
रमाकांत मुंडे अध्यक्ष पदी निवडून आले, सिने स्टिल टीव्ही आणि मोशन फोटोग्राफर असोसिएशनच्या २०२४-२०२६ या वर्षासाठीच्या कार्यकारिणीची निवडणूक बेडीया स्टुडिओ जोगेश्वरी (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आली होती. सर्व सदस्यांनी मतदानात सहभाग घेतला आणि निवडून आलेले सदस्य हे आहेत – रमाकांत मुंडे (अध्यक्ष), विनोद देशपांडे (उपाध्यक्ष), अतुल राजकुळे (सचिव), अशोक कनोजिया (सहसचिव), सतीश घुसाळे (कोषाध्यक्ष), अतुल सिंग.- (सह-खजिनदार), आणि (समिती सदस्य) – फिरोज हाशमी, हिमांशू व्यास, श्याम साळवेकर, रामबचन सोनी, गिरीश वर्मा, कार्तिक दास, देवेंद्र सरकार, विनायक वेटकर, आणि पप्पू गुप्ता यांची समिती सदस्य म्हणून निवड झाली आहे.

