मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर!

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू झालं असून याप्रसंगी स्वतः मनोज जरांगे पाटील, निर्माते, दिग्दर्शक आणि टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या २६ एप्रिल २०२४ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार… Read More मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर!

प्रेम आणि मैत्रीतील सुंदर सफर घडवणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर प्रदर्शित

स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट हा मान मिळवणाऱ्या पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रियुनियनच्या निमित्ताने भेटलेले हे पाचही मित्र एका अनोख्या दुनियेची सफर करताना दिसत आहेत. आयुष्यात आलेले, येणारे चढउतार या सगळ्यांना सामोरे जाऊन कुठेतरी स्वतःसाठी जगताना ते दिसत आहेत. मैत्री म्हटल की, त्यात… Read More प्रेम आणि मैत्रीतील सुंदर सफर घडवणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर प्रदर्शित

अनोख्या नात्यावर परखड भाष्य करणारा ‘गाफील’, खा. नवनीत राणांच्या हस्ते ट्रेलर रिलीज

आदित्य या तरूणाच्या आयुष्यात होणाऱ्या गंभीर घटनांवर भाष्य करणाऱ्या ‘गाफील’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यापूर्वी आलेल्या टीझरमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावलेल्या असतानाच आता या ट्रेलरची एंट्री झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या आशय-विषयाला धरून चित्रपट येत आहेत, ‘गाफील’ हा चित्रपटही त्यापैकीच एक असल्याचे ट्रेलरवरून जाणवत आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला अमरावती जिल्ह्याच्या खासदार सौ.… Read More अनोख्या नात्यावर परखड भाष्य करणारा ‘गाफील’, खा. नवनीत राणांच्या हस्ते ट्रेलर रिलीज

काला घोडा फेस्टिवल” महोत्सवात पहिल्याच दिवशी मराठीचा जागर होणार!

नाटक नृत्य संगीत याच्या माध्यमातून दोन हजार वर्षांचा प्रवास मनोरंजनाच्या माध्यमातून उलगडत जाणारी ही कलाकृती यंदाच्या काला घोडा फेस्टिवल च्या शुभारंभाच्या दिवशी म्हणजेच २० जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी सात वाजता वाय बी चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट इथे सादर होणार आहे. “मराठी असे आमुची मायबोली आम्ही मराठीतच बोलणार” असं म्हणणाऱ्यांपासून “मराठी आहोत हे सांगायला लाज वाटते”… Read More काला घोडा फेस्टिवल” महोत्सवात पहिल्याच दिवशी मराठीचा जागर होणार!

‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाच्या नवीन पोस्टरने वेधले प्रेक्षकांचे लक्ष

मोहसीन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे एक नवीन गंमतीशीर पोस्टर आपल्या भेटीला आले आहे. पोस्टरमध्ये प्रथमेश परबच्या हातातील गिफ्टबॉक्समध्ये एक गोंडस बाळ दिसत आहे. त्याच्या बाजूला पृथ्विक प्रताप आणि डॅाक्टरच्या वेषात अंकिता लांडे पाटीलही दिसत आहे. त्यामुळे आता प्रथमेश या बाळांची डिलिव्हरी करणार का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना… Read More ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाच्या नवीन पोस्टरने वेधले प्रेक्षकांचे लक्ष

ओमी वैद्यच्या `आईच्या गावात मराठीत बोल` मध्ये `स्टोरीटेल`चीही `भूमिका`

जगातील प्रगत देशांमध्ये ऑडिओबुक्स ही संकल्पना लोकप्रिय ठरली. तशी ती आता आपल्याकडेही चांगलीच रुजते आहे. त्याचीच साक्ष देणारी घडमोड आता मराठी चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आली आहे. ती म्हणजे, प्रसिद्ध अभिनेता ओमी वैद्य घेऊन येत असलेल्या आईच्या गावात मराठीत बोल या चित्रपटामध्ये `स्टोरीटेल`लाही `भूमिका` मिळाली आहे. या चित्रपटाचा नायक मराठी गोष्ट ऐकण्यासाठी `स्टोरीटेल` वापरतो, असे दाखवण्यात… Read More ओमी वैद्यच्या `आईच्या गावात मराठीत बोल` मध्ये `स्टोरीटेल`चीही `भूमिका`

‘पश्चिम रंग पूर्व रूप’ (मराठी ब्रॉडवे शो) आता प्लॅनेट मराठी ओटीटीवर

आपल्या मराठी रंगभूमीने प्राचीन काळापासूनच पौराणिक, संगीत, लोकनाट्य अशा विविध रंगछटा फुलवत आपला वारसा जोपासला. हाच वारसा पुढे नेण्यासाठी प्लॅनेट मराठी या पहिल्यावहिल्या मराठी ओटीटीनेही हातभार लावला आहे. नुकतेच प्लॅनेट मराठीवर ‘पश्चिम रंग पूर्व रूप’ (मराठी ब्रॉडवे शो) हे नाटक प्रदर्शित झाले आहे. बेसमेंट थिएटर शिकागो निर्मित या नृत्य नाट्य संगीतिकेची संकल्पना विद्या जोशी यांची… Read More ‘पश्चिम रंग पूर्व रूप’ (मराठी ब्रॉडवे शो) आता प्लॅनेट मराठी ओटीटीवर

‘विश्वमित्र’ अल्बममधील टायटल सॉंगचा ट्रेलर प्रदर्शित

‘विश्वमित्र’ या अल्बमबद्दल काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर अवधूत गुप्ते यांनी पोस्ट शेअर केली होती. तर आता या अल्बममधील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पहिल्या `विश्वमित्र’ या गाण्याचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून या गाण्यातून नितेश चव्हाण आणि सुवर्णा काळे यांच्या प्रेमाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. गाणे जरी रांगड्या मातीतील असले तरी या गाण्यातून… Read More ‘विश्वमित्र’ अल्बममधील टायटल सॉंगचा ट्रेलर प्रदर्शित