धडाकेबाज ॲक्शन असलेल्या ‘गौरीशंकर’ चित्रपटाचा टीझर लाँच!

मराठी चित्रपटसृष्टीत आशयसंपन्न उत्तमोत्तम चित्रपटांची परंपरा असली तरी, धडाकेबाज ॲक्शनपट तुलनेने कमीच बनतात. मात्र, ‘गौरीशंकर’ हा चित्रपट ही उणीव भरून काढणार आहे. नुकताच या चित्रपटाचा तुफान ॲक्शन आणि जबरदस्त संवादांनी भरलेला टीझर लाँच करण्यात आला आहे. चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. विशाल संपत निर्मित ‘गौरीशंकर’ – दमदार कथा आणि ऍक्शनचा मेळ!… Read More धडाकेबाज ॲक्शन असलेल्या ‘गौरीशंकर’ चित्रपटाचा टीझर लाँच!

‘चिकी चिकी बुबूम बुम’ मध्ये रंगणार धमाल रियुनियन पार्टी!

पार्टी म्हटलं की जंगी सेलिब्रेशन आलंच! अशाच एका धमाकेदार रियुनियन पार्टी साठी मराठीतील नामवंत कलाकार एकत्र आले आहेत. “आईच्या गावात बाराच्या भावात घरात नुसता गोंधळ हो” म्हणत या कलाकारांनी सेलिब्रेशनचा पारा फुल ऑन वाढवला आहे. “बुम बुम बुम बोंबला जीव हा टांगला” म्हणत हे कलाकार प्रत्येकाला थिरकायला लावणार आहेत. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चा धमाकेदार… Read More ‘चिकी चिकी बुबूम बुम’ मध्ये रंगणार धमाल रियुनियन पार्टी!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “सुनबाई लय भारी” चित्रपटाचं पोस्टर लाँच

दिग्दर्शक शिवाजी दोलताडे आता “सुनबाई लय भारी” हा चित्रपट घेऊन येणार आहेत. महिला सक्षमीकरण या विषयावर बेतलेल्या आणि धमाल मनोरंजन देणाऱ्या या चित्रपटाचं पहिलं पोस्टर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाँच करण्यात आलं. विशेष म्हणजे, या चित्रपटाचं चित्रीकरण मार्च महिन्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू होणार आहे. चित्रपट निर्मिती आणि प्रमुख आधारस्तंभ सोनाई फिल्म क्रिएशन तर्फे “सुनबाई… Read More मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “सुनबाई लय भारी” चित्रपटाचं पोस्टर लाँच

हार्दिक शुभेच्छा … कुणी कुणास दिल्या ?

मुंबई, २ फेब्रुवारी २०२५: मराठी चित्रपटसृष्टीतील नाविन्यपूर्ण विचारांसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता, दिग्दर्शक पुष्कर जोग पुन्हा एकदा एका हटके विषयावर भाष्य करणारा चित्रपट घेऊन येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ असून लैंगिक सुसंगतता या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून त्यात नवविवाहित दाम्पत्य पाहायला मिळते.… Read More हार्दिक शुभेच्छा … कुणी कुणास दिल्या ?

बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा मनोरंजक टीजर लाँच

मुंबई, २ फेब्रुवारी २०२५: अॅरेंज्ड मॅरेज या संकल्पनेवर आधारित आणि ग्रामीण भागातील लग्नाच्या गोष्टीला स्पर्श करणाऱ्या ‘स्थळ’ या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. टीझर लॉन्चच्या आधी प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ पोस्ट करत, ‘स्थळ’ चा टीझर येत असल्याची माहिती दिली होती. त्यांच्या या घोषणेमुळे टीझर… Read More बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा मनोरंजक टीजर लाँच

‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर प्रदर्शित!

रियुनियन म्हणजे धमाल-मस्ती! आणि जेव्हा बॅकबेंचर्स एकत्र येतात, तेव्हा गोंधळ, मजा आणि हास्य यांचा स्फोट होतो. अशाच एका धमाल रियुनियनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय, ज्यात ‘इकडे आड तिकडे विहीर’, ‘आगीतून फुफाट्यात’, ‘धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय’, ‘बुडत्याचा पाय खोलात’, ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणींमधून बॅकबेंचर्सची मजेशीर ओळख करून देण्यात आली आहे. या… Read More ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर प्रदर्शित!

संस्कृती बालगुडेच्या ‘Courage’ चित्रपटाचे अमेरिकेत विशेष स्क्रिनिंग!

मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. नृत्य, फॅशन आणि अभिनय या तिन्ही क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या संस्कृतीचा पहिला इंग्रजी चित्रपट ‘Courage’ आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजतोय. या चित्रपटाची संयुक्त राष्ट्र अमेरिकेतील (USA) सँटो डोमिन्गो फिल्म फेस्टिव्हलमध्ये अधिकृत निवड झाली असून, या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग तिथे संपन्न झाले. संस्कृतीच्या अभिमानास्पद प्रवासाची सुरुवात! या… Read More संस्कृती बालगुडेच्या ‘Courage’ चित्रपटाचे अमेरिकेत विशेष स्क्रिनिंग!

बर्थडे बॉय अंकुश चौधरीकडून चाहत्यांना खास रिटर्न गिफ्ट!

१३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नो एंट्री पुढे धोका आहे’ या सुपरहिट चित्रपटाने प्रेक्षकांना हसवून लोटपोट केले होते. या चित्रपटातील कलाकारांची धमाल आणि ‘जपून जपून जा रे’ या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावले होते. तब्बल दशकभरानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची मागणी सतत होत होती. अखेर वाढदिवसाचे औचित्य साधत अभिनेता अंकुश चौधरीने ‘नो एंट्री पुढे धोका आहे २… Read More बर्थडे बॉय अंकुश चौधरीकडून चाहत्यांना खास रिटर्न गिफ्ट!