श्रीकांत यादव यांचा रोमँटिक अंदाज ‘इलू इलू’मध्ये दिसणार!

दर्जेदार आणि संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे श्रीकांत यादव आता एका रोमँटिक भूमिकेत झळकणार आहेत. आगामी ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटात त्यांचा आणि ग्लॅमरस अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिचा रोमँटिक ट्रॅक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या दोघांची एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ असून, त्यांच्या केमिस्ट्रीची धमाल बघणं प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.

रोमँटिक ट्रॅकची धमाल:

चित्रपटात श्रीकांत यादव ‘मिलिंद सुर्वे’ ही व्यक्तिरेखा साकारत असून, पहिलं प्रेम अचानक समोर आल्यावर त्याच्या जीवनात घडणाऱ्या गमतीजमतींवर ही कथा आधारित आहे. त्यांच्या या भूमिकेबद्दल ते सांगतात, “मी आणि मीरा पहिल्यांदाच एकत्र काम केलं असलं तरी आम्ही दोघांनी या अनुभवाचा भरपूर आनंद घेतला. आमच्या भूमिकांमधील केमिस्ट्री खूप मजेशीर आणि सुंदर आहे.”

प्रतिभावान कलाकार श्रीकांत यादव यांची कारकीर्द

श्रीकांत यादव हे मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील प्रतिभावान अभिनेता असून त्यांनी आपल्या अभिनयाने सिनेमा, नाटक आणि वेब सिरीजमध्ये वेगळा ठसा उमटवला आहे. ‘देऊळ’, ‘फंड्री’, ‘पिपाणी’ यांसारख्या मराठी चित्रपटांमधून ग्रामीण आणि सामाजिक विषय प्रभावीपणे मांडले, तर हिंदी सिनेमांमध्ये ‘गली बॉय’, ‘धडक’, ‘दसवी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. OTT प्लॅटफॉर्मवरही त्यांनी ‘सेक्रेड गेम्स’, ‘महारानी’, ‘भौकाल’, ‘क्रिमिनल जस्टिस’ यांसारख्या लोकप्रिय वेब सिरीजमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सहजसुंदर अभिनय आणि विविधांगी भूमिकांमुळे ते प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत. सध्या ते ‘इलू इलू’ या आगामी चित्रपटात रोमँटिक अंदाजात झळकणार आहेत, तसेच त्यांच्या काही नवीन OTT प्रोजेक्ट्ससाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

तगड्या कलाकारांची मांदियाळी:
चित्रपटात श्रीकांत यादव आणि मीरा जगन्नाथ यांच्यासोबत एली अवराम, वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात, निशांत भावसार, कमलाकर सातपुते, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, आणि सिद्धेश लिंगायत असे नावाजलेले कलाकार झळकणार आहेत.

सिनेमाची तांत्रिक बाजू

कथा, पटकथा, संवाद: नितीन विजय सुपेकर, निर्माते: बाळासाहेब फाळके, हिंदवी फाळके सहनिर्माते: यश मनोहर सणस, छायांकन: योगेश कोळी, संकलन: नितेश राठोड

फाळके फिल्म्स एंटरटेनमेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ हा धमाकेदार चित्रपट येत्या ३१ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मनोरंजनाच्या ताज्या अपडेट्ससाठी Batamiwala.comला भेट द्या!

Leave a comment