‘हुकुमाची राणी ही’ मालिकेतील राणीने ‘असा’ साजरा केला कामगार दिन

कामगार दिनाच्या निमित्ताने मालिकेत विशेष एपिसोड ‘सन मराठी’वरील ‘हुकुमाची राणी ही’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील राणी आणि इंद्रजीत ही नवीन जोडी प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसत आहे. या मालिकेत यंदा कामगार दिनाचा विशेष भाग साजरा करण्यात येत असून मालिकेच्या कथानकातही या दिवशीला महत्त्व दिलं आहे. जयसिंगराव महाडिकचा इंद्रजीतसाठी खास प्रयोग… Read More ‘हुकुमाची राणी ही’ मालिकेतील राणीने ‘असा’ साजरा केला कामगार दिन

भारताच्या पहिल्या कीर्तन आधारित रिअ‍ॅलिटी शोची घोषणा

सोनी मराठी वाहिनीने ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या भारतातील पहिल्या कीर्तनावर आधारित रिअ‍ॅलिटी शोची घोषणा करत महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेला अनोखी मानवंदना अर्पण केली आहे. या शोमधून महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचा ठेवा रसिकांसमोर सादर होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण या रिअ‍ॅलिटी शोचा शुभारंभ आणि पु.ना. गाडगीळ यांनी हस्तनिर्मित केलेल्या वीणेच्या आकारातल्या चांदीच्या… Read More भारताच्या पहिल्या कीर्तन आधारित रिअ‍ॅलिटी शोची घोषणा

“अशक्य असं काहीच नसतं”; यंदाच्या होळीत ‘ही’ गोष्ट दहन करेन – स्नेहलता वसईकर

प्रत्येक सणाला खास स्वरूप देणाऱ्या मालिकांमध्ये यंदाची होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. विशेष म्हणजे, या सणाच्या पार्श्वभूमीवर मालिकांमध्ये रंगतदार वळणंही पाहायला मिळत आहेत. ‘सन मराठी’ वाहिनीवरील सर्वच मालिकांमध्ये रंगांचा जल्लोष आणि कथानकातील ट्विस्ट्स प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. मालिकांमध्ये रंगांची धमाल आणि कथानकातील ट्विस्ट ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेत सत्या-मंजूच्या साखरपुड्यानंतर होळी पेटवताना अचानक… Read More “अशक्य असं काहीच नसतं”; यंदाच्या होळीत ‘ही’ गोष्ट दहन करेन – स्नेहलता वसईकर

श्रेयस तळपदे’ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक, ‘चल भावा सिटीत’ या नव्या रिॲलिटीशो चे सूत्रसंचालन करणार!

श्रेयस तळपदे झी मराठीवर पुन्हा झळकणार ‘चल भावा सिटीत’ ह्या बहुचर्चित शोच्या एका प्रोमोमध्ये एक व्यक्ती पाठमोरी चालताना दिसते, ज्यावर कॅप्शन असं होतं – “तो येतोय शो गाजवायला! कोण बरं असेल तो? कंमेंट्समध्ये सांगा!” यावर अनेक युजर्सनी ‘श्रेयस तळपदे’ अशी कमेंट केली. लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेची मोठी पुनरागमनाची बातमी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेता ‘श्रेयस… Read More श्रेयस तळपदे’ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक, ‘चल भावा सिटीत’ या नव्या रिॲलिटीशो चे सूत्रसंचालन करणार!

झी चित्र गौरव पुरस्कार २०२५ – २५ व्या वर्षी भव्य आणि दिमाखदार सोहळा!

मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते, तो प्रतिष्ठित ‘झी चित्र गौरव २०२५’ सोहळा यंदा अधिक भव्य आणि दिमाखदार पद्धतीने साजरा झाला. २५ वर्षांचा समृद्ध इतिहास साजरा करत, मराठी चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञ, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि अन्य प्रतिभावान व्यक्तींच्या उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करण्यात आला. रेड कार्पेटवर दिग्गज कलाकारांची मांदियाळी या भव्य सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मराठी चित्रपटसृष्टीच्या… Read More झी चित्र गौरव पुरस्कार २०२५ – २५ व्या वर्षी भव्य आणि दिमाखदार सोहळा!

सरकार-सानिकाच्या विरोधात उभं ठाकलं कळशीगाव!

कलर्स मराठीवरील लय आवडतेस तू मला या मालिकेत साहेबरावांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर सगळ्या समीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे. सरकार, सानिका आणि संपूर्ण धुमाळ कुटुंब आप्पांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. मात्र, या कठीण परिस्थितीतही सरकार सानिकाची पुरेपूर काळजी घेत आहे. तिला कधीच एकटं वाटू नये, याची तो पूर्ण काळजी घेतो.… Read More सरकार-सानिकाच्या विरोधात उभं ठाकलं कळशीगाव!

शर्वरी लोहोकरे यांचे झी मराठीवर पुनरागमन

‘तुला जपणार आहे’ ह्या नव्या मालिकेतून शर्वरी लोहोकरे झी मराठीवर पुन्हा एकदा कमबॅक करत आहेत. त्यांच्या जोडीला नीरज गोस्वामी, प्रतीक्षा शिवणकर, मिलिंद फाटक, पूर्णिमा तळवलकर, निलेश रानडे, मनोज कोल्हटकर आणि अमोल बावडेकर ह्या दमदार कलाकारांची फौज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका आईच्या संघर्षाची रहस्यमय कथा ही मालिका एका आईच्या अंबिका नावाच्या महत्त्वाच्या पात्राभोवती फिरते. अंबिका… Read More शर्वरी लोहोकरे यांचे झी मराठीवर पुनरागमन

मराठी मालिकाविश्वात प्रथमच ‘तुला जपणार आहे’ मालिकेच्या प्रेस लाँचला होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर

झी मराठीने मराठी मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा नवा बेंचमार्क प्रस्थापित केला आहे. ‘तुला जपणार आहे’ या नव्या मालिकेच्या प्रेस लाँचच्या निमित्ताने, झी मराठीने अत्याधुनिक होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपस्थित पत्रकारांना एका अनोख्या कथाकथनाचा अनुभव दिला. हा प्रेस लाँच इव्हेंट खरोखरच आगळावेगळा आणि ऐतिहासिक ठरला. शर्वरी लोहोकरे पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करणार ‘तुला जपणार आहे’… Read More मराठी मालिकाविश्वात प्रथमच ‘तुला जपणार आहे’ मालिकेच्या प्रेस लाँचला होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर