केम छो स्वप्नील भाय….  गुजराती सिनेमाच्या पोस्टरवर स्वप्नील जोशीचा डॅशिंग लूक

गुजराती चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधीच अभिनेता-निर्माता स्वप्नील जोशी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शुभचिंतक या आगामी गुजराती चित्रपटाच्या नव्या पोस्टरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून, स्वप्नीलचा करारी आणि डॅशिंग लूक प्रेक्षकांच्या लक्षात ठसतोय. प्रेक्षकांच्या मनात एकच सवाल – काय असणार स्वप्नीलची भूमिका? ‘सुशीला सुजीत’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना देखील शुभचिंतकमुळे स्वप्नील पुन्हा चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. मराठी… Read More केम छो स्वप्नील भाय….  गुजराती सिनेमाच्या पोस्टरवर स्वप्नील जोशीचा डॅशिंग लूक

१८ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘सुशीला-सुजीत’च्या ट्रेलरचे प्रकाशन

स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘सुशीला-सुजीत’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच एका भव्य सोहळ्यात प्रकाशित झाला. या तीन दिग्गज कलाकारांची ही पहिलीच एकत्रित झळकणारी कलाकृती असल्यामुळे ट्रेलरबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती आणि त्याला मिळालेल्या प्रतिसादावरून ही उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. हास्य, रहस्य आणि गोंधळ यांचा अफलातून… Read More १८ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘सुशीला-सुजीत’च्या ट्रेलरचे प्रकाशन

यंदाचा गुढीपाडवा स्वप्नील जोशीसाठी या कारणामुळे ठरला खास!

‘सुशीला – सुजीत’ टीमसोबत पुण्यात साजरा होणार पारंपरिक नववर्ष अभिनय, निर्मिती आणि आपल्या विनोदी-भावनिक अंदाजामुळे प्रेक्षकांच्या मनात कायम जागा असणारा स्वप्नील जोशी यंदाच्या गुढीपाडव्याला एक खास अनुभव घेणार आहे. कारण, यंदा तो ‘सुशीला – सुजीत’ या आगामी मराठी चित्रपटाच्या टीमसोबत पुण्यात नववर्ष साजरं करणार आहे. प्रमोशन आणि पारंपरिक उत्सव एकत्र सध्या ‘सुशीला – सुजीत’ चित्रपटाच्या… Read More यंदाचा गुढीपाडवा स्वप्नील जोशीसाठी या कारणामुळे ठरला खास!

‘चिकी चिकी बुबूम बुम’ मध्ये रंगणार धमाल रियुनियन पार्टी!

पार्टी म्हटलं की जंगी सेलिब्रेशन आलंच! अशाच एका धमाकेदार रियुनियन पार्टी साठी मराठीतील नामवंत कलाकार एकत्र आले आहेत. “आईच्या गावात बाराच्या भावात घरात नुसता गोंधळ हो” म्हणत या कलाकारांनी सेलिब्रेशनचा पारा फुल ऑन वाढवला आहे. “बुम बुम बुम बोंबला जीव हा टांगला” म्हणत हे कलाकार प्रत्येकाला थिरकायला लावणार आहेत. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चा धमाकेदार… Read More ‘चिकी चिकी बुबूम बुम’ मध्ये रंगणार धमाल रियुनियन पार्टी!

‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर प्रदर्शित!

रियुनियन म्हणजे धमाल-मस्ती! आणि जेव्हा बॅकबेंचर्स एकत्र येतात, तेव्हा गोंधळ, मजा आणि हास्य यांचा स्फोट होतो. अशाच एका धमाल रियुनियनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय, ज्यात ‘इकडे आड तिकडे विहीर’, ‘आगीतून फुफाट्यात’, ‘धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय’, ‘बुडत्याचा पाय खोलात’, ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणींमधून बॅकबेंचर्सची मजेशीर ओळख करून देण्यात आली आहे. या… Read More ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर प्रदर्शित!

प्रसाद ओकने उलगडल्या स्वप्नीलबद्दल खास गोष्टी!

नुकत्याच संपन्न झालेल्या जिलबी सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी सहकलाकार स्वप्नील जोशी बद्दल खास गोष्टी सांगितल्या आणि त्याच्या कामाचं भरभरून कौतुक केलं. जिलबीच्या निमित्ताने हे दोघे कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत, आणि त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. प्रसाद ओकचे स्वप्नीलबद्दल मनोगत प्रसाद ओक म्हणाले, “जिलबीच्या निमित्ताने आम्हाला पहिल्यांदा… Read More प्रसाद ओकने उलगडल्या स्वप्नीलबद्दल खास गोष्टी!

‘जिलबी’चे रहस्य १७ जानेवारीला उलगडणार, ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्कंठा!

मराठी चित्रपटसृष्टीतील नाविन्यपूर्ण विचारसरणीला अनुसरून आनंद पंडित मोशन पिक्चर्स प्रेक्षकांसाठी ‘जिलबी’ हा हटके आणि गूढतेने भरलेला चित्रपट घेऊन येत आहे. दिग्दर्शक नितीन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांच्या मनात जबरदस्त उत्सुकता निर्माण केली आहे. रहस्याचा खेळ उलगडणार “रहस्याच्या सावल्यांत दडलेला आहे खेळ, विश्वासाचा प्रवास की फसवणुकीचा जाळ?”… Read More ‘जिलबी’चे रहस्य १७ जानेवारीला उलगडणार, ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्कंठा!

जिलबी चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित

अभिनेता प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी हे दोन्ही कलाकार नेहमीच चर्चेत असतात. सध्या मात्र हे दोन्ही कलाकार एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. प्रसाद ओकच्या केसची धुरा स्वप्नील जोशी  सांभाळणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेलच नेमकं प्रकरण काय ? आणि कोणती केस? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला १७ जानेवारीला येणारा ‘जिलबी’ चित्रपट पहावा लागेल. ‘मला ना… Read More जिलबी चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित