
स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. अक्षय आणि रमाची जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी ठरत आहे. अक्षय आणि रमाच्या या प्रेमाच्या मुरांब्यात रेवा मात्र अडसर ठरतेय. वेगवेगळी कारस्थानं करुन रमा आणि अक्षयला वेगळं करु पहाणाऱ्या रेवाच्या आयुष्यात मात्र आता नवं वादळ येणार आहे. मालिकेत रमाचा नवरा म्हणजेच अथर्वची एण्ट्री होणार आहे. अभिनेता आशय कुलकर्णी रेवाच्या नवऱ्याची म्हणजेच अथर्वची भूमिका साकारणार आहे. अथर्वच्या येण्याने मालिकेत नेमकं कोणतं नवं नाट्य घडणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. तेव्हा पाहायला विसरु नका मुरांबा दुपारी १.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
