“मुंबई लोकल” चित्रपटाचा कलरफुल टीजर लाँच

प्रेमाच्या संघर्षातून फुलणारी कथाआयुष्यात प्रत्येक गोष्ट हरवत असलेल्या तिला आणि प्रत्येक लढाईत हरत असलेल्या त्याला अखेर हिरवा सिग्नल मिळतो – ही प्रेमकहाणी ‘मुंबई लोकल’ या चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यातून प्रेम, संघर्ष आणि मुंबईच्या गतीने धावणाऱ्या आयुष्याची झलक पाहायला मिळते. चित्रपटाचा टीजर निर्माण करतो भावनांची उधळणया चित्रपटाचा टीजर अत्यंत… Read More “मुंबई लोकल” चित्रपटाचा कलरफुल टीजर लाँच

प्रिया बापट- उमेश कामत बारा वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार!

१२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘बिन लग्नाची गोष्ट’‘बिन लग्नाची गोष्ट’ या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मराठीतील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक असलेल्या प्रिया बापट आणि उमेश कामत या ‘क्युट कपल’ची जोडी तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. दोघांच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच ठरणार असून, १२ सप्टेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात… Read More प्रिया बापट- उमेश कामत बारा वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार!

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला

विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद घेत पहिली झलक प्रदर्शित महाराष्ट्राच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्या दृष्टिकोनातून आलेला चित्रपट ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या येणाऱ्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने महेश मांजरेकर यांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन या चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित केली. या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता सिद्धार्थ बोडके झळकणार असून, त्याच्यासोबत बालकलाकार… Read More ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला

देवभूमीत रुजलेली… कोकणच्या मातीतून साकारलेली ‘दशावतार’ची भव्य गाथा

दिलीप प्रभावळकर नव्या अवतारात रूपेरी पडद्यावर ‘चिमणराव’ ते ‘तात्या विंचू’ – असंख्य बहारदार भूमिका साकारणारे नटश्रेष्ठ दिलीप प्रभावळकर आता पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. “दशावतार” या आगामी चित्रपटात कोकणच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या सस्पेन्स थ्रिलर कथेत ते एक अत्यंत महत्त्वपूर्ण पात्र साकारत आहेत. त्यांच्या याआधीच्या सर्व भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी आहे आणि… Read More देवभूमीत रुजलेली… कोकणच्या मातीतून साकारलेली ‘दशावतार’ची भव्य गाथा

“मुंबई लोकल”मध्ये फुललेली प्रेमकथा १ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार

ज्ञानदा रामतीर्थकर आणि प्रथमेश परब यांची फ्रेश जोडी मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता मुंबई लोकल या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून, १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मिती आणि दिग्दर्शनाची जबाबदारी… Read More “मुंबई लोकल”मध्ये फुललेली प्रेमकथा १ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार

‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात

मैत्रीची अनोखी गोष्ट मैत्री ही कोणाशीही, कोणत्याही काळात जुळू शकते. अशाच एका निरागस मैत्रीची गोष्ट वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमर, अकबर आणि अँथनी यांच्या मैत्रीची ही धमाल गोष्ट रुपेरी पडद्यावर रंगणार आहे. मनोरंजन आणि मस्ती यांचा ट्रिपल डोस दिग्दर्शन योगेश जाधव यांचे असून लेखन प्रियदर्शन जाधव… Read More ‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात

सलमान खान आणि महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’च्या टायटल साँगचा भव्य लाँच सोहळा

चित्रपटाच्या चौथ्या भागात काम करण्याची सलमान खानची इच्छा ‘येरे येरे पैसा’ मालिकेचे यश पुढे नेत, ‘येरे येरे पैसा ३’ हा आगामी भाग प्रेक्षकांसाठी अधिक धमाल आणि मनोरंजन घेऊन येतो आहे. या चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच एक भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर हे दोघे… Read More सलमान खान आणि महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’च्या टायटल साँगचा भव्य लाँच सोहळा

‘गाडी नंबर १७६०’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत थ्रिलर, रहस्य आणि विनोदी घटकांचा अनोखा मिलाफ सादर करणाऱ्या ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित या चित्रपटात रहस्य आणि विनोद यांची रंगतदार सांगड पाहायला मिळणार आहे. काळ्या बॅगेभोवती फिरणारी रहस्याची कथा ट्रेलरमध्ये दाखवलेली काळ्या बॅगेची… Read More ‘गाडी नंबर १७६०’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित