक यांच्या अभिनय… Read More ‘वडापाव’मध्ये गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’चे चित्रीकरण अलिबागमध्ये सुरू

मातृभाषेतून होणाऱ्या शिक्षणाचे महत्त्व आणि मराठी शाळांची घटती संख्या या गंभीर विषयावर दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा नवा चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा अलिबाग येथे महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी निर्माती क्षिती जोग आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे उपस्थित होते. आदिती तटकरे… Read More ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’चे चित्रीकरण अलिबागमध्ये सुरू

मराठी रुपेरी पडद्यावर ‘जब्राट’

आयुष्याच्या प्रवासात अनेक मित्रमैत्रिणी भेटत असतात. त्यापैकी काही जण आजन्म मैत्री टिकवून ठेवतात, तर काही नातेसंबंध अर्धवट तुटून जातात. अशा खरीखुरी मैत्रीची कहाणी सांगणारा तारा करमणूक निर्मित, प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ हा नवीन मराठी चित्रपट नववर्षारंभी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे दमदार पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून त्याने रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.… Read More मराठी रुपेरी पडद्यावर ‘जब्राट’

‘बिन लग्नाची गोष्ट’ने उलगडली नात्यांची नवीन परिभाषा

रंगतदार ट्रेलर प्रदर्शित नात्यांचा गुंता, प्रेमाची गोडी आणि थोडीशी नोकझोक… हे सगळं सांगणारी ‘बिन लग्नाची गोष्ट’ ही गोड कथा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिकच उधाण आले आहे. या चित्रपटात रिअल लाईफ कपल प्रिया बापट आणि उमेश कामत परत एकदा रील लाईफमधून प्रेक्षकांना मोहवणार आहेत. दोघांची… Read More ‘बिन लग्नाची गोष्ट’ने उलगडली नात्यांची नवीन परिभाषा