सुबोध भावे ‘देवमाणूस’ चित्रपटाचा भाग बनले

तेजस देऊस्कर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होतोय मल्टिस्टारर चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेता सुबोध भावे आता तेजस देऊस्कर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘देवमाणूस’ या चित्रपटाचा भाग बनले आहेत. महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करत, हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक मल्टिस्टारर अनुभव ठरणार आहे. सुबोध भावे: अभिनयाचा एक नवा आयाम बालगंधर्व, डॉ. काशिनाथ घाणेकर, आणि… Read More सुबोध भावे ‘देवमाणूस’ चित्रपटाचा भाग बनले

सचिन पिळगांवकर यांना ‘स्थळ’ पसंत

मराठी चित्रपटसृष्टीतील आदरणीय नाव सचिन पिळगांवकर आता नवीन भूमिकेत झळकणार आहेत. अभिनय, दिग्दर्शन, आणि गायन अशा विविध क्षेत्रांमध्ये पाच दशकांहून अधिक काळ गाजवलेल्या सचिन यांनी ‘स्थळ’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित चित्रपटाच्या प्रस्तुतीद्वारे आपल्या करिअरमध्ये नवी इनिंग सुरू केली आहे. जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित ‘स्थळ’ हा चित्रपट ७ मार्च २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित… Read More सचिन पिळगांवकर यांना ‘स्थळ’ पसंत

लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारं ‘फसक्लास दाभाडे’मधील ‘दिस सरले’ गाणं प्रदर्शित!

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘फसक्लास दाभाडे’ या आगामी चित्रपटातील ‘दिस सरले’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. हे गाणं प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारं आहे, जे लग्नाच्या आठवणींना पुन्हा एकदा जिवंत करतं. या गाण्यात लग्नातील भावनिक क्षण आणि हास्यविनोद यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरची पहिली ऑनस्क्रीन केमिस्ट्री चित्रपटातील खास आकर्षण म्हणजे… Read More लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारं ‘फसक्लास दाभाडे’मधील ‘दिस सरले’ गाणं प्रदर्शित!

नवीन वर्षात मापुस्कर ब्रदर्स घेऊन येत आहेत…‘एप्रिल मे ९९’

चित्रपटसृष्टीतील नावाजलेली मापुस्कर ब्रदर्स जोडी, राजेश मापुस्कर आणि रोहन मापुस्कर, प्रेक्षकांसाठी २०२५ या नववर्षात एक खास चित्रपट घेऊन येत आहेत – ‘एप्रिल मे ९९’. या चित्रपटाच्या निमित्ताने रोहन मापुस्कर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून, चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एप्रिल मे ९९ मापुस्कर ब्रदर्सचा पहिला एकत्रित प्रोजेक्ट आहे. राजेश मापुस्करांचा अनुभव आणि रोहन मापुस्करांचं… Read More नवीन वर्षात मापुस्कर ब्रदर्स घेऊन येत आहेत…‘एप्रिल मे ९९’

अमृता खानविलकरच्या नृत्याने रंगला ‘संगीत मानापमान’, “वंदन हो” गाण्यातील सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री आणि नृत्यकलेने प्रसिद्ध असलेल्या अमृता खानविलकरने पुन्हा एकदा आपल्या नृत्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. आगामी ‘संगीत मानापमान’ या चित्रपटातील “वंदन हो” या गाण्यात तिच्या मोहक अदांनी आणि अप्रतिम नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमृता खानविलकर ही फक्त एक अभिनेत्री नसून एक कुशल नृत्यांगना सुद्धा आहे. तिच्या लावण्यांपासून ते रिऍलिटी शोमध्ये… Read More अमृता खानविलकरच्या नृत्याने रंगला ‘संगीत मानापमान’, “वंदन हो” गाण्यातील सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

वीणा आणि वनिता झाल्या शेजारी

‘नातेवाईंकापेक्षा हाकेच्या अंतरावर असलेला शेजारी अधिक जवळचा असतो.  सुखाच्या क्षणी ते आपल्यासोबत कायम असतात, दु:खात खंबीरपणे आपली साथ देतात आणि म्हणूनच हे शेजारी आपल्याला आपले सख्खे वाटतात. गुणी अभिनेत्री वीणा जामकर आणि विनोदाचं जबरदस्त टायमिंग असलेली अभिनेत्री वनिता खरात या दोघी अभिनेत्री आता सख्ख्या शेजारी झाल्या आहेत. आगामी ‘इलू इलू’ या चित्रपटात त्या शेजारधर्म निभावताना… Read More वीणा आणि वनिता झाल्या शेजारी

मिशन अयोध्या’चे मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताचे भव्य प्रदर्शन!

मुंबई, (संगीत प्रतिनिधी): अत्यंत वेगळा विषय घेऊन मुंबई, महाराष्ट्र ते अयोध्या अशी अत्यंत मनोवेधक व तितकीच रोमहर्षक कथा घेऊन येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात अवतारणाऱ्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाचा संगीत प्रदर्शन सोहळा अतिशय ग्लॅमरस आणि भव्य कॅनव्हासवर आज थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून… Read More मिशन अयोध्या’चे मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताचे भव्य प्रदर्शन!

राजेश खन्ना यांची अजरामर कलाकृती ‘आनंद’ मराठीमध्ये…

१९७१मध्ये प्रदर्शित झालेल्या हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’ या हिंदी चित्रपटाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या चित्रपटात राजेश खन्ना यांनी साकारलेला आनंद मृत्यूनंतरही रसिकांच्या मनात अजरामर झाला. यातील अमिताभ बच्चन यांची भूमिकाही खूप गाजली. त्यामुळेच आजही हा चित्रपट टेलिव्हीजनर लागल्यास प्रेक्षक तो आवडीने पाहतात. रसिकांचा लाडका ‘आनंद’ आता मराठमोळे रूप लेऊन समोर येणार आहे. विघ्नहर्ता फिल्म्सने… Read More राजेश खन्ना यांची अजरामर कलाकृती ‘आनंद’ मराठीमध्ये…