तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील अधिपती ऋषिकेश शेलार यांच्या आठवणीतील दिवाळी

फटाक्यांची रंगीबेरंगी आतिषबाजी, फराळाचा घमघमाट,आकर्षक देखण्या रांगोळ्या, सुंदर तेवत्या पणत्यांची आरास, घरोघरी सुंदर आकाश कंदिल सुरु झाला आहे सण दिवाळीचा. आठवण अशी गोष्ट आहे, जी कधी चेहऱ्यावर हसू आणते तर कधी डोळ्यात आनंदचे पाणी विशेषतः जेव्हा ती आठवण सणासुधीची असते. दिवाळीचा सण म्हटलं की लहानपणीच्या इतक्या आठवणी जाग्या होतात. पहाटे अभ्यंग स्नान, आईनी लावलेल्या उटण्याचा सुगंध, बाबां सोबत फटाके वाजवणे, चविष्ट फराळचा भावंडांबरोबर बसून आस्वाद घेणे. अश्या गोष्टी बहुतेकांच्या आठवणींच्या पेटीत नक्की असतील आणि अश्याच आठवणींनचा पेटारा आज तुमचे झी मराठीचे लाडके कलाकार तुमच्या समोर उघडत आहेत.

‘ऋषिकेश शेलार यांनी तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अधिपतीच्या भूमिकेतून लोकांच्या मनात घर केले आहे. दिवाळीच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, दिवाळीत शाळेच्या सुट्टीत रायगड, राजगड आणि अश्या इतर काही किल्ल्यांवर सहलीला जायचो आणि तिथे फराळ करायचो फक्त परिवारातील नाही तर कॉलनी मधले सगळे ह्या सहली मध्ये सामील असायचो पण आता शूटिंगमुळे हे सर्व शक्य नाही. मला लक्ष्यात आहे, २०१७ ची दिवाळी मी कुटुंबासोबत अमेरिकेत होतो आणि आम्ही न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर मध्ये बसून फराळ खाल्ला होता आणि मग ब्रॉडवेत नाटक पहिले होते. ह्या वर्षी माझी दिवाळी मुंबई मध्ये साजरी होणार आहे. ह्या दिवाळीत आई बाबा घरी येणार आहेत माझ्या मुलीची पहिली दिवाळी आहे रुही १० महिन्याची आहे आणि तिच्यामुळे आमची सर्वांची दिवाळी खास झाली आहे. पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणतात, रूहीचं पाऊल घरात पडले आणि माझे आयुष्य बदलून गेलं. मला झी मराठीची मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मध्ये पहिल्यांदा नायकाची भूमिका साकार करायला मिळाली. मला कडक चकल्या आवडतात आणि माझी आई माझ्यासाठी खास त्या बनवते. मला सख्खी बहीण नाही पण माझ्या मावस बहिणी माझ्या सख्ख्या बहिणी सारख्या आहेत. भाऊबीजेच्या दिवशी आमच्या कडे मटणाचा बेत असतो आणि ते ठरलेले आहे आम्ही सर्वे झणझणीत मटणावर ताव मारतो.

Leave a comment