‘अरण्य’मध्ये उलगडणार जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी

एस एस स्टुडिओ निर्मित ‘अरण्य’ या चित्रपटाचे दमदार मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. निर्माते शरद पाटील आणि अंजली पाटील यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे आहेत. हार्दिक जोशी, वीणा जगताप, हिृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा आणि चेतन चावडा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा भव्य प्रवास १९ सप्टेंबर… Read More ‘अरण्य’मध्ये उलगडणार जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी

‘दशावतार’च्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली

‘झी स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर झळकलं असून, प्रेक्षकांच्या मनात याने प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. काळसर रंगछटा, रौद्र चेहरा, लालसर डोळे आणि तीव्र कटाक्ष असलेला चेहरा या पोस्टरमधून दिसतोय आणि नेमकं काय घडणार आहे याचा अंदाज लागत नाही. दिलीप… Read More ‘दशावतार’च्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली

‘फकिरीयत’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित…

श्री महावतार बाबाजींची महती सांगणारा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला साधूसंतांनी नेहमीच सर्वसामान्यांना मार्ग दाखवत सुखी जीवनाचा मंत्र दिला आहे. असेच एक युगपुरुष, एक महापुरुष हजारो वर्षांपासून या सृष्टीच्या कल्याणाचे कार्य करीत आहेत. हिमालयाच्या पावन धरतीवर सतत संचार करणाऱ्या श्री महावतार बाबाजी यांनी दिलेला योग मानवांसाठी एक दैवी भेट ठरली आहे. हा योग… Read More ‘फकिरीयत’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित…

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातील ‘पालतू फालतू’  हे पहिलं गाणं प्रदर्शित

सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातील पहिलं गाणं ‘पालतू फालतू’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, प्रेक्षकांना एक भन्नाट आणि गंमतीशीर अनुभव देणारं हे गाणं आहे. सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू यांच्यावर चित्रित हे गाणं नवऱ्याच्या मनातील वैताग आणि गोंधळाचं मिश्किल चित्रण करतं. लग्नानंतरच्या विनोदी वास्तवाचं गीत या गाण्यातून लग्नानंतरचं नातं आणि त्यातील बडबड,… Read More ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातील ‘पालतू फालतू’  हे पहिलं गाणं प्रदर्शित

निवेदिता सराफ – गिरीश ओक पुन्हा एकत्र!

‘बिन लग्नाची गोष्ट’च्या नव्या मोशन पोस्टरने वाढवली उत्सुकता गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित तसेच तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत ‘बिन लग्नाची गोष्ट’ या आगामी चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झालं. याआधी प्रदर्शित झालेल्या प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या फ्रेश जोडीच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली होती.… Read More निवेदिता सराफ – गिरीश ओक पुन्हा एकत्र!

‘वेल डन आई’मध्ये विशाखा सुभेदारची धम्माल

१४ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित शिकलेली किंवा अशिक्षीत, मॅाडर्न किंवा साधीभोळी, शांत किंवा तापट – कशीही असली तरी आई ही आई असते. निसर्गाने दिलेल्या पुनर्निमितीच्या वरदानामुळे आईला देवानंतरचं सर्वोच्च स्थान दिलं जातं. आजवर अनेक कवींनी आणि चित्रपट निर्मात्यांनी आईवर आधारित कलाकृती सादर केल्या, तरीही आईच्या प्रेमाची महती संपत नाही. आता त्याच भावनेला विनोदी बाज… Read More ‘वेल डन आई’मध्ये विशाखा सुभेदारची धम्माल

अभिनेता स्वप्निल जोशी याच्या विशेष उपस्थितीत रंगला “मुंबई लोकल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

लोकल प्रवासात फुलणारी प्रेमाची गोष्ट “मुंबई लोकल” १ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईच्या जीवनशैलीला आरसा ठरणाऱ्या लोकल ट्रेनच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘मुंबई लोकल’ हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता स्वप्निल जोशी यांच्या विशेष उपस्थितीत लाँच करण्यात आला. ‘मुंबई लोकल’ चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अभिजीत यांनी केलं असून बिग ब्रेन… Read More अभिनेता स्वप्निल जोशी याच्या विशेष उपस्थितीत रंगला “मुंबई लोकल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

‘सत्यभामा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित

८ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार सती प्रथेवर आधारित चित्रपट ‘सत्यभामा – अ फरगॉटन सागा’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांना आपल्या समाजाच्या भूतकाळातील विचारसरणीचे आणि सामाजिक वास्तवाचे दर्शन घडवणार आहे. एकोणिसाव्या शतकातील सती प्रथेवर आधारलेला हा चित्रपट त्या काळातील सामाजिक अन्याय आणि स्त्रीशोषणावर भाष्य करतो. चित्रपटात निस्वार्थ प्रेम, बंधनांची सुंदर वीण आणि सामाजिक लढ्याचा भावनिक… Read More ‘सत्यभामा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित