
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘पुन्हा कर्तव्य आहे’ प्रेक्षकांसाठी एक नवीन वळण घेऊन येत आहे. मनोरंजन क्षेत्रातील ख्यातनाम आणि जेष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची या मालिकेत धमाकेदार एन्ट्री होणार आहे. त्या गुरुमा या वेगळ्या भूमिकेत झळकणार आहेत.
गुरुमाचा प्रवेश आणि वसुंधराची परीक्षा

गुरुमा या आध्यात्मिक मार्गदर्शिका असून, माधव म्हणजे आकाशच्या वडिलांच्या बहिणी आहेत. त्यांचा कुटुंबातील मोठ्या सुनेची पारख करण्यासाठी प्रवेश होतो. जयश्री गुरुमाची जबाबदारी वसुंधरावर टाकते, वसुंधरा अपयशी ठरेल अशी तिची अपेक्षा असते. पण वसुंधरा आपली प्रामाणिकता आणि मेहनतीने गुरुमाचं मन जिंकते आणि त्यांचा विश्वास मिळवते.
गुरुमाच्या शिष्यांचं आगमन झाल्यावर वसुंधरा त्यांची योग्य काळजी घेते, ज्यामुळे गुरुमावर तिची चांगली छाप पडते. मात्र जयश्री आणि तनयाची कारस्थानं सुरूच असतात. तनया गुरुमासाठी तयार केलेलं जेवण दूषित करण्याचा प्रयत्न करते, पण वसुंधराची प्रामाणिकता आणि चिकाटी यामुळे गुरुमा तिच्यावर विश्वास ठेवतात.
अखिल, वसुंधरा आणि कुटुंबातील तणाव
या दरम्यान, वसुंधरा आणि आकाश यांच्यात तणाव निर्माण होतो. वसुंधरा मुलांसोबत पिकनिक आयोजित करण्याचा विचार करते, ज्यामुळे महत्त्वाच्या बिझनेस मिटिंग्स रद्द होतात. मात्र वसुंधरा शेवटी परिस्थिती यशस्वीरित्या हाताळते आणि ऑनलाइन मीटिंगद्वारे क्लायंटच्या समस्यांचं समाधान करते.
गुरुमा आणि वसुंधराच्या नात्याचा प्रवास
गुरुमा वसुंधरावर एक तपस्वी कार्य सोपवतात. वसुंधरा या परीक्षांना कशी सामोरी जाईल आणि गुरुमाचं मन कसं जिंकेल, हे प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक ठरणार आहे.
‘पुन्हा कर्तव्य आहे’ प्रेक्षकांसाठी खास
या मालिकेतील गुरुमाच्या एन्ट्रीने कथा अधिक रंजक होणार आहे. वंदना गुप्तेंच्या दमदार अभिनयामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची ठरणार आहे.
‘पुन्हा कर्तव्य आहे’ पाहायला विसरू नका, सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६ वाजता, फक्त आपल्या झी मराठीवर.
ताज्या मनोरंजन अपडेट्ससाठी भेट द्या: Batamiwala.com

