
सणासुदी सीझन सुरू झाला असून अनेक कलाकार सध्या त्यांच्या पारंपरिक लूक्स मध्ये वावरताना दिसतात अश्यातच बॉलिवुड अभिनेत्री आहे जी तिच्या अत्याधुनिक एथनिक लुकसाठी ओळखली जाते आणि ती म्हणजे अदिती राव हैदरी. अभिनयाच्या सोबतीने फॅशन उत्तम प्रकारे कॅरी करून ती नेहमीच चर्चेत असते.

अदिती राव हैदरी ने तिच्या नेहमीच कमालीच्या एथनिक लूक्स ने सगळ्यांची मन जिंकून घेतली आहेत. कालिदार कुर्ता आणि मोठ्या आकाराच्या झुमक्यांसोबत ती उत्तम दिसतेय. पोशाखातला विंटेज लूक आणि पारंपरिक पना जपत तिने कायम फॅशन जपली आहे. मिनिमलिस्टिक मेकअपसह अदितीने या लुकसह सणाच्या सीझनमध्ये खरोखरच आकर्षक रंग आणला आहे. वर्क फ्रंटवर विजय सेतुपतीसोबत “गांधी टॉक्स” आणि संजय लीला भन्साळी सोबत “हीरामंडी” ती करणार आहे. अदिती आगामी ‘लायनेस’ या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
