अप्पीला मिळणार अर्जुन कडून दिवाळी भेट!

दिवाळीची तयारी घरोघरी सुरु आहे. कुठे खमंग फराळ बनतोय, तर कुठे घराची साफसफाई सुरु आहे. ‘अप्पी आमची कलेक्टर’ ह्या मालिकेतही दिवाळी जोरावर आहे. अप्पीच्या घरात दिवाळीची साफ सफाई चालू आहे पण धुळीचा त्रास होईल म्हणून घरचे अप्पीला थोडं लांब ठेवलं जातंय. एकीकडे घरात तिला कोणही काम करायला देत नाहीयेत आणि दुसरीकडे अर्जुनने अप्पीला ऑफिसला न जाण्याचा सल्ला दिलाय, अप्पीला घरी बसुन करमत नाहीये.


आता ह्या दिवाळीत अप्पीला खुश ठेवण्यासाठी अर्जुन ह्यातुन कसा मार्ग काढेल. ह्या दिवाळीत अर्जुन अप्पीला पुन्हा कामावर जायची परवानगी देईल ? हे सगळं लवकरच तुम्हाला ‘अप्पी आमची कलेक्टर’ च्या दिवाळी खास भागात पाहायला मिळणार ६ वाजता झी मराठीवर.

Leave a comment