
मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री पर्ण पेठे पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मालिकांपासून नाटकांपर्यंत आणि चित्रपटांपर्यंत तिचा अभिनय प्रवास नेहमीच स्तुत्य राहिला आहे. आगामी ‘जिलबी’ या चित्रपटात ती रुबिना या मुस्लिम मुलीच्या धाडसी भूमिकेत झळकणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित, दिग्दर्शक नितीन कांबळे यांचा हा चित्रपट १७ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
रुबिनाची भूमिका: पर्णच्या अभिनयाची नवी दिशा
‘जिलबी’मध्ये पर्णने साकारलेली रुबिना ही एक कणखर आणि धाडसी मुस्लिम मुलगी आहे. तिचा लूक आणि व्यक्तिरेखा तिच्या आतापर्यंतच्या कामांपेक्षा पूर्णतः वेगळी आहे. या भूमिकेबद्दल बोलताना पर्ण म्हणते, “मी कथेमधील वेगळेपणाला प्राधान्य देते. ‘जिलबी’मध्ये सस्पेन्स थ्रिलर जॉनर असल्यामुळे, या चित्रपटासाठी होकार दिला. मराठी सिनेविश्वात थ्रिलर चित्रपटांची उणीव आहे, आणि ‘जिलबी’ ती निश्चितच भरून काढेल.”
पर्ण पेठे: अभिनयाचा प्रवास आणि नाट्यक्षेत्रातील योगदान

पर्ण पेठे केवळ चित्रपटांसाठीच नव्हे, तर प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरील नाटकांमधील तिच्या भूमिकांसाठीही ओळखली जाते. तिच्या अभिनय प्रवासात ‘लव्ह यू’ अडलय का,.. या नाटकांचा समावेश आहे ‘चारचौघी’ या प्रतिष्ठित नाटकाने एक पर्णला वेगळी ओळख मिळवून दिली. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित या नाटकातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले.
चित्रपट क्षेत्रातही तिच्या अनेक भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत. फोटोकॉपी, रामा माधव, वायझेड आणि फास्टर फेणे’ यांसारख्या चित्रपटांमधून पर्णने तिच्या अभिनयाची क्षमता दाखवली आहे. प्रेक्षकांमध्ये तिची ओळख एक प्रयोगशील अभिनेत्री म्हणून झाली आहे, जी प्रत्येक भूमिकेत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते.
‘जिलबी’ चित्रपटाचे कलाकार आणि तांत्रिक टीम
‘जिलबी’ चित्रपटात पर्णसोबतच स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, शिवानी सुर्वे, गणेश यादव, आणि प्रणव रावराणे यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत.
चित्रपटाच्या कथा, पटकथा, आणि संवादाची जबाबदारी मच्छिंद्र बुगडे यांनी सांभाळली आहे. निर्मितीची जबाबदारी आनंद पंडित आणि रूपा पंडित यांची आहे. छायांकन गणेश उतेकर, कलादिग्दर्शन कौशल सिंग, आणि सहनिर्मितीचे काम राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळले आहे.
मराठी सिनेविश्वात सस्पेन्स थ्रिलरची भर
‘जिलबी’ हा चित्रपट केवळ एक कथा नसून, मराठी चित्रपटसृष्टीत सस्पेन्स थ्रिलर जॉनरला नवी उंची देणारा ठरणार आहे. पर्णच्या शब्दांत, “हा चित्रपट प्रेक्षकांना थरारक अनुभव देईल आणि माझ्या भूमिकेचे स्वागत होईल, याची मला खात्री आहे.”
चित्रपट, नाटक, आणि इतर मनोरंजन क्षेत्रातील अपडेट्ससाठी आमच्या batamiwala.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.
‘Parn Pethe’s powerful role in ‘Jilbi’, turned into a tough Rubin
