
झी मराठी वाहिनीवर ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’२०२३ चे विजेतेपद पटकवल्यावर आपला आनंद व्यक्त करताना गौरी म्हणाली, “मला खूप आनंद होतोय की मला ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ २०२३ चा किताब मिळाला. माझ्या कडे शिक्षण नसताना ही मी इतक्या ऊंचावर पोहचली, माझ्या ह्या यशात गुरुजी सुरेश वाडकर, सलील दादा आणि वैशाली ताईची खूप मेहनत आहे. मी विजेतेपद मिळवलं यात त्यांचं श्रेय आहे. महाराष्ट्रच्या जनतेच आणि झी मराठीचे खूप खूप आभार. माझ्या आईनी खूप मेहनत घेतली आहे म्हणूनच मी इथवर पोहोचू शकले असाही गौरीने आवर्जून उल्लेख केला.”
झी मराठी वाहिनीवर ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’२०२३ चा महाअंतिम सोहळा शनिवार २५ नोव्हेंबरला पार पडला. यावेळी मुंबईची श्रावणी वागळे, गोव्याचा हृषीकेश ढवळीकर, जयेश खरे, छोटा पॅकेट मोठा धमाका देवांश भाटे, गीत बागडे आणि कोपरगावची गौरी अलका पगारे हे लिटील चॅम्प्स टॉप ६ मध्ये होते. या अटीतटीच्या स्पर्धेत कोपरगावच्या ‘गौरी अलका पगारेने’ विजेती होण्याचा मान पटकावला. यावेळी पारितोषिक म्हणून गौरीला १,५०,००० चा धनादेश आणि चांदीची वीणा देण्यात आली.
महाअंतिम सोहळ्यात पोहोचलेल्या साऱ्याच स्पर्धकांनी यावेळी एकाहून एक सरस गाणी सादर केली. मात्र, या सगळ्यात वरचढ ठरली ती गौरी अलका पगारे, प्रथम उपविजेता ठरली मुंबईची श्रावणी वागळे व द्वितीय उपविजेते पद जयेश खरेला मिळाले. मृण्मयी देशपांडे हिच्या सूत्रसंचालनाने ह्या पर्वाला अजूनच बहार आली, आणि हा महाअंतिम सोहळा देखील अगदी दिमाखात पार पडला. एकूण काय तर ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्सच’ हे पर्व स्पर्धकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय होतं.
