
मराठी चित्रपटसृष्टीत ‘घडा घडा बोलायचं’ हा हटके आणि मनोरंजनाने भरलेला म्युझिकल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री सिमरन नेरुरकर आणि आरोह वेलणकर यांचा स्टायलिश अंदाज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
चित्रपटाचं नाव जितकं अनोखं, तितकीच खास कथा
चित्रपटाचं नाव ‘घडा घडा बोलायचं’ हेच प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. मनातलं स्पष्टपणे बोलण्याच्या संकल्पनेभोवती फिरणारा हा चित्रपट एक रोमँटिक म्युझिकल ड्रामा असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन रोकडे यांनी केलं असून, पटाखा फिल्म्सच्या आरती साळगावकर आणि सुहास साळगावकर यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
स्टारकास्टचा खास जलवा

भूषण प्रधान आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो, तर सिमरन नेरुरकर, जी ‘माजा माँ’ चित्रपटात माधुरी दीक्षितच्या तरुणपणीची भूमिका साकारत झळकली होती, या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. आरोह वेलणकर, ज्यांनी ‘फ्युनरल’, ‘चंदू चॅम्पियन’ आणि ‘धर्मवीर’ सारख्या चित्रपटांमधून आपला ठसा उमटवला आहे, या चित्रपटात एका नवीन रूपात दिसणार आहे.
मजबूत तांत्रिक बाजू आणि दिग्गज कलाकारांचा सहभाग
चित्रपटाची कथा-दिग्दर्शन नितीन रोकडे यांची असून, पटकथा राकेश शिर्के आणि महेंद्र पाटील, संवाद राकेश शिर्के, तर संगीत प्रफुल्ल स्वप्नील यांनी केलं आहे. छायालेखनाची जबाबदारी मंजुनाथ नायक, कला दिग्दर्शन डेव्हिड सोरेस, आणि संपादन निलेश गावंड यांनी सांभाळलं आहे.
याशिवाय, चित्रपटात देविका दफ्तरदार, मिलिंद पाठक, किशोर चौगुले, पंकज विष्णू, आणि राहुल बेलापूरकर यांसारख्या दिग्गज कलाकारांचाही समावेश आहे.
पटाखा फिल्म्सचा पहिला मराठी प्रोजेक्ट
‘घडा घडा बोलायचं’ हा पटाखा फिल्म्सचा पहिलावहिला मराठी प्रोजेक्ट आहे. त्यांच्या या प्रयत्नाने मराठी सिनेसृष्टीत एक नवा रंग भरला जाईल, अशी अपेक्षा आहे.
प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता वाढली
‘घडा घडा बोलायचं’ चित्रपटाच्या अनोख्या कथानकामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. रोमँटिक आणि म्युझिकल चित्रपटांमध्ये हा चित्रपट एक वेगळी ओळख निर्माण करेल, यात शंका नाही.
चित्रपटाविषयी अधिक माहितीसाठी भेट द्या: batmiwala.com
