‘रणरागिणी ताराराणी’ नाटकाचा दिमाखदार शुभारंभ

फुलांची मोहक सजावट, मंगल सनई-चौघड्यांचे सूर, आणि शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेले नाट्यरसिक—अशा भारावलेल्या वातावरणात ‘रणरागिणी ताराराणी’ या ऐतिहासिक नाटकाचा भव्य शुभारंभ संपन्न झाला. या प्रसंगी आमदार महेश सावंत, निर्माता-दिग्दर्शक अशोक हांडे, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, कॅप्टन शिवाजी महाडकर, लेखक सुखद राणे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘रणरागिणी ताराराणी’ नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद नाटकाच्या पहिल्याच… Read More ‘रणरागिणी ताराराणी’ नाटकाचा दिमाखदार शुभारंभ

‘रणरागिणी ताराराणी’ रंगभूमीवर – मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा नव्या पिढीसमोर!

महाराष्ट्राचा गौरवशाली ‘शिवइतिहास’ घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने आणि कर्त्या व्यक्तींच्या असामान्य कर्तृत्वाने! त्यात कर्त्या स्त्रियांचादेखील महत्त्वाचा सहभाग होता. अशाच एका पराक्रमी महाराणी ताराराणींचा इतिहास आता मराठी रंगभूमीवर भव्य नाट्यरूपात उलगडणार आहे! आपल्या कर्तबगारीने मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या रणरागिणी ताराराणी यांच्या इतिहासावर आधारित नाटकाची निर्मिती श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ(ट्रस्ट) यांच्या सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटीने केली आहे.… Read More ‘रणरागिणी ताराराणी’ रंगभूमीवर – मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा नव्या पिढीसमोर!