
बिग बॉस 17 मधील एका हृदयस्पर्शी क्षणात अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिचा नवरा विकी जैन यांच्याबद्दल खास गोष्ट सांगून त्याच्या बद्दल मनापासून भावना व्यक्त केल्या. तिने विकीचे कौतुक करून विकी तिच्यासाठी का खास आहे हे सांगितलं आहे. अंकिता ने या वेळी विकी बद्दल प्रेम व्यक्त केलं आहे.
अंकिताने तिचा साथीदार विकी जैनने तिच्या आयुष्यात कसे परिवर्तन घडवून आणले आहे हे तर सांगितलं पण तिने विकी आणि तिच्या कुटुंबातील खास नाते संबंध यावर खास चर्चा केली. विकीचा स्वीकार आणि अंकिताच्या कुटुंबातील प्रेमामुळे त्यांच्या हृदयात त्याच्यासाठी एक खास जागा निर्माण झाली आहे. अंकिताने विकीने तिच्या आयुष्यात आणलेल्या जादुई क्षणां बद्दल तिने भावना व्यक्त केल्या आहेत. ही जादू केवळ प्रेमाबद्दल नाही तर विकी ज्या प्रकारे तिच्या आई-वडील आणि कुटुंबासह अंकिताच्या जगाचा अविभाज्य भाग बनला आहे त्यावरही आहे.
शिवाय अंकिता खेळत उत्तम कामगिरी करत आहे आणि बिग बॉस 17 मधून तिच्या चाहत्यांची मन जिंकत आहे. अंकिता लोखंडे सध्या तिच्या पुढील रिलीजची तयारी करत असून चरित्रात्मक चित्रपट ज्यामध्ये ती रणदीप हुडा सोबत विनायक दामोदर सावरकर यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. बिग बॉस हाऊसमध्ये तिचा नवरा विकी सोबत ती प्रेक्षकांची मन जिंकत असून पुढे खेळात काय होणार हे बघण उत्सुकतेच ठरत आहे.
