सचिन पिळगांवकर यांना ‘स्थळ’ पसंत

सचिन पिळगावकर यांचे चित्रपट प्रस्तुतीत पदार्पण

मराठी चित्रपटसृष्टीतील आदरणीय नाव सचिन पिळगांवकर आता नवीन भूमिकेत झळकणार आहेत. अभिनय, दिग्दर्शन, आणि गायन अशा विविध क्षेत्रांमध्ये पाच दशकांहून अधिक काळ गाजवलेल्या सचिन यांनी ‘स्थळ’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित चित्रपटाच्या प्रस्तुतीद्वारे आपल्या करिअरमध्ये नवी इनिंग सुरू केली आहे. जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित ‘स्थळ’ हा चित्रपट ७ मार्च २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘स्थळ’ची यशोगाथा

‘स्थळ’ हा चित्रपट सामाजिक मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाचा टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड प्रीमियर झाला. तिथे चित्रपटाला NETPAC पुरस्कार मिळाला आणि आशिया पॅसिफिक फिल्मसाठी विशेष सन्मानही प्राप्त झाला. याशिवाय, हा चित्रपट तब्बल २९ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला असून, त्याने १६ हून अधिक पुरस्कार पटकावले आहेत.

चित्रपटाचे निर्माते आणि कलाकार

शेफाली भूषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा, आणि जयंत दिगंबर सोमलकर यांच्या निर्मितीतील हा चित्रपट नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग ढवस, आणि स्वाती उलमले यांसारख्या नव्या दमाच्या कलाकारांच्या उत्तम अभिनयाने सजला आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक जयंत दिगंबर सोमलकर, ज्यांनी यापूर्वी ‘गिल्टी माईंड्स’ या वेब सिरीजचं सहदिग्दर्शन केलं, त्यांचा ‘स्थळ’ हा पहिला मराठी चित्रपट आहे. त्यांनी यामध्ये ग्रामीण महाराष्ट्रातील वास्तववादी कथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

सचिन पिळगांवकर यांची भावना

सचिन पिळगांवकर यांनी ‘स्थळ’ बद्दल बोलताना सांगितले, “अमेरिकेतील ‘नाफा’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट पाहिला आणि तिथे उपस्थित प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून मला या चित्रपटाच्या प्रस्तुतीसाठी प्रेरणा मिळाली. चांगली संहिता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे, आणि ‘स्थळ’ या चित्रपटाने ते सिद्ध केले आहे.”

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना श्रद्धांजली

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने ‘स्थळ’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटाची संकल्पना ग्रामीण भागातील स्त्रियांच्या संघर्षांवर आधारित असून, महिला दिनाच्या निमित्ताने हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे.


‘स्थळ’चे वैशिष्ट

सामाजिक विषय आणि वास्तववादी मांडणी यांमुळे ‘स्थळ’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा मानदंड निर्माण करण्याची क्षमता बाळगतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावल्यानंतर आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडेल, याची खात्री आहे.

दर्जेदारआणि आशयघन चित्रपट ‘स्थळ’ आणि मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोडींसाठी batamiwala.com ला नक्की भेट द्या.

Leave a comment